ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचा ऐतिहासिक प्रवास
ठाणे - बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचा ऐतिहासिक प्रवास
मुंबई आणि ठाणे या दोन प्रमुख शहरांमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी ‘ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प’ (Twin Tube Tunnel Project) हा पायाभूत सुविधा क्षेत्रातील एक मैलाचा दगड ठरत आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणारा हा ठाणे-बोरिवली बोगदा देशातील सर्वात लांब नागरी रस्ते बोगदा प्रकल्प आहे. सुमारे ११.८५ किमी लांबीचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केवळ दोन शहरांमधील अंतर कमी करणार नाही, तर इंधनाची बचत आणि प्रदूषण नियंत्रणातही मोठे योगदान देणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचे इन्फ्रा मॅन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे योगदान अत्यंत मोठे आणि महत्त्वपूर्ण राहिले आहे. २०१५ मध्ये त्यांच्याच कार्यकाळात या प्रकल्पाच्या प्रस्तावाला पहिली मंजुरी मिळाली आणि पुढे हा प्रकल्प मार्गस्थ लागला. त्यानंतरच्या काळातही प्रकल्पातील विविध तांत्रिक अडचणी सोडवणे, पर्यावरण व वन्यजीव मंडळाच्या मंजुऱ्या जलदगतीने मिळवून देणे, निधीची उपलब्धता आणि थेट टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) ‘नायक’ द्वारे प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ करून घेण्यात त्यांनी विशेष पाठपुरावा केला. १६,६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर साकारत असलेल्या या प्रकल्पाचा २०१५ मधील संकल्पनेपासून ते २०२६ मधील प्रत्यक्ष खोदकामाच्या शुभारंभापर्यंतचा संपूर्ण प्रवास दर्शवणारी सविस्तर टाईमलाईन वाचा.
ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाची वैशिष्ट्ये
ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाची एकूण लांबी ११.८४ किमी आहे. ज्यामध्ये १०.२५ किमी लांबीचा दुहेरी बोगदा आणि १.५९ किमी लांबीचे जोड रस्ते समाविष्ट आहेत.
सध्या ठाणे ते बोरिवली प्रवासासाठी १ ते दीड तास लागतो. या भुयारी मार्गामुळे हे अंतर अवघ्या १५ मिनिटांत पार करता येणार.
या मार्गावरील वाहतुकीसाठी दोन स्वतंत्र बोगदे असणार आहेत. प्रत्येक बोगद्यात ३ लेन (२ ट्रॅफिक लेन आणि १ आपत्कालीन लेन) असणार.
हा मार्ग घोडबंदर रोड (ठाणे) ते वेस्टर्न एक्सप्रेस (बोरिवली) हायवे बोगदा असा असणार. ज्यामुळे मुंबई – ठाणे वाहतूक कोंडीवर उपाय मिळणार.
राष्ट्रीय उद्यानाला किंवा पर्यावरणाला बाधा पोहोचू नये म्हणून उन्नत टनल बोरिंग मशिनचा वापर केला जात आहे.
बोगद्यामध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा, स्मोक डिटेक्टर्स आणि एलईडी माहिती फलक यांसारख्या आधुनिक सुविधा असणार आहेत.
या प्रकल्पाचा अंदाजित खर्च १६,६०० कोटी रुपये आहे.
सप्टेंबर
नोव्हेंबर
एप्रिल
एप्रिल
मे
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
डिसेंबर
मार्च
मे
ऑक्टोबर
फेब्रुवारी
जुलै
ऑक्टोबर
एप्रिल
२०१५
२३
सप्टेंबर २०१५
ठाणे बोरिवली भुयारी मार्ग प्रस्तावास मंजुरी
ठाणे ते बोरिवली हे अंतर पार करण्यासाठी ठाणे ते बोरिवली अशा सहापदरी भुयारी मार्गांचे बांधकाम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC) हाती घेण्याच्या प्रस्तावास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या १५० व्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
Read More
३०
नोव्हेंबर २०१५
‘एमएसआरडीसी’ची कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून घोषणा
मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत सदर प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास (MSRDC) कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून घोषित करण्यात आले.
Read More
२०१६
११
एप्रिल २०१६
डीपीआरसाठी तज्ज्ञ सल्लागाराची नेमणूक
सदर प्रकल्पाचा सविस्तर सुसाध्यता अहवाल (Feasibility Report) व सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार म्हणून मे. एईकॉम एशिया कंपनी लिमिटेड यांची नेमणूक करण्यात आली.
Read More
२०१९
१५
एप्रिल २०१९
पर्यावरण ना-हरकत प्रक्रियेत सवलत
केंद्रीय पर्यावरण व वन विभागाच्या सुधारित अधिसूचनेनुसार (१ डिसेंबर २००९) पर्यावरण ना-हरकत प्राप्त करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यावर पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव यांनी सदर प्रकल्पासाठी पर्यावरण ना हरकत दाखल्याची आवश्यकता नसल्याचे कळवले.
Read More
मे २०१९
पर्यायी वनीकरणासाठी जमीन हस्तांतरण
ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या बांधकामात बाधित होणाऱ्या वन जमिनीच्या बदल्यात पर्यायी वनीकरणासाठी उमरावती, फुलंब्री (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील सुमारे ६० हेक्टर गायरान जमीन उप वनसंरक्षक, औरंगाबाद वन विभाग यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आली.
Read More
२०२०
७
जुलै २०२०
‘एमएमआरडीए’कडे प्रकल्प हस्तांतरण मंजुरी
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) १४९ व्या बैठकीत ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यास मंजुरी देण्यात आली.
Read More
१९
ऑगस्ट २०२०
ठाणे – बोरिवली ट्विन ट्युब टनेल प्रकल्प अधिकृतरीत्या हस्तांतरित
ठाणे – बोरिवली ट्विन ट्युब टनेल प्रकल्पाची सद्यस्थिती, सल्लागार नेमणूक, सल्लागाराच्या कामाचा वाव, निविदा प्रक्रिया आदी पुढील कार्यवाहीसाठी हा प्रकल्प अधिकृतरीत्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला.https://devgatha.in/wp-content/uploads/2026/06/thane-borivali-tunnel-gr-2015-devgatha.pdf
Read More
२०२२
५
सप्टेंबर २०२२
वन्यजीव मंडळाकडे सुधारित प्रस्ताव
नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफची परवानगी नियमावलीनुसार तसेच वन विभागाच्या परवानगी नियमावरीलनुसार ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सुधारित प्रस्ताव मंजुरीकरीता पाठवण्यात आला.
Read More
१४
ऑक्टोबर २०२२
भूसंपादन आणि संयुक्त मोजणी
सरकारी जागेसोबतच खाजगी जागेचा भूसंपादनाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील मानपाडा गावातील संयुक्त मोजणी पूर्ण करण्यात आली असून भूसंपादनाचे काम प्रगतीपथावर आहे.
Read More
डिसेंबर २०२२
नागरी बांधकाम आणि प्रकल्पपूर्तीसाठी निविदा प्रसिद्ध
एमएमआरडीएने २ सिव्हिल पॅकेज अंतर्गत नागरी बांधकामासह ४ वर्षात काम पूर्ण करण्याच्या मुदतीसह निविदा मागवल्या. प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत १३,२०० कोटी इतकी आहे.
Read More
२०२३
२४
मार्च २०२३
प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता
ठाणे ते बोरिवली दरम्यान दोन भुयारी मार्ग, बोगद्याजवळचा मार्ग व इतर नागरी बांधकामासाठी या प्रकल्पाच्या एकूण अंदाजित १६,६००.४० कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता देण्यात आली.
Read More
४
मे २०२३
मेघा इंजिनिअरिंगला ठाणे – बोरिवली दुहेरी बोगद्याचे काम सुपूर्द
मेघा इंजिनिअरिंग (MEIL) कंपनीने एकूण १४,४०० कोटी रुपयांची बोली लावून दोन स्वतंत्र पॅकेजेस (पॅकेज १: ६,१७८ कोटी आणि पॅकेज २: ५,८७९ कोटी) मिळवले. एल अॅण्ड टी आणि एमईआयएल पैकी कमी बोली असलेल्या एमईआयएलला काम सोपवण्याचा निर्णय झाला.
ठाणे जिल्ह्यातील टिकुजीनीवाडी ते मुंबई उपनगर जिल्ह्यातील बोरीवली पर्यंत प्रत्येक बाजूला बोगदा २ लेन तयार करण्यासाठी वन्यजीव मान्यतेचा प्रस्ताव प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्या कार्यालयाकडून मंजूर. राज्य वन्यजीव मंडळाची २२ वी बैठक १६ ऑक्टोबर २०२३ रोजी संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये प्रस्तुत प्रस्तावावर मंडळाने चर्चा करुन, प्रस्तुत प्रस्तावाचे अनुषंगाने, मंडळाने मुख्य वन्यजीव रक्षक, महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या अटी व शर्तीच्या अधिन राहून सदर प्रस्ताव राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे सादर करण्याची मंडळाने शिफारस केलेली आहे.
Read More
२०२४
७
फेब्रुवारी २०२४
केंद्रीय वन विभागाचा दुहेरी बोगदा प्रकल्पाला हिरवा कंदील
जीव मंडळाच्या स्थायी समितीची ७७ वी बैठक ३० जानेवारी २०२४ रोजी माननीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत केंद्रीय वन विभागाने ठाणे – बोरिवली दुहेरी भुयारी मार्ग प्रकल्पाला अधिकृत मंजुरी दिली.
पंतप्रधानांच्या हस्ते ठाणे – बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन
मुंबईतील पश्चिम उपनगरांना थेट ठाण्याशी जोडणाऱ्या १६,६०० कोटी रुपयांच्या या ऐतिहासिक ट्विन टनेल प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. हे काम २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
११.८५ किमी एकूण लांबीच्या (१०.२५ किमी बोगदा + १.६० किमी जोडरस्ता) आणि १८,८३८.४० कोटी एकूण किमतीच्या या प्रकल्पासाठी राज्य सरकारने २४१७ कोटी रुपयांचे बिनव्याजी दुय्यम कर्ज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली.
Read More
२०२६
७
एप्रिल २०२६
टीबीएम ‘नायक’द्वारे खोदकामाचा शुभारंभ
‘टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) – नायक’ च्या लाँचिंगसह भारतातील सर्वात लांब नागरी रस्ते बोगदा असलेल्या ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या टनेलिंगच्या प्रत्यक्ष खोदकामाला ऐतिहासिक सुरुवात झाली.
अत्याधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक नियोजन आणि खंबीर राजकीय इच्छाशक्ती यांच्या बळावर साकारला जाणारा ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प जेव्हा २०२८ मध्ये पूर्णत्वास येईल, तेव्हा तो मुंबई-ठाणेकरांचा प्रवास सुकर करण्यासोबतच देशातील सर्वोत्तम अभियांत्रिकी कौशल्याचे एक उत्तम उदाहरण म्हणून ओळखला जाईल.