लिडरशिप | निष्ठावान कार्यकर्ता

नगरपरिषद निवडणूक २०२५: देवेंद्र फडणवीस यांचा व्हिजन केंद्रीत विकास प्रचार

महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी, कामातील सातत्य आणि प्रशासनातील दृष्टीकोन विशेषत्वाने जाणवतो. त्यांच्या राजकीय प्रवासात निवडणुका या फक्त राजकीय चढाओढीच्या राहिल्या नाहीत. तर त्या लोकांच्या जीवनात थेट बदल घडवून आणणाऱ्या संधी ठरल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीकडे त्यांनी विकासाच्या अजेंड्याला गती देणारे साधन म्हणून पाहिले आहे. लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न, त्यांच्या मूलभूत गरजा, स्थानिक पातळीवरील रोजगारनिर्मिती, शेतीशी संबंधित अडचणी, पायाभूत सुविधा अशा सर्व समस्या जाणून घेऊन, निवडणुकांच्या माध्यमातून त्या पूर्ण करण्यावर भर देत आहेत. नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये देवेंद्र फडणवीस यांचे विकास मॉडेल हे केंद्रबिंदू ठरत आहे. महाराष्ट्र विकास आराखडा अंतर्गत राज्यभरातील शहरी विकास योजना आणि ग्रामीण विकास प्रकल्प यांना नवी गती मिळत आहे. ३५० शहरांच्या विकासाची ब्लूप्रिंट आणि पायाभूत सुविधांमधील मोठ्या गुंतवणुकीमुळे रोजगारनिर्मितीला देखील चालना मिळेल, असा विश्वास ते निर्माण करत आहेत.

२०१४मध्ये मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा विकास, जलसंधारण, सिंचन प्रकल्प, रस्ते बांधणी आणि शहरीकरण यांना प्राधान्य दिले. त्यांच्या मते विकास म्हणजे फक्त मोठमोठे प्रकल्प नाही. तर लोकांच्या रोजच्या अडचणी दूर करून त्यांना चांगल्या सेवासुविधा उपलब्ध करुन देणे. जसे की, दुष्काळी भागात जलसंधारणाच्या योजना राबवून पाण्याची उपलब्धता वाढवणे, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेद्वारे शेतीसाठी वीजपुरवठ्याचा प्रश्न सोडवणे, ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत रस्ते आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करणे, या पूर्ण करण्यावर भर दिला आहे. महाराष्ट्रातील नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या निवडणुकांसाठी त्यांनी सलग ८ दिवसांत ४३ सभा घेतल्या. त्यातील ३७ प्रत्यक्ष जाहीर सभांमधून तर मोबाईलद्वारे ६ सभांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

फडणवीस निवडणूक प्रचार

३५० शहरांच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार

गावासोबत शहरांचाही सर्वांगीण विकास झाला पाहिजे. राज्यातील लहान शहरांमध्ये आधुनिक सोयी निर्माण करणे, हे ध्येय बाळगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राज्यातील शहरांसाठी लाखो कोटी रुपयांच्या योजना राबविल्या. शहरी गरिबांना घरे, दर्जेदार आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, घनकचरा व्यवस्थापन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. या बदलासाठी ३५० शहरांच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार केल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकांच्या माध्यमातून त्यांनी भुसावळमध्ये टेक्सटाईल्स पार्क उभारणार, दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील नवीन ८०० मेगावॉट उत्पादन प्रकल्पाची मागणी पूर्ण करण्याची, ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर हे आदर्श तीर्थक्षेत्र बनविण्याचा, तसेच कुंभमेळ्याच्या विकासकामामुळे कोणालाही विस्थापित न करता तो मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच निवडणुका आहेत, म्हणून कोणावरही आरोप किंवा टीकाटिप्पणी न करता फक्त व्हिजन आणि विकासाच्या मुद्द्यांवर भर त्यांनी दिला. विरोधकांनी वारंवार लाडकी बहीण योजनेवर टीका केली. पण ही योजना कधीही बंद करणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. त्याचबरोबर महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पाच लाखांपर्यंत मोफत उपचार आणि जवळपास २४४० प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार सरकारद्वारे दिले जात आहेत.

राजकीय भाषणांमधून सामाजिक-आर्थिक बदलांना प्राधान्य

देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभांमधून नेहमी दिसून येते की, कोणत्या भागात कोणत्या विशिष्ट समस्या आहेत आणि त्या सोडवण्यासाठी कोणते उपाय शक्य आहेत. याचा सातत्याने त्यांचा अभ्यास सुरू असतो. नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांनी घेतलेल्या सभांमधून स्थानिक गरजा लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यांच्यासाठी निवडणुका या फक्त सत्ता मिळवण्याची प्रक्रिया नसून, नागरिकांना अपेक्षित असलेल्या सुविधा आणि विकास प्रकल्पांना चालना देणारी संधी असते. आपल्या राजकीय भाषणांमधून आणि निर्णयप्रक्रियेतून त्यांनी नेहमीच सामाजिक व आर्थिक बदलांना प्राधान्य दिले. उद्योगधंदे उभारून रोजगारनिर्मिती, कृषीक्षेत्र मजबूत करण्यासाठी लागणाऱ्या सुविधा, वीज-पाण्याची उपलब्धता, आधुनिक रस्ते आणि परिवहन व्यवस्था या सर्व क्षेत्रांमध्ये निवडणुकांद्वारे मिळालेल्या जनादेशाचा उपयोग त्यांनी योजनांची अंमलबजावणी वेगाने करण्यासाठी केला.

नगरपरिषद निवडणूक २०२५

आजही ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या संकल्पनेतून त्यांनी राज्याचा सर्वंकष कायापालट करण्याचा आराखडा मांडला आहे. भविष्यातील पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आधारित सेवा, शाश्वत शेती, स्वच्छ ऊर्जा, आणि सर्वसमावेशक विकास ही या दृष्टिकोनाची मुख्य तत्त्वे आहेत. निवडणुकांच्या माध्यमातून लोकांशी थेट संवाद साधत, त्यांच्या अडचणी आणि अपेक्षांचे भान ठेवत आणि त्यावर उपाययोजना राबवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत देवेंद्र फडणवीस यांनी नागरी सुविधांच्या आणि विकासाच्या क्षेत्रात गती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच त्यांची कार्यशैली पाहताना हे जाणवते की निवडणुका त्यांच्या दृष्टीने राजकीय मोहीम नसून, जनतेपर्यंत सोयीसुविधा पोहोचवण्याचा आणि त्यांच्या जीवनमानात बदल घडवून आणण्याचा मार्ग आहे.

देवेंद्र फडणवीस नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *