देवेंद्रजींनी एंट्री मारताच जिंकले जपानचे मन!

आपल्या ५ दिवसीय जपान दौऱ्यावर असलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आज सकाळी टोकियोत आगमन झाले. खरंतर देवेंद्रजींना जपानने सलग दुसऱ्यांदा ‘विशेष शासकीय अतिथी’ हा सन्मान दिला आहे. त्यामुळे दौऱ्यादरम्यान जपान सरकारने देवेंद्रजींच्या दौऱ्यासाठी भरपूर फौजफाटा सज्ज ठेवला होता. परंतु देवेंद्रजींच्या साधेपणाने जपानला आश्चर्यचकित केले. आपल्या देशात विशेष अतिथी म्हणून येणारा हा पाहुणा अगदी सामान्यांप्रमाणे चक्क आपल्या बॅग्ज स्वतःच घेऊन आला. एरवी सर्व व्हीव्हीआयपी पाहुण्यांच्या दिमतीला बॅग उचल्यांपासून ते सूट्स वगैरे कॅरी करायला भरपूर माणसे असतात, परंतु देवेंद्रजी त्याला अपवाद आहेत. आपल्या मॉरिशस दौऱ्यातही देवेंद्रजींनी आपल्या बॅगा स्वतःच वागवत व्हीआयपी संस्कृतीला फाट्यावर मारले.

Devendra Fadnavis Japan Tour
Devendra Fadnavis Japan Tour

जपान या धक्क्यातून सावरत नाही तोच देवेंद्रजींनी दुसरा धक्का दिला. दिमतीला चार्टड प्लेन, चॉपर आणि गाड्यांचा ताफा असूनही देवेंद्रजींनी टोकियो ते क्योटो हा प्रवास चक्क सार्वजनिक बुलेट ट्रेनमधून केला. आता देवेंद्रजींच्या या कृतीमागे मात्र एक स्वार्थ दडला आहे, तो म्हणजे महाराष्ट्र हिताचा! २०१५ साली जपान दौऱ्यावर असलेल्या देवेंद्रजींनी महाराष्ट्रात परत जाताच बुलेट ट्रेन प्रकल्पाला सुरुवात केली. वसुली सरकारची अडीच वर्ष प्रकल्प रखडला असला तरी देवेंद्रजींनी सत्तेत परतताच अवघ्या ११ महिन्यात ९९% भूसंपादनाचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात जी भन्नाट वेगवान वाहतूक व्यवस्था महाराष्ट्रातही सुरु होणार आहे, त्या बुलेट ट्रेनची टेस्ट राईड घ्यायला नको? म्हणून देवेंद्रजींनी व्हीआयपी प्रवासापेक्षा बुलेट ट्रेनला पसंती दिली.

Devendra Fadnavis Japan Tour
Devendra Fadnavis Japan Tour

देवेंद्र फडणवीस हा अवलिया असाच आहे. महाराष्ट्र हितासाठी दिवसरात्र झटतो, परंतु शाही सुविधांचा उपभोग घेण्याचे मात्र कटाक्षाने टाळतो. राज्याचे मुख्यमंत्री असताना सुद्धा देवेंद्रजी इकॉनॉमी क्लासनेच प्रवास करायचे आणि तो शिरस्ता आजही सुरु आहे. ज्यांचं ध्येय व्यापक असतं त्यांना व्यक्तिगत सुख-सुविधांची पर्वा नसते. देवेंद्र फडणवीस हे संघाच्या प्रयोगशाळेत आणि मोदीजींच्या करड्या नजरेखाली घडलेले नेतृत्व आहे. त्यामुळे राष्ट्रभक्ती आणि ‘इदं न मम’ हा विचार त्यांच्या अंगी ठासून भरला आहे. आपण कुठल्या पदावर आहे यापेक्षा आपल्या खांद्यावर कुठले दायित्व आहे याकडे देवेंद्रजींचे लक्ष सदैव केंद्रीत असते. त्यामुळे जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी देवेंद्रजींचे लक्ष महाराष्ट्रासाठी गुंतवणूक कशी खेचायची याकडेच असते. जपान हा कष्टाळू आणि राष्ट्रभक्तांचा देश आहे, जपानला देवेंद्रजींसारखी मेहनती माणसेच आवडतात. म्हणूनच २०१५ पासून देवेंद्रजी आणि जपानची मैत्री, सत्ता गेल्यावरही कायम राहिली. देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जपानने महाराष्ट्रात बुलेट ट्रेन, मेट्रो, ट्रान्सहार्बर लिंक या प्रकल्पांमध्ये १ लाख कोटीहून अधिक गुंतवणूक केली आहे. जपानमधील ओसाका विद्यापीठाकडून डॉक्टरेट मिळविणारे देवेंद्रजी पहिलेच भारतीय आहेत. त्यामुळे आपली कर्मठता आणि साधेपणाने देवेंद्रजी जपानला प्रभावित करून या दौर्यातूनही महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणात प्रकल्प आणि गुंतवणूक घेऊन येणार यात शंकाच नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *