मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने सुरु केलेला मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्प हा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते पार नुकतेच पडले. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा राज्यातील दळणवळणाच्या दृष्टीने एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे. देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी आणि सतत नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या दृष्टिकोनातून जन्माला आलेली ‘समृद्धी महामार्गा’ची संकल्पना प्रत्यक्षात साकारत आहे. हा समृद्धी महामार्ग राज्यातील 15 जिल्हे आणि हजारो गावांना परस्परांशी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईशी जोडणार आहे.
हा प्रकल्प सुरु होण्यापूर्वीच वेगवेगळ्या कारणांमुळे समृद्धी महामार्ग प्रकल्पाला विरोध होत होता. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयमीपणे या प्रकल्पातील अडथळे दूर करण्यात यश मिळवून आवश्यक असलेल्या जमिनीचे अधिग्रहण करण्याची प्रक्रियाही शांततेत पूर्ण केली. या महामार्गामुळे मुंबई आणि नागपूर या राज्यातील दोन मोठ्या शहरांमधील अंतर 112 किमी ने कमी होणार आहे. तसेच मुंबई आणि नागपूर दरम्यानचा प्रवास 8 तासांत करणे शक्य होणार आहे. मुंबई आणि नागपूरला जोडणारा हा महामार्ग कृषी आणि व्यापाराच्या बाबतीत मुंबई आणि विदर्भाला जोडणारा मोठा दुवा ठरणार आहे.
राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या या एकूण 701 किमी लांबीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील नागपूर ते शिर्डी या पहिल्या 500 किलोमीटर्सच्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण मार्गावर एकत्रितपणे प्रवासदेखील केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचे ‘व्हिजन’ आणि प्रशासनावर स्वार होऊन त्यांनी प्रकल्पाला केलेली सुरुवात याचा ‘समृद्धी’च्या पूर्ततेत खूप मोठा वाटा आहे. महाराष्ट्राचे भविष्य बदलण्यात समद्धी महामार्ग परिणामकारक ठरणार आहे.
राज्यातील 15 जिल्ह्यांना आणि हजारो गावांना परस्परांशी आणि राजधानी मुंबईशी जोडणाऱ्या ‘समृद्धी’ महामार्गामुळे संपूर्ण महाराष्ट्राला एकसंघपणे जोडण्याचा नवा पायंडा प्रकल्पाचे जन्मदाते तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे अस्तित्वात आला आहे. मुंबई आणि नागपूरसारख्या इतर काही महत्त्वाच्या शहरांमध्ये मेट्रोचे जाळे विणणे आणि अशा मोठ्या शहरांना परस्परांशी जोडण्यासाठी महामार्गांची निर्मिती करणे, हा फडणवीसांच्या दूरदृष्टीचा मुख्य भाग होता.
701 किमी लांबी असलेला हा समृद्धी महामार्ग राज्यातील एकमेव ‘ग्रीन फिल्ड इंडस्ट्रीयल कॉरिडोर’ म्हणून ओळखला
जाणार आहे. उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरून या महामार्गाचे बांधकाम करण्यात आले आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला ज्या 24 ठिकाणी इतर जोडरस्ते येऊन छेदतात, त्या ठिकाणी विशेष ‘एन्ट्री’ आणि ‘एक्झिट’ची योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे. या महामार्गावर एकूण 24 ठिकाणी टोलची सुविधा उभारण्यात आली आहे. या 24 ठिकाणी नव्या शहरांची निर्मिती करण्याचे काम देखील सुरू होत आहे. समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस हा प्रकल्प देशातील इतर प्रकल्पांपेक्षा अग्रभागी रहावा, यासाठी अविरत परिश्रम घेत आहेत.
शासन निर्णय
नागपूर – मुुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वे बांधणे
नागपूर – मुुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वे साठी प्रशासकीय सुधारित मान्यता
प्रकल्पातील विलंब टाळण्यासाठी त्रयस्थ यंत्रणेची स्थापना
वित्तीय करारांना मुद्रांक शुल्क माफी
समृद्धी महामार्गाचे नामकरण
महामार्गालगत सोयीसुविधा केंद्र स्थापन करणे
संबंधित ट्विट्स
संबंधित विडिओ