आमदार स्थानिक विकास निधी: देवेंद्रजींची कमिटमेंट आणि मतदारसंघाचा विकास

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ ते २०२४ या कालावधीत दक्षिण-पश्चिम नागपूर या आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी स्थानिक आमदार विकास निधीचा वापर करून विविध उपक्रम राबवले. यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास, सार्वजनिक सेवा आणि नागरी सुविधांच्या उन्नतीसाठी विशेष कामे हाती घेऊन मार्गी लावली. देवेंद्रजी राज्याचे नेते असले तरी मतदारसंघावर त्यांचे विशेष प्रेम आहे. राज्याच्या प्रगतीसाठी अनेक मोठमोठ्या योजना राबवल्या. इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले. पण त्याचबरोबर मतदारसंघातील लोकांसाठी जे जे गरजेचे आणि आवश्यक आहे, ते पूर्ण केले. 

मागील २५ वर्षांपासून आमदार म्हणून देवेंद्रजींनी नागपूर शहर आणि दक्षिण-पश्चिम नागपूरमधील अनेक विषय मार्गी लावले. झोपडपट्टीधारकांना जमीन पट्टे वाटपाची सुरूवात देवेंद्रजींनी नागपूरपासून सुरू केली. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ही योजना संपूर्ण राज्यभर लागू करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय सरकारला घ्यावा लागला. नागपूरमधील जवळपास ४४६ झोपडपट्ट्यांमध्ये राहत असलेल्या नागरिकांना याचा लाभ मिळाला आहे. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना पट्ट्यांचे मोफत वाटप करण्यात आले. सरकारच्या राखीव जागेवरील झोपडपट्ट्या नियमित करण्यात आल्या. तर आताच्या पाचव्या टर्ममध्ये देवेंद्रजींनी नागपूरमधील पाणी पुरवठ्यासाठी ५९९.९९ कोटी रुपये, सांडपाणी व्यवस्थापनासाठी १६७३.९१ कोटी तर नागपूर शहरातील जलस्त्रोत व तलावांच्या पुनर्जिवीकरणासाठी २७.८० कोटी रुपयांचा निधी आणला. या व्यतिरिक्त देवेंद्रजींनी २०१९-२० पासून ते २०२३-२४ या पाच वर्षांच्या कालावधीत आमदार स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून केलेल्या कामांची माहिती जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण आमदार निधी काय असतो आणि त्याची सुरूवात कधीपासून झाली? याविषयी जाणून घेऊ.

आमदार स्थानिक विकास निधी म्हणजे काय?

मतदारसंघातील छोटी-मोठी कामे करता यावीत म्हणून प्रत्येक आमदाराला निधी उपलब्ध केला जातो. यात मतदारसंघातील लहान वाटा-रस्ते, लहान-सहान गल्ल्यांचे सपाटीकरण, लादी-पेव्हर ब्लॉक लावणे, व्यायामशाळा उभारणे, व्यायामशाळेची उपकरणे उपलब्ध करून देणे, जलवाहिन्या, शाळा, बाजार-मंडई यांची दुरुस्ती आदी कामे करता येतात. आमदारांनी सुचविलेल्या या कामांना जिल्हा नियोजन विभागाकडून मंजूरी मिळवून ती प्रत्यक्षात पूर्ण केली जातात.

आमदार स्थानिक विकास निधी कार्यक्रमाची पार्श्वभूमी

महाराष्ट्रात या अशा महत्त्वाच्या लोकोपयोगी लहान कामांचा कार्यक्रम १९८४-८५ पासून राबवविला जात आहे. १९९०-९१ मध्ये या कार्यक्रमाचे नाव ‘स्थानिक विकास कार्यक्रम’ असे करण्यात आले. तर १९९६-९७ पासून याचे ‘आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम’ असे नामकरण करण्यात आले. २०११ मध्ये या आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत कोणकोणती कामे करता येतील याच्या मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या. पण त्यामध्ये बदलत्या काळानुसार आणि परिस्थितीनुसार बदल करून नवीन गोष्टींचा स्वीकार करणे गरजेचे होते. ही गरज लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत येणारी अपेक्षित कामे आणि त्याच्या कार्यपद्धतीची अभ्यास करण्यासाठी २१ जून २०१६ रोजी मंत्रिमंडळ  उपसमितीची स्थापना केली. या समितीने तयार केलेल्या सुधारित सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचनांचा समावेश करून फडणवीस सरकारने १२ जुलै २०१६च्या शासन निर्णयाद्वारे आमदार स्थानिक विकास कार्यक्रमासाठी नवीन नियमावली प्रसिद्ध केली. देवेंद्रजींनी अशाप्रकारे मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी आणि समस्या लक्षात घेऊन आमदारांमार्फत सोडवण्यासाठी नियमावली तयार करून घेतली.

देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण-पश्चिमचे आमदार म्हणून २०१९-२० ते २०२३-२४ या कालावधीत केलेल्या विविध कामांचा आढावा घेणार आहोत.

पायाभूत सुविधा विकास

मतदारसंघातील पायाभूत सुविधांचा विकास करताना वेगवेगळ्या प्रभागातील रस्ते आणि पुलांच्या बांधकामावर लक्ष दिले. जिथे पूर्वी ब्रीज नव्हते किंवा ते जीर्ण झाले होते. अशा ठिकाणी नवीन रस्ते आणि पूल उभारले. यामुळे स्थानिकांना येण्या-जाण्यासाठी अधिक सोयीस्कर सुविधा उपलब्ध झाल्या. त्याचबरोबर पावसाळी नाली, पेव्हरब्लॉक आदी कामेही मार्गी लावली. 

आमदार स्थानिक विकास निधी २०१९-२० अंतर्गत करण्यात आलेली कामे

आमदार स्थानिक विकास निधी २०१९-२०

क्रीडा सुविधांचा विकास

मतदारसंघातील तरुणांसाठी क्रीडांगणे, मैदाने आणि खेळाच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या. यामुळे स्थानिक खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळाल्या आणि त्यांचे प्रोत्साहन वाढण्यास मदत झाली. जी मुलांना पैसे खर्च करून खेळाचे प्रशिक्षण घेता येत नाही. अशा मुलांसाठी शासकीय जागेवर खेळाच्या मैदानांचा विकास करून तिथे खेळाची साधने उपलब्ध करून दिली.

आमदार स्थानिक विकास निधी २०२०-२१ अंतर्गत करण्यात आलेली कामे

आमदार स्थानिक विकास निधी २०२०-२१

पाणी पुरवठा व मलनिस्साकरण वाहिनींचे काम

मतदारसंघातील रहिवाशांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन योजना मंजूर करून घेणे, त्यासाठी निधी उपलब्ध करून देणे. त्याचबरोबर मलनिस्सारण वाहिनींचे आणि नवीन शौचालयांची उभारणी, दुरूस्ती आदी कामे करण्यात आली. या कामांमधून रहिवाशांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. अनेक ठिकाणच्या पाण्याच्या आणि मलनिस्सारण वाहिन्या जीर्ण झाल्याने तिथे नवीन वाहिन्या टाकून घेण्यात आल्या.

आमदार स्थानिक विकास निधी २०२१-२२ अंतर्गत करण्यात आलेली कामे

आमदार स्थानिक विकास निधी २०२१-२२
आमदार स्थानिक विकास निधी २०२१-२२ page 2

शिक्षण आणि आरोग्य सुधारणा

मतदारसंघातील काही भागात वाचनालये, लायब्ररी आदी सेवा सुरू करण्यात आल्या. सरकारी शाळांना जोडून असलेल्या मैदानांवर खेळाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. बॅडमिंटन कोर्ट, स्केटिंग कोर्ट बनवून घेतले. त्याचबरोबर लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी वॉर्डमधील आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य सेवांचा विस्तार करण्यावर भर दिला. वेळोवेळी मतदारसंघात आरोग्यविषयक शिबिरे आयोजित करून तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करून घेतली. आवश्यकतेनुसार गरजू रुग्णांसाठी शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून दिली. 

आमदार स्थानिक विकास निधी २०२२-२३ अंतर्गत करण्यात आलेली कामे

आमदार स्थानिक विकास निधी २०२२-२३
आमदार स्थानिक विकास निधी २०२२-२३ page 2

सांस्कृतिक व समाजभवनची निर्मिती

मतदारसंघातील वेगवेगळ्या जाती-धर्माच्या नागरिकांना सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता यावा. यासाठी काही ठिकाणी सांस्कृतिक सभागृह व समाज भवन उभारून दिले. यामुळे स्थानिकांना सण, उत्सव आणि सांस्कृतिक कार्याक्रमाचे आयोजन करणे सुलभ झाले.

आमदार स्थानिक विकास निधी २०२३-२४ अंतर्गत करण्यात आलेली कामे

आमदार स्थानिक विकास निधी २०२३-२४
आमदार स्थानिक विकास निधी २०२३-२४ page 2

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघासाठी २०१९ ते २०२४ या काळात स्थानिकांची गरज लक्षात घेऊन स्थानिक आमदार विकास निधीचा प्रभावी वापर करून विविध विकासकामे हाती घेतली आणि ती यशस्वीरित्या पूर्ण केली. पायाभूत सुविधांपासून नागरी सेवांपर्यंतच्या क्षेत्रांत अनेक उपक्रम राबवून मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी योगदान दिले. राज्यस्तरावर मोठमोठ्या योजनांचा पाठपुरावा करत असतानाही फडणवीस यांनी आपल्या मतदारसंघाच्या गरजांकडे विशेष लक्ष दिले. ज्यामुळे मतदारसंघातील नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होत राहिला. त्यांच्या या कार्यातून त्यांची मतदारसंघातील बांधिलकी आणि विकासासाठीची वचनबद्धता दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *