उत्तम प्रशासक | टेकसॅव्ही

महाराष्ट्राची एआय क्रांती: टेकसॅव्ही मुख्यमंत्र्यांचा आधुनिक सुशासन मॉडेल बनवण्याचा संकल्प

महाराष्ट्र आज फक्त भारतातील एक प्रगत औद्योगिक राज्य राहिलेले नाही. तर ते जगाच्या नकाशावर टेक्नॉलॉजीमध्ये एआय हब म्हणून वेगाने उदयाला येत आहे. टेक्नॉलॉजी जेव्हा सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवते, तेव्हा त्याला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होतो. हीच भूमिका डोळ्यासमोर ठेवून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया एआय इम्पॅक्ट समिट, एआय फॉर ॲग्री २०२६ आणि नॅसकॉम टेक्नॉलॉजी ॲण्ड लीडरशिप फोरम या व्यासपीठावरून महाराष्ट्राच्या हिताचे अनेक धाडसी निर्णयांची माहिती दिली. यामध्ये जगातील दिग्गज ओपन एआय सोबतची भागीदारी असो किंवा शेतकऱ्यांच्या हातातील महाविस्तार हे एआय साधन असो; महाराष्ट्राने कृषी, शिक्षण आणि प्रशासन या तिन्ही स्तरावर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू केला आहे. मागील १५ दिवसात नवी दिल्ली आणि मुंबईमधील तीन महत्त्वाच्या परिषदांमधून टेकसॅव्ही मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या प्रगतीची दिशा स्पष्ट करत महाराष्ट्राला आधुनिक युगातील सुशासनाचे मॉडेल बनवण्याचा संकल्प सोडला आहे.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अंगणवाडी

राज्यात हरितक्रांतीनंतर आता कृषी ‘एआय’ क्रांती घडवून आणण्यासाठी सरकार सज्ज झाले आहे. महाराष्ट्र सध्या तंत्रज्ञानाच्या एका महत्त्वाच्या वळणावर उभा आहे. याच उद्देशाने मागील १५ दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली आणि मुंबईत झालेल्या महत्त्वाच्या कार्यक्रमांमधून महाराष्ट्राला देशाचे ‘एआय हब’ बनवण्यासाठी अनेक धाडसी पावले उचलली आहेत. या प्रवासाची सुरुवात नवी दिल्लीतील ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’ने झाली. जिथे महाराष्ट्राने आपले महत्त्वाकांक्षी महा ॲग्री एआय धोरण २०२५-२९ बाबत माहिती देऊन कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारे देशातील अग्रगण्य राज्य होण्याचा मान मिळवला. याच व्यासपीठावरून अंगणवाडी सेविकांच्या मदतीसाठी ‘शिक्षा साथी’ या प्रगत एआय टूलची घोषणा केली. विशेष म्हणजे, अशा प्रकारच्या उपक्रमासाठी जागतिक स्तरावरील ओपन एआय या संस्थेसोबत भागीदारी करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी आयआयटी मुंबई आणि भारतजेन सोबत करण्यात आलेल्या सामंजस्य करारातून सरकारची कटिबद्धता दिसून येते.

महाविस्तार AI

महाराष्ट्राच्या शेतीतील डिजिटल क्रांतीला अधिक बळकटी देण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने मुंबईत एआय फॉर ॲग्री २०२६ ही जागतिक परिषद आयोजित केली होती. या परिषदेत महाविस्तार या अत्यंत प्रभावी एआय प्लॅटफॉर्मचा शुभारंभ करण्यात आला. जो थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये वैयक्तिक सल्लागार म्हणून काम करणार आहे. हवामानाचा अचूक अंदाज असो वा बाजारभावातील चढ-उतार, ही सर्व माहिती आता शेतकऱ्यांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. टेक्नॉलॉजीचा फायदा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने फक्त शहरांवर लक्ष केंद्रीत न करता, दुर्गम भागातील आदिवासी बांधवांसाठी त्यांच्या स्वतःच्या बोलीभाषेत संवाद साधणारे लार्ज लॅग्वेज मॉडेल विकसित केले. पिकांवरील रोग ओळखण्यासाठी कॉम्प्युटर व्हिजनचा वापर सुरू केला आहे. तर महालक्ष्मी योजने अंतर्गत महिलांना तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावरून महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक विकासाचे प्रतिबिंब दिसून येते.

महा ॲग्री एआय धोरण २०२५-२९

राज्याच्या औद्योगिक आणि प्रशासकीय रचनेत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी नॅसकॉम टेक्नॉलॉजी ॲण्ड लीडरशिप फोरममधील मुख्यमंत्र्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. या फोरमच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या उद्योगांनाच नाही, तर राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएमएमई) एआयच्या प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याचे संकेत दिले आहेत. डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर (डीपीआय) अधिक सक्षम करून सरकारी सेवांमध्ये एआयचा अंतर्भाव केल्यामुळे सामान्य नागरिकांची कामे अधिक सुलभ आणि विनासायास होणार आहेत. गेल्या पंधरा दिवसांत तंत्रज्ञान क्षेत्रात उचललेली ही पावले हे सिद्ध करतात की, महाराष्ट्र आता केवळ पारंपरिक उद्योगांवर अवलंबून न राहता, जागतिक स्तरावरील प्रगत तंत्रज्ञानाचा आधार घेऊन सुशासन आणि समृद्धीचे एक नवे मॉडेल जगासमोर उभे करत आहे. यामुळे येणाऱ्या काळात फक्त शेतीच नाही, तर शिक्षण, प्रशासन आणि उद्योग अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राचा दबदबा अधिक वाढल्याचे दिसून येईल.

नॅसकॉम टेक्नोलॉजी अँड लीडरशिप फोरम 2026

मागील काही दिवसांतील आर्टिफिशिअल इंटेलिजन्सला धरून झालेल्या परिषदा या महाराष्ट्राच्या भविष्याच्या दृष्टीने खूपच महत्त्वाच्या ठरणार आहेत. अत्यंत दूरदृष्टीने तंत्रज्ञानाला फक्त कागदावर न ठेवता, ते शेतकरी, अंगणवाडी सेविका, महिला आणि उद्योजक यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्यासाठी खूप महत्त्वाची पावले उचलली आहेत. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून प्रगतीबरोबरच सामाजिक न्याय देखील साधला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात डिजिटल आणि एआय प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास दिसून येईल.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *