इन्फ्रा मॅन | मेट्रो मॅन

मेट्रोमॅन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मेट्रो प्रकल्पांचा झंझावात!

महाराष्ट्रातील शहरी भागात जलद, सुरक्षित, आधुनिक आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी इन्फ्रा मॅन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अत्यंत वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील शहरीकरणाचा वाढता वेग लक्षात घेता पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर राज्य सरकार भर देत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल २ लाख ८० हजार ७५५ कोटी रुपये खर्चाच्या ६८३.५३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गांचे जाळे उभारले जाणार आहे. या महाकाय मेट्रो नेटवर्कमुळे मुंबई, पुणे, नागपूर आणि मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) नागरी वाहतुकीला आणि विकासाला नवी दिशा आणि गती मिळणार आहे. महाराष्ट्राच्या दृष्टिने ही एक प्रकारची मेट्रो क्रांती आहे.

महाराष्ट्रातील मेट्रो नेटवर्क आणि प्रकल्पांचा विस्तार

प्रकल्प ३ वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश

राज्यात सध्या १७४ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग प्रवाशांसाठी प्रत्यक्ष सेवेत सुरू झाले आहेत. तब्बल २९१ किलोमीटर लांबीच्या मार्गांचे बांधकाम वेगाने सुरू आहे. याशिवाय १३० किमी मार्ग मंजुरीच्या टप्प्यावर आहे; तर ८७.१५ किलोमीटर लांबीच्या मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक ४ ऑगस्ट, २०२६ रोजी मुंबईत पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाल्यापासून ते तीन वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. येत्या वर्षभरात राज्यातील ८७ किमीचे नवीन मेट्रो मार्ग आणि ५६ नवीन स्टेशन्स खुली केली जाणार आहेत. २०२९-३० पर्यंत ३०२ किलोमीटरचे मार्ग आणि १६१ स्टेशन्स सुरू करण्याचे नियोजन सरकारने केले आहे.

प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारचे आर्थिक पाठबळ

शहरांच्या वाहतूक सुविधेतील या विकासकामांसाठी राज्य सरकारने चोख आर्थिक नियोजन केले आहे. एकूण २.८० लाख कोटींच्या प्रकल्पांपैकी केंद्र सरकारचा हिस्सा २७,२१६ कोटी रुपये तर राज्य सरकारचा थेट हिस्सा ५०,२५० कोटी रुपये आहे. याव्यतिरिक्त एमएमआरडीए, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध नियोजन प्राधिकरणांच्या माध्यमातून ७५,७२९ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. उर्वरित रक्कम राज्य सरकारच्या हमीवर कर्जाद्वारे उभारली जाणार आहे. प्रादेशिक विस्ताराचा विचार करता मुंबई महानगर प्रदेशात ४२८.८९ किमी, पुणे महानगर प्रदेशात १६९.४५ किमी आणि नागपूर महानगर प्रदेशात ८५.२० किमीचे मेट्रो नेटवर्क आकारास येत आहे. विशेषतः मीरागाव ते गायमुख या ८,५०० कोटी रुपये खर्चाच्या मेट्रो-१० मार्गाच्या परवानग्या अंतिम टप्प्यात असून ९.६८ किलोमीटरचा हा मार्ग तीन वर्षांत पूर्ण केला जाणार आहे.

राज्यातील प्रस्तावित आणि विस्तारित मेट्रो प्रकल्प

  • मुंबई मेट्रो-११ (अणिक डेपो ते गेटवे ऑफ इंडिया – १७.५१ किमी), 
  • मुंबई मेट्रो-८ (सीएसएमआयए ते नवी मुंबई विमानतळ – ३४.९० किमी), 
  • मुंबई मेट्रो-१० (गायमुख ते छत्रपती शिवाजी महाराज चौक – ९.२० किमी), 
  • मुंबई मेट्रो-१३ (शिवाजी चौक ते वसई-विरार – २५.०३ किमी), 
  • मुंबई मेट्रो-१२ए (मानपाडा ते तळोजा – १८.४० किमी), 
  • मुंबई मेट्रो-३ विस्तार (कफ परेड ते नेव्ही नगर – १.४० किमी) 
  • मुंबई मेट्रो-१४ (कांजूर ते बदलापूर – ४५.१५ किमी) 
  • नवी मुंबई मेट्रो-१ए व २ (१७.०९ किमी), 
  • पुणे हडपसर-लोणी काळभोर व हडपसर-सासवड रोड (१६.६८ किमी), 
  • पुणे मेट्रो फेज-३ (निगडी ते चाकण – ४२ किमी) 
  • नागपूर दुसरा टप्पा कान्हान नदी ते कान्हान सिटी विस्तार (१.४५ किमी) 

मेट्रोमॅन देवेंद्र फडणवीस यांच्या या दूरदृष्टीमुळे आणि प्रशासकीय पकडीमुळे महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, जलद आणि भविष्याभिमुख होत आहे.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *