कृषिगाथा | महाराष्ट्र सेवक

शेतकरी कर्जमाफी योजना २०२६: तिसऱ्या टप्प्यात ३,२७,२५० शेतकरी कर्जमुक्त

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत राज्य सरकारने तिसऱ्या टप्प्यातील कर्जमाफीची प्रक्रिया यशस्वीरीत्या सुरू केली. या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील ३ लाख २७ हजार २५० पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात आले. त्यांच्यासाठी ३ हजार १६० कोटी ४३ लाख रुपयांच्या लाभाचे वितरण यशस्वीरीत्या सुरू झाले आहे. या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा झाला असून, योजनेमुळे राज्यभरातील हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या लाभाचे वितरण करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जात असून थेट मुख्यमंत्री स्तरावरून यावर नियंत्रण व देखरेख ठेवली जात आहे. अजूनही पात्र लाभार्थ्यांची यादी व संख्या सातत्याने अद्ययावत (अपडेट) केली जात असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही टप्प्याटप्प्याने लाभ दिला जाणार आहे.

१५ लाख ८५ हजार ४९३ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

शेतकरी कर्जमाफी योजनेच्या पहिल्या टप्प्यात ६ लाख २२ हजार २०७ पात्र शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटी रुपयांचा, दुसऱ्या टप्प्यात ६ लाख ३६ हजार ३६ पात्र शेतकऱ्यांना ५ हजार ८६ कोटी रुपयांचा कर्जमुक्ती लाभ देण्यात आला आहे. तर आता तिसऱ्या टप्प्यात ३ लाख २७ हजार २५० पात्र शेतकऱ्यांना ३ हजार १६० कोटी ४३ लाख रुपयांच्या कर्जमुक्तीचे वितरण सुरू केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत आतापर्यंत राज्यातील एकूण १५ लाख ८५ हजार ४९३ शेतकऱ्यांना १३ हजार २७५ कोटी रुपयांचा कर्जमुक्ती लाभ वितरित करण्यात आला आहे.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *