नागपूर शहराचा सर्वांगीण विकास आणि येथील नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र सेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नागपूर महानगरपालिकेला मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्य सरकारने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी विशेष तरतूद केली आहे. या निधीद्वारे प्रामुख्याने शहरातील अंतर्गत रस्ते, रस्त्यांचे सिमेंट क्राँक्रीटीकरण, सांडपाणी व्यवस्था, शहरातील मैदाने-उद्याने आणि नागरी सौंदर्यीकरणावर भर देण्यात आला आहे.

राज्य सरकारने महाराष्ट्र शहरी विकास २०२५-२६ अंतर्गत नागपूरच्या विकासासाठी नागपूर महानगरपालिकेसाठी ५ कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर केला आहे. त्यातील १.२५ कोटींचा पहिला हप्ता वितरित देखील केला गेला. राज्य सरकारने हा निधी नागपूर शहराच्या पायाभूत सुविधा विकास, नागपूर रस्ते विकास आणि नागरी सुविधा सुधारण्यासाठी मंजूर केला आहे. या निधीद्वारे नागपूर महानगरपालिके अंतर्गत येणाऱ्या भागांमध्ये पाणीपुरवठा, मलनि:स्सारण आणि रस्त्यांच्या कामांना गती देण्यात आली. त्याचबरोबर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात म्हणजेच नागपू महानगरपालिका क्षेत्रातील नागरी सेवा व सुविधेची कामे मार्गी लावण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे नागपूरमधील विकासकामांना गती मिळणार आहे. विशेषकरून दक्षिण-पश्चिम नागपूर आणि विमानतळ परिसरातील सोनेगाव, विजय व पॅराडाईज सोसायटी यांसारख्या वस्त्यांमध्ये पर्जन्यवाहिका नेटवर्क आणि सिमेंट रस्त्यांसाठी १८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. ज्यामुळे पावसाळ्यातील पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार आहे. प्रभाग क्रमांक १७, १८, १९, २०, २१ आणि २२ या भागातील विविध कामांसाठी अतिरिक्त ५ कोटी रुपये देऊन जुन्या वस्त्यांमधील सिव्हर लाईन, सिमेंट रोड आणि सौंदर्यीकरणाचे प्रश्न मार्गी लावले जात आहेत. यामध्ये टिमकी भानखेडा, गणेशपेठ, मातंगपूरा आणि कर्नलबाग यांसारख्या दाट वस्तीच्या भागांचा समावेश असून तिथे क्रॉसफिट ओपन जिम आणि परिसरातील मैदाने / उद्यानांचा विकास करून नागरिकांना उत्तम आणि आरोग्याच्यादृष्टीने सुखकारक सुविधा पुरवल्या जात आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागपूर पायाभूत सुविधा विकास योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. नागपूर महानगरपालिका विकास निधीमुळे शहराचा सर्वांगीण शहरी विकास साधला जात आहे. शहरातील पायाभूत सुविधांचा विकास हा फक्त रस्ते आणि नाल्यांपुरता मर्यादित न ठेवता, देवेंद्र फडणवीस सरकारने सामाजिक सुविधांकडेही तितकेच लक्ष दिले. १४ डिसेंबर २०२५ च्या शासन निर्णयाद्वारे १६.७२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून प्रभाग क्र. ३६, १३ आणि ३८ मध्ये ग्रीन जिम, योगा शेड, वाचनालये आणि समाजभवन उभारले जात आहे. अंबाझरी आणि अभ्यंकर नगर येथील उद्यानांचा विकास व पादचारी मार्गांचे बांधकाम यामुळे या भागाचा कायापालट होत आहे. सर्वात महत्त्वाचा आणि मोठा टप्पा म्हणजे १०९ कोटी ३८ लाख रुपयांचा विशेष निधी. ज्याद्वारे नागपुरातील बहुतांश प्रभागांमधी रस्ते सिमेंट काँक्रीटचे आणि डांबरीकरणाने झाकोळून निघणार आहेत. यामध्ये आनंद नगर, लक्ष्मीनगर, त्रिमूर्ती नगर, बजाज नगर, गोपाल नगर आणि मनीष नगर यांसारख्या प्रमुख निवासी भागांचा समावेश आहे. या रस्त्यांचे क्राँक्रीटीकरण आणि नूतनीकरण करून इथली वाहतूक कोंडी आणि धुळीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे नागपुरमधील झोपडपट्टी परिसरापासून ते उच्चभ्रू वस्त्यांपर्यंत सर्वत्र पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारला जात आहे. ९.३३ कोटी रुपयांच्या निधीतून मोक्षधाम घाटाजवळील नाल्याची सुरक्षा भिंत आणि नरेंद्र नगर परिसरातील सांडपाणी व्यवस्थापनाची कामे पूर्णत्वास येत आहेत. सरकारच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिकेसाठी आलेला हा कोट्यवधींचा निधी शहराला जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा मिळवून देण्यासाठी आणि नागपूरकरांचे दैनंदिन जीवन सुसह्य करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
संबंधित लेख:
