इन्फ्रा मॅन | मेट्रो मॅन

मेट्रो मॅन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुंबई मेट्रोचा १०० किमीचा टप्पा पूर्ण

मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी मेट्रो हे फक्त स्वप्नं न राहता आता ते मुंबईकरांच्या वास्तव जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली आणि महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळाली. अनेक वर्षे रखडलेल्या मेट्रो प्रकल्पांना प्रशासकीय अडथळ्यातून बाहेर काढून त्यांनी ३३७ किमीचे जाळे निर्माण करण्याचा धाडसी संकल्प सोडला होता. आज त्या संकल्पाचे फलित म्हणून मुंबई मेट्रोने १०० किमीचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला असून, दिल्लीपाठोपाठ देशातील दुसरे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क होण्याचा बहुमान मुंबई मेट्रोने पटकावला आहे. अवघ्या १२ वर्षांत साध्य झालेला हा १०० किमीचा प्रवास मुंबईच्या आधुनिक आणि प्रगत भविष्याची साक्ष देत आहे.

मुंबई मेट्रोचा इतिहास आणि प्रगती

मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीचा कायापालट करण्यासाठी आणि शहरवासियांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी इन्फ्रा मॅन देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर मेट्रो प्रकल्पांना गती दिली. २०१४ पूर्वीच्या सरकारच्या कासवगतीमुळे मेट्रोच्या कामाला विलंब होत होता. याचे एक उदाहरण म्हणजे त्या सरकारला फक्त ११.४ किमीची मेट्रो (वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो १) उभारण्यासाठी तब्बल ११ वर्षे लागली होती. पण, २०१४ नंतर देशात आणि राज्यात दोन्हीकडे सत्ताबदल झाला आणि प्रशासनातील मरगळ झटकली गेली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि उपनगरासाठी ३३७ किमी लांबीच्या १४ मेट्रो लाईन्सचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट समोर ठेवले. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे १२ वर्षांत मुंबई मेट्रोने १०० किमीचा ऐतिहासिक टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. मुंबई मेट्रोच्या जाळ्याचा विस्तार झपाट्याने होत आहे. महामुंबई मेट्रो अंतर्गत शहराच्या कानाकोपऱ्यात नवीन लाईन्सचे काम प्रगतीपथावर आहे. या मेट्रो विकासामुळे मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठी प्रगती झाली आहे. सध्या काम सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे संपूर्ण मुंबई मेट्रोचे नेटवर्क अधिक सक्षम आणि वेगवान होणार आहे.

मेट्रो लाईन २ बी आणि मेट्रो ९ लोकार्पण
मुंबई मेट्रोचा १०० किमीचा टप्पा पूर्ण

नुकतेच ७ एप्रिल रोजी मेट्रो लाईन २ बी आणि मेट्रो ९ लाईनवरील पहिल्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. या विस्तारामुळे महामुंबईतील मेट्रोचे जाळे १०१.३३ किमीवर पोहोचले आहे. यामध्ये मेट्रो १, २-ए, २-बी, मेट्रो ३, मेट्रो ७, मेट्रो ९ आणि नवी मुंबई मेट्रो अशा एकूण ७ लाईन्सचा समावेश आहे. मुंबई मेट्रो आता देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क ठरले आहे. दिल्ली मेट्रोच्या ४१८ किमीच्या जाळ्यानंतर आता मुंबईने बंगळुरू, हैदराबाद आणि कोलकाता यासारख्या शहरांना मागे टाकले आहे. ३३७ किमीच्या एकूण आराखड्यातील इतर लाईनवरही सध्या वेगाने काम सुरू आहे. मेट्रो प्रकल्प हा फक्त वाहतूक सुलभ करणारा नाही, तर पर्यावरणाचा समतोल राखणारा आणि प्रदूषण कमी करणारा एक हरित प्रकल्प आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळे आज मुंबईकरांना जलद, किफायतशीर आणि जागतिक दर्जाची प्रवास सेवा उपलब्ध होत आहे.

मुंबई मेट्रो विस्तार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *