सामाजिक न्यायगाथा | मराठा | रोजगार गाथा

मराठा तरुणांसाठी अण्णासाहेब पाटील कर्ज योजना: व्यवसायासाठी १५ लाखांचे कर्ज व व्याज परतावा

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजना ही महाराष्ट्र सरकारची राज्यातील मराठा तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणारी एक महत्त्वाची योजना आहे. या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना थेट महामंडळाकडून पैसे न देता, लाभार्थी बँकेकडून कर्ज घेतात आणि त्या कर्जावरील व्याजाचा परतावा महामंडळाद्वारे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केला जातो. त्यामुळे ही योजना ‘बिनव्याजी कर्ज योजना’ म्हणून ओळखली जाते. या योजनेमुळे व्यवसाय सुरू करताना येणारी पैशांची अडचण दूर तर होतेच, पण त्याचबरोबर कर्जावरील व्याजाचा काही भाग महामंडळाकडून परत मिळत असल्याने कर्जाची परतफेड करणे सोपे होत आहे. या योजनेसाठी लागणारी पात्रता, कागदपत्रे आणि अर्जप्रक्रियेविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना

व्यक्तिगत कर्ज व्याज परतावा योजना:

  • वैयक्तिक व्यवसायासाठी बँकेकडून १५ लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
  • या कर्जावरील व्याज परताव्याचा कालावधी ७ वर्षे आहे.
  • कर्जाचा कमाल व्याजदर १२%.

गट कर्ज व्याज परतावा योजना:

  • बचत गट किंवा भागीदार उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध.
  • १० ते ५० लाखापर्यंत उद्योग कर्ज उपलब्ध
  • वेळेत हप्ते भरल्यास ७ वर्षापर्यंत / कर्जाच्या कालावधीपर्यंत परतावा. 
  • कमाल १५ लाख व्याजाच्या मर्यादेत परतावा.

गट प्रकल्प कर्ज योजना:

  • १० लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध
  • कंपनी कायदा २०१३ अंतर्गत नोंदणीकृत पात्र शेतकरी उत्पादक पात्र.
  • एफपीओ गटांना थेट बिनव्याजी कर्ज उपलब्ध. 
  • परतफेड कालावधी ७ वर्षे (८४ महिने).

योजनेसाठी पात्रता

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावा
  • ही योजना आर्थिकदृष्ट्या मागास (विशेषतः मराठा समाजातील होतकरू तरुणांसाठी उपलब्ध 
  • अर्जदाराचे वय १८ ते ६० वर्षे दरम्यान असावे. 
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असावे.
  • अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा 
  • अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा. 
  • बँकेचे कर्ज मंजूर होण्यासाठी उत्तम सिबिल स्कोर असणे आवश्यक.
  • योजनेतील एकूण निधीपैकी किमान ४ टक्के निधी दिव्यांगांसाठी राखीव.

आवश्यक कागदपत्रे

१. वैयक्तिक पुरावे:

  • आधार कार्ड व पॅन कार्ड
  • रहिवासी दाखला (लाईट बिल / रेशन कार्ड / पासपोर्ट / डोमिसाईल)
  • उत्पन्नाचा दाखला (तहसीलदारने मंजूर केलेला / आयटीआर फाईल)
  • जातीचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
  • बँक पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो

२.व्यवसायाशी संबंधित कागदपत्रे:

  • उद्यम आधार किंवा शॉप ॲक्ट लायसन्स 
  • व्यवसाय प्रकल्प अहवाल
  • व्यवसायिक जागेचा पुरावा (भाडेकरार किंवा स्वतःची जागा असल्यास कर पावती)
  • स्वयं घोषणापत्र

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  • महास्वयं पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करा.
  • नोंदणी केल्यानंतर लॉगिन आयडी कार्यरत करा.
  • खाते तयार झाल्यावर वैयक्तिक माहितीसह, व्यवसायाचा तपशील व कागदपत्रे अपलोड करून पात्रता प्रमाणपत्रासाठी अर्ज करा.
  • महामंडळाकडून प्रमाणपत्र मंजूर झाल्यावर ते आणि व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट बँकेत कर्जाच्या अर्जासोबत सादर करा.
  • बँकेकडून सर्व कागदपत्रे तपासून कर्ज मंजूर झाल्यावर, कर्जाची रक्कम खात्यात जमा केली जाते.
  • प्रत्येक महिन्याला कर्जाचे हप्ते वेळेवर भरा. बँकेचा हप्ता भरल्याची पावती महास्वयं पोर्टलवर अपलोड केल्यावर महामंडळ व्याजाची रक्कम बँक खात्यात जमा करते.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *