मुंबईत दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या सतत धावणाऱ्या शहराला नवा वेग देण्यासाठी राज्य सरकारने मुंबई लोकलसोबतच मुंबई मेट्रो ३ (अॅक्वा लाईन) ही अत्याधुनिक भूमिगत मेट्रो लाईन साकारली आहे. ही भूमिगत मेट्रो लाईन मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेच्या इतिहासातील एक क्रांतिकारी टप्पा ठरली आहे. या प्रकल्पाने मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर बनवला आहे. त्याचबरोबर शहरातील प्रदूषण आणि वाहतूक कोंडी कमी करण्यातही मोठी मदत केली आहे. प्रवाशांना जागतिक दर्जाचा अनुभव देणारी ही मेट्रो आज मुंबईच्या आधुनिकतेचे प्रतीक ठरली आहे. सुमारे १५ वर्षांच्या नियोजन, प्रशासनिक आव्हाने आणि विविध राजकीय सत्तांतरांचा सामना करत अखेर अॅक्वा लाईन ऑक्टोबर २०२५ मध्ये पूर्ण क्षमतेने सुरू झाली. दक्षिण मुंबईतील कफ परेडपासून, उत्तर मुंबईमधील आरेपर्यंत ३३.५ किलोमीटर लांबीची ही भूमिगत मेट्रो लाईन आज मुंबईच्या पोटातून धावत, शहराला नव्या गतीची आणि शाश्वत भविष्याची दिशा देत आहे. मुंबई मेट्रो लाईन ३ मार्ग ही लाईन खऱ्या अर्थाने मुंबईकरांच्या स्वप्नपूर्तीचे प्रतीक बनली आहे.
मुंबई मेट्रो ३ लाईन ही मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेतील आणि विकासगाथेतील एक महत्वाचा टप्पा बनली आहे. या प्रकल्पाने मुंबईच्या वाहतुकीला नवी दिशा दिली आहे. मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे. २०१४ पूर्वी म्हणजे तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. पण तो पूर्ण करण्याचे काम मेट्रो मॅन देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर २०१४ ते २०१९, त्यानंतर पुन्हा जुलै २०२२ ते २०२४ आणि पुन्हा डिसेंबर २०२४ नंतर ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत कसे केले. ते तीन महत्त्वाच्या टप्प्यांत समजून घेणार आहोत.

मेट्रो ३ आणि ऑक्टोबर २०१४ पूर्वीची परिस्थिती
मुंबई मेट्रो ३ ची संकल्पना सर्वप्रथम २०११ मध्ये मांडण्यात आली होती. तेव्हा कुलाबा ते वान्द्रे आणि त्यानंतर सीप्झ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ लाईन) असा ३३.५ किलोमीटर लांबीचा मार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. या मेट्रो मार्गातील काही भाग भूमिगत तर काही भाग एलिवेटेड ठेवण्यात येणार होता. पण त्यामध्ये बदल करण्यात आला. अखेर २७ जून २०१३ रोजी केंद्र सरकारने मुंबई मेट्रो ३ या भूमिगत मेट्रो मार्गाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देत २३,१३६ कोटी रुपयांचा खर्च मंजूर केला होता. त्यावेळी हा प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. तर हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ही केंद्र व राज्य सरकारची समान भागीदारी असलेली संयुक्त कंपनी स्थापन करण्यात आली. २०१४ मध्ये या प्रकल्पाला मुंबई महापालिका आणि तत्कालीन राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यानंतर २६ ऑगस्ट २०१४ रोजी अंधेरी येथे तत्कालीन मुख्यमंत्री आणि तत्कालीन केंद्रीय नगरविकास मंत्री यांच्या हस्ते सदर प्रकल्पाचे भूमिपूजन करून त्याचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
२०१४ ते २०१९ देवेंद्र फडणवीस सरकारचा काळ
ऑक्टोबर २०१४ पूर्वी मेट्रो ३ लाईनच्या संकल्पनेला आकार मिळाला. पण त्याची पूर्तता आणि त्याला आकार देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात झाले. आणि मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांनंतर महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत आले आणि मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे विराजमान झाले. त्यांच्या नेतृत्वात मेट्रो ३ च्या कामांना वेग मिळाला. केंद्रातील विविध विभागांकडे प्रलंबित असलेल्या परवानग्या देवेंद्र फडणवीस यांनी मिळवल्या. २०१६ मध्ये त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मेट्रो ३ चे काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मेट्रो ३ च्या कामाला सुरूवात झाली. जानेवारी २०१८ मध्ये मरोळमधून टनेल बोअरिंग मशीनच्या साहाय्याने भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्याच वर्षी सप्टेंबरपर्यंत १.२६ किलोमीटर बोगद्याचे काम पूर्ण झाले. त्यानंतर भुयारी मार्गाच्या कामाने चांगलाच वेग धरला. दरम्यान, १६ ऑगस्ट २०१९ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या रोलिंग स्टॉक मॉडेलचे अनावरण करत या लाईनला अधिकृतरित्या ‘अॅक्वा लाईन’ हे नाव दिले. या काळात प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली आणि मुंबईच्या भूमिगत मेट्रो वाहतुकीचे स्वप्नं वास्तवात उतरू लागले.
जुलै २०२२ ते ऑक्टोबर २०२५ नवीन उर्जेचा काळ
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत युतीला चांगले यश मिळूनही युतीचे सरकार स्थापन होऊ शकले नाही. शिवसेनेने मुख्यमंत्री पदाच्या ईर्ष्येतून भाजपाशी असलेली युती तोडून, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. या सरकारने महायुतीच्या अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली. त्यात मेट्रो ३ चे कारशेड आरेत करायचे की, कांजुरमार्ग येथील मिठागरांच्या जमिनीवर करायचे यात बराच काळ वादविवाद झाले. कोविड आणि अडीच वर्षांच्या विलंबानंतर, मात्र जुलै २०२२ मध्ये मेट्रो ३ प्रकल्पाला नवीन ऊर्जा मिळाली. १० ऑगस्ट २०२२ मध्ये महायुती सरकारने या प्रकल्पाच्या सुधारित सविस्तर प्रकल्प अहवालाला मंजुरी दिली, ज्यामुळे वाढीव खर्चासह काम पुन्हा वेगाने सुरू झाले. त्याच महिन्यात, ३० ऑगस्ट रोजी, मुंबई मेट्रो ३ च्या पहिल्या भूमिगत ट्रेनची चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. हा क्षण मुंबईकरांसाठी अभिमानाचा ठरला. २०२३ मध्ये या प्रकल्पासाठी धारावीतील आवश्यक जमीन लीजवर देण्यात आली आणि सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. शेवटी, ५ ऑक्टोबर २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अॅक्वा लाईनच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. या टप्प्यात आरे ते बीकेसी दरम्यानचा मार्ग सुरू झाला आणि लाखो प्रवाशांना वेगवान व सुरक्षित प्रवासाचा पर्याय मिळाला. ९ मे २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केले आणि ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेवटचा टप्पा, आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या मार्गाचे लोकार्पण करण्यात आले. आज अॅक्वा लाईन पूर्णपणे सुरू झाली असून, मुंबईच्या वाहतुकीत आमूलाग्र बदल झाला आहे. ही मेट्रो मुंबईच्या आधुनिकतेचे प्रतीक ठरत आहे. मुंबईला जागतिक दर्जाच्या शहरांच्या बरोबरीने उभे करणारा हा एक निर्णायक टप्पा आहे.

मुंबई मेट्रो ३ आणि आरे कारशेड
मेट्रो लाईन ३ (अॅक्वा लाईन) ही पूर्णपणे भूमिगत असून ती ३३.५ किमी लांबीची आहे. ही लाईन मुंबईचा दक्षिणेकडील भाग कफ परेड, उत्तरेकडील आरे कॉलनी आणि अंधेरी पूर्वेकडील सीप्झ या भागाला जोडते. या अॅक्वा लाईनचे ३ टप्प्यांमध्ये उद्घाटन झाले असून, ती आता फुल स्विंगमध्ये सुरू आहे. मेट्रो लाईन ३ चा आरे कारशेड हा एक महत्त्वाचा भाग आहे. या कारशेडमध्ये मेट्रोच्या डब्यांची देखभाल आणि दुरुस्ती केली जाते. हे कारशेड जवळपास २५ एकर जागेवर तयार करण्यात आले आहे. आरे कारशेडच्या जागेवरून राजकीय वातावरण बरेच तापले होते. काही राजकीय पक्षांनी आरेमधील मेट्रो कारशेडला केलेला विरोध, एनजीओंनी पर्यावरणाच्या मुद्द्यावरून केलेले आंदोलन, तर न्यायालयाने प्रकल्पाची गरज म्हणून नियम अटींच्या शर्तीवर दिलेली परवानगी. यातून आरेमधील मेट्रोच्या कारशेडबाबत मोठा वाद निर्माण झाला होता. दरम्यान, २०१९ ते २०२२ या कालावधीत महाविकास आघाडी सरकारने आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देत, त्याला कांजुरमार्ग येथे पर्यायी जागा देण्याचा निर्णय घेतला गेला. परिणामी प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ झाली. त्यानंतर जून २०२२ मध्ये पुन्हा एकदा राज्यात सत्तांतर झाले आणि महायुतीचे सरकार सत्तेत आले. महायुती सरकारने आरे येथील कारशेडच्या कामावरील स्थगिती उठवून ते जलद गतीने पूर्ण करून घेतले. हे कारशेड आता मेट्रो लाईन ३ च्या ऑपरेशनसाठी कार्यान्वित झाले आहे.
मुंबई मेट्रो ३ (अॅक्वा लाईन) प्रकल्पातील टप्पे
डिसेंबर २०११:
कुलाबा – बान्द्रा – शिप्ज या मार्गावर डिसेंबर २०११ मध्ये मेट्रो लाईन सुरू करण्याची कल्पना मांडण्यात आली. या मार्गातील काही भाग भूमिगत आणि काही भाग एलिवेटेड असा ठरवण्यात आला.
जून २०१२:
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने जून २०१२ मध्ये या प्रकल्पाचे डिटेल सर्वेक्षण करण्यासाठी कन्सलटन्टची निवड केली. या कन्सलटन्टला जमिनीचे सर्वेक्षण, मातीची तपासणी, जमिनीखाली असलेल्या गॅस, पाणी आणि विजेच्या लाईन्स यांचे डिझाईन्स व नकाशे तयार करणे, तसेच आजुबाजूच्या इमारतींच्या स्थितीचा अभ्यास करण्याची जबाबदारी देण्यात आली.
२७ जून २०१३:
केंद्र सरकारने कुलाबा ते शिप्ज या ३३.५ किमीच्या भूमिगत मेट्रो मार्गाला मंत्रिमंडळाद्वारे मान्यता दिली. प्रकल्पाचा खर्च २३,१३६ कोटी रुपयांच्या खर्चालाही मंजुरी देण्यात आली. हा प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचा निश्चय केला गेला. या प्रकल्पासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ही केंद्र व राज्य सरकारची संयुक्त भागीदारी असलेली कंपनी स्थापन केली.
१८ जुलै २०१३:
केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर केंद्रीय नगरविकास विभागानेही या प्रकल्पाला १८ जुलै २०१३ रोजी मान्यता दिली.
१३ फेब्रुवारी २०१४:
एमएमआरडीए (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) द्वारे मुंबई महापालिकेला मुंबई मेट्रो ३ चा प्रस्ताव सादर.
२६ फेब्रुवारी २०१४:
महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने २६ फेब्रुवारी २०१४ रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी दिली.
२६ ऑगस्ट २०१४:
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय नगर विकास मंत्री यांच्या हस्ते अंधेरी येथे या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. याचे प्रत्यक्ष काम डिसेंबर २०१४ पासून सुरू होणार होते.
३१ ऑक्टोबर २०१४:
देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातही विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव होऊन राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आले. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.
मे २०१६:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो ३ चे काम सुरू करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश.
८ जानेवारी २०१८:
टनेल बोअरिंग मशीनद्वारे मरोळमधून भुयारीमार्गाच्या कामास प्रारंभ. २५० अभियंते, तंत्रज्ञ, कुशल कामगारांचा मोठ्या संख्येने सहभाग.
११ जानेवारी २०१८:
मेट्रो ३ च्या २०० मीटर बोगद्याचे काम पूर्ण.
२४ सप्टेंबर २०१८:
१.२६ किलोमीटर बोगद्याचे भुयारीकरण यशस्वीरीत्या पूर्ण. २५० अभियंते, तंत्रज्ञ आणि कुशल कामगारांच्या सहकार्याने दररोज ४.६ मीटर गतीने काम करत २५९ दिवसांत १.२६ किमी बोगद्याचे काम पूर्ण केले.
१६ ऑगस्ट २०१९:
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या रोलिंग स्टॉक मॉडेलचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी मेट्रो – ३ या लाईनला ॲक्वा लाईन असे नाव देण्यात आले.
१४ ऑक्टोबर २०२०:
मेट्रो ३ आणि मेट्रो ६ या दोन लाईनसाठी कांजुरमार्ग येथे कारशेड प्रस्तावित करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संकल्पना त्यांनीच स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने नाकारली.
२१ जानेवारी २०२१:
मेट्रो – ३च्या कारशेडची जागा बदलण्याचा उद्धव ठाकरे सरकारने घातलेला घाट लक्षात आल्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे आर्थिक आणि मुंबईकरांचे सर्व बाबतीत होणारे नुकसान टाळण्यासाठी आरे येथेच कारशेड उभारण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले.
१० ऑगस्ट २०२२:
मुंबई मेट्रो लाईन ३च्या सुधारित प्रकल्प अहवालाला (डीपीआर) महायुती सरकारकडून १० ऑगस्ट २०२२च्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सदर प्रकल्प बराच काळ रखडल्याने त्याच्या वाढीव खर्चाला देखील महायुती सरकारने मंजुरी दिली. पूर्वी या प्रकल्पाचा खर्च २३,१३६ कोटी इतका मंजूर होता. त्यात वाढ होऊन तो ३३,४०५.८२ कोटी रुपये इतका झाला.
३० ऑगस्ट २०२२:
कुलाबा – वांद्रे – सीप्झ कॉरिडोर मुंबई मेट्रो ३च्या पहिल्या भूमिगत ट्रेन चाचणीचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
२८ जून २०२३:
मुंबई मेट्रो लाईन ३ साठी धारावीतील ३,३०८ चौरस मीटर जागा एमएमआरडीएला ३० वर्षांच्या लीजवर देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
५ ऑक्टोबर २०२४:
मेट्रो ३ या आशियातील सर्वात मोठ्या ३३.५ किमीच्या भुयारी मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑक्टोबर २०२४ रोजी झाले. या मेट्रोने दररोज १७ लाख प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. पंतप्रधानांनी १४,१२० कोटी रुपयांच्या मुंबई मेट्रो लाईन ३ कुलाबा – वांद्रे – सीप्झ फेज १ आणि आरे जेवीएमआर ते वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्सचे उदघाटन केले.
९ मे २०२५:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो लाईन ३ वरील टप्पा २ अ चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बीकेसी ते सिद्धिविनायक या स्टेशन दरम्यान मेट्रोने प्रवास केला.
८ ऑक्टोबर २०२५:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई मेट्रो ३ वरील आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या लाईनचे लोकार्पण करण्यात आले. संपूर्ण मुंबई मेट्रो ३ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित.
संबंधित लेख:
