नागपूर मेट्रो: शहरी वाहतूक क्रांतीचा नवा अध्याय | Nagpur Metro Project
नागपूर मेट्रो: शहरी वाहतूक क्रांतीचा नवा अध्याय
महाराष्ट्राची उपराजधानी आणि मध्य भारतातील एक महत्त्वाचे शहर म्हणजे नागपूर. नागपूर हे मुंबई-पुण्यानंतर राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. विदर्भाचे हार्ट अशीही त्याची ओळख आहे. सध्या नागपूर वेगाने शहरीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहे. यात नागपूर मेट्रो (Nagpur Metro) हा प्रकल्प शहराच्या वाहतूक व्यवस्थेत क्रांती घडवून आणणारा ठरत आहे. २०१९ मध्ये सुरू झालेली नागपूर मेट्रो ही फक्त एक वाहतूक व्यवस्था नाही, तर शहराच्या आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय विकासाचे मॉडेल आहे. मेट्रो मॅन (Metro Man Devendra Fadnavis) अशी ओळख असलेले आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नागपूरचे ‘स्मार्ट सिटी’त रुपांतर होण्याच्या प्रयत्नात मेट्रो हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
नागपूर मेट्रो ही महाराष्ट्रातील दुसरी आणि देशातील उच्च-तंत्रज्ञानावर आधारित सार्वजनिक वाहतूक सुविधांपैकी एक आहे. या मेट्रोने नागपूरकरांसाठी जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. नागपूर मेट्रोचा संपूर्ण प्रकल्प दोन टप्प्यांत विकसित होत आहे. यातील पहिला टप्पा पूर्णपणे सुरू झाला आहे. ऑरेंज आणि अॅक्वा या दोन महत्त्वाच्या लाईनमुळे नागपूर शहर पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण भागांनी जोडले गेले. यामुळे शहरातील रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी झाला. नागरिकांना जलद, थंडगार आणि परवडणाऱ्या प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला. याशिवाय, प्रदूषण कमी करण्यास आणि नागपूरच्या हरित विकासाला गती देण्यासही मेट्रो उपयुक्त ठरत आहे. या प्रकल्पासाठी एकूण ८,६८० कोटी रुपये खर्च आला. नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे कामही वेगाने सुरू झाले आहे. नागपूर मेट्रो शहराच्या प्रगतीत भर घालणार असून तो नागपूरला एक नवीन दिशा देणारा दिशादर्शक ठरेल.
२२
फेब्रुवारी २०१२
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन नागपूर मेट्रोचा डीपीआर तयार करणार!
नागपूर सुधार प्रन्यास (Nagpur Improvement Trust-NIT) आणि दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (Delhi Metro Rail Corporation-DMRC) यांच्या दरम्यान २२ फेब्रुवारी २०१२ रोजी एक सामंजस्य करार झाला. या करारांतर्गत दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन नागपूर मेट्रो प्रकल्पाचा डीपीआर तयार करणार आहे.
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी फोटो आणि व्हिडिओ -
२२
फेब्रुवारी २०१२
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी सोशल मीडियामधील चर्चा -
२२
फेब्रुवारी २०१२
Facebook
माहिती अस्तित्वात नाही
Twitter
माहिती अस्तित्वात नाही
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी GR आणि इतर लिंक्स -
२२
फेब्रुवारी २०१२
नागपूर मेट्रोचा डीपीआर नागपूर सुधार प्रन्यासकडे सादर
२०१२ मध्ये नागपूर सुधार प्रन्यास (Nagpur Improvement Trust-NIT)ने दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन कंपनीला (Delhi Metro Rail Corporation-DMRC) नागपूरमधील मेट्रो प्रकल्पाचा डीटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याची विनंती केली होती. डीपीआर तयार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरूवातीला ३० किमीची परवानगी दिली होती. पण जुलै २०१२ मध्ये त्यात बदल करून ती ४२ किमीपर्यंत वाढवण्यात आली. नागपूर सुधार प्रन्यास संस्थेने केलेल्या करारानुसार दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने नागपूर शहरातील ट्राफिक समस्या, टोपोग्रिफिकल सर्वेक्षण, जिओटेक्निकल सर्वेक्षण आणि वातावरणाच्या होणाऱ्या परिणामांचे मूल्यांकन करण्यात आले. हे सर्वेक्षण नागपूर महापालिकेच्या हद्दीतील साधारण २१७ चौरस किलोमीटर क्षेत्रात करण्यात आले. दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशन कंपनीने १२ फेब्रुवारी २०१३ रोजी हा डीपीआर नागपूर सुधार प्रन्यासकडे सादर केला. यात त्यांनी ऑटोमोटीव्ह चौक ते मिहान एअरपोर्ट परिसर असा पहिला टप्पा आणि प्रजापती नगर त लोकमान्य नगर असा दुसरा टप्पा याचे प्रपोजल दिले होते.
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी फोटो आणि व्हिडिओ -
१२
फेब्रुवारी २०१३
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी सोशल मीडियामधील चर्चा -
१२
फेब्रुवारी २०१३
Facebook
माहिती अस्तित्वात नाही
Twitter
माहिती अस्तित्वात नाही
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी GR आणि इतर लिंक्स -
१२
फेब्रुवारी २०१३
GR
DPR-1.pdf
×
Useful Links
माहिती अस्तित्वात नाही
२९
जानेवारी २०१४
नागपूर मेट्रोच्या दोन मार्गिकांना राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
नागपूर शहरातील दोन उन्नत मेट्रो मार्गिकांना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. नागपूरमधील ऑटोमोटीव्ह चौक ते मिहान आणि प्रजापती नगर ते लोकमान्य नगर अशा दोन मार्गांवर मेट्रो उभारण्यात येणार आहे. या मार्गिकांची लांबी एकूण ३८.३ किमी असून हा प्रकल्प ६ वर्षात पूर्ण करण्याबाबत सरकारने संमती दिली असून त्यासाठी ८,६८० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे. यासाठी केंद्र सरकारचा २० टक्के, राज्य सरकारचा २० टक्के आणि नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास यांचा प्रत्येकी ५ टक्के हिस्सा खर्च देणार आहे. तर उर्वरित ५० टक्के रक्कम ही कर्ज आणि इतर स्त्रोतांद्वारे उभारली जाणार आहे.
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी फोटो आणि व्हिडिओ -
२९
जानेवारी २०१४
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी सोशल मीडियामधील चर्चा -
२९
जानेवारी २०१४
Facebook
माहिती अस्तित्वात नाही
Twitter
माहिती अस्तित्वात नाही
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी GR आणि इतर लिंक्स -
२९
जानेवारी २०१४
नागपूर मेट्रो प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन
नागपूर मेट्रोला केंद्रीय मंत्रिमंडळाची २१ ऑगस्ट २०१४ रोजी मंजुरी मिळाली आणि त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे भूमिपूजन करण्यात आले. नागपूरमधील मेट्रो ही ग्रीन मेट्रो म्हणून ओळखली जाते. या मेट्रोसाठी वापरण्यात येणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी जवळपास ६५ टक्के ऊर्जा ही सोलर ऊर्जेतून वापरली जाणार आहे. या प्रकल्पासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. तसेच पावसाचे पाणी साठवण्यासाठी स्टेशनवर रेन वॉटर हार्वेस्टिंगची सिस्टिम तयार करण्यात आली.
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी फोटो आणि व्हिडिओ -
२१
ऑगस्ट २०१४
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी सोशल मीडियामधील चर्चा -
२१
ऑगस्ट २०१४
नागपूर मेट्रोसाठी मिहान प्रकल्पांतर्गत ३७ हेक्टर जागा
नागपूर येथील मिहान प्रकल्पांतर्गत मेट्रोसाठी ३७ हेक्टर जागा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मिहान प्रकल्पाच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत मिहान प्रकल्पांतर्गत मेट्रो प्रकल्पाच्या कारशेड तसेच इतर सुविधांसाठी ३७ हेक्टर जागा देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला.
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी फोटो आणि व्हिडिओ -
२३
फेब्रुवारी २०१५
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी सोशल मीडियामधील चर्चा -
२३
फेब्रुवारी २०१५
Facebook
माहिती अस्तित्वात नाही
Twitter
माहिती अस्तित्वात नाही
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी GR आणि इतर लिंक्स -
२३
फेब्रुवारी २०१५
नागपूरच्या ‘माझी मेट्रो’ लोगो आणि वेबसाईटचे उद्घाटन
माझी मेट्रो लोगोचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. दरम्यान, यावेळी नागपूर मेट्रोची वेबसाईट ww.metrorailnagpur.com याचेही उद्घाटन करण्यात आले.
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी फोटो आणि व्हिडिओ -
२१
मार्च २०१५
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी सोशल मीडियामधील चर्चा -
२१
मार्च २०१५
Facebook
Twitter
माहिती अस्तित्वात नाही
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी GR आणि इतर लिंक्स -
२१
मार्च २०१५
GR
माहिती अस्तित्वात नाही
Useful Links
माहिती अस्तित्वात नाही
३१
मे २०१५
नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या कामाची पायाभरणी!
महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये मेट्रोच्या बांधकामास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पायभरणी करण्यात आली. याचे दोन टप्प्यात काम केले जाणार असून, पहिल्या टप्प्यात उत्तर-दक्षिण टप्प्याचे बांधकाम केले जाणार आहे.
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी फोटो आणि व्हिडिओ -
३१
मे २०१५
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी सोशल मीडियामधील चर्चा -
३१
मे २०१५
Facebook
Twitter
माहिती अस्तित्वात नाही
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी GR आणि इतर लिंक्स -
३१
मे २०१५
केंद्र, राज्य आणि नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्यातील त्रिपक्षीय कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी
नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि नागपूर मेट्रो प्रकल्प यांच्या दरम्यान झालेल्या करारास कार्योत्तर मंजुरी राज्य मंत्रिमंडळाने दिली. नागपूर शहरातील सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टिने हा करार करण्यात आला आहे. राज्य सरकारने ३० जानेवारी २०१४ मध्ये या प्रकल्पा मान्यता दिली होती. त्यानंतर केंद्र, राज्य आणि नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्या त्रिपक्षीय करार करण्यात आला होता. त्या कराराला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी फोटो आणि व्हिडिओ -
१३
जून २०१७
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी सोशल मीडियामधील चर्चा -
१३
जून २०१७
Facebook
माहिती अस्तित्वात नाही
Twitter
माहिती अस्तित्वात नाही
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी GR आणि इतर लिंक्स -
१३
जून २०१७
नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या टप्पा २ मध्ये मिहान ते एमआयडीसी इएसआर (१८.७६ किमी), ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान नीद (१२.९२ किमी), लोकमान्य नगर ते हिंगणा (६.६५ किमी), प्रजापती नगर ते ट्रान्सपोर्ट नगर (५.४४ किमी) आणि वासुदेव नगर ते दत्तवाडी (४.४८ किमी) अशा एकूण ४८.२९ किमीच्या मार्गांचा समावेश आहे. या प्रकल्पाच्या ११,२३९ कोटी रुपयांच्या खर्चासही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी फोटो आणि व्हिडिओ -
८
जानेवारी २०१९
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी सोशल मीडियामधील चर्चा -
८
जानेवारी २०१९
Facebook
Twitter
माहिती अस्तित्वात नाही
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी GR आणि इतर लिंक्स -
८
जानेवारी २०१९
नागपूर मेट्रोचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ
नागपूर शहराच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी नोंदवावा, असा दिवस आहे. आजपासून (दि. ७ मार्च २०१९) नागपूरमध्ये माझी मेट्रो धावली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते नागपूर मेट्रोचा शुभारंभ करण्यात आला. साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशन येथे हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑरेंज लाईनच्या पहिल्या टप्प्यातील सिताबर्डी ते खापरी मार्गाचे उद्घाटन केले.
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी फोटो आणि व्हिडिओ -
७
मार्च २०१९
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी सोशल मीडियामधील चर्चा -
७
मार्च २०१९
मुंबई पाठोपाठ आता नागपूरमध्येही मेट्रो नागरिकांच्या सेवेसाठी खुली करण्यात आली आहे.नागपूर मेट्रो अॅक्वा लाईनचा पहिला भागाला आज (२८ जानेवारी) सुभाषनगर मेट्रो स्थानकावर हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ लिंकच्या मदतीने नागपूर मेट्रो प्रोजेक्टला हिरवा कंदील दाखवत त्याचे लोकार्पण केले. सिताबर्डी ते लोकमान्य नगरला जोडणाऱ्या अॅक्वा लाईनचे उद्घाटन करून मेट्रोचे जाळे विस्तारण्यात आले.
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी फोटो आणि व्हिडिओ -
२८
जानेवारी २०२०
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी सोशल मीडियामधील चर्चा -
२८
जानेवारी २०२०
नागपूर मेट्रो टप्पा १ च्या ९,२७९ कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता
नागपूर मेट्रो प्रकल्प १ ला गती देण्यासाठी सुधारित ९२७९ कोटींच्या सुधारित खर्चाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पाचा मूळ खर्च ८६८० कोटी इतका होता. त्यात ५९९ कोटी ६ लाख रुपयांची वाढ झाली. पहिल्या टप्प्यामध्ये मार्गिका १ ऑटोमोटीव्ह चौक ते मिहान आणि मार्गिका २ प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर या ३८.२१ किमी लांबीच्या दोन लेन आणि ३८ स्टेशन्सचा समावेश आहे. त्याला २०१४ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. या प्रकल्पाचा मूळ कालावधी एप्रिल २०१३ ते एप्रिल २०१८ असा ५ वर्षांचा होता. पण याच्या कामास प्रत्यक्षात सुरूवात जून २०१५ मध्ये झाली. एकूण ३८.२१ किमीपैकी सध्या २६ किमी मेट्रो कार्यरत आहे. उर्वरित १२ किमी लाईनचे काम सुरू आहे. प्रकल्पाच्या बांधकामास उशिरा सुरूवात झाल्याने त्याच्या खर्चात वाढ झाली.
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी फोटो आणि व्हिडिओ -
४
ऑक्टोबर २०२२
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी सोशल मीडियामधील चर्चा -
४
ऑक्टोबर २०२२
नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन तर दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन ११ डिसेंबर २०२२ रोजी केले. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्याच्या कामाचे भूमिपूजन केले. पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: फ्रीडम पार्क स्टेशनवरून तिकिट काढून फ्रीडम पार्क ते खापरीपर्यंत मेट्रोने प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. खापरी स्टेशनवर पंतप्रधानांनी खापरी ते ऑटोमोटीव्ह चौक (ऑरेंज लाईन) आणि प्रजापती नगर ते लोकमान्य नगर (अॅक्वा लाईन) या दोन मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यासाठी ८६५० कोटी रुपये खर्च आला.
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी फोटो आणि व्हिडिओ -
११
डिसेंबर २०२२
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी सोशल मीडियामधील चर्चा -
११
डिसेंबर २०२२
नागपूर शहरातील मेट्रो टप्पा २ च्या सुधारित खर्चाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीत नागपूर मेट्रोच्या ४३.८० किमी अंतराची मेट्रो उभारण्यास मान्यता देण्यात आली. यासाठी एकूण ६,७०८ कोटी रुपयांचा सुधारित खर्च येणार आहे. यामध्ये मार्गिका १ ए मिहान ते एमआयडीसी ईएसआर (१८.६५ किमी) मार्गिका २ ए ऑटोमेटीव्ह चौक ते कन्हान नदी (१३ किमी), मार्गिका ३ ए लोकमान्य नगर ते हिंगणा (६.६५ किमी), मार्गिका ३ ए १ प्रजापती नगर ते ट्रान्सपोर्ट नगर (५.५० किमी) असे मार्ग असणार आहेत. जानेवारी २०१४ मध्ये नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा १ प्रकल्प राबवण्यास सुरूवात झाली होती. यामध्ये ४०.०२ किमी लांबीचा मार्ग असून ३२ स्टेशन्स उभारण्यात आली आहेत. याचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी फोटो आणि व्हिडिओ -
५
एप्रिल २०२३
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी सोशल मीडियामधील चर्चा -
५
एप्रिल २०२३
नागपूर मेट्रो रेल टप्पा २ प्रकल्पासाठी त्रिपक्षीय करार
केंद्र सरकारचे नियम व अटींनुसार केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यासंदर्भात केंद्र सरकारने १६ जानेवारी २०२३ रोजी पत्र पाठवले होते. त्यानुसार राज्य सरकारने या त्रिपक्षीय सामंजस्य करारनाम्याच्या मसुद्यास मान्यता दिली. या करारनाम्यानुसार, सदर प्रकल्पावरील खर्चाचा भार भागविण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांना स्थानिक प्राधिकरण, सरकारी/निमसरकारी संस्थांच्या जमिनींचे विकसन करून त्यातून निर्माण होणाऱ्या आर्थिक स्त्रोतांमधून भागवण्यास मान्यता देण्यात आली. तसेच प्रकल्प अहवालामध्ये दर्शवलेल्या बाबींशिवाय खर्च वाढल्यास त्याची मान्यता वित्त विभागाकडून घेणे बंधनकारक असणार आहे.
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी फोटो आणि व्हिडिओ -
२२
सप्टेंबर २०२३
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी सोशल मीडियामधील चर्चा -
२२
सप्टेंबर २०२३
Facebook
माहिती अस्तित्वात नाही
Twitter
माहिती अस्तित्वात नाही
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी GR आणि इतर लिंक्स -
२२
सप्टेंबर २०२३
GR
nagpur-metro-GR-22-September-2023.pdf
×
Useful Links
माहिती अस्तित्वात नाही
२३
नोव्हेंबर २०२३
नागपूर मेट्रो टप्पा २ च्या कामास सुरूवात
नागपूर शहराजवळील भागाला मुख्य शहराशी जलद वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून जोडण्याच्या उद्देशाने प्रस्तावित नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे काम २३ नोव्हेंबरपासून सुरू झाले. या प्रकल्पासाठी एकूण ६,७०८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. नागपूर जिल्ह्यातील वेगाने वाढणाऱ्या भागाला जलद वाहतूक व्यवस्थेने जोडण्यासाठी ४३.८ किमीचा मेट्रो मार्ग तयार केला जात आहे. यामध्ये ३२ मेट्रो स्टेशन्स असणार आहेत.
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी फोटो आणि व्हिडिओ -
२३
नोव्हेंबर २०२३
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी सोशल मीडियामधील चर्चा -
२३
नोव्हेंबर २०२३
Facebook
माहिती अस्तित्वात नाही
Twitter
माहिती अस्तित्वात नाही
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी GR आणि इतर लिंक्स -
२३
नोव्हेंबर २०२३
केंद्रीय अर्थसंकल्पात नागपूर मेट्रोला ६८३ कोटींचा निधी
अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी सादर केलेल्या नवीन सरकारच्या अर्थसंकल्पातून नागपूरमधील मेट्रो प्रकल्प टप्पा २ साठी केंद्र सरकारने ६८३ कोटी रुपयांची तरतूद केली. नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू असून त्यासाठी ६७०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकार यांचा संयुक्त प्रकल्प आहे. त्यामुळे केंद्र सरकारने नागपूर मेट्रोच्या टप्पा दोनसाठी ६८३ कोटी रुपयांची तरतूद केली.
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी फोटो आणि व्हिडिओ -
२३
जुलै २०२४
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी सोशल मीडियामधील चर्चा -
२३
जुलै २०२४
Facebook
माहिती अस्तित्वात नाही
Twitter
माहिती अस्तित्वात नाही
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी GR आणि इतर लिंक्स -
२३
जुलै २०२४
आशियाई विकास बँकेकडून नागपूर मेट्रो-२ साठी १५२७ कोटी रुपये
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला चालना देण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून १,५२७ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महामेट्रो आणि आशियाई विकास बँक यांच्यात सामंजस्य करार झाला. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचा दुसरा टप्पा हा एकूण ४३.८ किमीचा आहे. यामध्ये खापरी ते एमआयडीसी इएसआर (१८.५ किमी), ऑटोमोटीव्ह चौक ते कन्हान नदी (१३ किमी), प्रजापती नगर ते ट्रान्सपोर्टनगर (५.६ किमी), लोकमान्य नगर ते हिंगणा (६.७ किमी) आहे.
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी फोटो आणि व्हिडिओ -
१६
डिसेंबर २०२४
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी सोशल मीडियामधील चर्चा -
१६
डिसेंबर २०२४
नागपूर मेट्रो उड्डाणपुलाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
नागपूरच्या कामठी महामार्गावरील मेट्रोचा ५.६२ किमीचा सिंगल कॉलम पिलरवर उभारलेला डबल डेकर व्हायाडक्ट हा भारतातील सर्वाधिक लांबीचा मार्ग ठरला आहे. स्थापत्यकला आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून बांधण्यात आलेल्या या डबल डेकर व्हायाडक्टची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या रेकॉर्डचे प्रमाणपत्र नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितत महामेट्रोला देण्यात आले. चारपदरी असलेल्या या उड्डाणपुलावर पहिल्या स्टेपवर महामार्ग, दुसऱ्या स्टेपवर मेट्रो आणि जमिनीवरील पूर्वीचा मार्ग अशा वेगवेगळ्या टप्प्यावर वाहतूक व्यवस्था आहे. गड्डीगोदाम चौक, कडबी चौक, इंदोरा चौक, नारी रोड आणि ऑटोमोटिव्ह चौक ही ५ मेट्रो स्टेशन्स या उड्डाणपुलावर बांधण्यात आली आहेत. महामेट्रोने यापूर्वी वर्धा मार्गावर ३.१४ किमी लांबीचा डबल डेकर व्हायाडक्ट बांधून २०२२ मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली होती. आता कामठी मार्गावरील या प्रकल्पाने त्या विक्रमालाही मागे टाकत नवीन इतिहास रचला आहे.
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी फोटो आणि व्हिडिओ -
२
सप्टेंबर २०२५
Photo Gallery
YouTube
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी सोशल मीडियामधील चर्चा -
२
सप्टेंबर २०२५
नागपूर मेट्रो टप्पा २ च्या कर्जास मंत्रिमंडळाची मान्यता
राज्य सरकारने नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा २ या प्रकल्पाला यापूर्वीच मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जाची जबाबदारी स्वीकारण्यास तसेच त्यासाठी आवश्यक करार करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पासाठी मंजूर केलेल्या मर्यादेत द्विपक्षीय, बहुपक्षीय वित्तीय संस्था किंवा अन्य संस्थांमार्फत सुलभ व्याज दराचे कर्ज उपलब्ध करून घेता येणार आहे. त्यांना या कर्जाची मुद्दल, व्याज व इतर शुल्क यांची परतफेड करावी लागणार आहे. या कर्जाच्या अनुषंगाने आवश्यकतेनुसार सरकारने हमी देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी फोटो आणि व्हिडिओ -
३
सप्टेंबर २०२५
Photo Gallery
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
नागपूर मेट्रो प्रकल्पासंबंधी सोशल मीडियामधील चर्चा -
३
सप्टेंबर २०२५
नागपूर मेट्रो – शहरी वाहतूक आणि विकासाचे नवे परिमाण
नागपूर मेट्रो हा केवळ एक वाहतूक प्रकल्प नसून, शहराच्या सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय विकासाचे प्रतीक आहे. या प्रकल्पामुळे नागपूरकरांच्या दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे; गती आली आहे. मेट्रोच्या माध्यमातून शहरातील प्रमुख भागांमध्ये जलद आणि सुरक्षित पोहोचणे शक्य झाले. याचबरोबर मेट्रोमुळे प्रदूषणात लक्षणीय घट होऊन पर्यावरणासाठी मोलाची कामगिरी बजावली गेली. नागपूर मेट्रोच्या दोन मुख्य मार्गांमुळे (नारंगी आणि अॅक्वा लाइन) शहराच्या पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण भागांना जोडले गेले आहेत, ज्यामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा सुधारणा झाली आहे. हा महत्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यात मेट्रो मॅन देवेंद्र फडणवीस (Metro Man Devendra Fadnavis) यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि प्रभावी नेतृत्वामुळे नागपूर मेट्रोच्या संकल्पनेपासून ते प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत वेगवान प्रगती झाली. अंदाजे ८,६८० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारलेला हा प्रकल्प नागपूरला ‘स्मार्ट सिटी’ म्हणून उभारण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. तसेच नागपूरकरांना एक आधुनिक, टिकाऊ आणि कार्यक्षम वाहतूक व्यवस्था उपलब्ध झाली आहे.
भारताची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई शहरात दररोज जवळपास ७० लाख लोक ट्रेन ने व ५० लाख लोक बसने प्रवास करीत असतात. माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे मुंबई मेट्रो प्रकल्पा द्वारे (Mumbai Metro Project) रेल्वे लाइन चे काम प्रगतीपथावर सुरु आहे.