मुंबई मेट्रो प्रकल्प : ड्रीम लाईन ऑफ मुंबई | Mumbai Metro Project

मुंबई मेट्रो प्रकल्प : मुंबई हे फक्त बॉलिवूडमधील स्वप्नांचे शहर नाही. तर अनेकांचे स्वप्नं प्रत्यक्षात उतरवणारे हॅपनिंग शहर आहे. तसेच ती महाराष्ट्राची राजधानी, तर भारताची ‘फायनान्शिअल कॅपिटल’सुद्धा आहे. भारतातील सर्वाधिक लोकसंख्या ही मुंबईत राहते. मुंबईचे क्षेत्रफळ अवघे ६०३ चौरस किलोमीटर आहे आणि त्यावर जवळपास साडेतीन कोटीहून अधिक लोकसंख्या राहते. यापैकी ७० लाखाहून अधिक लोक दररोज रेल्वेने तर ४० लाख लोक बसने प्रवास करतात. ही सुविधा मुंबईच्या लोकसंख्येच्या तुलनेने खूपच कमी आहे. तर मुंबईत काही ठिकाणी जाण्यासाठी दळणवळणाच्या पुरेशा सोयीसुविधाही नाहीत. यासाठीच मेट्रो हा मुंबईकरांसाठी हा चांगला पर्याय ठरत आहे. यामुळे मुंबईतील दळणवळणाच्या इतर सोयीसुविधांवर येणारा ताण कमी होण्यास मदत होत आहे. अर्थात यामागे दूरदृष्टिकोन असणारा आणि भविष्याचा वेध घेणारा नेता श्री देवेंद्र फडणवीस यांचा मोलाचा हात आहे.

२०१४ नंतर महाराष्ट्रात ‘विकास पर्व’

देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर २०१४ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्राने एक वेगळे पर्व अनुभवायला सुरूवात केली. याचे एक उदाहरण सांगायचं झालं तर, महाराष्ट्रातील पहिला मेट्रो प्रकल्प वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर. या प्रोजेक्टला तत्कालीन राज्य सरकारने २००४ मध्ये मान्यता दिली. पण त्याचे प्रत्यक्ष काम २००८ मध्ये सुरू झाले आणि मुंबईकरांना २०१४ मध्ये मेट्रोने प्रवास करता आला. पण आता ही प्रशासनातील कासवगती राहिली नाही. ‘देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ यांचे सरकार आल्यानंतर प्रशासनातील मरगळ दूर होऊन मुंबईच्या मेट्रो मार्गातील अनेक अडथळे दूर केले गेले आणि आज मुंबईत लाईन-२ पासून लाईन-१४ पर्यंतच्या मार्गावरचे काम सुरू झाले आहे. त्यातील बऱ्याच लाईन सुरू सुद्धा झाल्या आहेत.

Mumbai Metro - मुंबई मेट्रो प्रकल्प
मुंबई मेट्रो प्रकल्प

मुंबई शहर आणि उपनगराचा विचार करता इथे नॉर्थ मुंबईपासून साऊथ मुंबईला येण्याची कनेक्टीव्हीटी बऱ्यापैकी उपलब्ध आहे. पण तीच कनेक्टीव्हीटी मुंबई ईस्टवरून वेस्टला जाण्यासाठी उपलब्ध नाही. त्याचबरोबर मुंबईत रस्त्यावरील वाहतुकीने प्रवास करणे हे ट्रॅफिकच्या दृष्टिने अजिबात हितावह नाही. यासाठी मेट्रो हा एकमेव आणि जलद पर्याय समोर दिसतो. त्याला अनुसरूनच मुंबईतील मेट्रो लाईनची योजना आखली गेली. घाटकोपर ते वर्सोवा या पहिल्या लाईननंतर दुसरी लाईन (ए) डी एन नगर-चारकोप ते दहिसर आणि डी एन नगर – बांद्रा ते मानखुर्द ही लाईन बी आहे. तिसरी लाईन कुलाबा ते अंधरी, सिप्जपर्यंत आहे. चौथी लाईन वडाळ्याहून घाटकोपर, मुलुंड, ठाणे ते कासारवडवलीपर्यंत असणार आहे. चौथी लाईन वडाळ्यापासून पुढे मुंबई सीएसटीपर्यंत जीपीओपर्यंत वाढवण्यात आली. पाचवी लाईन ठाणे ते भिवंडी, कल्याण आणि सहावी लाईन स्वामी समर्थ, जोगेश्वरी ते कांजुरमार्ग अशी असणार आहे. सातवी लाईन दहिसर ईस्ट ते अंधेरी ईस्टवरून एअरपोर्टपर्यंत असणार आहे. सातव्या लाईनचे विस्तारीकरण करून ती दहिसरच्या पुढे मिरा भाईंदरपर्यंत वाढवण्यात आली. मेट्रोच्या या जाळ्यामुळे मुंबईवरील दळणवळणाचा बराचसा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. यामधील फक्त लाईन ३ भूमिगत असणार असून, बाकी सर्व इलिवेटेड म्हणजेच वरून जाणाऱ्या मेट्रो असणार आहेत. या मेट्रोमुळे मुंबईतील जवळपास 35 टक्के रस्त्यावरील ट्रॅफिक कमी होण्यास मदत होणार आहे. 

महाराष्ट्रातील मेट्रोचे सर्व प्रोजेक्ट हे महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MAHA-METRO) या कंपनी अंतर्गत सुरू आहेत. या कंपनीची ५० टक्के मालकी भारत सरकारची आणि ५० टक्के मालकी महाराष्ट्र सरकारची आहे. महामेट्रो या कंपनी अंतर्गत नागपूर आणि पुणे या दोन मेट्रो प्रोजेक्टचे काम सुरू आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत (MMRDA) उभारल्या जाणाऱ्या मेट्रो प्रकल्पाचे काम करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीची १० जून २०१९ मध्ये स्थापना केली होती.

इंटिग्रेटेड तिकिट सिस्टिम – Mumbai Metro

मुंबईची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळित करून ती इंटिग्रेटेड करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध पातळीवर काम करत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना वेगवेगळ्या टप्प्यावर रेल्वे, मेट्रो, मोनो, रोड-वे अशा विविध वाहतूक यंत्रणांचा लाभ तर मिळालाच पाहिजे पण त्यासाठी मुंबईकरांना प्रत्येक वेळी वेगवेगळी तिकिटे काढावी लागणार नाहीत. याचाही सूक्ष्म विचार करून इंटिग्रेटेड तिकिट सिस्टिम राबवण्याची कल्पना मांडली होती. या सिस्टिममुळे मुंबईकरांना एकाच तिकिटावर विविध वाहतूक साधनांचा उपयोग करून इच्छित स्थळी उतरण्याची सुविधा मिळण्याची कल्पना आहे. यामुळे मुंबईकरांची मोठी सोय होण्यास मदत होणार आहे.

मुंबई मेट्रो प्रकल्प : प्रामाणिक काम आणि विकासावर ठाम

Mumbai Metro Project - Inspection by Devendra fadnavis
Mumbai Metro Project

मेट्रोच्या माध्यमातून मुंबईतील वेगवेगळ्या लोकेशनचे देखील इंटिग्रेशन केले जाणार आहे. यातून सर्वसामान्य मुंबईकरांना एण्ड टू एण्ड सोल्यूशन देण्याचा ध्यास श्री देवेंद्र फडणवीस घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या कार्यमग्नतेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मेट्रो उद्घाटन कार्यक्रमामध्ये जाहीर कौतुक केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते की,

मैं श्रीमान देवेन्द्र जी को बधाई देना चाहता हूं, हमारे देश में मेट्रो जैसे काम कें डीपीआर बनाने है तों देंढ-दों साल चले जाते है। लेकिन देवेन्द्र जी ने चार महिने के भीतर उसके डीपीआर तयार किये। और जो इस फिल्ड को जानते है, उन्हे मालूम हैं की, चार महिने में इतना बडा काम कागज पें बनाना यें हमारे देश कें स्वभाव में नही है। देवेन्द्र जी ने जिस तेज गती से मेट्रो कें इस काम कों बल दिया है। यह बदलते हुयें शहरों के जीवन की अनिवार्यता बन गया है।

काँग्रेस-राष्ट्रवादीने ११ वर्षात ११ किमीची मेट्रो उभारली

देवेंद्र फडणवीसांनी ५ वर्षांत मेट्रोचे ३३७ किमीचे जाळे विणले

राज्यात २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेनेचे सरकार येण्यापूर्वी, राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार होते. त्या सरकारने राज्यात  ११ किलोमीटर लांबीची पहिली मेट्रो सुरू करण्यासाठी ११ वर्षे लागली. पण जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे नेतृत्व स्वीकारले तेव्हा त्यांनी अत्यंत कमी कालावधीत जवळपास ३३७ किलोमीटरचा प्लॅन तयार करून त्यातील काही फेजमधील मेट्रो लाईन सुरू देखील केल्या. सर्वात जलद गतीने मेट्रोची कामे मार्गी लावून त्या लोकांसाठी उपलब्ध करून देण्याचा विश्वविक्रम फडणवीस सरकारने केला. २०१९ पर्यंत मुंबई मेट्रो प्रकल्प बरोबरच फडणवीसांनी नागपूर मेट्रोचे ४८.२९ किमी आणि पुणे मेट्रोचे ५८.९६ किमीचे काम मार्गी लावले. 

केंद्र सरकारची मेट्रो प्रकल्पांना गती

राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर केंद्राच्या अर्बन मिनिस्ट्रीने महाराष्ट्रातून पाठवलेल्या मुंबई, नागपूर आणि पुण्यातील मेट्रो प्रकल्पांना मान्यता देऊन त्यांना त्वरित अनुदानही दिले. ३३.५ किलोमीटरच्या मुंबई मेट्रोमधील कुलाबा-बान्द्रा-सिप्झमधील लाईन -३ साठी केंद्र सरकारने ३,४२७ कोटी, मुंबई मेट्रो लाईन २ च्या ३७.८७ किमीसाठी (चारकोप-बान्द्रा-मानखुर्द कॉरिडोअर पीपीपी मॉडेल) १,५३२ कोटी दिले आहेत.

केंद्र सरकारने महाराष्ट्रातील मेट्रो प्रकल्पासाठी २०२१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पातही भरभरून अशी १३,५३६ कोटी रुपयांची तरतूद केली. त्यामध्ये मुंबई मेट्रो -३ (आरे कारशेड) साठी १८३२ कोटी रुपये, पुणे मेट्रो ३,१९५ कोटी रुपये, नागपूर मेट्रो टप्पा २ साठी ५,९७६ कोटी रुपये, नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी रुपये आणि मुंबईतील इतर मेट्रो प्रकल्पांसाठी ४४१ कोटी रुपये मंजूर केले.

मुंबईचा मेट्रो प्रकल्प निधीअभावी रखडू नये यासाठी राज्याचे प्रमुख या नात्या व्यतिरिक्त देवेंद्र फडणवीस यांनी एक सच्चा कार्यकर्ता आणि मुंबईकर या नात्याने निधी मिळवण्यासाठी विविध कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. भविष्यातील मुंबईची प्रगती पाहता अनेक कंपन्या-अधिकाऱ्यांनी फडणवीसांना निधी देण्यास सहकार्य दिले. जून २०१८ मध्ये एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बँक (AIIB)च्या मुंबईत झालेल्या वार्षिक मिटिंगमध्ये शाश्वत विकास यावर प्रेझेंटेशन देऊन मुंबई मेट्रो प्रकल्प सह राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये ५१ टक्के एफडीआय गुंतवणूक आणली.

मेट्रोच्या कामाला कासवगती आणि पुन्हा एकदा कामांचा धडाका

२०१९ च्या निवडणुकांनंतर जनतेने पुन्हा एकदा भाजप-शिवसेना युतीला सरकार स्थापन करण्याची संधी दिली होती. पण उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अति महत्त्वाकांक्षेमुळे देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षात बसावे लागले. त्यावेळी राज्यातील अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडले गेले. मेट्रोच्या कामालाही कासवगती आली. पण पुन्हा एकदा २०२२ मध्ये राज्यात सत्ता बदल झाला आणि फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आणि पुन्हा एकदा कामांचा धडाका सुरू झाला.

२०२३ मध्ये राज्यातील मेट्रो प्रकल्पांचे जाळे पुन्हा एकदा विस्तारू लागले. सरकारच्यावतीने ठाण्यात वर्तुळाकार मेट्रो, राबवण्याचा निर्णय घेतला गेला. मुंबईतही मेट्रोचे नवीन प्रकल्प हाती घेतले. त्यामध्ये मेट्रो -१० गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड या ९.२ किमीसाठी सरकारने ४४७६ कोटी रुपयांची तरतूद केली. तर मेट्रो -११ वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या १२.७७ किमीसाठी ८७३९ कोटी आणि मुंबई -१२ कल्याण ते तळोजा २०.७५ किमीसाठी ५८६५ कोटी रुपयांची तरतूद केली.

देवेंद्र फडणवीस यांनी इतक्या विविध पातळीवर मुंबई मेट्रो प्रोजेक्ट (Mumbai Metro Project) साठी काम केले आहे. या सर्व लाईन जेव्हा हळुहळू सुरू होतील. तेव्हा मुंबईकरांचा प्रवास खरंच सुखदायक होणार आहे. मुंबईच्या कोणत्याही कोपऱ्यातून कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठीच्या सुविधा यातून उपलब्ध होत आहेत. तसेच हा प्रवास गारेगार, प्रदूषण मुक्त, कमी वेळेचा आणि आरामदायी असणार आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मेट्रोमुळे मुंबईतील प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

मुंबईतील मेट्रो नेटवर्कची सद्यस्थिती (Mumbai Metro Status)

मेट्रोचा मुख्य उद्देश मुंबई शहराची अंतर्गत कनेक्टिव्हिटी जोडणे हा आहे. पूर्वी प्रामुख्याने रेल्वे आणि बस सेवेवर अवलंबून असणाऱ्या प्रवाशांना मेट्रोची सुविधा उपलब्ध करून त्यांच्या वेळेची बचत करणे. त्याचवेळी रेल्वेवरील ताण कमी करणे, रस्त्यावरील ट्रॅफिकसह प्रदूषण आटोक्यात आणणे. अशा सर्वांगिण दृष्टिने मेट्रो मुंबईकरांच्या सेवेसाठी तयार आहे. सध्या मुंबई मेट्रो नेटवर्कद्वारे राबविल्या जाणाऱ्या मेट्रो प्रकल्पांचे स्टेट्‍स काय आहे. ते आपण पाहणार आहोत.

४ मार्गावरील मेट्रो कार्यरत

सध्या मुंबईतील ४ मार्गावरील मेट्रो कार्यरत आहेत. सर्वात पहिली वर्सोवा ते घाटकोपर या मार्गावर मुंबईत पहिली मेट्रो सेवा सुरू झाली. त्यानंतर दहिसर ते अंधेरी, दहिसर ते डी एन नगर आणि आता नुकतीच सुरू झालेली मुंबई मेट्रो लाईन ३. ही मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो आहे. आरे ते बीकेसी या मार्गावर एकूण १० स्थानके असून त्यातील ९ स्थानके ही अंडरग्राऊंड आहेत.

१. वर्सोवा ते घाटकोपर (लाईन १) १२ स्थानके (११.४ किमी)
२. दहिसर ते डी एन नगर (लाईन २ए) १७ स्थानके (१८.६ किमी)
३. दहिसर ते अंधेरी पूर्व (लाईन ७) स्थानके १४ (१६.५ किमी)
४. आरे कॉलनी ते बीकेसी (लाईन ३) १० स्थानके (१२.४४ किमी)

८ मार्गावरील मेट्रोची काम प्रगतीपथावर

१. डी एन नगर ते मंडाले (लाईन २बी) २२ स्थानके (२३.६४ किमी)
२. कफ परेड ते बीकेसी – सिप्झ – आरे कॉलनी (लाईन ३) स्थानके २७ (३३.५० किमी)
३. वडाळा ते कासारवडवली (लाईन ४) ३२ स्थानके (३२.३२ किमी)
४. कासारवडवली ते गायमुख (लाईन ४ए) २ स्थानके (२.८८ किमी)
५. ठाणे – भिवंडी – कल्याण (लाईन ५) १७ स्थानके (२४.९५ किमी)
६. स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी (लाईन ६) १३ स्थानके (१५.१८ किमी)
७. अंधेरी पूर्व ते सीएसआय एअरपोर्ट (लाईन ७ए) २ स्थानके (३.१७ किमी)
८. दहिसर ते मिरा भाईंदर (लाईन ९) ८ स्थानके (११.३८ किमी)

५ नवीन प्रस्तावित मेट्रो लाईन

१. सीएसआय एअरपोर्ट ते एनएमआयए (लाईन ८) ७ स्थानके (३५ किमी)
२. वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (लाईन ११) १० स्थानके (१२.७ किमी)
३. कल्याण ते तळोजा (लाईन १२) १७ स्थानके (२०.७ किमी)
४. मिरा रोड ते विरार (लाईन १३) २० स्थानके (२३ किमी)
५. कांजुरमार्ग ते बदलापूर (लाईन १४) ४० स्थानके (४५ किमी)

मंजुरी मिळालेला १ मेट्रो प्रकल्प

१. गायमुख ते शिवाजी चौक, मीरा रोड (लाईन १०) ४ स्थानके (९.२ किमी)

मुंबई, नागपूर मेट्रोसाठी केंद्र सरकारचा निधी

शासन निर्णय

मुंबई, पुणे आणि नागपूर शहरांत मेट्रो प्रकल्प राबविण्यासाठी आणि त्यांना निधी वितरित करण्यासाठी नगर विकास विभागांतर्गत नवीन लेखाशीर्ष सुरू

मुंबई मेट्रो लाईन – २ प्रकल्प राज्य सरकारची मान्यता

मुंबई मेट्रो मार्ग २ दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द मेट्रो मार्ग टप्पा-२ ब डी.एन.नगर – मंडाळे व मुंबईमेट्रो मार्ग ४ वडाळा – घाटकोपर – मुलुंड – ठाणे -कासारवडवली या लाईनला मान्यता देण्याबाबत

मुंबई मेट्रो मार्ग ४अ कासरवडवली गायमुख (मुंबई मेट्रो मार्ग-४ चा विस्तार) या मेट्रो रेल्वे मार्गर्केस मान्यता देण्याबाबत

मुंबई मेट्रो मार्ग ५ ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रोरेल्वे मार्गिकेस मान्यता देण्याबाबत

मुंबई मेट्रो मार्ग ६ स्वामी समर्थनगर – जोगेश्वरी – विक्रोळी या मार्गिकेस मान्यता देण्याबाबत

मुंबई मेट्रो लाईन – ७ प्रकल्प राज्य सरकारची मान्यता

मुंबई मेट्रो ९ दहिसर ते मिरा-भाईुंदर व मेट्रो मार्ग ७ अ अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) (मेट्रो मार्ग-७ चा विस्तार) या मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी
करण्यास मान्यता देण्याबाबत

मुंबई मेट्रो मार्ग १०- गायमुख – शिवाजी चौक (मिरा
रोड) या मेट्रो मार्गाच्या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्याबाबत

मुंबई मेट्रो मार्ग ११ – वडाळा – छत्रपती शिवाजी
महाराज टर्मिनस या मार्गाच्या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्याबाबत

मुंबई मेट्रो मार्ग-12-कल्याण-तळोजा या मेट्रो मार्गाच्या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्याबाबत

इतर लेख

संबंधित ट्विट्स

जी मेट्रो मुंबईची जीवनरेखा आहे, कुलाब्यापासून सिप्जपर्यंत 40 किलोमीटरची आशियातील सर्वात मोठी…

मुंबई मेट्रो २ए दहिसर ते डी एन नगरचे उद्घाटन

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1616106209932890115

मुंबई मेट्रो ९ आणि ७ ए साठी ६३३ कोटी कर्ज मंजूर

संबंधित विडिओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *