कृषिगाथा | महाराष्ट्र सेवक

राज्यातील दीड कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी ५ हजारांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना यंदाच्या दिवाळीपूर्वी राज्य सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दुष्काळी परिस्थितीने होरपळलेल्या दीड कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची अग्रिम (अ‍ॅडव्हान्स) मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिवळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी तब्बल ७५०० कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र दुष्काळग्रस्त शेतकरी आर्थिक मदत योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये डीबीटीद्वारे देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सेवक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या या निर्णयामुळे ऐन सणासुदीच्या काळात संकटात सापडलेल्या बळीराजाला मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.

३०४ तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना सरसकट मदत

राज्य सरकारकडून दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. सद्यस्थितीत पिकांच्या नुकसानीचा वर्गवारीनुसार आणि क्षेत्रनिहाय अंतिम तपशील निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण प्रक्रिया सुरू आहे. पण या सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल येण्यास आणि पूर्ण मदत मिळण्यास काही वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तातडीने अग्रिम रक्कम देण्याचे पाऊल उचलले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे, अशा दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यांतील सर्व पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही जटिल प्रक्रियेशिवाय सरसकट पाच हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.

डीबीटीद्वारे थेट खात्यात जमा होणार रक्कम!

ही सर्व आर्थिक मदत पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) प्रणालीद्वारे जमा केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी १ नोव्हेंबर २०२५ पासून आतापर्यंत विविध शासकीय योजनांतर्गत ई-केवायसी (e-KYC) पूर्ण केली आहे, त्यांना पुन्हा ई-केवायसी करण्याची आवश्यकता भासणार नाही. तसेच, ज्या वनपट्टाधारक शेतकऱ्यांना अद्याप अ‍ॅग्रीस्टॅक शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर्स आयडी) मिळालेला नाही, त्यांना ई-केवायसीच्या आधारे ही अग्रिम मदत दिली जाणार आहे.

मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही संपूर्ण वितरण प्रक्रिया राबवली जाणार आहे. दिवाळीपूर्वी ही रक्कम दीड कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यासाठी राज्य सरकारने ७ हजार ५०० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यामुळे राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या मदतीमुळे बाधित शेतकऱ्यांना सण-उत्सवाच्या काळात थेट आर्थिक बळ मिळण्यास मदत होणार आहे.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *