• facebook
  • twitter
  • instagram
  • youtube
Skip to content
  • July 6, 2026
  • होम
  • facebook
  • twitter
  • instagram
  • youtube
Devgatha

सृजनशील विचारांचा प्रवाह स्रोत

  • होम
  • इन्फ्रा मॅन
    • मेट्रो मॅन
      • मुंबई मेट्रो टाईमलाईन
      • पुणे मेट्रो टाईमलाईन
      • नागपूर मेट्रो टाईमलाईन
      • नवी मुंबई मेट्रो टाईमलाईन
    • समृद्धी महामार्ग
    • अटल सेतू
    • मुंबई कोस्टल रोड
    • नवी मुंबई एअरपोर्ट
    • मुंबई-पुणे मिसिंग लिंक
    • बीडीडी चाळ प्रकल्प
    • वाढवण प्रकल्प
    • शक्तीपीठ महामार्ग
    • ठाणे-बोरिवली टनेल
    • पुणे रिंग रोड
    • मुंबई रेल्वे
    • तिसरी मुंबई
    • महामुंबई इन्फ्रा
    • वॉटर मेट्रो
    • धारावी पुनर्विकास
    • रमाबाई कॉलनी पुनर्विकास
    • नवी मुंबई एज्युसिटी
    • उत्तन – विरार सागरी सेतू
    • विरार – अलिबाग कॉरिडॉर
    • ग्रीन फिल्ड महामार्ग
    • महाराष्ट्र रस्ते विकास
      • राष्ट्रीय महामार्ग
      • राज्य महामार्ग
      • मुख्यमंत्री ग्राम सडक योजना
    • महाराष्ट्र विमानतळ विकास
    • लॉजिस्टिक हब
    • सर्वांसाठी घरे
    • मिहान प्रकल्प
    • विकसित महाराष्ट्र-इन्फ्रा
  • सामाजिक न्यायगाथा
    • मराठा
    • ओबीसी
    • धनगर
    • एससी
    • एसटी
    • दिव्यांग
    • अनाथ
    • महिला सक्षमीकरण
      • लाडकी बहीण टाईमलाईन
  • वॉटर मॅन
    • जलयुक्त शिवार
    • मागेल त्याला शेततळे
    • मराठवाडा वॉटर ग्रिड
    • जिहे- कठापूर
    • निळवंडे धरण
    • नदीजोड प्रकल्प
  • कृषिगाथा
  • उत्तम प्रशासक
    • अर्थमंत्री
    • गृहमंत्री
    • ऊर्जामंत्री
      • सोलर मॅन
    • जलसंपदा मंत्री
    • सीएम फेलोशिप
    • मुख्यमंत्री संवाद सेतु
    • मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी
    • रोजगार गाथा
    • गुंतवणूक गाथा
    • क्रीडागाथा
      • दहीहंडी टाईमलाईन
    • नक्षलमुक्त महाराष्ट्र
  • व्यक्तिमत्त्व
    • लिडरशिप
      • राजकीय प्रवास
    • निष्ठावान कार्यकर्ता
    • हिंदुत्ववादी
    • अभ्यासू व्यक्तिमत्व
    • प्रगतीशील
    • विनम्र
    • टेकसॅव्ही
    • फॅमिली मॅन
    • लेखक
  • एफबीआय
  • जनगाथा
  • विजयगाथा
  • मानवगाथा
  • महाराष्ट्र सेवक
    • अहिल्यानगर
    • अकोला
    • अमरावती
    • भंडारा
    • बीड
    • बुलढाणा
    • चंद्रपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • धाराशिव
    • धुळे
    • गडचिरोली
    • गोंदिया
    • हिंगोली
    • जळगाव
    • जालना
    • कोल्हापूर
    • लातूर
    • मुंबई
    • नागपूर
    • नागपुर दक्षिण पश्चिम
    • नांदेड
    • नंदुरबार
    • नाशिक
    • पालघर
    • परभणी
    • पुणे
    • रायगड
    • रत्नागिरी
    • सांगली
    • सातारा
    • सिंधुदुर्ग
    • सोलापूर
    • ठाणे
    • वर्धा
    • वाशिम
    • यवतमाळ
नवी मुंबई मेट्रो

नवी मुंबई मेट्रोचा उदय आणि ‘इन्फ्रा मॅन’ देवेंद्र फडणवीस यांचे गतिमान योगदान

नवी मुंबई मेट्रोचा उदय आणि 'इन्फ्रा मॅन' देवेंद्र फडणवीस यांचे गतिमान योगदान

नवी मुंबई मेट्रो प्रकल्प हा या शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा चेहरा बदलणारा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. २०१० मध्ये या प्रकल्पाची अधिकृत सुरुवात झाली असली, तरी सुरुवातीच्या काळात भूसंपादन, तांत्रिक परवानगी आणि कंत्राटदारांचे अंतर्गत वाद यामुळे हा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर रखडला होता. मात्र, ऑक्टोबर २०१४ मध्ये महाराष्ट्रात सत्ताबदल झाला आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी राज्यातील प्रलंबित इन्फ्रा प्रकल्पांना गती देण्यासाठी ‘वॉटरशेड’ निर्णय घेतले, म्हणूनच त्यांना ‘इन्फ्रा मॅन’ म्हणून ही ओळखले जाते. देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील प्रशासकीय अडचणी दूर करून आणि उच्चस्तरीय बैठकांच्या माध्यमातून विविध तांत्रिक मंजुऱ्यांचा मार्ग मोकळा केला. त्यांच्या याच दूरदृष्टी आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मरगळ आलेल्या या प्रकल्पाला कमालीची गती मिळाली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात या प्रकल्पाचे काम खूपच रखडले. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च १,९८४ कोटी रुपयांवरून थेट ३,०६३ कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला. नवी मुंबई मेट्रो मार्ग १ सीबीडी बेलापूर ते पेंढार दरम्यानचा ११.१ किलोमीटरचा उन्नत मार्ग पूर्ण झाला आहे. या मार्गावर ११ स्टेशन्स बांधण्यात आली आहेत. आज हा मार्ग नवी मुंबईतील मेट्रो नेटवर्कचा पाया ठरला आहे. यापुढील टप्प्यांमध्ये नवी मेट्रोचा विस्तार होऊन हा मार्ग तळोजा आणि कळंबोलीमार्गे थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडला जाणार आहे.



         
२०१०  
         
२०११  
         
२०१४  
Year Icon   २०१५  
         
२०१९  
Year Icon   २०२३   Year Icon   २०२६  
सप्टेंबर
मे ऑक्टोबर
ऑक्टोबर
जानेवारी
सप्टेंबर
नोव्हेंबर
जून
२०१०
नवी मुंबई मेट्रो
३० सप्टेंबर २०१०

सिडकोची नवी मुंबई मेट्रोसाठी सल्लागार म्हणून निवड

महाराष्ट्र सरकारने भारतीय ट्राम वे कायदा, १८८६ अंतर्गत नवी मुंबई सार्वजनिक जलद वाहतूक यंत्रणेच्या अंमलबजावणीसाठी सिडकोची नेमणूक केली. तसेच नवी मुंबईचा मुंबईशी संपर्क वाढविण्यासाठी मेट्रो मार्गिकेचा विचार केला. यासाठी दिल्ली मेट्रो रेल महामंडळाला (डीएमआरसी) मेट्रोच्या तांत्रिक सल्लागारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

Read More
२०११
१ मे २०११

नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते १ मे २०११ रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. २०१४ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट तत्कालीन राज्य सरकारने ठरवले होते.

Read More
नवी मुंबई मेट्रो विस्तार
ऑक्टोबर २०११

मेट्रोचा अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर

दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) नवी मुंबई मेट्रोचा अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) ऑक्टोबर २०११ रोजी सिडको प्रशासनाकडे सादर केला.

Read More
नवी मुंबई मेट्रो
२८ ऑक्टोबर २०११

मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात

१ मे २०११ रोजी नवी मुंबई मेट्रोचे भूमिपूजन केल्यानंतर तब्बल ६ महिन्यांनी या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामाच्या कामाला सुरुवात झाली.

Read More
२०१४
नवी मुंबई मेट्रो विस्तार
ऑक्टोबर २०१४

कंत्राटदार आणि कामांमधील अडचणी

मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनानंतरच्या काळात भूसंपादन, निधीची कमतरता आणि कंत्राटदारांचे अंतर्गत वाद यामुळे प्रकल्पाचा वेग कमालीचा मंदावला आणि अंतिम मुदत वारंवार पुढे ढकलावी लागली.

Read More
२०१५
नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्प
९ जानेवारी २०१५

मेट्रो रेल्वे अधिनियमांतर्गत अधिकृत घोषणा

भारत सरकारच्या नागरी विकास मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार, नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्प, मार्गिका-१, मार्ग क्र. १ (बेलापूर ते पेंढार) याच्या नकाशाची समन्वय घोषणा. दि मेट्रो रेल्वे (कामांचे बांधकाम) अधिनियम, १९७८ च्या कलम ३२ अंतर्गत उपरोक्त प्रकल्प मेट्रो अधिनियमांतर्गत विकसित करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले. ऑक्टोबर २०१४ नंतर राज्यात सत्ताबदल झाला आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले. या काळात त्यांनी राज्यातील इन्फ्रा प्रकल्पांना कमालीचा वेग दिला.

Read More
२०१९
नवी मुंबई मेट्रो
११ सप्टेंबर २०१९

नवी मुंबई मेट्रोची पहिली यशस्वी ट्रायल रन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तळोजा मेट्रो डेपो ते स्थानक क्र. ११ दरम्यान मेट्रोची पहिली चाचणी यशस्वीरीत्या घेण्यात आली.

Read More
२०२३
बेलापूर ते पेंढार (लाईन-१) मार्ग
१७ नोव्हेंबर २०२३

बेलापूर ते पेंढार (लाईन-१) मार्ग प्रवाशांसाठी खुला

बेलापूर ते पेंढार हा पहिल्या टप्प्यातील ११ किलोमीटरचा मेट्रो मार्ग (११ स्टेशन्स) प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. कोणत्याही मोठ्या औपचारिक उद्घाटन सोहळ्याची वाट न पाहता, महायुती सरकारने १६ नोव्हेंबर रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ही सेवा १७ नोव्हेंबरपासून, कोणत्याही उद्घाटनाविना सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात झाली.

Read More
२०२६
नवी मुंबई मेट्रो मार्गिका
२२ जून २०२६

नवी मुंबई मेट्रो मार्गिका २ आणि १-अ च्या ५५७५ कोटींच्या प्रकल्पास मान्यता

नवी मुंबई मेट्रो मार्गिका- २अ (बेलापूर ते सागर संगम, ३.०२ किमी) आणि नवी मुंबई मेट्रो मार्गिका – २ (पेंढार ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, १४.०७ किमी) या एकूण लांबी १७.०९ किमी, १२ उन्नत स्थानके (नवी मुंबई मेट्रो मार्गिका – १ अ चे १ स्थानक + नवी मुंबई मेट्रो मार्गिका – २ ची ११ स्थानके) असलेल्या एकूण ५,५७५.00 कोटी प्रकल्प पूर्णत्व किमतीच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पांची मुंबई मेट्रो रेल कॉपोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) मार्फत अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच सदर प्रकल्पासाठी केंद्र सरकारमार्फत निधी प्राप्त करून घेण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) यांना प्राधिकृत करण्यात आले. या प्रकल्पाला महत्त्वपूर्ण सार्वजनिक प्रकल्प आणि महत्त्वपूर्ण शहरी वाहतूक प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. तर या प्रकल्पासाठी सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली.

Read More


अडथळ्यांवर मात करत नवी मुंबई मेट्रोचा यशस्वी प्रवास

अनेक तांत्रिक, वित्तीय आणि प्रशासकीय आव्हानांचा सामना करत अखेर १७ नोव्हेंबर २०२३ रोजी नवी मुंबई मेट्रोची बेलापूर ते पेंढार (लाईन-१) ही पहिली मेट्रोलाईन सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेत दाखल झाली. कोणत्याही औपचारिक उद्घाटन सोहळ्याची वाट न पाहता महायुती सरकारने ही सेवा थेट जनतेसाठी खुली करून एक नवा आदर्श घालून दिला. हा प्रकल्प आता फक्त लाईन-१ पुरताच मर्यादित राहिलेला नाही. तर २२ जून २०२६ रोजी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे या नेटवर्कचा आणखी विस्तार होणार आहे. मार्गिका-२ आणि १-अ च्या मंजुरीमुळे आता ही मेट्रो थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सागर संगम परिसराला जोडली जाणार आहे. सुरुवातीच्या विलंबाकडून गतीमान झालेला नवी मुंबई मेट्रोचा प्रवास उल्लेखनीय आहे.



    तुमच्या माहितीला नवा आयाम द्या!

    आजच सबस्क्राईब करा, देवगाथा!

    ‘देवगाथा’विषयी

    टाईमलाईन

    • मराठा आरक्षण
    • समृद्धी महामार्ग
    • जलयुक्त शिवार अभियान
    • ओबीसी निर्णय
    • धनगर निर्णय
    • सीएम फेलोशिप कार्यक्रम
    • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना

    टाईमलाईन

    • मराठा आरक्षण
    • वाढवण प्रकल्प
    • जलयुक्त शिवार अभियान
    • मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी
    • विजयगाथा
    • इतर टाईमलाईन…

    • अनाथ आरक्षण
    • दहीहंडी साहसी खेळ
    • मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी
    • दिव्यांग निर्णय
    • वाढवण प्रकल्प
    • मुंबई मेट्रो
    • मिहान प्रकल्प
    • ऊर्जा विभाग निर्णय
    • पुणे मेट्रो
    • विजयगाथा
    • नागपूर मेट्रो
    • मुंबई कोस्टल रोड
    • गुंतवणूक गाथा
    • इतर टाईमलाईन…

    Devgatha
    • facebook
    • twitter
    • instagram
    • youtube
    Copyright © 2026 Devgatha. All Rights Reserved