लातूर | रोजगार गाथा

लातूर रेल्वे कोच फॅक्टरीतून १०,००० स्थानिक तरुणांना मिळणार रोजगार!

महाराष्ट्राच्या आधुनिक आणि सर्वसमावेशक विकासाचे एक प्रभावी उदाहरण म्हणजे लातूरमध्ये उभारण्यात आलेला लातूर रेल्वे कोच फॅक्टरी प्रकल्प. विशेषतः मराठवाड्यासारख्या तुलनेने दुर्लक्षित भागात असा प्रकल्प आणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाची समतोल दिशा ठरवली आहे. लातूरच्या या कारखान्यातून मेट्रोचे कोच आणि वंदे भारत रेल्वेचे डबे तयार होणार आहेत. त्यामळे हा प्रकल्प फक्त महाराष्ट्राच्या औद्योगिक विस्ताराचे प्रतीक ठरत नाही, तर हजारो युवकांना रोजगाराची संधी देणारे एक सशक्त माध्यम ठरत आहे. या कारखान्यातून सुमारे १०,००० रोजगार निर्माण होणार आहे.

लातूर रेल्वे बोगी निर्मिती कारखाना प्रकल्पाची जानेवारी २०१८ मध्ये घोषणा करण्यात आली होती. फेब्रुवारी २०१८ मध्ये रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांत टेंडर प्रक्रिया, जमीन हस्तांतरण आणि काम सुरू होण्यापर्यंतची सर्व कार्यवाही पूर्ण करण्यात आली. यामागे देवेंद्र फडणवीस यांचे प्रभावी नेतृत्व आणि निर्णयक्षमता होती. इतक्या वेगाने कार्यान्वित होणारा मराठवाडा रेल्वे कोच कारखाना हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प असेल. २५ डिसेंबर २०२० मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी या कारखान्यातील पहिल्या रेल्वे कोच शेलची निर्मिती पूर्ण करण्यात आली. जी तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी त्यापूर्वी जाहीर केली होती.

लातूर रेल्वे कोच निर्मिती कारखाना टाईमलाईन

जानेवारी २०१८: लातूर येथे मेट्रो कोच प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय जाहीर

फेब्रुवारी २०१८: रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात सामंजस्य करार

३१ मार्च २०१८: रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन

३० ऑगस्ट २०१८: अवघ्या ५ महिन्यात टेंडर प्रक्रिया पूर्ण करून कामाचे निर्देश

११ सप्टेंबर २०१८: अवघ्या ११ दिवसात रेल्वे विभागाकडून एमआयडीसीकडे जागेसाठी जवळपास २२ कोटी रुपयांचा भरणा करण्यात आला

ऑक्टोबर २०१८: प्रत्यक्ष कामाला सुरुवात

२५ डिसेंबर २०२०: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी मेट्रो कोच शेलची प्रत्यक्ष निर्मिती

मार्च २०२३: निविदा प्रक्रियेचा अंतिम टप्पा पूर्ण. १२० वंदे भारत गाड्या लातूरमध्ये बनवण्याचा निर्णय

सप्टेंबर २०२४: कायनेट रेल्वे सॉल्युशनच्या तांत्रिक मदतीने १९२० स्लीपर कोचचे उत्पादन घेण्याचा निर्णय

ऑगस्ट २०२५: लातूर कारखान्याद्वारे १,००० लोकांना रोजगार दिला. आगामी दिवसात १०,००० संभाव्य रोजगाराची तयारी

या प्रकल्पात सुमारे ७०५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. लातूरच्या या कारखान्यात वंदे भारतसारख्या अत्याधुनिक रेल्वेगाड्यांचे १९२० डबे तयार होणार आहेत. यातून स्थानिक रोजगारनिर्मितीचे एक यशस्वी मॉडेल नावारूपास येत आहे. साधारणपणे १०,००० लोकांना थेट किंवा अप्रत्यक्षपणे यातून रोजगार उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत स्थानिक तरुण-तरुणींना या संधीचा लाभ द्यावा, असे ठोस निर्देश दिले आहेत.

रेल विकास निगम लिमिटेडमार्फत उभारण्यात आलेल्या या कारखान्यात दरवर्षी २५० ते ४०० कोच तयार करण्याची क्षमता आहे. १५३.८८ हेक्टरवर उभारलेला हा प्रकल्प फक्त लातूरसाठी नाही, तर संपूर्ण मराठवाड्यासाठी लाभदायकक ठरत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात लातूरकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले नाही, तर त्या भागातील गरज, क्षमतांचा अभ्यास करून, दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने निर्णय घेतला. त्यामुळे लातूर आज भारतातील चौथा आणि महाराष्ट्रातील पहिल्या रेल्वे कोच फॅक्टरीचा मानकरी ठरत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे तसेच योजनाबद्ध विचार आणि तितक्याच प्रभावी अंमलबजावणीमुळे लातूरसारखा भाग राष्ट्रीय विकासाच्या केंद्रस्थानी आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *