कृषिगाथा

शेतकरी कर्जमाफी योजना २०२६: चौथ्या यादीत १,१५,६९७ शेतकरी पात्र

राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत एकापेक्षा जास्त बँकांमध्ये कर्ज खाती आणि २ लाखापेक्षा कमी थकबाकी असलेल्या १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांची चौथी यादी आधार प्रमाणीकरणासाठी जाहीर केली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत आतापर्यंत १५.८५ लाख शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी योजना २०२६चा लाभ मिळाला आहे. तर या पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर देवेंद्र फडणवीस सरकारकडून १३,२७५ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. कर्जाच्या अपडेट व इतर गोष्टींच्या माहितीकरीता महाआयटी विभागाने तयार केलेल्या पोर्टलवर बँकांनी आतापर्यंत ३१.१७ लाख थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. राज्य सरकारने पहिल्या यादीत १६ लाख ९६ हजार २०१, दुसऱ्या यादीत ४ लाख १९ हजार ७३७, तिसऱ्या यादीत ३ लाख ५१ हजार १९२ अशा एकूण २४ लाख ६७ हजार १३० पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत.

चौथ्या यादीतील महत्त्वाची वैशिष्ट्ये

  • कर्जमुक्तीच्या चौथ्या यादीत राज्यातील १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांचा समावेश. 
  • एकापेक्षा अधिक बँकांमध्ये पीककर्ज खाती असलेल्या आणि २ लाखांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचा या यादीत समावेश.
  • चार याद्यांमधून एकूण २५ लाख ८२ हजारांहून अधिक शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्.
  • १५.८५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर १३,२७५ कोटी रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा.
  • चौथ्या यादीतील शेतकऱ्यांच्या कर्जबाकीची रक्कम ३१ मार्च २०२६ रोजीची. 
  • १ एप्रिल २०२६ नंतरचे व्याज व इतर खर्च माफ होणार.

आपले नाव कसे तपासाल?

  • चौथी यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध.
  • लाभार्थी यादी कर्ज घेतलेल्या बँकेची शाखा, सोसायटी कार्यालय आणि ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध.
  • ज्यांचे नाव चौथ्या यादीत आहे, त्यांनी नजीकच्या ‘आपले सरकार’ सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करावे. 
  • किंवा कर्ज घेतलेल्या बँकेत जाऊन आधार बायोमेट्रिक ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *