सरकारच्या कामकाजात लोकसहभाग वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना शाश्वत विकासासाठी तरुणांची कल्पकता आणि ऊर्जेचा पुरेपूर वापर सरकारने करून घ्यावा, या उद्देशाने ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र (Transform Maharashtra)’ हा उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील विविध समस्यांविषयी आणि धोरणांविषयी हजारो विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता.
ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र उपक्रम – Transform Maharashtra Activity in Marathi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘न्यू इंडिया’ या उपक्रमावर आधारित देवेंद्र फडणवीस यांनी ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र या उपक्रमाची सुरूवात केली होती. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील तरुणांचा सरकारमधील सहभाग वाढवून राज्यासमोरील आर्थिक, शैक्षणिक, शेती आणि यासारख्या इतर ११ समस्यांवर उपाय योजना शोधण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाला प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा, भारतीय लष्कराचे वेस्टर्न कमांडर प्रमुख मेजर जनरल अनुथ माथूर, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये सादर करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी कॅबिनेट मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
तरुणाई म्हणजे इनोव्हेटीव्ह आयडियाजचे भांडार
आजची तरुणाई खूप स्मार्ट आणि इनोव्हेटीव्ह आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रकारच्या प्रकल्पांवर तरुणाई सकारात्मक पद्धतीने काम करत आहे. तरुणांच्या या उत्साहाला आणि कल्पनांना अधिकृत सरकारी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाची रुपरेषा तयार केली होती. यातून महाराष्ट्राच्या विकासाला हातभार लावणाऱ्या कल्पना मिळाल्या. तसेच त्यातून महाराष्ट्राचे ट्रान्सफॉर्मेशन वेगाने होण्यास मदत झाली. भारत ज्या वेगाने बदलतोय. वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करत आहे. त्यामुळे जगभरात भारताकडे मोठ्या आशेने पाहिले जात आहे. जगाच्या भारताकडून असलेल्या या आशा पूर्ण करण्याची तयारी भारताने सुरू केली. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्र त्या दिशेने पाऊल टाकत आहे. यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. यातून भारत विकसित राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. जगाच्या पटलावर भारत सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेला देश म्हणून ओळखला जातो. त्या युवकांची शक्ती योग्य रीतीने वापरली तर भारत लवकर विकसित होण्यास मदत होईल.
जगातील विकसित अर्थव्यवस्था असलेले देश आता वार्धक्याकडे झुकलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागून आहे. सध्या भारत हा सर्वाधिक तरुणाई लोकसंख्या असलेला देश म्हणून ओळखला जातो. २०३५ पर्यंत ही परिस्थिती अशीच राहणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भारत संपूर्ण जगाला स्कील मॅनपावर पुरवू शकतो, इतकी ताकद भारतामध्ये आहे. हेच उद्दिष्ट लक्षात ठेवून केंद्र सरकारने स्कील इंडिया उपक्रमाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या कौशल्यांना प्राधान्य दिले. अशाच पद्धतीने जर आपल्या युवा शक्तीला योग्य वळण दिले तर संपर्ण जगात भारताचा डंका वाजू शकतो.
महाराष्ट्र दिनी ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्रा’ची सुरूवात
वरळी येथील एनएससीआय येथे महाराष्ट्र दिनी १ मे २०१७ रोजी अॅक्शन फॉर कलेक्टिव्ह ट्रान्सफॉर्मेशन (एसीटी) अंतर्गत ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी संपूर्ण राज्यभरात एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्यभरातील ६ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यातील २३०० विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर सादरीकरण केले होते. त्यातून वेगवेगळ्या महाविद्यालयातील ११ टीमची अंतिम फेरीसाठी निवड केली. या टीमने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपस्थित साडेतीन हजार विद्यार्थ्यांसमोर आपल्या कल्पना मांडल्या. तंत्रज्ञान आणि ज्ञानाचा योग्य उपयोग केला तर एक छोटासा प्रयोगदेखील लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो. जलयुक्त शिवार ही अशाच प्रकारची एक योजना आहे. ज्या योजनेमुळे राज्यातील ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली होती. जिथे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्स लावावे लागत होते. तिथे पुरेसे पाणी उपलब्ध झाले होते. तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने वापर केला तर अनेक समस्यांवर समाधानकारक उत्तर मिळते.
अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या ११ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घनकचरा व्यवस्थापन, नागरी गरिबी निर्मुलून, भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र, दुष्काळमुक्त महाराष्ट्र, वाहतूक व्यवस्थेचे एकात्मिकरण (ट्रॅफिक कंट्रोल), नागरिकांचा प्रशासनातील सहभाग, स्टार्टअप इंडिया, ग्रामीण जीवनात तंत्रज्ञानाचा वापर आणि जलद न्यायदानासाठी आधुनिक पद्धतीचा अवलंब आदी महाराष्ट्रासमोरील विविध समस्यांवर अभिनव संकल्पना मांडल्या. यातील काही संकल्पना प्रत्यक्षात राबविण्यासाठी सरकारकडून संमती देण्यात आली. त्यासाठी मंत्री, सचिव आणि विद्यार्थी प्रतिनिधींना सोबत घेऊन एका समितीची स्थापना करण्यासही फडणवीस यांनी संमती दिली होती. दरम्यान, फडणवीस यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन ‘व्हिजन महाराष्ट्र २०२५’ यावर चर्चा केली. या चर्चेत राज्यातील महत्त्वाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले. मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्र या विषयावर तयार केलेल्या मॉडेलचा समावेश जलयुक्त शिवार योजनेमध्ये करण्यास संमती दिली होती. त्याचबरोबर वसंतदादा पाटील वास्तुशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शहरी गरीब निर्मूलन या विषयावर सादरीकरण केले. या मॉडेलचा स्मार्ट सिटी प्रोजेक्टसाठी उपयोग होणार असल्याचे मत उपस्थितांनी नोंदवले होते. तसेच पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी इंटीग्रेटेड ट्रॅफ्रिक सिस्टमवर एक मॉडेल सादर केले. तर मुंबईतील व्हीजेटीआय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र यावर मॉडेल तयार केले होते. अवसारी येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन संस्थेने ग्रामीण महाराष्ट्रातील शिक्षणाचा कायापालट करणारी योजना मांडली होती.
तरुणाई म्हणजे सळसळता उत्साह. तरुणाई म्हणजे बदल घडवून आणण्याची ताकद आणि तरुणाई म्हणजे तंत्रज्ञानाचा अविष्कार. या सर्व गोष्टींना एकत्र आणणारा प्लॅटफॉर्म म्हणजे ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र (Transform Maharashtra) हा उपक्रम आहे. राज्यातील विविध समस्या तंत्रज्ञानाच्या मदतीने दूर करणारा हा प्लॅटफॉर्म आहे. तसेच युवा शक्तीच्या विचारांना चालना देणारा, कल्पना शक्तींना वाव देणारा, प्रगतीचा विचार करणाऱ्या तरुणाईचा आवाज सरकारपर्यंत पोहचवणारा ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ हा प्लॅटफॉर्म आहे.
संबंधित लेख
- महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचा सर्वांनाच मोफत लाभ!
- लोकसेवा हक्क अधिनियम: सामान्य जनतेला सेवेचा अधिकार मिळवून देणारा कायदा
संबंधित विडिओ