स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये भरणारी जागतिक आर्थिक परिषद ही फक्त सर्वोच्च नेत्यांची बैठक नसते. तर ती भविष्यातील समृद्धीची आणि जागतिक बदलांची नांदी असते. ही बैठक म्हणजे आयडियाज्, इनोव्हेशन आणि इन्व्हेस्टमेंट यांचा संगम आहे. २०२६च्या शिखर परिषदेत भारताच्या आर्थिक प्रगतीचे इंजिन असलेल्या महाराष्ट्राने आपल्या सामर्थ्याचा ठसा उमटवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या माध्यमातून जगाला गुंतवणुकीसाठी साद घालण्यात आली. याला अपेक्षित प्रतिसाद देत महाराष्ट्राने पहिल्याच दिवशी १४.५० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. या करारातून जवळपास १५ लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. आयडियाज्, इनोव्हेशन आणि इन्व्हेस्टमेंट, या त्रिसूत्रीच्या जोरावर महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे ध्येय गाठण्यासाठी सज्ज होत आहे.

दावोस – क्रांतिकारी विचारांचे केंद्र
दावोस हे जगातील सर्वात प्रभावी ‘विचारांचे केंद्र’ (Idea Incubator) मानले जाते. इथे जगभरातील कंपन्यांचे सीईओ, उद्योजक व्यापाराच्या नवनवीन आयडियाज् घेऊन येतात. याच प्लॅटफॉर्मवर कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स), हरित हायड्रोजन (ग्रीन हायड्रोजन) आणि डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर (डीपीआय) यासारख्या विषयावरील जागतिक चर्चा प्रत्यक्ष धोरणांमध्ये रूपांतरित होतात. महाराष्ट्रासाठी अशा नाविन्यपूर्ण आयडियाज् म्हणजेच आपल्या भविष्याचा आराखडा आहे. आयडियाजच्या या जागतिक प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्र नवीन गोष्टी जाणून घेण्याबरोबरच आपली यशोगाथाही जगाला सांगत आहोत. या अशा आयडियाजच्या संमेलनातून आपल्या सामाजिक आणि भौगोलिक क्षमता लक्षात घेऊन राज्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या सेक्टरला प्राधान्य दिले जात आहे. याचाच भाग म्हणून टाटा सन्सच्या माध्यमातून ९२,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने मुंबईजवळ एक ‘इनोव्हेशन सिटी’ उभारली जात आहे. सध्या आपण सौर प्रकल्पात देशात सर्वांत पुढे आहे. नुकताच आपण सौर पंपाच्या माध्यमातून गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. सौर प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य शेतकऱ्यांसाठी १६,००० मेगावॅटहून अधिक वीज निर्माण करत आहे.

दावोस – नवकल्पनांना प्रोत्साहन
नवकल्पना (इनोव्हेशन) हे आधुनिक अर्थव्यवस्थेचे इंजिन आहे. जागतिक गुंतवणुकीतील हा गाभा लक्षात घेऊन दावोस येथील परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी आणि टेक्नोलॉजी इन डेमोक्रॉसी यावर विशेष भर दिला आहे. जागतिक पातळीवरील वेगवेगळ्या टेक कंपन्या तसेच एमआयटी (MIT), बर्कले (Berkeley) यासारख्या नामांकित संस्थांशी जोडून महाराष्ट्र नवकल्पनांना प्रोत्साहन देत आहे. भारताची स्टार्टअप राजधानी ही महाराष्ट्रच राहील, यावर देवेंद्र फडणवीस भर देत आहेत. येणाऱ्या काळात राज्याला क्वांटम कॉम्प्युटिंग आणि मेडटेकचे जागतिक केंद्र बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भारत आणि महाराष्ट्राने हरित ऊर्जेचा मार्ग स्वीकारला आहे. जागतिक स्तरावर महाराष्ट्र ‘ग्रीन ट्रान्झिशन’ (हरित ऊर्जा संक्रमण) मध्ये आघाडीवर आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने आर्सेलर मित्तल कंपनी सोबत १.१ लाख कोटी रुपयांचा करार झाला आहे. ज्यामुळे गडचिरोलीतून पर्यावरणापूरक स्टील निर्मिती होणार आहे. तसेच महाराष्ट्राने २०३० पर्यंत ५२ टक्के वीज ही अपारंपरिक स्त्रोतांतून मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ग्रीन हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातही महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर प्रगती करत आहे.

दावोस – विक्रमी गुंतवणूक आणि रोजगार संधी
दावोसचे यश हे गुंतवणूकदार दाखवत असलेल्या विश्वासावर अवलंबून आहे. २०२६ च्या आर्थिक परिषदेच्या पहिल्याच दिवशी १४.५० लाख कोटी रुपयांहून अधिकचे सामंजस्य करार करून महाराष्ट्राने हे सिद्ध केले आहे की, जागतिक भांडवलासाठी महाराष्ट्र हेच खऱ्या अर्थाने ‘गेटवे ऑफ इंडिया’ आहे. हरित ऊर्जा, प्रगत उत्पादन आणि सेमी-कंडक्टर या क्षेत्रांतील या गुंतवणुकीतून १५ लाखांहून अधिक रोजगार निर्माण होणार आहे. ज्यामुळे जागतिक संपत्ती आणि स्थानिक संधींमधील दरी कमी होईल.
| उद्योग समूह | क्षेत्र | गुंतवणूक |
| एसबीजी ग्रुप | लॉजिस्टिक आणि पायाभूत सुविधा | १.८२ लाख कोटी |
| आर्सेलर मित्तल | हरित स्टील उद्योग | १.१ लाख कोटी |
| लोढा ग्रुप | डेटा सेंटर्स आणि आयटी | १ लाख कोटी |
| सुमितोमो रिअल्टी | नागरी विकास | ७२,८०० कोटी |
| स्कोडा ऑटो व्हीडब्ल्यू | इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) | १२,००० कोटी |
आपल्याला जर जागतिक अर्थव्यवस्थेत आपले स्थान टिकवून ठेवायचे असेल, तर आपण दावोसमध्ये असणे गरजेचे आहे. कारण या परिषदेतून आपण फक्त करार करून येत नाही, तर ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ च्या एका नवीन दृष्टीकोनासह परत येतो. ज्यामुळे आपल्या विचारांना आणि नवकल्पनांना हुंकार फुटतात आणि आपणही जगाच्या बरोबरीने झेप घेण्यासाठी सिद्ध होतो.
संबंधित लेख:
