भारतात दरवर्षी लाखो रुग्ण उपचारांसाठी परदेशात जातात, तर दुसरीकडे जगभरातून वैद्यकीय पर्यटनासाठी भारताकडे येणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘हील इन इंडिया’ या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र सेवक देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मेडिसिटी प्रकल्पाची आखणी केली. महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रात नवीन प्रकल्प राबवून नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी प्रकल्पातून रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेष हे सर्व घटक एकाच परिसंस्थेत आणण्याची ही संकल्पना आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने अमेरिकेतील प्रतिष्ठित ‘क्लीव्हलँड क्लिनिक’ (Cleveland Clinic) सोबत सामंजस्य करार केला. या करारामुळे आणि एकूणच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्राला मोठी गती मिळणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नियोजित ‘तिसरी मुंबई‘ या विकास पट्ट्यानजीक जवळपास १६५ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाची मेडिसिटी उभारली जात आहे. यासाठी इन्फ्रा मॅन देवेंद्र फडणवीस सरकारने अमेरिकेतील प्रतिष्ठित क्लीव्हलॅण्ड क्लिनिक, ब्रुकफिल्ड अॅसेट मॅनेजमेंट आणि आरोधन हेल्थ सिटी या संस्थांसोबत सामंजस्य करार केले आहेत. या करारातून सुमारे १.२ अब्ज अमेरिकी डॉलर (अंदाजे १०,००० कोटी रुपये) इतकी गुंतवणूक आणि १०,००० हून अधिक थेट रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी (NMIMC) हा भारतातील एकमेव प्रकल्प आहे, जे भारताचे पहिले जागतिक दर्जाचे आरोग्य सेवा, संशोधन आणि वैद्यकीय पर्यटन केंद्र ठरेल. जानेवारी २०२६ मध्ये दावोस येथे झालेल्या जागतिक गुंतवणूक परिषदेत मेडिसिटी प्रोजेक्टबाबत अनेक परदेशी कंपन्यांसोबत चर्चा करून त्यांच्याशी वेगवेगळ्या टप्प्यांसाठी करार केले होते. या करारांच्या माध्यमातून पुढचा टप्पा पार करत मेडिसिटी आकारास येत आहे.
१० हजार नोकऱ्या अपेक्षित
नवी मुंबई मेडिसिटी प्रकल्पातून थेट आणि अप्रत्यक्ष असा जवळपास १० हजार रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी खाली दिलेल्या क्षेत्रातील कौशल्याधारित (Skilled Based) तरुणांची गरज भासणार आहे.
- आरोग्य सेवक
- मेडिकल रिसर्च
- बायोटेक्नॉलॉजी
- नर्सिंग आणि संबंधित आरोग्य सेवा
- मेडिकल एज्युकेशन
- टेक्नोलॉजी आणि एआय (AI)
- फॅसिलिटी मॅनेजमेंट
- हॉस्पिटॅलिटी आणि सपोर्ट सर्व्हिसेस
मेडिसिटी प्रकल्पात अमेरिकेतील क्लीव्हलॅण्ड क्लिनिक मुख्य ‘अँकर पार्टनर’ म्हणून भूमिका बजावणार आहे. ही संजागतिक दर्जाची मेडिसिटी स्था रुग्णकेन्द्री उपचार पद्धती, क्लिनिकलच्या दृष्टीने योग्य असलेल्या गोष्टी आणि अधुनिक तंत्रज्ञान वापर करून केलेले संशोधन यातील आपला प्रदीर्घ अनुभव या प्रकल्पासाठी उपलब्ध करून देणार आहे. या मेडिसिटीच्या माध्यमातून एकाच परिसरामध्ये अत्याधुनिक रुग्णालये, वैद्यकीय आणि परिचारिका शिक्षण संस्था, क्लिनिकल संशोधन केंद्रे आणि वेलनेस सुविधा उभारल्या जाणार आहेत. त्यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), जीनोमिक्स, जैवतंत्रज्ञान आणि जीवन विज्ञान (Life Sciences) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आरोग्य क्षेत्रातील नवोन्मेषाला थेट प्रोत्साहन दिले जाणार आहे.
संबंधित लेख:
