देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकीर्द पाहिली तर त्यांनी नागपूर महापालिकेच्या नगरसेवक पदापासून नागपूरचे महापौर, विधानसभेचे आमदार आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जनतेची सातत्याने सेवा केली. राज्याचे प्रमुख म्हणून राज्यहितासाठी विविध प्रकारच्या विकास योजना आणल्या. शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली. पाण्याचे दुर्भिक्ष नाहिसे करण्यासाठी जलयुक्त शिवार सारखी योजना आणली. सर्वसामान्य नागरिकांसाठी सेवा हमी कायदा आणला. त्याचप्रमाणे देवेंद्रजींनी नागपूरमध्ये मेट्रो आणली, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी आणली. आयआयएम सारखी नामांकित संस्था आणली. एम्स सारखे प्रगत रुग्णालय आणले. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारली. रखडलेल्या मिहान प्रकल्पाला गती दिली. ज्या मतदारसंघातील मतदारांमुळे त्यांना महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी मिळाली. त्या मतदारसंघासाठी त्यांनी भरभरून निधी देत त्याचा विकास केला.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर २०१४ ते २०१९ या दरम्यान राज्याचे प्रमुख म्हणून संपूर्ण राज्याची जबाबदारी होती. पण ज्या मतदारसंघातून ते निवडून आले; तो नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघ, त्याचबरोबर नागपूर शहर आणि एकूण नागपूर जिल्ह्याचीही त्यांनी पुरेपूर काळजी घेतल्याचे दिसून येते. नागपूर जिल्हा आणि नागपूर शहरातील जनहिताची विविध प्रकारची कामे मार्गी लावली. त्याचबरोबर नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात मागील १५ वर्षांपासून सातत्याने जनहिताची कामे करत आहेत. नागपूर दक्षिण-पश्चिम हा मतदारसंघ नागपूर पश्चिम आणि नागपूर दक्षिण या दोन मतदारसंघाच्या फेररचनेतून २००९ मध्ये निर्माण झाला आहे. देवेंद्र फडणवीस हे २००९ पासून नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व विधानसभेत करत आहेत. २०१४ मध्ये ते राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी २०१४ ते २०१९ या पाच वर्षात नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघासाठी एकूण ८ कोटी ५४ लाख १७ हजार ६३७ रुपयांचा विकासनिधी दिला.
पायाभूत सोयीसुविधांवर प्रामुख्याने भर
देवेंद्रजींनी मतदारसंघात सिमेंटच्या रस्त्यांचे जाळे विणले. सिमेंटच्या मजूबत रस्त्यांमुळे रस्ते बांधकामातून होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घातला. त्याचबरोबर अनेक विभागांमध्ये सीसीटीव्ही लावले. यामुळे वाहतूक सुरळित होण्याबरोबरच गुन्हेगारीवर वचक ठेवण्यास मदत झाली. मतदारसंघातील झोपडपट्टीवासियांना मालकी हक्काच्या पट्ट्यांचे वाटप केले. त्याचबरोबर मतदारसंघातील नागरिकांना चांगल्या आणि स्वस्त दरात आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आरोग्य शिबिरे आयोजित केली. गरीब आणि गरजू रूग्णांना अत्यावश्यक वैद्यकीय वस्तुंचे वाटप केले. मतदारसंघातील रस्त्यांवर आणि चौकांमध्ये एलईडी दिवे लावण्यात आले. अनेक भागांमध्ये २४ तास पाणी पुरवठा उपलब्ध करून दिला. पूर्वी इथल्या काही भागांमध्ये दिवसातून एकदा किंवा दोन वेळा पाणी येत होते. तर काही ठिकाणी ठराविक वेळेसाठी पाणी येत असल्याने लोकांना ते साठवून ठेवावे लागत होते. पण आता नागरिकांना आपल्या गरजेनुसार पाण्याचा वापर करता येत आहे. २०१४ ते २०१९ या पाच वर्षात नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघासाठी त्यांनी एकूण ८,५४,१७,६३७ रुपयांची कामे केली.
२०१४-१५ मध्ये देवेंद्रजींनी एकूण २७ प्रकारची कामे केली. यासाठी एकूण १ कोटी ५८ लाख ८८ हजार ७३ रुपयांच्या विकासनिधीतून रस्त्याचे डांबरीकरण, आयब्लॉक, सामाजिक सभागृह, शेडचे बांधकाम, संरक्षण भिंत, वीज/प्रकाश, जलवाहिनी अशी एकूण २७ प्रकारची कामे केली.
२०१५-१६ मध्ये रस्त्याचे डांबरीकरण, आयब्लॉक, सामाजिक सभागृह, संरक्षण भिंत, वीज/प्रकाश, सिव्हर लाईन, मैदानांचा विकास आणि चेकर्स टाईल्स अशी एकूण ४० प्रकारची कामे केली. यासाठी त्यांनी आपल्या आमदार निधीतून १ कोटी ८२ लाख ७६ हजार ३२० रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.
२०१६-१७ मध्ये सिव्हर लाईन, शेडचे बांधकाम, सामाजिक सभागृह, रस्त्याचे डांबरीकरण, आयब्लॉक, पाईपद्वारे पाणी, मैदानांचा विकास आणि चेकर्स टाईल्ससाठी एकूण २३ प्रकारची कामे केली. यासाठी एकूण १ कोटी ७० लाख ४४ हजार ५१९ रुपयांचा निधी मिळवून दिला.
२०१७-१८ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एकूण २६ प्रकारची कामे मतदारसंघात केली. यामध्ये डांबरीकरण, सामाजिक सभागृह, संरक्षण भिंत, जलवाहिनी, आयब्लॉक या कामांसाठी एकूण २ कोटी १० लाख ६०५ रुपयांचा विकास निधी मतदारसंघासाठी दिला.
२०१८-१९ मध्ये डांबरीकरण, आयब्लॉक, शेडचे बांधकाम, संरक्षण भिंत, वीज/प्रकाश, जलवाहिनी आणि सिव्हर लाईन अशी एकूण २२ प्रकारची कामे करण्यात आली. त्यासाठी १ कोटी ३२ लाख ८ हजार ११९ रुपयांचा विकासनिधी देण्यात आला.
आमदार निधी व्यतिरिक्त देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी २१० कोटी रुपयांचा विशेष निधी देण्यात आला होता. या विशेष निधीच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिकेतर्फे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी उपयुक्त ठरणारे नाले, नाल्यांचे रुंदीकरण, रस्त्याचे डांबरीकरण, सिव्हर लाईन, शेडचे बांधकाम, पुलाचे बांधकाम, टॉयलेट ब्लॉक,वाचनालय, बॅडमिंटन-बास्केट बॉल कोर्ट-वॉली बॉल कोर्ट, सिमेंटचे रस्ते, कम्युनिटी हॉल, इनडोअर स्टेडिअम, मैदानांचा विकास, कम्पाउंड वॉल आणि मतदारसंघातील वेगवेगळ्या भागांचे सौंदर्यीकरण करण्यासाठी या निधीचा वापर करण्यात आला.
नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात २१.५३ कोटी रुपयांच्या निधीतून उद्याने आणि मैदानांचा विकास करण्यात आला. यामध्ये रामदास पेठ दगडीपार्क उद्यान, व्यंकटेश नगरमधील व्यंकटेस मंदिराजवळील उद्यानाचे सुशोभिकरण, टाटा टोपे नगर, गजानन नगर, सुयोग नगर, नरेंद्र नगर, पंचदीप नगर,तसेच सोनेगाव येथील विविध उद्यानांचा विकास करण्यात आला. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक १३ हिंदुस्थान कॉलोनी, प्रभाग क्रमांक १६ तिरूपती लेआऊट, प्रभाग क्रमांक ३५ संताजी सोसायटी उद्यान, पंचतारा सोसायटी येथील उद्यान, प्रभाग क्रमांक ३४ बाबुलखेडा रेल्वे कॉलोनी, प्रभाग क्रमांक खामला जुनी वस्ती येथील मैदान, प्रभाग क्रमांक ३७ गिट्टीखदान लेआऊट येथील उद्यानांचा विकास करण्यात आला.
प्रभाग क्रमांक १३ मधील अंबाझरी लेआऊट येथील उद्यान, प्रभाग क्रमांक १६ विश्राम नगर येथील सुरेन्द्र देव पार्क धंतोली येथील उद्यान, प्रभाग क्रमांक ३५ येथील भारतीय गृह सोसायटी येथील मैदान, पायल पल्लवी सोसायटी मैदान, प्रभाग क्रमांक ३७ मधील सरस्वती विहार कॉलोनी येथील मैदानांचा विकास केला.
प्रभाग क्रमांक १४, १६, ३४ आणि ३७ मधील विविध भागांमध्ये पथदिवे लावण्याची आणि खांब उभारण्याची कामे करण्यात आली. यासाठी जवळपास ८.४२ कोटी रुपयांची कामे करण्यात आली. त्याचबरोबर सहकारनगर दहन घाटावर नवीन एलपीजी शवदाहिनी उभारण्याचे काम देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
इतर लेख