सामाजिक न्यायगाथा | ओबीसी

महाज्योती योजना लिस्ट: फ्री कोचिंग, फेलोशिप व स्कॉलरशिपसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारकार्याचा वसा चालविण्यासाठी, त्यांच्या विचारातला सुशिक्षित समाज निर्माण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकासासाठी कंपनी कायदा २०१३ अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी घटकांतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व आर्थिक विकास साधण्यासाठी फ्री कोचिंग, फेलोशिप, स्कॉलरशिप, कौशल्य विकास प्रशिक्षण आदी योजना राबवल्या जात आहेत. या महाज्योती योजनांची लिस्ट, त्यासाठी लागणारी पात्रता आणि अर्जप्रक्रियेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

महाज्योतीमार्फत विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण मार्गदर्शन आणि विद्यावेतन दिले जाते.

एमपीएससी व युपीएससी नागरी सेवा परीक्षा पूर्वतयारी

मिळणारे लाभ:

  • पुणे, दिल्ली किंवा महाराष्ट्रातील नामवंत संस्थांमध्ये मोफत अनिवासी/निवासी प्रशिक्षण.
  • विद्यार्थ्यांना दरमहा १० ते १३ हजारापर्यंत विद्यावेतन 
  • प्रशिक्षण सुरू झाल्यावर १४ ते २५ हजार एकरकमी पुस्तकांसाठी

पात्रता:

  • उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी आणि ओबीसी/व्हीजेएनटी/एसबीसी प्रवर्गातील असावा.
  • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असावा.
  • नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्राची अट लागू.
  • निवड चाळणी परीक्षेतील सीईटी गुणांच्या आधारे केली जाते.

JEE / NEET / MHT-CET पूर्वतयारी (इयत्ता ११ वी व १२ वी)

मिळणारे लाभ:

  • १० वी नंतर इंजिनिअरिंग आणि मेडिकल प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत कोचिंग.
  • मोफत टॅब्लेट आणि दरमहा ६ GB इंटरनेट डाटा दिला जातो.

पात्रता:

  • विद्यार्थी १०वी मध्ये किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • महाराष्ट्रातील सरकारी किंवा मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता ११ वी मध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.

पोलीस भरती, बँकिंग आणि एसएससी / आरआरबी प्रशिक्षण

मिळणारे लाभ:

  • पोलीस / सैन्यदल भरतीसाठी शारीरिक व बौद्धिक प्रशिक्षण.
  • बँक, रेल्वे आणि एसएससीच्या परीक्षांसाठी मोफत कोचिंग. 
  • दरमहा ६ ते ९ हजार विद्यावेतन.

संशोधन शिष्यवृत्ती (महाज्योती फेलोशिप)

एम.फिल. आणि पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना.

मिळणारे लाभ:

  • UGC / CSIR-NET किंवा JRF च्या धर्तीवर दरमहा ३१ ते ३५ हजारापर्यंत फेलोशिप.
  • मानव्यविद्या (Humanities) आणि विज्ञान (Science) शाखेनुसार वार्षिक १० ते २५ हजार अतिरिक्त मदत.
  • नियमानुसार घरभाडे भत्ता
  • कालावधी कमाल ५ वर्षे

पात्रता:

  • विद्यार्थी मान्यताप्राप्त विद्यापीठात Ph.D. साठी नियमित (Full-time) नोंदणीकृत असणे आवश्यक.
  • उमेदवार ओबीसी/व्हीजेएनटी/एसबीसी प्रवर्गातील आणि महाराष्ट्राचा अधिवासी असावा.
  • नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र आवश्यक.

कौशल्य विकास व कौशल्य आधारित प्रशिक्षण

विद्यार्थी आणि बेरोजगारांना रोजगाराभिमुख बनवण्यासाठी विविध टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण दिले जाते.

मिळणारे लाभ:

  • डिजिटल मार्केटिंग, एआय आणि डेटा सायन्स, सीएनसी ऑपरेटिंग, मोबाईल रिपेअरिंग, टेलरिंग, ॲनिमेशन इत्यादी कोर्सेसचे प्रशिक्षण.
  • यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व १०० टक्के जॉब मार्गदर्शन.
  • प्रशिक्षणादरम्यान दरमहा ६ हजारापर्यंत विद्यावेतन.

पात्रता:

  • विद्यार्थी वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षे.
  • १० वी, १२ वी किंवा पदवी परीक्षा उत्तीर्ण उमेदवार.

परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

जागतिक दर्जाच्या टॉप रँकिंग विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी (मास्टर्स / पीएचडी) जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे.

मिळणारे लाभ:

  • शिक्षण शुल्क (ट्युशन फी), राहण्याचा व खाण्याचा खर्च, आणि विमानाचे येण्या-जाण्याच्या तिकीटाचा खर्च सरकार देते.

पात्रता:

  • QS World University Rankings मध्ये पहिल्या ३००/५०० क्रमांकाच्या आत असलेल्या परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळालेला असावा.
  • कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा नियमानुसार ८ लाखा पर्यंत असावी.

वरील सर्व योजनांसाठी आवश्यक कागदपत्रे

  • जात प्रमाणपत्र (ओबीसी / व्हिजेएनटी / एसबीसी)
  • नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र 
  • महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल सर्टिफिकेट)
  • इयत्ता दहावी, बारावी व पदवीची गुणपत्रके
  • पीएचडी फेलोशिपसाठी विद्यापीठ नोंदणी पत्र व गाईडचे पत्र
  • तहसीलदार किंवा सक्षम प्राधिकरणाचा उत्पन्नाचा दाखला
  • बँक खात्याशी लिंक असलेले आधार कार्ड
  • बँक पासबुक 
  • पासपोर्ट साईज फोटो

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

वरील सर्व योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागतो.

  • महाज्योतीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • नवीन नोंदणी (Notice / Advertisement Section): 
  • होमपेजवरील योजनांची जाहिरात पाहा आणि योग्य योजनेसाठी ‘Apply Online’ वर क्लिक करा.
  • खाते तयार करण्यासाठी मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक टाकून नोंदणी करा.
  • वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, पत्ता आणि बँक खात्याची माहिती भरा.
  • योजनेनुसार आवश्यक असणारी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • भरलेली माहिती चेक करून अर्ज सबमिट करा. 
  • माहितीसाठी अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *