भारताची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई शहरात दररोज जवळपास ७० लाख लोक ट्रेन ने व ५० लाख लोक बसने प्रवास करीत असतात. माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे मुंबई मेट्रो प्रकल्पा द्वारे (Mumbai Metro Project) रेल्वे लाइन चे काम प्रगतीपथावर सुरु आहे.

शहरांतील वाहतूक सुलभ करणारे, शहरांना नवी दिशा देणारे – मेट्रो मॅन देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राचे मेट्रो मॅन म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मेट्रो क्रांती घडवून आणली. मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे यांसारख्या शहरांमध्ये मेट्रोचे जाळे निर्माण करून त्यांनी शहरी वाहतूक व्यवस्थेत ऐतिहासिक बदल घडवून आणला आहे. त्यांनी नागपूरमध्ये देशातील पहिला ‘ग्रीन मेट्रो प्रकल्प’ (India’s First Green Metro Project) सुरू केला, तर मुंबई मेट्रोच्या वेगवेगळ्या लाईनला गती दिली. त्यांच्या कार्यकाळात मेट्रो प्रकल्पांनी वेग घेतला, पुरेशा निधी मंजूर झाला आणि प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली. पहिल्या टर्ममधील मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी ३३७ किमीच्या मेट्रो लाईनची परवानगी मिळवून घेतली होती. त्यातील बऱ्याच मार्गावरील लाईन आता सुरू झाल्या आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात ११ वर्षात अवघी ११ किमीची मेट्रो लाईन उभारली गेली होती. पण देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो प्रकल्पांना चालना देऊन विकासाला आणखी गती दिली. त्यांनी फक्त मेट्रोचे प्रकल्प जाहीर केले नाहीत, तर ते वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी सक्षम यंत्रणा निर्माण केली. त्यामुळेच मुंबई मेट्रो, नागपूर मेट्रो, पुणे मेट्रो आणि नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांना प्रत्यक्षात आणणारे आणि शहरांना नवी दिशा देणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मेट्रो मॅन म्हणून ओळखले जातात.