त्याला प्रचंड त्रास दिला. त्याच्याबद्दल खोट्या अफवा पसरवल्या . त्याच्या कुटुंबाला टार्गेट केले. खोट्या केसेस टाकून त्याला अटक करण्यासाठी कुभांड रचले. त्याच्यावर टीका करताना हीनतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या गेल्या. विरोधकांनी त्याचे मानसिक खच्चीकरण करण्याची एकही संधी सोडली नाही. पण समुद्राप्रमाणे प्रचंड सामर्थ्यशाली तो! एकाच लाटेत सगळ्यांचे हिशेब चुकते केले त्याने. तोच! ‘देवेंद्र गंगाधरराव फडणवीस’ महाराष्ट्रासारख्या महान राज्याचे धोरणी आणि मुरब्बी नेतृत्व.
देशाच्या इतिहासातले २रे सर्वात तरुण महापौर आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करणारे, स्व. वसंतराव नाईकांनंतरचे पहिलेच मुख्यमंत्री. होय! ‘वसंतराव नाईक’ आणि देवेंद्रजी वगळता महाराष्ट्राच्या इतिहासात एकाही मुख्यमंत्र्याला पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. शरद पवारांना देखील नाही. तुमचा विश्वास बसणार नाही पण देवेंद्रजींना राजकारणात पडायचेच नव्हते. त्यांना आयुष्यभर विद्यार्थी परिषद किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक राहून राष्ट्रसेवा करायची होती. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
देवेंद्र अवघे सतरा वर्षांचे असताना वडील गंगाधरराव फडणवीस वैकुंठवासी झाले. त्याकाळी छोटे देवेंद्रजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमार्फत विद्यार्थी चळवळीचे काम करत असत. एकदा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे काश्मिरात गेले असताना, देवेंद्रजींनीं २५० विद्यार्थ्यांचे नेतृत्व केले होते. त्याकाळी काश्मिरात दहशतवाद्यांनी उच्छाद मांडला होता. आपल्याच काश्मिरमध्ये तिरंगा फडकावण्याची बंदी होती. योगायोगाने तेंव्हाच देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जीवाची बाजी लावून काश्मिरात यात्रा काढून तिरंगा फडकवला होता. इकडे वक्तृत्व,प्रखर बुद्धिमत्ता,स्वच्छ चारित्र्य, वेळ प्रसंगी दोन पाऊल मागे घेत, योग्यवेळी आक्रमकता दाखवणे, हे देवेंद्रचे नेतृत्वगुण परिषदेच्या पदाधिकाऱ्यांपासून लपून राहिले नाही.
त्याच दरम्यान ३० सप्टेंबर १९९० साली अयोध्येत राम मंदिर व्हावे, यासाठी वीस वर्षांच्या देवेंद्रजींनी कारसेवा केली. त्यावेळी त्यांनी पोलिसांच्या लाठ्या खाल्या. प्रतापगड नजीकच्या पुलाजवळ पोलिसांची एक गोळी देवेंद्रजींच्या कपड्याला चाटून गेली. तरीही त्यांनी माघार घेतली नाही. तिकडे देवेंद्रला अटक झाल्याची घरच्यांना पुसटशीही कल्पना देखील नव्हती. अखेर आपण सुखरूप असल्याचे, त्यांनीच जेलमधून पत्राद्वारे कळवले. पण काँग्रेसच्या शासन व्यवस्थेचाच काळ तो. संथ आणि बाबूगिरीने बरबटलेला. इकडे देवेंद्रजींची जेलमधून सुटका होउन ते घरी परतले तराही पत्र घरच्यांना पत्र मिळाले नव्हते.
परिषदेतल्या नेतृत्वगुणांमुळे एके दिवशी सुनीलजी आंबेकरांनी देवेंद्रजींना भाजपात काम करण्याबद्दल सुचवले. आणि वरिष्ठांचा शब्द राखून देवेंद्रजींनी १९९२ साली नगरसेवकपदाची निवडणूक जिंकून राजकारणात प्रवेश केला. तत्पूर्वी त्यांनी भाजयुमोच्या माध्यमातून भाजपात काम केलेले होते. त्यानंतर पक्षाने प्रत्येक वेळी टाकलेला विश्वास देवेंद्रजींनी वेळो-वेळी सार्थ ठरवला. बघाना २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश पाठोपाठ, महाराष्ट्रातून सर्वाधिक खासदार निवडून आणण्यासाठी देवेंद्रजींनी जीवाचे रान केले.
मनोहर पर्रीकरांच्या पश्चात गोव्यात कमळ फुलवण्यात देवेंद्रजींचा खूप मोठा वाटा आहे. देवेंद्रजींना बिहार निवडणुकीसाठी प्रभारी करताच बिहारमध्ये भाजपच्या आमदारांची संख्या वाढली. २०२१च्या बंगाल निवडणुकीची जबाबदारी पक्षाने देवेंद्रजींच्या खांद्यावर टाकताच, मोदीजींच्या नेतृत्वात भाजपने बंगालमध्ये ३ वरून ७७ जागांवर मुसंडी मारली. देवेंद्रजींना हैद्राबाद महापालिका निवडणुकीचे प्रभारी केले आणि तिथल्या नगरसेवकांची संख्या वाढली. तेच कशाला महाराष्ट्रात खंजीर खुपश्याना धोबीपछाड देऊन, देवेंद्रजींनी भल्याभाल्यांचे नड्डे ढिल्ले केले.
समृद्धी महामार्ग,मेट्रो,न्हावाशेवा ट्रान्स हार्बर, जलयुक्त शिवार,ड्रोन पॉलिसी,केंद्राप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात ६००० हजारांची सबसिडी,महिलांना अर्ध्या तिकीटमध्ये राज्यभर एसटीचा प्रवास, कॅन्सर हॉस्पिटल, अनाथांना एक टक्का आरक्षण,ओबीसी राजकीय आरक्षण,मराठा आरक्षण असे कित्येक धडाकेबाज निर्णय या नेत्याने घेतले पण कधीही चमकोगिरी केली नाही. उलट पक्ष, राष्ट्र आणि महाराष्ट्रासाठी प्रसंगी मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला.
देवेंद्रजींचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधीही पुरोगामीत्व किंवा स्त्री मुक्तीच्या पोकळ बाता केल्या नाहीत. मात्र त्यांनी कायमच कृतीतून आपल्या पत्नीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले. महाराष्ट्राच्या एका माजी मुख्यमंत्र्याने आपल्या बायकोला मुख्यमंत्रीपद मिळत असताना, खोडा घातला होता. देवेन्द्रजी अशा अहंकारी स्वभावाचे अजिबात नाहीत. सुदैवाने अशा तेजस्वी नेतृत्वाच्या हाती महाराष्ट्राची सूत्र आहेत. अशा या महाराष्ट्राच्या महानेतृत्वाने आज वयाच्या ५३ व्या वर्षात प्रवेश केलाय. देवेंद्रजी तुम्ही शतायुषी व्हा. महाराष्ट्र आणि देशाची सेवा अशीच तुमच्या हातून घडत राहो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.