महाराष्ट्रातील जलसंपत्तीचे नियोजन प्रभावीपणे करण्यासाठी आणि दुष्काळग्रस्त भागांना पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नदीजोड प्रकल्प सुरू करण्यात आला. या संकल्पनेची सुरुवात सर्वप्रथम २००५ मध्ये जळगाव...
महाराष्ट्राचे वॉटर मॅन म्हणून परिचित असलेले नेते देवेंद्र फडणवीस यांनी जलसंधारण आणि पाण्याच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी केलेले काम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागासाठी क्रांतिकारी ठरले. जलयुक्त शिवार योजना ही दुष्काळग्रस्त भागातील लोकांसाठी संजीवनी ठरली. देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी आणि प्रशासकीय कौशल्यामुळे जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून हजारो गावांमधील जलसाठे पुनर्जिवित झाले, आटलेल्या विहिरींना पाझर फुटला, पाणी आले आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.
२०१४ मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा चंग बांधला होता. यासाठी त्यांनी विविध प्रकारच्या योजना आणल्या. त्या यशस्वीरीत्या राबवल्या आणि त्यातून महाराष्ट्राला पाणी सुद्धा उपलब्ध करून दिले. यात जलयुक्त शिवार योजनेचा वाटा मोठा आहे. महाराष्ट्रातील या योजनेच्या यशानंतर इतर राज्यांनीही ही योजना स्वीकारली. जलयुक्त शिवार योजनेबरोबरच मागेल त्याला शेततळे, मराठवाडा वॉटर ग्रीड, साताऱ्यातील माण-खटाव तालुक्यासाठी राबवलेली जिहे-कठापूर योजना, तर ५० – ६० वर्षांपासून प्रशासकीय फेऱ्यात अडकलेले निळवंडे धरण मार्गी लावून देवेंद्रजींनी त्या त्या भागातील पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजना केल्या. त्यामुळे संबंध महाराष्ट्र त्यांना वॉटर मॅन म्हणून ओळखतो. त्यांनी फक्त योजना जाहीर केल्या नाहीत, तर त्याची काटेकोर अंमलबजावणी करून लोकांना पाणी उपलब्ध करून दिले. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागात पावसाचे प्रमाण कमी असूनही त्यांनी शाश्वत असे जलस्रोत निर्माण केले. त्यामुळेच वॉटर मॅन देवेंद्र फडणवीस हे नाव आता जलक्रांतीचे दुसरे रुप ठरू लागले आहे. त्यांच्या या कामामळे पाणी हा आता संघर्ष राहिला नाही; तर तो आता महाराष्ट्राच्या विकासाचा स्त्रोत ठरू लागला आहे.
महाराष्ट्रातील जलसंपत्तीचे नियोजन प्रभावीपणे करण्यासाठी आणि दुष्काळग्रस्त भागांना पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नदीजोड प्रकल्प सुरू करण्यात आला. या संकल्पनेची सुरुवात सर्वप्रथम २००५ मध्ये जळगाव...
सातारा जिल्ह्यातील माण आणि खटाव तालुके गेल्या अनेक वर्षांपासून तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात होते. अत्यल्प पर्जन्यमानामुळे येथील शेतकरी आणि ग्रामस्थांना कायमच पाण्यासाठी संघर्ष...
जलयुक्त शिवार योजना हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाकांक्षी जलसंधारण आणि जलव्यवस्थापनाचा प्रकल्प आहे. याची सुरूवात २०१५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. राज्यातील शेतकऱ्यांना...
पाण्याची अनिश्चित उपलब्धता, वारंवार भेडसावणारा दुष्काळ आणि शेतीसमोरील जलसंकट या पार्श्वभूमीवर गोदावरीच्या पाण्याचा नियोजनबद्ध वापर…
महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील अवर्षणग्रस्त भागासाठी वरदान ठरलेल्या कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या उर्वरित कामांना वेग देण्यासाठी आणि शेतीला…
नर्मदा नदीच्या पाण्याचा आणि प्रकल्पाच्या खर्चाचा प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर सुटला असून, महाराष्ट्राच्या…
महाराष्ट्र जशी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. तशीच ती नद्यांची भूमी म्हणूनही परिचित आहे. आपल्या…
राज्यातील कोरडवाहू शेतीला सिंचनाचे शाश्वत कवच मिळवून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प…
वॉटर मॅन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने जलसंवर्धनाच्या क्षेत्रात देशात निर्माण केलेला आदर्श आज…
महाराष्ट्रातील समृद्ध जलस्त्रोतांचे संरक्षण करण्याबरोबरच भविष्यातील पिढ्यांसाठी नद्यांचे पुनरुज्जीवन करणे ही आज काळाची गरज बनली…
वॉटर मॅन म्हणून ओळखले जाणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सिंचन व्यवस्थेमध्ये ऐतिहासिक पाऊल उचलत…
विदर्भातील शेतकऱ्यांच्या भवितव्याशी निगडित असलेला गोसीखुर्द राष्ट्रीय दर्जा प्रकल्प (Gosikhurd National Irrigation Project) हा महाराष्ट्रातील…