भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा रेशीम धागा अधिक घट्ट करणाऱ्या रक्षाबंधनानिमित्त, महाराष्ट्रातील एका महानेत्याच्या बहिणीची मुलाखत प्रसिद्ध झाली. ही मुलाखत म्हणजे जुन्या पेटाऱ्यात दडलेल्या आठवणींचा खजिना म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण या मुलाखतीच्या माध्यमातून लाडक्या बहिणीने आपल्या भाऊरायाच्या असंख्य आठवणी सांगितल्या आहेत. इंग्रजीत द्वाडपणासाठी ‘पार्टनर्स इन क्राईम’ नावाची एक फ्रेज वापरली जाते. त्याप्रमाणेच या मुलाखतीत ‘भाड्याची सायकल’ या आठ्वणीद्वारे त्यावर प्रकाश टाकला गेला आहे. शिवाय तुम्ही-आम्ही ज्याचे चाहते आहोत. ते आपले लाडके नैतृत्व लहानपणी किती व्रात्य होते? त्यांची जडणघडण कशी झाली? अशा अनेक गोष्टींवर या मुलाखतीच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला आहे. या मुलाखतीतील सगळ्यात भावुक क्षण म्हणजे महाराष्ट्र आणि राष्ट्रसेवेस वाहून घेतलेल्या आपल्या भावाकडे त्याच्या लाडक्या बहिणीने एक छोटीशी गोष्ट मागितली. काय असेल ती गोष्ट? आणि ती इच्छा बंधुरायला पूर्ण करता येईल की नाही? चला तर जाणून घेऊयात.
राष्ट्रसेवेस वाहून घेतलेल्या देवेंद्रजींसाठी लाडक्या बहिणीची ‘स्पेशल ओवाळणी
‘देवेंद्र फडणवीस’ हे महाराष्ट्रातल्या नेत्यांचे नेते. देवेंद्रजी त्यांच्या शांत, सुस्वभावी आणि संवेदनशील व्यक्तिमत्वासाठी ओळखले जातात. देवेंद्रजींची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे दिलेल्या शब्दाचे पालन करणे. मग तो शब्द जनतेला दिलेला असो वा वरिष्ठांना. त्यासाठी वेळ प्रसंगी त्यांनी सर्वस्व पणाला लावलेले महाराष्ट्राने अनेकदा पाहिले आहे. हा नेता देव, देश आणि धर्माप्रती कमालीचा एकनिष्ठ आहे. इतका की देशाच्या आजवरच्या इतिहासात मुख्यमंत्रीपदानंतर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ कुणीही घेतली नाही. मात्र, व्यापकदृष्टी आणि महाराष्ट्रहित नसानसांत भिनलेल्या देवेंद्रजींनी ते केले. याचे श्रेय अर्थात फडणवीस कुटुंबातील वडीलधारी मंडळी आणि देवेंद्रजींवर संस्कार करणाऱ्या त्यांच्या बहिणींना जाते.
‘भावना खरे’ या देवेंद्रजींच्या बहिणीने त्यांच्या लहानपणीचे अनेक किस्से सांगितले आहेत. त्यातील काही निवडक किश्यांची आम्ही तुम्हाला मेजवाणी देणार आहोत. तर वर उल्लेख केलेल्या ‘भाड्याची सायकल’ या किश्यापासून सुरुवात करुयात. लहानपणी देवेंद्रजींची सारी भावंडे घरून मिळणारे पैसे जमा करून दोन सायकल भाड्याने घेत असत. त्यानंतर आळीपाळीने दोघे-दोघे सायकलचा राउंड मारत असत. एके दिवशी भावनाजी आणि देवेंद्रजींकडे सायकलचा ताबा येताच त्यांनी खट्याळपणे मोठा राउंड मारला. वेळ संपून गेली तरी दोघे परतलेच नाहीत. त्यामुळे पुढे सगळ्या भावंडानी वेळ संपण्याच्या १५ मिनिट आधी देवेंद्रजी आणि भावनाजींना सायकल देण्याचा नियम केला.
देवेंद्रजी एकत्र कुटुंबात वाढले. त्यामुळे सगळ्या गोष्टी वाटून खायच्या. सगळ्यांशी मिळून मिसळून वागायचे. हे संस्कार आपसूकच बालपणापासून त्यांच्यावर होत गेले. भावनाजी सांगतात की, फडणवीस कुटुंबाच्या मालकीचे एक ऊसाचे गुऱ्हाळ होते. लहानपणी सगळी भावंडे ऊसाचा रस पिण्यासाठी संध्याकाळी आपापले ग्लास घेऊन तिथे जात असत आणि मनमुराद ऊसाच्या रसाचा आस्वाद घेत असत. आवडत्या पेयाबद्दल बोलतांना भावनाजी म्हणल्या की, देवेंद्रजींसहित सगळीच भावंडे हाडाचे चहाप्रेमी आहेत. लहानपणी आम्ही सगळी भावंडे पंगतीने चहा घ्यायचो. त्यावेळी चहाचे कित्येक राऊंड होत होते. थोडक्यात काय, तर एकत्र सायकल चालवणे. ऊसाचा रस किंवा चहाची पंगत अशा छोट्याछोट्या गोष्टीतून मिळून-मिसळून राहण्याचे संस्कार नकळतच छोट्या देवेंद्रजींवर होत गेले. कदाचित म्हणूनच देवेंद्रजींनी राजकारणात वैयक्तिक हितसंबंध आणि स्वार्थाला अधिक महत्त्व दिले नाही किंवा मी, मला, माझे असा संकुचित विचार देखील कधीच केला नाही. आज देशात-महाराष्ट्रातच नव्हे तर देशाबाहेर देखील देवेंद्रजींच्या विद्वत्तेतचे कौतुक केले जाते. नुकत्याच झालेल्या जपान दौऱ्यात एखाद्या सेलिब्रेटीप्रमाणे अनिवासी भारतीयांसह जपानी लोकसुद्धा टोकियो एअरपोर्ट बाहेर देवेंद्रजींच्या आगमनाची वाट पाहत होते. जपानी इन्फ्लुएन्सरसह अनेक युट्युबर देवेंद्रजींच्या स्वागताचे व्हिडीओ पोस्ट करत होते.
भावनाजींनी देवेंद्रजींच्या बुद्धिमत्तेबद्दल एक छान आठवण सांगितली. लहानपणापासूनच देवेंद्रजींची बुद्धी अत्यंत तल्लख आहे. त्यामुळे परीक्षेत थोडासा अभ्यास करूनही त्यांना चांगले गुण मिळायचे. या दरम्यान भावनाजींनी देवेंद्रजींबद्दल एक सदिच्छा व्यक्त केली. भावनाजी म्हणतात, देवेंद्रजी कधीही स्वतःसाठी जगत नाहीत. नेहमी इतरांचा विचार करतात. त्यामुळे त्यांनी किमान एक दिवस स्वतःसाठी काढायला हवा. किमान एक दिवस स्वतःसाठी जगायला हवे. वर्षातून किंवा सहा महिन्यातून एकदा का होईना पण देवेंद्रजींनी एक दिवस स्वतःसाठी राखून ठेवायला हवा. त्यादिवशी फक्त त्यांनी आपल्या आवडीच्या गोष्टी कराव्यात. सामान्यतः राजकारण्यांचे आयुष्य सुखासीन असते, असा लोकांचा गैरसमज आहे. गैरसमज यासाठी कारण देवेंद्रजींसारख्या नेत्याला सतत पायाला भिंगरी लावून फिरावे लागते. त्यांच्या जेवणाची अथवा झोपण्याची वेळ ठरलेली नसते. रात्र-रात्रभर काम करावे लागते. कुटुंबाला वेळ देता येत नाही. खासगी आयुष्य संपुष्टात येते. कुठलीही कृती करताना खूप सावध राहावे लागते. कारण केवळ राजकीय वैमनस्यातून अनेकांनी देवेंद्रजींबद्दल अत्यंत घाणेरडे राजकारण खेळलेले उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. २०१४ साली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून देवेंद्रजींनी एकदाही सुट्टी घेतल्याचे आठवत नाही. त्यामुळे भावनाजींची मागणी अगदी रास्त आहे.
कदाचित आपणही पूर्वीप्रमाणे मोटार सायकलवरून एखादी चक्कर मारावी. सकाळी उशिरापर्यंत झोप काढावी. नेटफ्लिक्सवरील सिरीज पाहण्यात दिवस खर्ची घालावा. आवडीच्या एखाद्या नाटकाचा मनमुराद आनंद लुटावा. कुटुंबासह सहलीला जावे, असे देवेंद्रजींना बऱ्याचदा वाटून गेले असावे. पण कितीही इच्छा असली तरी त्यांच्यासाठी ते शक्य नाही. पूर्वी अनेकदा देवेंद्रजी भावनाजींच्या घरी सुट्टी काढून राहायला जात असत. आपल्या भाऊजींच्या रॉयल एन्फिल्डवर मनमुराद रपेट मारत असत. मात्र राजकरणात सक्रिय झाल्यावर हळुहळू या गोष्टी दुरापास्त झाल्या. ज्या प्रमाणे चंदन स्वतः झिजून इतरांचे आयुष्य सुगंधित करते. तसेच देवेंद्र फडणवीसांसारख्या नेतृत्वाच्या हाती महाराष्ट्राची सूत्र असल्याने तुमच्या आमच्यासारखी महाराष्ट्रातील १२ कोटी जनता आपल्या मनासारखे जगू शकते. म्हणूनच अशा लोकनेत्याला मानाचा मुजरा आणि आभाळहून मोठे व्यक्तिमत्व लाभलेल्या भावाकडे वैयक्तिक लाभाची गोष्ट न मागता, “स्वतःच्या मनाप्रमाणे जग” अशी सदिच्छा व्यक्त करणार्या बहिणीला सलाम.
इतर लेख: