१७
एप्रिल २०२६
१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील तब्बल ४० हजार ७७६ रुग्णांना ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या या कक्षामार्फत कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्ष २ ते ६), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, हाताचे, गुडघ्याचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान बालकांची शस्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायालिसिस, कर्करोग (केमोथेरपी / रेडिएशन), अस्थिबंधन, नवजात शिशुंचे आजार, बर्न (भाजलेले) रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण या अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी अर्थसहाय्य दिले जाते.
१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत मुंबई उपनगर जिल्ह्यातील ८६९ रुग्णांना सुमारे ८ कोटी १० लाख ४४ हजार रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली. जर जळगाव जिल्ह्यात मागील १ वर्षात १६१० रुग्णांना १३ कोटी ३३ लाख ४ हजार रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली. पुणे जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात ३,८६१ रुग्णांना ३४ कोटी ५३ लाख रुपयांची मदत करण्यात आली. बीड जिल्ह्यात १,७७३ रुग्णांना १३ कोटी ६९ लाख रुपयांची वैद्यकीय मदत वितरित करण्यात आली. सातारा जिल्ह्यात १६०० रुग्णांना सुमारे १२ कोटी ९६ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात २,५१४ रुग्णांना २१ कोटी ७४ लाख रुपयांची वैद्यकीय मदत वितरित करण्यात आली. ठाणे जिल्ह्यात २,५१४ रुग्णांना २१ कोटी ७४ लाख रुपयांची वैद्यकीय मदत वितरित करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १,७६९ रुग्णांना सुमारे १४ कोटी २५ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यात १,५९० रुग्णांना १२.८६ कोटी रुपयांची मदत देण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या जिल्हा कक्ष, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, सामंजस्य करार आदीमुळे रूग्णांना वेळेत अर्थसहाय्य होत आहे. गरजू रूग्णांनी योजनेचा लाभ घेण्याकरिता आणि अधिक माहितीकरिता १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.