विकासाची नवी दिशा: नागपूर शहर आणि दक्षिण-पश्चिम मतदारसंघात भरीव निधी

नागपूर शहर आणि दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील विविध प्रकारच्या विकासकामांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरीव निधीची तरतूद केली. ज्यामुळे या परिसरातील मूलभूत सोयीसुविधा, पायाभूत विकास, शिक्षण, आरोग्य सेवा, रस्ते आणि रोजगाराच्या संधींमध्ये सुधारणा होत आहे. नागपूरच्या प्रगतीला गती देण्यासाठी देवेंद्रजींच्या माध्यमातून करण्यात आलेली ही गुंतवणूक शहरातील नागरी जीवनाचा दर्जा उंचावण्यास महत्त्वाची ठरणार आहे. देवेंद्रजींनी नागपूर दक्षिण-पश्चिम आणि एकूण नागपूर शहराचा ज्या पद्धतीने विकास केला आहे. त्यामुळे नागपूर आता एक स्मार्ट शहर म्हणून विकसित होऊ लागले. पूर्वीच्या नागपूरची जी ऑरेंजसिटी म्हणून ओळख होती. ती आता बदलून हेल्थसिटी आणि टायगर सिटी होऊ लागली. नागपूर लोकांना आता लिव्हेबल आणि लवेबल वाटू लागले आहे. उद्योगधंदे आणि रोजगाराच्या दृष्टिनेही नागपूर लॉजिस्टिक हब म्हणन विकसित होऊ लागले. तर देवेंद्रजींनी विकासनिधीच्या माध्यमातून नागपूर शहरामध्ये जी विकासाची गंगा आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत, त्याबाबत अधिक माहिती घेऊ.

लिव्हेबल अ‍ॅण्ड लवेबल नागपूर – Governmental Funds for Nagpur’s Development

नागपूर शहराला लिव्हेबल अ‍ॅण्ड लवेबल बनवण्याच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस यांनी राबविलेले अनेक प्रकल्प आणि सुधारणा कामी आल्या आहेत. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीमुळे नागपूर शहर राहण्याजोगे, सुरक्षित आणि अधिक आनंददायक बनले आहे. यामध्ये काही ठराविक प्रकल्पांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. ज्यामुळे नागपूरचा कायापालट होण्यास मदत होत आहे. जसे की, स्मार्ट सिटी प्रकल्प. नागपूर स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत शहरात अनेक महत्त्वाच्या ठिकाणी अत्याधुनिक सोयीसुविधा उभारल्या जात आहेत. ज्यामुळे नागपूरचे स्वरूप बदलू लागले आहे. स्मार्ट स्ट्रीट लाईट्समुळे नागपूरच्या सुशोभिकरणात भर पडली आहे. त्याचबरोबर या लाईट्समुळे शहराची सुरक्षितताही वाढली आहे. 

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1746120126628339753

डिजिटल ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टिमद्वारे देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील ट्रॅफिकच्या स्मस्येवर एआयद्वारे नियंत्रण आणणारा प्रकल्प आणला आहे. इंटेलिजंट इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (IITMS)द्वारे शहरातील ट्रॅफिक नियंत्रित करणारी स्वयंचलित कार्यप्रणाली राबवली जाणार आहे. याचबरोबर शहरातील ३३ चौकांमध्ये कॅन्टिलिव्हर पोल्सवर वाहतूक सिग्नल लावण्याचा निर्णय घेण्यात आला. नागपूर विमानतळापासून संविधान चौक आणि एलआयसी चौक ते पारडीपर्यंत कॅन्टिलिव्हर लावण्यात येणार आहेत. सध्याचे वाहतूक सिग्नल वाहनचालकांना स्पष्टपणे दिसत नाही. कॅन्टिलिव्हरवर वाहतूक सिग्नल लावण्याने वाहनचालकांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर आधुनिक पार्किंग प्रणालीचा वापर करून कमी जागेत जास्तीत जास्त पार्किंगची व्यवस्था निर्माण केली जात आहे. सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे नागपूर शहरातील अनाज बाजार इतवारी, सुपर मार्केट सीताबर्डी, गांधीसागर तलाव आणि गोकुळपेठ मार्केट येथे मल्टिलेव्हल कार आणि दुचाकींसाठी पार्किंगची सुविधा निर्माण केली जाणार आहे. या ठिकाणी जवळपास १५० कार ते ६०० पेक्षा जास्त दुचाकींची व्यवस्था होणार आहे. 

फ्री वाय-फाय सुविधा

इंटरनेटमुळे आज अनेकांच्या कामात बदल झाले आहेत. या सुविधेमुळे कोठूनही काम करता येत आहे. संवाद साधता येत आहे. त्यामुळे या गोष्टींना अधिकाधिक प्राधान्य देण्याच्या दृष्टिने शहरातील ठराविक चौकात, बाजार, हॉटेल्स, बस स्टेशन्स, रेल्वे अशा सार्वजनिक ठिकाणी वाय-फाय सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

माझी मेट्रो नागपूर मेट्रो

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे शहरातील नागरिकांचा प्रवास जलद आणि सुलभ बरोबरच थंडगार ही झाला. मेट्रोमुळे नागरिकांसाठी एक सुरक्षित आणि स्वस्त पर्याय उपलब्ध झाला. परिणामी रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होऊन प्रदूषण नियंत्रित होण्यास मदत होऊ लागली आहे.

नागपूरमधील रस्त्यांचे नूतनीकरण आणि विस्तारीकरण करण्यात आले. त्यामुळे इथली वाहतूक व्यवस्था सुधारली. वाहनचालकांमध्ये शिस्त निर्माण झाली. अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली असून प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होऊ लागला आहे. नागपूरला स्वच्छ व हिरवेगार बनवण्यासाठी वृक्षारोपण, ग्रीन पार्क्ससारखे प्रकल्प सुरू करण्यात आले. यामुळे पर्यावरणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत झाली असून यामुळे प्रदूषण आटोक्यात येण्यासही मदत होत आहे. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर, चौकांमध्ये बस स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यामुळे शहरात सुरक्षिततेचे वातावरण आहे. सीसीटीव्ही आणि सीसीटीएनएस सारख्या प्रकल्पांमुळे पोलिसांना यावर लक्ष ठेवता येत आहे.

ऑरेंज सिटीचे रुपांतर हेल्थ सिटी आणि टायगर सिटीत

नागपूर शहर पूर्वीपासून ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जात होते. पण आता गेल्या काही वर्षात नागपूर आता हेल्थ सिटी आणि टायगर सिटी म्हणूनही आपली ओळख निर्माण करून लागले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी विदर्भात आणि प्रामुख्याने नागपूरमध्ये चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला. सध्या नागपूरमध्ये मेडिकलच्या उत्तमोत्तम शिक्षण संस्था उपलब्ध आहेत. यामध्ये एम्स (AIIMS), गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज (GMC), लता मंगेशकर हॉस्पिटल, विदर्भ आणि मध्य भारतातील कॅन्सर रूग्णांसाठी संजीवनी ठरलेले नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, तसेच इतर सुपर स्पेशालिटी रुग्णालयांमुळे नागपूर विदर्भासाठी हेल्थ सिटी ठरू लागली. 

नागपूर आणि टायगर यांचा तसा थेट संबंध नाही. पण नागपूरच्या आसपास निर्माण केलेल्या पेंच टायगर रिझर्व्ह, ताडोबा-अंधारी रिझर्व्ह, उमरेड-कऱ्हांड या वाघ संवर्धन अभयाराण्यांमुळे नागपूरमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली. सरकारने इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्याचा फायदा होत आहे. तशा अशाप्रकारे नागपूरची ओळख आता नव्याने होऊ लागली आहे.

मध्य भारतातील लॉजिस्टिक हब – नागपूर

नागपूर देशाच्या मध्यवर्ती भागात असल्याने उत्तर, दक्षिण तसेच पूर्व आणि पश्चिम भागातील राज्यांशी सहज कनेक्टिव्हिटी साधता येते. त्यामुळे लॉजिस्टिक आणि वाहतुकीच्या दृष्टिने नागपूरला अधिक पसंती मिळत आहे. नागपूर देशातील सर्व महत्त्वाच्या शहरांशी एक समान अंतराने जोडलेले आहे. त्यामुळे अनेक उद्योग आणि व्यावसायिकांसाठी नागपूर हे लॉजिस्टिक हब बनले आहे. इथे असलेला मिहान प्रकल्प हा नागपूरला लॉजिस्टिक हब बनविण्यात महत्त्वाचा घटक ठरत आहे. नव्याने तयार करण्यात आलेला नागपूर – मुंबई समृद्धी महामार्ग हा आणखी एक घटक आहे; जो नागपूरला लॉजिस्टिक हब बनविण्यास कारणीभूत ठरत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचे भौगोलिक स्थान आणि इथली साधन संपत्ती लक्षात घेऊन निर्माण केलेल्या पायाभूत सुविधा, वेगवेगळे प्रकल्प आणि तंत्रज्ञानाची मदत घेऊन राबवलेल्या प्रोजेक्टमुळे नागपूरची देशात वेगळी ओळख निर्माण होत आहे. परिणामी नागपूर देशाचे एक प्रमुख लॉजिस्टिक हब बनत आहे.

नागपूर एआय सिटी

नागपूरमध्ये होत असलेल्या विकासामुळे नागपूर शहराची वेगवेगळी ओळख निर्माण होऊ लागली आहे. यामध्ये आता नागपूरची ‘एआय सिटी’ अशीही ओळख नावारूपाला येऊ लागले आहे. देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल पायाभूत सेवासुविधांचे, तंत्रज्ञानावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प राबवले जात आहेत. यामुळे नागपूर एक स्मार्ट सिटी आणि एआय तंत्रज्ञानाचे केंद्र बनू लागले आहे.

नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत, वाहतूक व्यवस्थापन, जल व्यवस्थापन, वीज व्यवस्थापन, आणि कचरा व्यवस्थापनाच्या स्मार्ट उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. यात डिजिटल प्लॅटफॉर्म्स, सेन्सर-आधारित मॉनिटरिंग आणि डेटा विश्लेषण वापरून शहरातील विविध गोष्टींचे नियमन व नियंत्रण केले जात आहे. ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी आणि शिस्तप्रिय वाहतुकीसाठी एआयवर आधारित ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम आणि सुरक्षिततेसाठी स्मार्ट सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत. राज्य सरकार आणि नागपूर महापालिकेने स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी इनक्यूबेशन सेंटर आणि फंडिंगसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. त्या योजनांच्या माध्यमातून नागपूरमध्ये नवीन उद्योगांना चालना मिळत आहे. तसेच डेटा सेंटर, डेटा स्टोरेज, क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर, प्रोसेसिंगच्या सेवा, डेटा सायन्समधील रिसर्च आणि संधी यांना सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. यामुळे नागपूर एक एआय सिटी म्हणून नावारूपाला येत आहे.

नागपूरच्या विकासात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे नागपूर आज स्मार्ट शहर बनण्याच्या दिशेने प्रवास करत आहे. हेल्थसिटी आणि टायगर सिटी म्हणून नागपूरची ओळख निर्माण होत आहे. ज्यामुळे नागपूर राहण्यासाठी अधिक आकर्षक शहर बनत आहे. तसेच उद्योगधंदे आणि रोजगाराच्या संधी वाढवल्यामुळे नागपूरचा लौकिक एक लॉजिस्टिक हब म्हणूनही प्रस्थापित होत आहे. नागरी जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले निर्णय आणि गुंतवणूक महत्त्वपूर्ण ठरत आहे.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *