लिडरशिप | निष्ठावान कार्यकर्ता

नगरपरिषद निवडणूक २०२५ – देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप राज्यात ‘नंबर १’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत २०२५ मध्ये मिळवलेले यश हे राज्याच्या राजकीय इतिहासातील सर्वांत मोठा विजय ठरला आहे. नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या निकालातील हा एक मैलाचा दगड ठरला आहे. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची धुरा सांभाळल्यापासून भाजपने शहरापासून ग्रामीण भागापर्यंत आपले पाय घट्ट रोवण्यास सुरूवात केली. त्याची प्रचिती नुकत्याच झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूक निकालातून आली. २०१४ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेला भारतीय जनता पक्ष २०१७ च्या ऐतिहासिक कामगिरीनंतर आणि आता नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये पुन्हा एकदा राज्यातील ‘नंबर १’ चा पक्ष ठरला आहे. ही देवेंद्र फडणवीस यांची ऐतिहासिक कामगिरी आहे.

भाजप राज्यात नंबर १

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये पहिल्या टप्प्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायती, अशा एकूण २८८ संस्थांच्या निवडणुकीत महायुतीने २०७ जागांवर विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. यात देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीचा मोठा वाटा असून भाजपने स्वबळावर १०० चा आकडा पार करत ११७ नगराध्यक्ष निवडून आणले आहेत, तर सहयोगी पक्षांसह ही संख्या १२९ वर पोहोचली आहे. महायुतीत सहभागी असलेल्या शिवसेनेने ५३ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ३७ जागांवर यश मिळवले आहे. महायुतीचा हा विजयी झंझावात महाविकास आघाडीला रोखता आला नाही. उलट त्यांचे नामोनिशाण दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे. राज्यातील एकूण ६,९५२ नगरसेवकांपैकी एकट्या भाजपचे सुमारे ३,३२५ जागांवर नगरसेवक जिंकून आले आहेत. १०० टक्क्यातला ४८ टक्क्यांहून अधिक वाटा भाजपाने आपल्याकडे आणला आहे. प्रादेशिक विभागांचा विचार करता, देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे विदर्भात भाजपने १०० पैकी ५१ नगरपालिका जिंकून आपला दबदबा कायम ठेवला आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपने २३ जागांसह आघाडी घेतली असून मराठवाड्यात १७, उत्तर महाराष्ट्रात १४ आणि कोकणात ५ जागांवर नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. पुणे आणि नागपूर यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्येही महायुतीने मोठी मुसंडी मारली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या विजयाचे श्रेय सरकारच्या ‘विकास मॉडेल’ला आणि पारदर्शक प्रशासनाला दिले आहे.

२०१७ मध्येही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राज्यातील २५ जिल्हा परिषदांपैकी सर्वाधिक ४०० हून अधिक जागा आणि पंचायत समित्यांमध्ये ८०० हून अधिक जागा जिंकून ग्रामीण भागात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला होता. त्यावेळी झालेल्या विविध निवडणुकांमध्ये राज्यातील २७० हून अधिक नगरपालिकांपैकी सुमारे ७० पेक्षा जास्त नगरपालिकांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले होते. भाजपने सर्वाधिक १,२०० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. पुण्यासारख्या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ही भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले होते. मुंबईत तर पक्षाने ३१ वरून थेट ८२ नगरसेवकांपर्यंत मजल मारत शिवसेनेला कडवी झुंज दिली होती. त्यावेळी शिवसेनेचे ८४ नगरसेवक निवडून आले होते. ग्रामीण भागातही भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला मोठा धक्का दिला होता.

२०१७ मध्ये विस्तार, २०२५ मध्ये निर्विवाद वर्चस्व!

२०१७ च्या तुलनेत २०२५ मध्ये भाजपने नगराध्यक्ष पदाच्या जागांमध्ये जवळपास ८० टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. २०१७ मध्येच भाजप नगरपालिकांमध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला होता. २०२५ मध्ये तर भाजपने ४८ टक्क्यांपेक्षा जास्त जागा जिंकून एकहाती वर्चस्व मिळवले आहे. २०१७ च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट चौरंगी लढत होती. तरीही भाजपने १,२०० हून अधिक नगरसेवक निवडून आणले होते. तर आताच्या २०२५ च्या निवडणुकीत एकूण ६,९५२ जागांपैकी एकट्या भाजपने ३,३२५ पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. म्हणजे राज्यातील नगरपालिकांमध्ये जवळपास निम्मे नगरसेवक हे भाजपचे आहेत. प्रादेशिक पातळीवर या निकालाचा विचार केला तर २०१७ मध्ये भाजपने विदर्भात मोठी मुसंडी मारली होती. २०२५ मध्ये तर विदर्भातील १०० पैकी ५१ नगरपालिका जिंकून भाजपने हा आपला बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. पश्चिम महाराष्ट्र हा पूर्वी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. इथून भाजपने यावेळी २३ नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही भाजपचे अनुक्रमे १७ आणि १४ ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आले आहेत. २०१४ च्या सत्तांतरानंतर २०१७ मधील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही भाजपसाठी विस्ताराची निवडणूक होती. ज्या निवडणुकीने पक्षाला चौथ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर नेले. तर २०२५ ची निवडणूक ही पक्षाच्या सर्वसमावेशक वर्चस्वाची निवडणूक ठरली. ज्यामुळे पक्षाची शहरासह ग्रामीण भागातही पाळेमुळे अधिक घट्ट झाली.

महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक

देवेंद्र फडणवीसांकडून विकासाचा रोडमॅप तयार

भाजपच्या या सातत्यपूर्ण यशामागे देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला विकासाचा रोडमॅप आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवलेल्या सरकारी योजनांची माहिती कारणीभूत असल्याचे बोलले जाते. २०२५ च्या या निकालाने पुन्हा एकदा स्पष्ट केले की, शहरी मतदारांसोबतच ग्रामीण भागातील मतदारांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भारतीय जनता पक्षावर आणि महायुतीच्या कामगिरीवर विश्वास दर्शवला आहे. ही निवडणूक आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी ‘ट्रेलर’ असल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना महापालिकेच्या निवडणुकांसाठी सज्ज राहण्यास सांगून संपूर्ण विजयश्री खेचून आणण्याचे आवाहन केले. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील या विजयामुळे भाजपची राज्यातील पकड अधिक मजबूत झाली असून, स्थानिक पातळीवर पक्ष संघटनात्मकदृष्ट्या अधिक सक्षम झाल्याचे अधोरेखित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *