अर्थसंकल्प म्हणजे काय? | अभ्यासक, लेखक अन् अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस!

‘अभ्यासोनी प्रकटावे, अन्यथा झाकोनि असावे’, या उक्तीप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी कोणताही विषय हाती घेतला की, ते त्याचा खोलात जाऊन विचार करतात. त्याचा सांगोपांग अभ्यास करतात आणि त्यातून स्वत:ची भूमिका निश्चित करतात. सखोल अभ्यास करण्याची त्यांची ही वृत्ती आताची नाही. तर अगदी शालेय जीवनापासून कोणताही विषय अभ्यासपूर्वक समजून घ्यायचा ही त्यांची सवय होती. त्यांनी ही सवय राजकारणतही सोडली नाही. उलट या सवयीमुळे त्यांना त्याचा फायदाच अधिक झाला. आज आपण त्यांच्या या सवयीशी संबंधित ‘अर्थसंकल्पाच्या अभ्यासा’विषयी, त्यातील आकडेमोड आणि अर्थमंत्री म्हणून सादर केलेल्या पहिल्या अर्थसंकल्पाविषयी जाणून घेणार आहोत.

सध्याच्या राजकारणातील नेते मंडळी पाहता काही निवडक नेते सोडले तर एकही नेता अभ्यासू म्हणावा असा दिसत नाही. उलटपक्षी सध्याच्या राजकीय नेत्यांच्या नावाने खडे बोल ऐकवणाऱ्यांचीच संख्या अधिक आहे. सभागृहातील भाषणे असो, एखाद्या विषयावरील चर्चा असो, विरोधी पक्षाचा ठराव असो, मुद्देसूद भाषण असो किंवा विधिमंडळातील अर्थसंकल्पावरील चर्चा असो, अशा सर्वच पातळीवर देवेंद्र फडणवीस हे जोरदार बॅटिंग करताना दिसतात. आमदार म्हटले की, मतदारसंघातील विकासकामे आली, राज्याचा जमा-खर्च आला, विविध विषयांवरील धोरणे आली आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राज्याचे बजेट आले. या बजेटबाबत आजही अनेक आमदारांमध्ये संभ्रम असल्याचे दिसून येते. कारण अर्थसंकल्प आणि आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी लागणाऱ्या निधीचा संबंध काय? याची पुरेशी माहितीच आमदारांना नसते. हेच नेमके हेरून देवेंद्र फडणवीस यांनी आमदार झाल्यानंतर अर्थसंकल्प म्हणजे काय? अर्थसंकल्पात काय असते? त्यातून एखादी माहिती कशी शोधायची? असे त्यांनाच पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी जाणून घेतली आणि त्यानंतर ती इतरांना समजून सांगण्यासाठी ‘अर्थसंकल्प म्हणजे काय?’, हे पहिले पुस्तक २००५ मध्ये लिहिले. त्यानंतर त्यांनी ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे आणखी एक छोटेखानी पुस्तक त्यांनी २०२० मध्ये लिहिले. 

Devendra fadnavis explaining Budget

अर्थसंकल्प म्हणजे काय? | What is a Budget in Marathi

अर्थसंकल्प, हा कोणत्याही सरकारचा सर्वांत महत्त्वाचा भाग असतो. या अर्थसंकल्पातून त्या सरकारचे राजकीय आणि आर्थिक धोरण दिसून येत असते, म्हणून या अर्थसंकल्पाला खूप महत्त्व आहे. तसा प्रत्येक घराचा स्वत:चा असा एक अर्थसंकल्प असतो. अर्थसंकल्प म्हणजे काय? तर राज्याच्या तिजोरीत विविध घटकांमधून जमा होणारी रक्कम आणि त्या जमा रकमेतून करण्यात येणारा आवश्यक बाबींबरील खर्च. त्यामध्ये कर्ज, व्याज, भांडवल यांचाही समावेश असतो. तर हा जमा-खर्च राज्याच्या आकारामानाप्रमाणे आणि राज्याच्या आर्थिक स्थितीप्रमाणे प्रचंड मोठा असतो. त्यामध्ये बारीक-बारीक गोष्टींचे तपशील लक्षात घेतलेले असतात. तर या सगळ्यांची इत्यंभूत माहिती अर्थसंकल्पाच्या पुस्तकांमध्ये दिलेली असते. पण एवढ्या मोठ्या बॅगमधून नेमकी माहिती शोधायची कशी? हा मात्र मोठा प्रश्न असतो. पण ज्याला त्या पुस्तकांविषयी माहिती आहे. कोणत्या पुस्तकात कोणती माहिती असते, हे माहिती आहे, तो त्यातून माहिती शोधून काढू शकतो. 

अर्थसंकल्प-म्हणजे-काय.pdf

×

सदस्यांना बॅग प्रिय, तर देवेंद्रजींना बॅगेतील पुस्तके!

अर्थसंकल्पाची माहिती दिलेल्या पुस्तकांविषयी पुरेशी माहिती असलेले सदस्य खूपच कमी आहेत. त्यातीलच एक म्हणजे देवेंद्र फडणवीस. त्यांचा अर्थसंकल्पाचा सखोल अभ्यास होता. अर्थसंकल्प मांडून झाल्यानंतर सर्व सदस्यांना ही पुस्तके दिली जातात. ती एकत्रित राहावी यासाठी ती बॅगेत भरलेली असतात. पण सदस्यांना त्या पुस्तकांचे काय करायचे, हे कळत नव्हते. त्यामुळे ते बॅगेतील पुस्तके काढून फक्त बॅग घेत असत. पण देवेंद्र फडणवीस यांचे उलटे होते. ते अशा सदस्यांकडून ती पुस्तके घेऊन अभ्यासकांना देत असत. यातील गंमतीचा भाग सोडला तर, अर्थसंकल्प हा राज्याच्या दृष्टिने खूपच महत्त्वाचा भाग आहे. तो लोकप्रतिनिधी म्हणून सदस्यांनी समजून घेणे तितकेच गरजेचे आहे. कारण लोकप्रतिनिधी विधिमंडळात जनतेचे विविध प्रश्न मांडत असतात. त्या प्रश्नांची उत्तरे, त्यासाठी करण्यात आलेली तरतूद किंवा सरकार जनतेसाठी किती आणि कसे पैसे खर्च करते, याची सर्व माहिती या अर्थसंकल्पाच्या पुस्तकांमध्ये दिलेली असते. ती लोकप्रतिनिधींनी समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी २००५ मध्ये ‘अर्थसंकल्प म्हणजे काय?’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकामध्ये अर्थसंकल्प म्हणजे काय, अर्थसंकल्पाची प्रक्रिया कशी सुरू केली जाते, विधिमंडळात बजेटची पुस्तके म्हणून सदस्यांना काय-काय दिले जाते, त्यातील महत्त्वाच्या टर्म कोणत्या आहेत, त्याचा अर्थ काय, याची माहिती दिली.

अर्थसंकल्पीय भाषणातून राज्याचा लेखाजोखा सादर 

देवेंद्रजींनी लिहिलेल्या पुस्तकाचा अनेक सदस्यांना फायदा झाला. त्यातील काही संज्ञांचे मराठीतून स्पष्टीकरण दिल्यामुळे त्याबद्दलची स्पष्टता आली. देवेंद्रजी जेव्हा विधिमंडळात एखाद्या विषयावर भाषण करायचे तेव्हा त्यांच्या भाषणात वेगवेगळ्या प्रकारची आकडेमोड असायची. त्यामध्ये सरकारने राबविलेल्या योजनांचा किती जणांना नेमका लाभ मिळाला. त्यासाठी निधी किती खर्च केला. तो किती टप्प्यात दिला गेला, याची इत्यंभूत माहिती असायची. त्यांच्या या अशा मुद्देसूद भाषणामुळे सरकारलाही त्याचपद्धतीने त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागत असे. त्यांची अर्थसंकल्पावर एवढा डिटेल अभ्यास होता की, ते जेव्हा अर्थसंकल्पावरील भाषणास उभे राहायचे तेव्हा त्यांचे भाषण ऐकण्यासाठी अनेक जण सदस्य आवर्जून उपस्थित राहायचे. तर ने=[]मके उत्तर देण्यासाठी मंत्र्यांबरोबर अधिकारी सर्व लेखा-जोखा घेऊन उपस्थित राहायचे.

बजेटमधील आकड्यांमधून सत्ताधाऱ्यांचा पर्दाफाश

अर्थसंकल्पातील या चिकित्सक वृत्तीमुळेच फडणवीस यांनी जलसंपदा विभागातील सिंचन घोटाळ्याबाबत अनेक पुरावे शोधून काढले होते. कोणत्या प्रकल्पांना कशाप्रकारे सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यामध्ये अनियमितता कशी झाली. निधीचा दुरूपयोग कशाप्रकारे केला गेला, अशी सर्व माहिती त्यांनी शोधून काढली होती. त्यानंतर सरकारला सिचंनाविषयीची श्वेतप्रत्रिका काढावी लागली होती. त्याचप्रमाणे विदर्भाच्या अनुशेषाबाबतही फडणवीसांनी जोरदार आवाज उठवला होता. तर काही ठिकाणी त्यांनी सरकारला निधीचे योग्य वाटप करण्याबाबत मार्गदर्शन केले.

२०१४ मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी आपल्या ५ वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात आपल्यातील अर्थसंकल्पाचा अभ्यासक जागृत ठेवून राज्याच्या हितासाठी अनेक समाजोपयोगी योजना राबवल्या. त्यासाठी लागणारा निधी फक्त राज्याच्या तिजोरीतून न काढता त्यासाठी लोकांना, सामाजिक संस्थांना, कॉर्पोरेट कंपन्यांना आवाहन करून या योजनांच्या पूर्ततेसाठी जमा-खर्चाचा मेळ साधला. जलयुक्त शिवार योजना, मागेल त्याला शेततळे या योजनांसाठी मिळवलेला लोकसहभाग त्याचबरोबर पायाभूत सोयीसुविधा उभारण्यासाठी जमा केलेला निधी, हे देवेंद्र फडणवीस यांचे अर्थसंकल्पातील कौशल्य आहे.

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस – Finance Minister Devendra Fadnavis

नोव्हेंबर २०१४ ते ऑक्टोबर २०१९ अशी ५ वर्षे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अडीच वर्षे देवेंद्रजी राज्याचे विरोधी पक्ष नेते होते. या कालावधीत त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. कोरोना काळात राज्याची अर्थव्यवस्था डबघाईला आली असताना सरकारच्या वायफळ खर्चाबाबत आणि अनियमिततेबाबत फडणवीसांनी सरकारला धारेवर धरले होते. या अडीच वर्षानंतर देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा सत्तेत सहभागी झाले. त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री पद ही जबाबदारी देण्यात आली. 

२०२३ मध्ये त्यांनी अर्थमंत्री म्हणून आपल्या जीवनातीलच नाही, तर देशाच्या अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प पाच अमृतांवर आधारित मांडण्यात आला होता. यामध्ये पहिले अमृत होते, शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, दुसरे अमृत महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, तिसरे अमृत भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधांचा विकास, चौथे अमृत रोजगार निर्मिती आणि पाचवे अमृत पर्यावरणपूरक विकास हे होते. 

अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी अनेक नवीन योजना सुरू केल्या. तर काही योजनांचा थेट लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. त्यातीलच एक योजना म्हणजे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना, या योजनेद्वारे राज्य सरकार केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये जमा करत आहे. म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना १२ हजार रुपये मिळत आहेत. त्यानंतर अवघ्या १ रुपयांत पीकविमा उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्याचबरोबर नदी जोड प्रकल्प, मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्प, मुलींसाठी लेक लाडकी योजना, महिलांसाठी एसटीच्या तिकिटात ५० टक्के सवलत अशा समाजोपयोगी योजना सुरू केल्या.

अशाप्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी एक अर्थसंकल्पाचा अभ्यासक, अर्थसंकल्पावर मुद्देसूद चर्चा करणारा आमदार, यशस्वीरीत्या मुख्यमंत्री पदाची ५ वर्षे पूर्ण करणारा आश्वासक नेता, त्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या बेलगाम खर्चाला लगाम लावणारा विरोधी पक्ष नेता आणि कोरोनानंतर ढासळलेली अर्थव्यवस्था सुस्थितीत आणण्यासाठी तसेच लोकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना आधार देणारे अर्थमंत्री म्हणून भरीव व ठोस असे काम उभे केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *