राज्याच्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात विविध भागांतील तीर्थक्षेत्रे आणि यात्रास्थळांचे विशेष महत्त्व आहे. लाखो भाविक श्रद्धेने या ठिकाणी दरवर्षी भेट देतात. या ठिकाणांना आधुनिक सुविधा मिळाव्यात, तसेच इथले धार्मिक पर्यटन वाढून स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात. ही दूरदृष्टी ठेवून महायुती सरकारने ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजना’ राबवण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात योग्य दिशा मिळत असून, कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी वितरित केला जात आहे.
ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास निधीत २५ कोटीपर्यंत वाढ
तीर्थक्षेत्रांचा विकास म्हणजे फक्त धार्मिक परंपरांचे पालन करणे नाही, तर त्या माध्यमातून गावांचा सर्वांगीण विकास करण्यावरही भर दिला जात आहे. धार्मिक श्रद्धास्थळांच्या सुशोभिकरणाबरोबरच तिथले रस्ते, पाण्याची उपलब्धता, स्वच्छतागृहे, भक्तनिवास, वीज, पार्किंगची व्यवस्था, संरक्षणी भिंती आणि मंदिराच्या भोवतालचा परिसर निसर्गरम्य रहावा यासाठी झाडांची लागवड आदी गोष्टींचा सहभाग असलेला एक समग्र विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार पारंपरिक श्रद्धास्थानांना आधुनिक सुविधांची जोड देत धार्मिक ग्रामीण पर्यटनाला चालना आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम राज्य सरकारद्वारे केले जात आहे. पूर्वीच्या योजनेत यात्रास्थळांच्या विकासासाठी फक्त २ कोटी रुपयांपर्यंत मर्यादित निधी दिला जात होता. महायुती सरकारने याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन ही मर्यादा २ कोटींवरून ५ कोटी रुपयांपर्यंत नेली आणि ग्रामीण तीर्थक्षेत्र विकासासाठी दिला जाणारा ५ कोटींचा निधी २५ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला. त्यामुळे अनेक मोठ्या तीर्थक्षेत्रांना भरीव निधीची उपलब्धता झाली. या योजनेत ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त एकूण ४८० तीर्थक्षेत्रांना थेट लाभ होणार आहे, ही तीर्थक्षेत्रे राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये विस्तारलेली आहेत.
भाविकांसाठी मूलभूत आणि आधुनिक सुविधा
महायुती सरकारच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी एक भक्कम आणि दूरदृष्टीपूर्ण पाऊल उचलले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास निधी योजना राज्यात प्रभावीपणे राबवण्यास सुरूवात केली आहे. या योजनेला १४ डिसेंबर २०२३ च्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. त्या योजनेची आता वेगाने अंमलबजावणी केली जात आहे. या योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागातील धार्मिक स्थळांचा विकास करताना मंदिर किंवा दर्ग्यांची डागडुजी करण्याबरोबरच, इथे येणाऱ्या भाविकांसाठी मूलभूत आणि आधुनिक सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. या अंतर्गत मंदिरापर्यंतचे रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, वाहनतळ, भक्तनिवास, संरक्षक भिंती, रस्त्यावर दिव्यांची व्यवस्था, मंदिर परिसरात झाडांची लागवड केली जात आहे.
यात्रास्थळ व तीर्थक्षेत्रांना निधी वितरित
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील स्थळांना निधी वितरित करण्याचे शासन निर्णय प्रसिद्ध केले आहेत. अनेक प्रकल्पांना राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. जसे की, श्री क्षेत्र त्रिभुवन गड (भांड्याचा माळ), कऱ्हेडगाव, जि. बीड यासाठी तब्बल ५ कोटी रुपये, तसेच दर्गा विकास योजनेतून हजरत सात सय्यद पीर दर्गा, नांगोळे, जि. सांगली यासाठी ४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. श्री क्षेत्र अवधूत महाराज संस्थान कारला, जि. अमरावती यासाठी ४ कोटी, श्री धानम्मादेवी मंदिर, जत, जि. सांगली यासाठी ३ कोटी ७७ लाख, तर श्री रेणुका माता देवस्थान, बीड यासाठी २ कोटी ९२ लाखांचा निधी मंजूर केला आहे. अशाप्रकारे राज्यभरातील विविध श्रद्धास्थळांना अनुदान दिले जात आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तीर्थस्थळांचे आधुनिकीकरण आणि त्या परिसराचा विकास होण्यास मदत होत आहे. धार्मिक पर्यटनाबरोबर स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे.
अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने ही योजना सुरू करून महायुती सरकारने त्यांच्या ऐतिहासिक कार्याला आधुनिक काळाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी त्यांच्या काळात ज्या पद्धतीने घाट, रस्ते, पाण्याच्या सोयी, धर्मशाळा उभारल्या, त्याच धर्तीवर आजच्या महाराष्ट्रात विकास घडवण्याचे कार्य या योजनेतून करण्यात येत आहे. तसेच यातून आपल्या श्रद्धा स्थळांबाबत आत्मभान आणि आपल्याला मिळालेल्या वारशाचे संवर्धन करण्याचा प्रयत्न होत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ग्रामीण महाराष्ट्राला धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याचा हा एक चांगला प्रयत्न सुरू आहे.
योजनेतील अनुदान वितरित – शासन निर्णय
श्री सिध्देश्वर मंदिर, सलगरे, ता. मिरज, जि. सांगली. प्रशासकीय मान्यता – २ कोटी २५ लाख ५३ हजार १४० रुपये. शासन निर्णय – १६ जुलै २०२५
हजरत सात सय्यद पीर दर्गा, नांगोळे, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली. प्रशासकीय मान्यता – ४ कोटी ९ लाख ६८ हजार ४८१ रुपये. शासन निर्णय – १६ जुलै २०२५
श्री धानम्मादेवी मंदिर, मौजे गुड्डापूर, ता. जत, जि. सांगली. प्रशासकीय मान्यता – ३ कोटी ७७ लाख ९८ हजार ८२६. शासन निर्णय – १० सप्टेंबर २०२५
श्री बिरोबा देवालय, आरेवाडी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली. प्रशासकीय मान्यता – १ कोटी ९९ लाख ७७ हजार ३१४. शासन निर्णय – १० सप्टेंबर २०२५
श्री जितसिध्द देवस्थान, ब्रम्हनाळ, ता. पलूस, जि. सांगली. प्रशासकीय मान्यता – १ कोटी ७९ लाख ९८ हजार. शासन निर्णय – ११ सप्टेंबर २०२५
श्री लिंगेश्वर महाराज मठ, आळसंद, ता खानापूर, जि. सांगली. प्रशासकीय मान्यता – ८९ लाख ९९ हजार. शासन निर्णय – ११ सप्टेंबर २०२५
श्री भूडसिध्दनाथ देवस्थान, भूड, ता. खानापूर, जि. सांगली. प्रशासकीय मान्यता – ३ कोटी ५९ लाख ९८ हजार. शासन निर्णय – ११ सप्टेंबर २०२५
श्री क्षेत्र संगमेश्वर देवस्थान हरिपूर, ता. मिरज, जि. सांगली. प्रशासकीय मान्यता – १ कोटी ४९ लाख १९ हजार. शासन निर्णय – १२ सप्टेंबर २०२५
सोमेश्वर मंदिर मौजे खटाव, ता. मिरज, जि. सांगली. प्रशासकीय मान्यता – १ कोटी ७९ लाख ९१ हजार. शासन निर्णय – १५ सप्टेंबर २०२५
सोमेश्वर मंदिर मौजे खटाव, ता. मिरज, जि. सांगली. प्रशासकीय मान्यता – २ कोटी ४० लाख. शासन निर्णय – १५ सप्टेंबर २०२५
काळ भैरवनाथ देवस्थान, मौजे, बिळूर, ता. जत, जि. साांगली. प्रशासकीय मान्यता – १ कोटी रुपये. शासन निर्णय – १३ ऑक्टोबर २०२५
श्री एकविरेश्वर महादेव मंदिर, करगणी, ता. आटपाडी, जि. साांगली. प्रशासकीय मान्यता – १ कोटी ८२ लाख. शासन निर्णय – १३ ऑक्टोबर २०२५
श्री चिमकाईदेवी मंदिर, चिमगाव, ता. कागल, जि. कोल्हापूर. प्रशासकीय मान्यता – ८८ लाख रुपये. शासन निर्णय – १२ ऑगस्ट २०२५, प्रशासकीय मान्यता – ७२.०८ लाख. शासन निर्णय – १२ ऑगस्ट २०२५
श्री बेलजाई मंदिर, मौजे उंदरवाडी, ता. कागल, जि. कोल्हापूर. प्रशासकीय मान्यता – १ कोटी ४४ लाख. शासन निर्णय – १० सप्टेंबर २०२५
श्री जंगलीसाहेब गैबी पीर दर्गा मौजे सांगाव, ता. कागल, जि. कोल्हापूर. प्रशासकीय मान्यता – २ कोटी ४८ लाख १४ हजार. शासन निर्णय – १० सप्टेंबर २०२५
श्री केदारलिंग मंदिर (खंबलिंग) मौजे पिंपळगाव बु. ता. कागल, जि. कोल्हापूर. प्रशासकीय मान्यता – २ कोटी ५१ लाख ६५ हजार. शासन निर्णय – १० सप्टेंबर २०२५
भुतोबा मंदिर आकुर्डे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर. प्रशासकीय मान्यता – १ कोटी २७ लाख ८० हजार. शासन निर्णय – १० सप्टेंबर २०२५
भैरवनाथ मंदिर, मौजे खोतवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर. प्रशासकीय मान्यता – १ कोटी ५९ लाख ८६ हजार. शासन निर्णय – १० सप्टेंबर २०२५
संतुबाई देवालय मौजे हेरवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर. प्रशासकीय मान्यता – १ कोटी ५९ लाख ९८ हजार. शासन निर्णय – १० ऑक्टोबर २०२५
संतुबाई देवालय मौजे हेरवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर. प्रशासकीय मान्यता – १ कोटी ६० लाख ५० हजार. शासन निर्णय – १० ऑक्टोबर २०२५
श्री केदारलिंग (ज्योतिर्लिंग) मंदिर मौजे बोरवडे, ता. कागल, जि. कोल्हापूर. प्रशासकीय मान्यता – २ कोटी २ लाख ४८ हजार. शासन निर्णय – १० ऑक्टोबर २०२५
हिवरखान बिरदेव मंदिर, मौजे कुंभोज, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर. प्रशासकीय मान्यता – १८ सप्टेंबर २०२५
जुगाईदेवी मंदिर येळवण जुगाई, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर. प्रशासकीय मान्यता – २ कोटी २५ लाख ६० हजार. शासन निर्णय – २३ सप्टेंबर २०२५
जुगाईदेवी मंदिर येळवण जुगाई, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर. प्रशासकीय मान्यता – १ कोटी ९२ लाख. शासन निर्णय – २३ सप्टेंबर २०२५
श्री महालक्ष्मी विठ्ठलाई मंदिर मौजे ठिकपुर्ली, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर. प्रशासकीय मान्यता – ५ लाख २९ हजार. शासन निर्णय – १३ ऑक्टोबर २०२५
श्री महालक्ष्मी विठ्ठलाई मंदिर मौजे ठिकपुर्ली, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर. प्रशासकीय मान्यता – १ कोटी २३ लाख ५ लाख ८० हजार. शासन निर्णय – १३ ऑक्टोबर २०२५
अतिशय क्षेत्र वृषभाचल मौजे नांदणी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर. प्रशासकीय मान्यता – २ कोटी १९ लाख १९ हजार. शासन निर्णय – १३ ऑक्टोबर २०२५
श्री क्षेत्र बाहुबली मौजे कुंभोज, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर. प्रशासकीय मान्यता – ८० लाख रुपये. शासन निर्णय – १३ ऑक्टोबर २०२५
श्री बिरदेव मंदिर मौजे माणगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर. प्रशासकीय मान्यता – २ कोटी ३५ लाख ५३ हजार. शासन निर्णय – १३ ऑक्टोबर २०२५
श्री गजानन महाराज मंदिर, मौजे खोतवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर. प्रशासकीय मान्यता – २ कोटी ३९ लाख ९९ हजार. शासन निर्णय – १० ऑक्टोबर २०२५
श्री क्षेत्र त्रिभुवन गड (भांड्याचा माळ), कऱ्हेडगाव, ता. आष्टी, जि. बीड. प्रशासकीय मान्यता – ५ कोटी रुपये. शासन निर्णय – १२ ऑगस्ट २०२५
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव ता. आष्टी, जि. बीड. प्रशासकीय मान्यता – ३ कोटी २० लाख. शासन निर्णय – १० सप्टेंबर २०२५
श्री क्षेत्र संत मिराबाई गुरु भगवान संस्थान, महासांगवी, ता. पाटोदा, जि. बीड. प्रशासकीय मान्यता – २ कोटी ४० लाख. शासन निर्णय – १० सप्टेंबर २०२५
श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी, घाटसावळी, ता. जि. बीड. प्रशासकीय मान्यता – २ कोटी ११ लाख ५० हजार. शासन निर्णय – १५ सप्टेंबर २०२५
श्री क्षेत्र रेणुका माता देवस्थान, बेलगाव, ता. आष्टी, जि. बीड. प्रशासकीय मान्यता – २ कोटी ९२ लाख रुपये. शासन निर्णय – १० सप्टेंबर २०२५
श्री तुळजाभवानी देवस्थान, बेलूरा, ता. जि. बीड. प्रशासकीय मान्यता – १ कोटी ४८ लाख १० हजार. शासन निर्णय – १३ ऑक्टोबर २०२५
श्री क्षेत्र नागनाथ महादेव संस्थान, नागतळा, ता. आष्टी, जि.बीड. प्रशासकीय मान्यता – १ कोटी ८० लाख. शासन निर्णय – १० ऑक्टोबर २०२५
श्री क्षेत्र मदन महाराज विद्या प्रसारक मंडळ, कडा, ता. आष्टी, जि. बीड. प्रशासकीय मान्यता – १ कोटी ८० लाख. शासन निर्णय – १० ऑक्टोबर २०२५
श्री क्षेत्र अवधूत महाराज संस्थान कारला, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती. प्रशासकीय मान्यता – ४ कोटी रुपये. शासन निर्णय – १० सप्टेंबर २०२५
श्री संत खप्ती महाराज संस्थान, बागापूर, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती. प्रशासकीय मान्यता – ४ कोटी रुपये. शासन निर्णय – १० सप्टेंबर २०२५
श्री चक्रधर चरनांकित पांडेश्वर देवस्थान, वाकी रायपुर, ता. भातुकली जि. अमरावती. प्रशासकीय मान्यता – २४ लाख. शासन निर्णय – १ सप्टेंबर २०२५
कापूर विहीर संस्थान, विहिरपूर (अष्टमसिध्दी), ता. अचलपूर जि. अमरावती. प्रशासकीय मान्यता – ४० लाख. शासन निर्णय – १२ सप्टेंबर २०२५
श्री क्षेत्र जलालुद्दीन बाबा दर्गा, आमनेर, ता. वरूड जि. अमरावती. प्रशासकीय मान्यता – १ कोटी ८ लाख. शासन निर्णय – १२ सप्टेंबर २०२५
हनुमान मंदिर वेढापूर ता. वरूड, जि. अमरावती. प्रशासकीय मान्यता – ५१ लाख ८६ हजार. शासन निर्णय – १५ सप्टेंबर २०२५
अवधूत महाराज संस्थान सावंगा विठोबा, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती. प्रशासकीय मान्यता – १ कोटी २१ लाख ५० हजार. शासन निर्णय – १० ऑक्टोबर २०२५
श्री क्षेत्र नागमंदिर संस्थान गव्हाळ चांदुरवाडी, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती. प्रशासकीय मान्यता – ४ कोटी रुपये. शासन निर्णय – १३ ऑक्टोबर २०२५
श्री क्षेत्र भैरवनाथ मंदिर देवस्थान, अंकोली, ता. मोहोळ, जि. सोलापूर. प्रशाकीय मान्यता – २९ लाख २५ हजार ९७२. शासन निर्णय – १० सप्टेंबर २०२५
श्री क्षेत्र कामसिध्द देवस्थान खोमनाळ, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर. प्रशासकीय मान्यता – ७९ लाख ५१ हजार १५५ रुपये. शासन निर्णय – ११ सप्टेंबर २०२५
श्री क्षेत्र कामसिध्द देवस्थान, हिवरगाव, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर. प्रशासकीय मान्यता – ७३ लाख ४८ हजार ८९ रुपये. शासन निर्णय – १२ सप्टेंबर २०२५
श्री महालिंगराया देवस्थान, हुलजंती, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर. प्रशासकीय मान्यता – ५५ लाख २२ हजार ५९७. शासन निर्णय – १० ऑक्टोबर २०२५
श्री लक्ष्मीदेवी देवस्थान लक्ष्मी दहिवडी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर. प्रशासकीय मान्यता – ४७ लाख ११ हजार ३९२ रुपये. शासन निर्णय – १३ ऑक्टोबर २०२५
श्री भैरवनाथ देवस्थान सरकोली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर. प्रशासकीय मान्यता – ३१ लाख १ हजार ५४ रुपये. शासन निर्णय – १० ऑक्टोबर २०२५
श्री खंडेराव महाराज देवस्थान खेडगाव, ता. दिंडोरी, जि. नाशिक. प्रशासकीय मान्यता. शासन निर्णय – १० सप्टेंबर २०२५
श्री मोठेबाबा मंदिर, दापूर, ता. सिन्नर जि. नाशिक. प्रशासकीय मान्यता – २ कोटी ४० लाख. शासन निर्णय – १० सप्टेंबर २०२५
श्री खंडेराव महाराज मंदिर, चंदनपूरी, ता. मालेगाव, जि. नाशिक. प्रशासकीय मान्यता – २० लाख रुपये. शासन निर्णय – १० सप्टेंबर २०२५
श्री जगदंबा माता मंदिर, कसबेवणी, ता.दिंडोरी, जि. नाशिक. प्रशासकीय मान्यता – २० लाख. शासन निर्णय – १२ सप्टेंबर २०२५
श्री माहिजीदेवी देवस्थान, पातोंडी, ता. अंमळनेर, जि. जळगाव. प्रशासकीय मान्यता – १० लाख ९५ हजार ३०० रुपये. शासन निर्णय – १० सप्टेंबर २०२५
श्री राम मंदिर, नंदगाव, ता. अंमळनेर, जि. जळगाव. प्रशासकीय मान्यता – ३८ लाख ७१ हजार ८०० रुपये. शासन निर्णय – १० सप्टेंबर २०२५
श्री काळभैरव देवस्थान चांदसणी, ता. चोपडा, जि. जळगाव. प्रशासकीय मान्यता – १ कोटी ७८ लाख ५ हजार ६३५. शासन निर्णय – १० सप्टेंबर २०२५
श्री भैरवनाथ व इतर देवस्थान ट्रस्ट निंबुत, ता. बारामती, जि. पुणे. प्रशासकीय मान्यता – ६० लाख. शासन निर्णय – १२ सप्टेंबर २०२५
श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट ओझर, ता. जुन्नर जि. पुणे. प्रशासकीय मान्यता – ३ लाख ५० हजार. शासन निर्णय – १२ सप्टेंबर २०२५
श्री क्षेत्र मोरगाव, ता. बारामती, जि. पुणे. प्रशासकीय मान्यता – ३८ लाख. शासन निर्णय – १२ सप्टेंबर २०२५
श्री संत झोलेबाबा संस्थान, मौजे चिखली, ता. मंगरूळपीर, जि. वाशिम. प्रशासकीय मान्यता – २ कोटी ३९ लाख ५२ हजार. शासन निर्णय – १० ऑक्टोबर २०२५
श्री शंभुशेष महाराज संस्थान, तऱ्हाळा, ता. मंगरूळपीर, जि. वाशिम. प्रशासकीय मान्यता – ३ कोटी ९९ लाख २२ हजार. शासन निर्णय – १० ऑक्टोबर २०२५
श्री क्षेत्र पितांबर महाराज देवस्थान कोन्डोली, ता. मानोरा, जि. वाशिम. प्रशासकीय मान्यता – २ कोटी ३८ लाख ९२ हजार. शासन निर्णय – १० ऑक्टोबर २०२५
जगदंबा देवी संस्थान, डोंगरखेडा (गिंभा), ता. मंगरूळपीर, जि. वाशिम. प्रशासकीय मान्यता – ३ कोटी ९८ लाख ७३ हजार. शासन निर्णय – १० ऑक्टोबर २०२५
सोनाजी मिाराज संस्थान, मौ. सोनाळा, ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा. प्रशासकीय मान्यता – ३० लाख. शासन निर्णय – १२ सप्टेंबर २०२५
श्री क्षेत्र नृसिंह हेमाडपंथी मंदीर संस्थान, मौजे चांडोळ, ता. जि. बुलडाणा. प्रशासकीय मान्यता – ७२ लाख. शासन निर्णय – १२ सप्टेंबर २०२५
संत गुलाब बाबा संस्थान मौजे काटोल, ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा. प्रशासकीय मान्यता – १ कोटी रुपये. शासन निर्णय – १३ ऑक्टोबर २०२५
संत सखाराम महाराज, मौ. इलोरा, ता.जळगाव जामोद, जि. बुलडाणा. प्रशासकीय मान्यता शासन निर्णय – १२ सप्टेंबर २०२५
पुंडलिक महाराज संस्थान सिरसो, ता. मुर्तीजापूर, जि. अकोला. प्रशासकीय मान्यता – १ कोटी ७० लाख रुपये. शासन निर्णय – १० सप्टेंबर २०२५
नागास्वामी महाराज संस्थान बोर्डी, ता. अकोट, जि. अकोला. प्रशासकीय मान्यता – १ कोटी ७० लाख. शासन निर्णय – १० सप्टेंबर २०२५
श्री क्षेत्र राणमाता मंदिर, सुरादेवी, ता. कामठी, जि. नागपूर. प्रशासकीय मान्यता – ७१ लाख ६२ हजार. शासन निर्णय – १२ ऑगस्ट २०२५
सती अनुसया माता मंदिर, पारडसिंगा, ता. काटोल, जि. नागपूर. प्रशासकीय मान्यता – १ कोटी रुपये. शासन निर्णय – १२ सप्टेंबर २०२५
श्री क्षेत्र नृसिंह संस्थान, पोखर्णी, ता. जि. परभणी. प्रशासकीय मान्यता – २ कोटी ५८ लाख. शासन निर्णय – ११ सप्टेंबर २०२५
रेणुका देवी संस्थान राणीसावरगाव, ता. गंगाखेड, जि. परभणी. प्रशासकीय मान्यता – २ कोटी ३९ लाख ९३ हजार. शासन निर्णय – १० ऑक्टोबर २०२५
कोतुळेश्वर महादेव देवस्थान कोतुळ, ता. अकोले, जि. अहिल्यानगर. प्रशासकीय मान्यता – १ कोटी ७९ लाख ९९ हजार. शासन निर्णय – २३ सप्टेंबर २०२५
श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, जातेगाव, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर. प्रशासकीय मान्यता – १ कोटी ५४ लाख ७८ हजार ६२० रुपये. शासन निर्णय – १३ ऑक्टोबर २०२५
श्री क्षेत्र रामेश्वर ट्रस्ट धांदरफळ, ता. अकोले, जि. अहिल्यानगर. प्रशासकीय मान्यता – १ कोटी ८० लाख. शासन निर्णय – १४ ऑक्टोबर २०२५
श्री रत्नेश्वरी मंदिर वडेपुरी, ता. लोहा, जि. नांदेड. प्रशासकीय मान्यता – ४ कोटी ५० लाख. शासन निर्णय – १२ सप्टेंबर २०२५
श्री भावेश्वर लिंग मल्लीन्नाथ देवस्थान, गुंडेगाव, ता. जि. नांदेड. प्रशासकीय मान्यता – ४ कोटी ५० लाख. शासन निर्णय – १२ सप्टेंबर २०२५
श्री महादेव मंदिर, होळ, ता. शिंदखेडा, जि. धुळे. प्रशासकीय मान्यता – ७८ लाख ५८ हजार. शासन निर्णय – १० ऑक्टोबर २०२५
श्री गोरक्षनाथ महाराज मंदिर, करवंद, ता. शिरपूर, जि. धुळे. प्रशासकीय मान्यता – १ कोटी ६६ लाख ४४ हजार. शासन निर्णय – १० ऑक्टोबर २०२५
श्री क्षेत्र तुकाई देवी मंदिर, मौजे तांदुळवाडी, ता. जि. लातूर. प्रशासकीय मान्यता – १ कोटी १३ लाख २५ हजार रुपये. शासन निर्णय – १० सप्टेंबर २०२५
श्री क्षेत्र प्रकाशा, ता. शहादा, जि. नंदूरबार. प्रशासकीय मान्यता – २ कोटी ८८ लाख. शासन निर्णय – ११ सप्टेंबर २०२५
श्री शिवशंकर मंदिर मौजा नागरा, ता. जि. गोंदिया. प्रशासकीय मान्यता – १ कोटी ८ लाख. शासन निर्णय – १५ सप्टेंबर २०२५
श्री देवी दाक्षायणी मंदिर लासुरगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर. प्रशासकीय मान्यता – ३ कोटी ६० लाख. शासन निर्णय – १० ऑक्टोबर २०२५
श्री शंकर स्वामी संस्थान शिवूर, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर. प्रशासकीय मान्यता – २४ लाख. शासन निर्णय – १४ ऑक्टोबर २०२५
भांगसीमाता गड, मौजे शरणापूर, ता. जि. छत्रपती संभाजीनगर. प्रशासकीय मान्यता – १ कोटी ८० लाख. शासन निर्णय – १४ ऑक्टोबर २०२५
(नोट – १६ जुलै २०२५ ते १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंतचे शासन निर्णय)
संबंधित लेख: