इन्फ्रा मॅन

महाराष्ट्राच्या आर्थिक परिवर्तनाचे नवे पर्व; कनेक्टिव्हिटी, व्यापार आणि प्रगती

महाराष्ट्राला देशाच्या आर्थिक विकासाचे केंद्र मानले जाते. देशाच्या एकूण सकल देशांतर्गत उत्पादनात महाराष्ट्राचा १४ टक्के वाटा असतो. याच प्रगतीवर आधारित भारताला ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने राज्याची भूमिका अत्यंत निर्णायक ठरत आहे. २०२८ पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अभूतपूर्व पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यात आली आहे. विशेषतः रस्ते कनेक्टिव्हिटी, दळणवळण आणि लॉजिस्टिकच्या दृष्टिने उभारले जात असलेले महामार्ग, एक्सप्रेस वे, औद्योगिक कॉरिडॉर आणि सागरी दुवे हे राज्याच्या आर्थिक क्षमतेला नवी दिशा देत आहेत. उद्योग, व्यापार, शेती, पर्यटन आणि निर्यात यांना एकत्र जोडणाऱ्या या आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरमुळे महाराष्ट्राचा विकास वेगाने पुढे जात असून राज्य जागतिक स्तरावर स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत आहे.

महाराष्ट्र लॉजिस्टिक विकास

महाराष्ट्राच्या या आर्थिक विकासाला अजून गती देण्यासाठी राज्यात महामार्ग, एक्सप्रेसवे, औद्योगिक कॉरिडॉर आणि सागरी दुव्यांचे जाळे वेगाने उभे राहत आहे. वाहतूक, उद्योग, शेती आणि निर्यात क्षेत्राला बळकटी देण्यासाठी लॉजिस्टिक नेटवर्क अधिक सक्षम केले जात आहे. इन्फ्रामॅन म्हणून ओळखले जाणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबई रिंग रोड, कोकण ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे आणि शक्तीपीठ द्रुतगती मार्ग यांसारखे प्रकल्प आकार घेत आहेत. या पायाभूत सुविधांमुळे राष्ट्रीय महामार्गांशी थेट जोडणी होत असून गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढत आहेत. परिणामी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अधिक गतिमान, स्पर्धात्मक आणि भविष्यातील स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी तयार होत आहे.

महाराष्ट्राच्या आर्थिक वाढीमध्ये ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मास्युटिकल्स, टेक्सटाईल, आयटी, लॉजिस्टिक यांसारख्या क्षेत्रांचा मोठा वाटा असून सध्या सुमारे ४५ बिलियन डॉलरचे उत्पादन क्षेत्र २०२८ पर्यंत १०६ बिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी उद्योगस्नेही धोरणे, परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन, सुलभ परवाना प्रणाली आणि आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरवर भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर २०२४ मध्ये राज्य सरकारने सर्वसमावेशक लॉजिस्टिक धोरण लागू करून रस्ते, रेल्वे, बंदरे आणि विमानतळ यांचा एकात्मिक विकास हाती घेतला आहे. त्यातील रस्ते निर्मितीबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत. राज्यात सध्या १७,७५७ किमीहून अधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आणि २८,४६१ किमी राज्य महामार्गांचे मजबूत जाळे कार्यरत आहे. हे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी दिल्ली – मुंबई, दिल्ली – नागपूर, हैदराबाद – नागपूर आणि बंगळुरू – मुंबई या राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉरशी महाराष्ट्रातील जिल्हे आणि औद्योगिक भाग जोडला जात आहे. या धोरणाचा केंद्रबिंदू असलेला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा आता राज्याच्या आर्थिक परिवर्तनाचा महामार्ग ठरू लागला आहे. नागपूर ते मुंबई दरम्यानचा प्रवास वेळ निम्म्यावर आणणारा हा द्रुतगती मार्ग औद्योगिक नोड्स, लॉजिस्टिक हब, कृषी बाजारपेठा आणि जेएनपीटी बंदराशी थेट जोडणी निर्माण करून राज्यातील अंतर्गत व्यापार आणि निर्यातीला चालना देत आहे. समृद्धी महामार्गाचा आता पुढे गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरपर्यंत विस्तार केला जात आहे. त्यामुळे भंडारा, वर्धा आणि पूर्व विदर्भातील जिल्ह्यांचा आंतरजिल्हा संपर्क वाढणार आहे. तसेच यामुळे मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ही राज्येदेखील समृद्धी महामार्गाशी जोडली जाणार आहेत. या रस्त्यामुळे लॉजिस्टिक क्षेत्रासाठी मोठी उपलब्धता निर्माण होत आहे.

मुंबई रिंग रोड – महामुंबईमधील रस्त्यांचे एकीकरण

मुंबई महानगर प्रदेशात अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतू, वर्सोवा – वांद्रे सी लिंक, ठाणे खाडी पूल, भिवंडी – कल्याण – शिळफाटा रस्ता आणि ठाणे – वडापे महामार्ग यांसारखे प्रकल्प मुंबई, नवी मुंबई, रायगड, पुणे आणि औद्योगिक पट्ट्यांमधील वाहतूक सुलभ करत आहेत. यामुळे केवळ प्रवासाचा वेळ कमी होत नाही तर लॉजिस्टिक खर्चात घट होऊन उद्योगांची स्पर्धात्मक क्षमता वाढत आहे. आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट कनेक्टिव्हिटी निर्माण होत असल्याने जागतिक व्यापारासाठी महाराष्ट्र अधिक सक्षम होत आहे. त्याचबरोबर प्रस्तावित मुंबई रिंग रोडमुळे शहरांतील अंतर्गत वाहतुकीत मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहे. या रिंगरोडद्वारे वांद्रे वरळी सी लिंक, वरळी शिवडी कनेक्टर, शिवडी न्हावा शेवा सी ब्रिज (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक), वडोदरा मुंबई एक्स्प्रेस वे, विरार अलिबाग बहुउद्देशीय कॉरिडॉर, वर्सोवा विरार सी ब्रिज, वर्सोवा वांद्रे सी लिंक या रस्त्यांच्या पायाभूत सुविधांचे एकीकरण केले जाणार आहे.

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग

रेवस रेडी कोस्टल हायवे

रेवस रेडी कोस्टल हायवे महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक आणि कनेक्टिव्हीच्या दृष्टीने चालना देणारा प्रकल्प ठरणार आहे. ४९८ किमी लांबीच्या दोन पदरी महामार्गाचे चौपदरीकरण प्रस्तावित आहे. हा प्रकल्प इंटर-मॉडेल वाहतुकीला हाय-स्पीड रोडद्वारे चालना देण्याच्या उद्देशाने राबविला जात आहे. या रस्त्यामुळे महाराष्ट्रातील ४८ लहानसहान बंदरांमधील कनेक्टीव्हिटीमध्ये सुधारणा होऊन गुंतवणूक आणि कार्गोक्षेत्रामध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे अलिबाग, मुरुड-जंजिरा, हरिहरेश्वर, दापोली, गणपतीपुळे, मालवण आणि देवबाग यासारख्या प्रमुख पर्यटन स्थळांशी जोडता येणार आहे. या प्रकल्पासाठी २४,४१९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामुळे महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक सेक्टरमध्ये क्रांती निर्माण होऊ शकते.

जालना-नांदेड द्रुतगती महामार्ग

समृद्धी महामार्गावरील निधोना नांदेड – देगलूर – हैदराबाद या महामार्गावरील काकंडी या शहराच्या माध्यमातून जोडणारा १८० किमी लांबीचा जालना-नांदेड एक्सप्रेस हायवे उभारला जाणार आहे. या ६ पदरी एक्सप्रेसवे वर ७ मोठे पूल, २ रेल्वे ओव्हर ब्रिज आणि ८ इंटरचेंज असणार आहेत. यामुळे या महामार्गाला लागून असलेली शहरे आणि एमआयडीसी सक्षम होतील. तसेच या महामार्गाची कनेक्टीव्हिटी समृध्दी महामार्गाशी असणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजित २२,४०० कोटी रुपये इतका आहे. यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली.

कोकण ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग

किनारपट्टीला लागून असलेल्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या शहरांना जोडणारा ६ लेनचा कोकण ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग तयार केला जाणार आहे. कोकण ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग ३८८ किमी लांबीचा असून तो मुंबई व्हाया रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुढे गोव्याला जोडला जाणार आहे. लॉजिस्टिक आणि व्यापाराच्यादृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे. हा प्रकल्प या महामार्गालगतच्या जिल्ह्यांसाठी खूप फायद्याचा ठरणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हयांना एअर लिंक्ससह वर्धित कनेक्टिव्हिटीचा फायदा मिळणार आहे.

कोकण ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग

शक्तीपीठ द्रुतगती मार्ग शक्तीपीठ

७६० किमी लांबीचा शक्तीपीठ महामार्ग नागपूरपासून सुरु होऊन वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग यासह १२ जिल्ह्यांना जोडणार आहे. या द्रुतगती महामार्गामुळे जे जिल्हे आतापर्यंत एक्सप्रेसवे पासून लांब होते, ते आता जोडले जाणार आहेत. यामध्ये नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होता. या हाय स्पीड रस्त्यामुळे संबंधित जिल्ह्यांमधील मालाची वाहतूक खूपच जलद होणार आहे आणि यामुळे जवळपास १० तासांनी प्रवास कमी होणार आहे. दळणवळण आणि उद्योगधंद्यांबरोबरच हा द्रुतगती महामार्ग औंढा नागनाथ, परळी वैद्यनाथ, माहूरगड, तुळजापूर, कोल्हापूर आणि पंढरपूर अशा धार्मिक व अध्यात्मिक स्थळांशी जोडला जाणार आहे. त्यामुळे शक्तीपीठ द्रुतगती मार्ग हा आगामी काळात महाराष्ट्रातील वाहतुकीसाठी गेम चेंजर ठरेल, असा विश्वास राज्य सरकारला विश्वास आहे.

दिल्ली – नागपूर इंडस्ट्रियल कॉरिडॉर

दिल्ली – नागपूर इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून नागपूर आणि नवी दिल्ली या शहरांना जोडला जाणार आहे. या महामार्गा अंतर्गत पाटना, सागर, झाशी, ग्वाल्हेर, आग्रा, मथुरा, जेवार, तसेच डीएमआयसीवरील शेंद्रा – बिडकीन औद्योगिक क्षेत्र आणि दिघी बंदर औद्योगिक क्षेत्र जोडली जाणार आहेत.

राष्ट्रीय महामार्ग

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या आंतरराज्य रस्त्यांबरोबरच विविध राज्यांना जोडणारे राष्ट्रीय महामार्गांची कामेदेखील प्रगतीपथावर आहेत. ज्यामध्ये, पुणे – बंगळुरू द्रुतगती मार्ग (सातारा आणि सांगली मार्गे), सुरत – चेन्नई एक्सप्रेसवे (नाशिक, अहमदनगर आणि सोलापूर मार्गे), नागपूर – हैदराबाद इंडस्ट्रियल कॉरिडॉर (वर्धा आणि यवतमाळमार्गे), पुणे – हैदराबाद महामार्ग NH65 (सोलापूर आणि उस्मानाबाद मार्गे), मुंबई आणि वडोदरा द्रुतगती मार्ग गुजरात आणि मुंबईला जोडणारा एक्सप्रेसवे यांचा समावेश आहे.

राज्याच्या दीर्घकालीन विकास धोरणात रेवस–रेड्डी कोस्टल हायवे, पुणे रिंग रोड, जालना–नांदेड द्रुतगती महामार्ग, कोकण ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे आणि शक्तीपीठ द्रुतगती मार्ग यासारखे प्रकल्प भविष्यात उद्योग-धंद्याच्यादृष्टीने निर्णायक ठरणार आहेत. हे महामार्ग औद्योगिक व व्यापाराबरोबरच पर्यटन, कृषी मालवाहतूक आणि मागास भागांच्या विकासासाठीही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहेत. विशेषतः शक्तीपीठ द्रुतगती मार्गामुळे पूर्वी एक्सप्रेस वेपासून वंचित असलेल्या अनेक जिल्हे एकमेकांशी जोडले जाणार आहेत. या रस्त्याच्या माध्यमातून धार्मिक पर्यटनाबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. दिल्ली – नागपूर इंडस्ट्रियल कॉरिडॉर, शेंद्रा – बिडकीन औद्योगिक शहर, दिघी बंदर औद्योगिक क्षेत्र आणि विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील उद्योग, बंदरे आणि बाजारपेठा एकमेकांशी अधिक वेगाने जोडल्या जात आहेत. या सर्व प्रकल्पांचा एकत्रित परिणाम म्हणजे राज्यातील मालवाहतुकीचा वेग वाढणे, खर्च कमी होणे, गुंतवणूक आकर्षित होणे आणि रोजगारनिर्मितीला गती मिळणे हा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उभारले जात असलेले हे व्यापक रस्ते व लॉजिस्टिक नेटवर्क महाराष्ट्राला केवळ देशातील नव्हे तर जागतिक पातळीवर स्पर्धात्मक अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने निर्णायक ठरणार आहेत.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *