महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या शाश्वत विकासाचा ध्यास घेत छत्रपती संभाजीनगर विभागातील महानगरपालिका आणि नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या विशेष निधीची तरतूद केली आहे. राज्याच्या शहरी भागात रस्ते, ड्रेनेज लाईन आणि उद्यानांचे जाळे अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘महानगरपालिकांना मूलभूत सोयी-सुविधांचा विकास’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी छत्रपती संभाजीनगर विभागाकरिता १३.६५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या वितरणाचे टप्पे निश्चित करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात ३.४१ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत छत्रपती संभाजीनगर, जालना आणि वाघाळा – नांदेड या महानगरपालिकांच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत सोयी-सुविधा विकास योजनेंतर्गत भरघोस निधी मंजूर केला आहे. यामुळे या तीन शहरांमधील प्रलंबित विकासकामांना गती मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शहरी पायाभूत सुविधांवर भर देताना प्रामुख्याने सिमेंट काँक्रीट रस्ते, आधुनिक ड्रेनेज लाईन आणि उद्यान विकासासाठी विशेष तरतूद केली आहे. विशेष रस्ता अनुदान योजने मुळे विभागातील प्रमुख शहरांचा चेहरामोहरा बदलणार असून, स्मार्ट सिटी प्रकल्पासह नागरी सुविधांचा दर्जा सुधारण्यास मोठी मदत होणार आहे. २०२५-२६ च्या या विकास आराखड्यामुळे छत्रपती संभाजीनगर विभागातील जनसामान्यांचे जीवन सुसह्य या अंतर्गत येणाऱ्या शहरांच्या विकासाला नवी गती प्राप्त होणार आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी या योजनेतून ३.६५ कोटी रुपये मंजूर झाले असून, त्यातील ९१.२५ लाख रुपये महापालिकेला देण्यात आले आहेत. जालना आणि नांदेड – वाघाळा महानगरपालिकेसाठी प्रत्येकी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, त्यातील प्रत्येकी १.२५ कोटी रुपये पहिल्या टप्प्यात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहराचा विस्तार आणि वाढत्या लोकसंख्येची गरज ओळखून मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहरांतर्गत विविध वॉर्डांसाठी स्वतंत्र विकास निधीची तरतूद केली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात पायाभूत सुविधांची कामे प्रगतीपथावर
छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजी नगर, गजानन नगर, न्यू उस्मानपुरा आणि मुकुंदवाडी यांसारख्या भागांतील पायाभूत सुविधांसाठी ४.६० कोटी रुपयांचा विशेष निधी १२ डिसेंबर २०२५ च्या शासन निर्णयाद्वारे दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने शिवाजी नगर सेक्टर ई मधील उद्यानांचा विकास, श्री स्वामी समर्थ मंदिराशेजारील सभागृह बांधकाम आणि वर्धमान नागरी पतसंस्था ते जंबुरे हॉस्पिटलपर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण अशा कामांचा समावेश आहे. केवळ रस्तेच नव्हे, तर गजानन नगर आणि मुकुंदवाडी परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करून नागरिकांचा प्रवास सुखकर करण्यावर भर दिला आहे. तसेच, शहरातील ड्रेनेज व्यवस्थेचा प्रश्न सोडवण्यासाठी उत्तम नगर आणि सुराणानगर भागात बंदिस्त गटारे आणि ड्रेनेज लाईनच्या बांधकामासाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे. जालना रोडवरील सर्व्हिस रोडच्या काँक्रीटीकरणासाठी ४ नोव्हेंबर २०२५ रोजी स्वतंत्रपणे १ कोटी ८० लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
नांदेड-वाघाळा आणि जालना महापालिकाही विकसित होण्यास सज्ज
छत्रपती संभाजीनगर विभागातील इतर जिल्ह्यांचा विचार करता, नांदेड जिल्ह्यातील नांदेड-वाघाळा महानगरपालिकेला १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी देऊन प्रभाग क्रमांक १ आणि ३ मधील अंतर्गत रस्ते आणि सार्वजनिक सभागृहांच्या निर्मितीला प्राधान्य दिले आहे. तसेच, ‘विशेष रस्ता अनुदान’ योजनेच्या माध्यमातून ४ नोव्हेंबर २०२५ रोजी फुलंब्री आणि कन्नड नगरपरिषदेसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. फुलंब्री नगरपरिषदेला ४ कोटी ६५ लाख रुपये देऊन छत्रपती संभाजीनगर रस्ता ते नागनाथ मंदिर अशा महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामाला मंजुरी दिली आहे, तर कन्नड नगरपरिषदेसाठी टिळक उद्यान ते शनी मंदिर चौकापर्यंतच्या रस्त्यासाठी २ कोटी ७१ लाख रुपये वितरित केले आहेत. याव्यतिरिक्त, २०२५ च्या अर्थसंकल्पीय तरतुदींनुसार छत्रपती संभाजीनगरला ‘स्मार्ट सिटी’ म्हणून अधिक विकसित करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राच्या सहकार्याने औद्योगिक पायाभूत सुविधांसाठी अतिरिक्त निधीची तरतूद केली आहे. तर जालना महानगरपालिकेच्या हद्दीतील मस्त्योदरी महाविद्यालय ते गाकुळधाम सोसायटी, विद्युत कॉलनी व एस.बी. कॉलनीला जोडणारा अंतर्गत सिमेंट रस्ता, गायत्रीनगर येथील खुल्या जागेत खेळाचे मैदान विकसित करण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी २७ ऑक्टोबर २०२५ शासन निर्णयाद्ववारे देण्यात आला आहे.
या सर्व विकासकामांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ शहरांच्या सौंदर्यीकरणावरच नव्हे, तर ड्रेनेज, रस्ते आणि मोकळ्या जागांच्या विकासातून नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
संबंधित शासन निर्णय
छत्रपती संभाजीनगरमध्ये विशेष रस्ता अनुदानातून फुलंब्री आणि वॉर्ड क्रमांक ८६ आणि ८९ मधील रस्त्यांसाठी ४.६५ कोटी रुपये मंजूर – २७ ऑक्टोबर २०२५
छत्रपती संभाजीनगरमध्ये विशेष रस्ता अनुदानातून कन्नड आणि वॉर्ड क्रमांक ५ आणि ६ मधील रस्त्यांसाठी २.७१ कोटी रुपये मंजूर – २७ ऑक्टोबर २०२५
जालना महापालिके अंतर्गत रस्ते, मैदान, सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामासाठी ५ कोटी रुपये मंजूर – २७ ऑक्टोबर २०२५
छत्रपती संभाजीनगरमधील प्रभाग क्रमांक ३ मधील विकासकामांसाठी १.७१ कोटी रुपये मंजूर – ४ नोव्हेंबर २०२५
छत्रपती संभाजीनगरमधील वॉर्ड क्रमांक १७, ६५, ७०, १०३,१०६ मधील कामांसाठी २ कोटी रुपये मंजूर – ४ नोव्हेंबर २०२५
छत्रपती संभाजीनगरमध्ये विशेष रस्ता अनुदानातून १.३५ कोटी रुपये मंजूर – ४ नोव्हेंबर २०२५
नांदेड-वाघाळा महापालिके अंतर्गत वॉर्ड क्रमांक १ आणि ३ मधील मूलभूत कामांसाठी १.०५ कोटी रुपये मंजूर – ४ नोव्हेंबर २०२५
छत्रपती संभाजीनगरमधील वॉर्ड क्रमांक ७२, ७६ ७५, ७७, ८४, ९४, ९५, १०९, ११२, ११३, ११५ मधील विकासकामांसाठी ४.६० कोटी रुपये मंजूर – १२ डिसेंबर २०२५
छत्रपती संभाजीनगर विभागासाठी १३.६५ कोटी रुपये मंजूर – १३ डिसेंबर २०२५
संबंधित लेख:
