मुंबई | इन्फ्रा मॅन

मुंबई रेल्वे – विकासाच्या ‘फास्ट ट्रॅक’वर धावणारी नवी लाईफलाईन

मुंबईची उपनगरीय रेल्वे म्हणजेच लोकल ट्रेन ही फक्त एक शहरातील दळणवळणाची व्यवस्था नाही. तर ती मुंबईची लाईफलाईन आहे. लाखो मुंबईकर रोजच्या उदरनिर्वाहासाठी हिची मदत घेतात. गेली अनेक दशके मुंबईची लोकल ज्या ट्रॅकवरून धावत आहे. त्या ट्रॅकने आणि रेल्वे यंत्रणेने गेल्या काही वर्षांत विकासाचा नवा वेग प्राप्त केला आहे. २००९ ते २०१४ या कालखंडात निधीची कमतरता आणि नियोजनाच्या अभावामुळे मुंबईतील रेल्वे प्रकल्पांचा वेग मंदावला होता, त्याच प्रकल्पांनी २०१४ नंतर, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मुंबई रेल्वेने कात टाकली आहे. रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईच्या बजेटमध्ये झालेली भरमसाठ वाढ, नवीन टेक्नॉलॉजीचा वापर आणि ‘मुंबई नागरी परिवहन प्रकल्पां’च्या (MUTP) माध्यमातून होत असलेले आमूलाग्र बदल हे बदलत्या मुंबईचे निदर्शक आहे. मुंबईची ही ‘लाईफलाईन’ आता लांबपर्यंत विस्तारली असून, ती अधिक सुरक्षित, वातानुकूलित आणि अत्याधुनिक होण्याच्या दिशेने वेगाने प्रवास करत आहे. मुंबईच्या रेल्वे विकासाचा हा प्रवास २०१४ नंतर नेमका कसा बदलला, हे आपण जाणून घेणार आहोत.

मुंबईची लाईफलाईन असलेल्या मुंबई उपनगरीय रेल्वेचा कायापालट करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत अनेक मोठमोठे प्रकल्प राबवले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि पाठपुराव्याने मुंबई रेल्वे पायाभूत सुविधा अधिक भक्कम करण्यावर भर देत आहे. यामध्ये नवीन रेल्वे लाईन आणि जुन्या लाईन्स आणि स्टेशन्सचे आधुनिकीकरण या कामांना वेग देत आहे. यामुळे मुंबई लोकल ट्रेनचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी होण्यास मदत होणार आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे गेल्या काही दशकांत मुंबई रेल्वेच्या यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला होता. पण नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या धोरणात्मक बदलांमुळे आणि भरीव निधीमुळे मुंबई रेल्वेने बरीच प्रगती केली आहे. २००९ ते २०१४ या कालावधीत केंद्र सरकारद्वारे रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी वर्षाला सरासरी १,१७१ कोटी रुपयांची तरतूद केली जात होती. तसेच त्या काळात रेल्वे लाईन टाकण्याचा वेगही संथ म्हणजे वर्षाला जेमतेम ५८ किलोमीटर इतकाच होता. पण, २०१४ नंतर मुंबई आणि महाराष्ट्राच्या रेल्वे विकासाला एक वेगळीच दिशा मिळाली. २०१४ नंतर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई रेल्वेच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारकडे विशेष पाठपुरावा केला. याचाच परिणाम म्हणून २०२५ – २६ च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी रेल्वेचा निधी २० पटीने वाढवून तो २३,७७८ कोटी रुपयांपर्यंत नेण्यात आला. मुंबईच्या सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्याच्यादृष्टीने उचललेले एक मोठे पाऊल आहे.

मुंबई रेल्वे नवीन लाईन

एमयुटीपीच्या माध्यमातून मुंबई रेल्वेचे आधुनिकीकरण

मुंबई महानगर प्रदेशाचा (MMR) विस्तार लक्षात घेता, एमयूटीपी – २, ३ आणि ३ ए सारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबई रेल्वेचे आधुनिकीकरण केले जात आहे. यामध्ये विशेषकरून प्रवाशांचे वाढते अपघात रोखण्यासाठी १९,२९३ कोटी रुपये खर्चून २६८ नवीन एसी लोकल गाड्यांना मंजुरी देण्यात आली. या सर्व गाड्या बंद दरवाजांच्या असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील सुटणार आहे. मुंबई सेंट्रल ते बोरीवली दरम्यान ६ वी लाईन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कुर्ला दरम्यान पाचवी व सहावी लाईनचे काम हाती घेतले जाणार आहे. विरार-डहाणू रोड दरम्यानच्या अतिरिक्त लाईन्समुळे उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीतील अडथळे दूर होत आहेत. तसेच, १५ डब्यांच्या गाड्या चालवण्यासाठी ३४ स्थानकांवरील प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यात येत आहे, ज्यामुळे गर्दीचे नियोजन अधिक प्रभावीपणे होणार आहे. दादर, कल्याण, पनवेल, परळ आणि विरार यांसारख्या महत्त्वाच्या जंक्शन्सवर अतिरिक्त प्लॅटफॉर्म आणि पिट लाईन्स उभारून गाड्यांच्या संचलनात सुधारणा करण्यात आली आहे.

वर्षाला सरासरी २०० हून अधिक किमी रेल्वे मार्ग बनतोय

मुंबईच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय कॉरिडॉर आणि ऐरोली-कळवा लिंक या प्रकल्पांमुळे ठाणे आणि नवी मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्रात जमीन संपादनाची प्रक्रिया १०० टक्के पूर्ण झाली असून, त्याचे काम आता वेगाने सुरू आहे. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे जेएनपीटी बंदरातून होणारी मालवाहतूक रेल्वेच्या स्वतंत्र मार्गावरून धावेल, ज्यामुळे मुंबईतील प्रवासी रेल्वे मार्गांवरील मालगाड्यांचा भार कमी होणार आहे. २०१४ पूर्वी जिथे रेल्वेच्या कामाचा वेग संथ होता, तिथे आता वर्षाला सरासरी २०८ किलोमीटरहून अधिक नवीन रेल्वेलाईन टाकली जात आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे मंत्रालयाशी साधलेल्या समन्वयामुळेच मुंबईच्या उपनगरीय रेल्वेचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहेत. त्यामुळे लवकरच मुंबई रेल्वे अधिक गतिमान होऊन सुरक्षित प्रवास देणारी एक सक्षम यंत्रणा बनेल.

मागील १० वर्षात मुंबई रेल्वेने प्रवाशांची सुरक्षितता आणि सोयीसुविधांना केंद्रस्थानी ठेवून मोठे बदल केले आहेत. २००९ ते १४ मधील संथ गती आणि २०१४ ते २०२५ या दरम्यान झालेली प्रगती ही मुंबईकर पाहत आहेत, अनुभवत आहेत. नवीन २६८ एसी ट्रेन्सची खरेदी, उपनगरीय कॉरिडॉरचा विस्तार आणि बुलेट ट्रेनसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबईला जागतिक दर्जाच्या शहरांच्या श्रेणीत नेऊन ठेवतील.

मुंबई रेल्वे विकास

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *