सीएम ऑडियो ब्रिज: पारदर्शक आणि उत्तरदायी शासनाची दिशा

राज्यातील वेगवेगळ्या भागात पाण्याच्या टंचाईमुळे आवश्यकतेनुसार पाण्याचे टँकर उपलब्ध करून देणे, तसेच जुन्या झालेल्या पाण्याच्या योजना दुरूस्त करून किंवा जिथे गरज असेल तिथे नवीन पाईपलाईन टाकणे, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करणे, जिथे चारा छावण्या कमी आहेत; तिथली संख्या वाढविणे. पाणीटंचाईग्रस्त भागात रोजगार हमी योजना सुरू करून तिथल्या लोकांशी थेट बोलून दिलासा देण्याचा प्रयत्न तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘संवाद सेतू’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला होता.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना २०१९ मध्ये ‘सीएम ऑडियो ब्रिज’ हा कार्यक्रम राबविला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिक, शासकीय अधिकारी आणि इतर संबंधित घटकांशी थेट संवाद साधून लोकांच्या तक्रारींचे निवारण केले जात होते. देवेंद्र फडणवीस यांनी संवाद सेतू या कार्यक्रमाच्या माध्यमातून २२ जिल्ह्यातील १३९ तालुक्यांतील लोकप्रतिनिधी, सरपंच, सरकारी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांच्याशी टंचाई परिस्थितीत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी संवाद सेतूच्या माध्यमातून संवाद साधला. या संवाद सेतू कार्यक्रमात जवळपास २७ हजार ४४९ लोकप्रतिनिधी आणि अधिकारी सहभागी झाले होते. राज्यभरातून ८८४ सरपंचांनी संवाद सेतूद्वारे आपल्या गावातील समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. तसेच व्हॉटस्अ‍ॅपद्वारे दुष्काळाशी संबंधित तक्रारी नोंदविल्या. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्परतेने कार्यवाही करण्याच्या सूचना देत ग्रामस्थांना दिलासा दिला होता.

सीएम ऑडियो ब्रिज या कार्यक्रमाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना सरकारकडून मिळत असलेल्या सुविधा योग्य पद्धतीने मिळत आहेत का? तसेच या योजनांचा राज्यातील नागरिकांना फायदा होत आहे का? त्याबाबत त्यांच्या काही सूचना असल्यास त्या जाणून घेऊन त्यात बदल करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

जनतेशी प्रत्यक्ष संवाद

सीएम ऑडियो ब्रिज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी थेट ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांशी संवाद साधला. या थेट संवादामुळे मुख्यमंत्र्यांना लोकांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा कळण्यास मदत झाली. अनेकवेळा सरकार आपल्या पद्धतीने काम करत असते. पण त्याचा नागरिकांना किती फायदा होत आहे किंवा सरकारकडून मिळणाऱ्या मदतीमध्ये, योजनांमध्ये काही बदल अपेक्षित असतात. पण या गोष्टी सरकारपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे देवेंद्रजींनी ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यांना स्थानिक पातळीवरील समस्या समजून घेण्यास आणि त्याचे तात्काळ निराकरण करणे शक्य झाले.

दुहेरी संवाद

प्रत्यक्ष संवादबरोबरच देवेंद्रजींनी राज्यातील नागरिकांशी दुहेरी संवाद साधला. बऱ्याचवेळा सरकारद्वारे किंवा सरकारी अधिकाऱ्यांकडून एकतर्फी संवाद साधला जातो. यामुळे लोकांच्या अडचणी आणि अपेक्षा सरकारपर्यंत पोहोचत नाही. यासाठी देवेंद्रजींनी या ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांशी दुहेरी संवाद साधण्याची संधी घेतली. ज्यामुळे नागरिकांच्या समस्या आणि सूचना मुख्यमंत्र्यांपर्यंत थेट पोहचल्या व त्यावर तत्काळ उत्तर मिळणे शक्य झाले.

पारदर्शकता आणि उत्तरदायित्व

सरकारच्या कामातील पारदर्शकता आणि सरकारद्वारे राबविल्या जाणाऱ्या योजनांचे उत्तरदायित्व अधिक जाणीवपूर्व करण्यासाठी ऑडिओ ब्रिज हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरला. यामुळे सरकारचा नागरिकांप्रति असलेला ओपन अ‍ॅप्रोच दिसून आला. तसेच सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या योजनांचे उत्तरदायित्व कोण स्वीकारणार हा प्रश्न ही सर्वसामान्यांना पडत असतो. बऱ्याचवेळा चांगल्या गोष्टींचे श्रेय घ्यायला सगळेच पुढे येतात. पण काही योजनांमध्ये गडबड असल्यास किंवा त्या चुकीच्या पद्धतीने राबविल्या जात असल्यास त्याचे उत्तरदायित्व स्वीकारण्यास कोणीच तयार होत नाही. देवेंद्रजींनी हाच विचार बदलण्यासाठी प्रत्यक्ष संवादावर भर देत आपल्या सरकारमधील प्रत्येक कामामध्ये पारदर्शकता असल्याचे सांगत त्याचे उत्तरदायित्वही स्वीकारले. यामुळे नागरिकांचा या सरकारवरील विश्वास अजून वाढला. कारण इथे चांगल्या गोष्टींबरोबरच समस्या ऐकून त्यावर ताबडतोप तोडगाही काढला जात होता.

योजनांचा प्रतिसाद आणि समस्या निराकारण

ऑडिओ ब्रिज या कार्यक्रमाचा उपयोग देवेंद्रजींनी नागरिक सरकारी योजनांना कशाप्रकारे प्रतिसाद देत आहेत, हे समजून घेण्यासाठी केला. ३१ ऑक्टोबर २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर मात्र त्यांना पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागले. त्यावेळी त्यांनी सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून अनेक दुष्काळी भागांना फायदा झाला. जलयुक्त शिवार नंतर मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार यासारख्या योजनांमुळे पाणीटंचाईच्या परिस्थितीवर मात करता आली. पण देवेंद्रजींनी फक्त योजना सुरू केल्या नाहीत. तर त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला. त्या योजनांमधील अडचणी समजून घेऊन त्या अधिक मजबुतीने राबविल्या. ऑडिओ ब्रिजमुळे सरकारला नागरिकांच्या नेमक्या समस्या कळल्या आणि त्यावर योग्य तोडगादेखील काढता आला. यामुळे लोकांच्या मनात फडणवीस सरकारबद्दल अधिक विश्वास निर्माण झाला.

मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे मुख्य सचिव, विविध विभागांचे सचिव, संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक आणि सरपंच असे सर्वच महत्त्वाच्या व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे समस्यांवर प्रत्येक टप्प्यांवर लगेच तोडगा काढून तक्रारीचे निवारण करण्यावर भर दिला गेला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरपंचांनी आपल्या गावातील समस्या सांगितल्या आणि या समस्यांवर ग्रामसेवकापासून मुख्य कार्यकारी अधिकारी ते जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यावर मार्ग सुचविण्यात आले. यामुळे अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याच्या योजनांची दुरूस्ती झाली. काही ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्यात आली. रोजगार हमी योजनेतून गावासाठी विहिरीचे, शेततळ्याचे काम मंजूर करण्यात आले. त्याचबरोबर दुष्काळ निवारणाच्या कामांना प्राधान्य देत पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, टँकर मंजुरी, चारा छावण्या सुरू करणे ही कामे लगेच मार्गी लावण्यात आली.

सीएम ऑडियो ब्रिज कार्यक्रमामुळे नागरिक आणि सरकार यांच्यातील अंतर कमी झाले. तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे सरकारला राज्याच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या लोकांशी थेट संवाद साधता आला. आपल्या मागण्या, अडचणी प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांसमोर मांडता आल्या. यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अधिक प्रभावी आणि नागरिक केंद्रीत बनले. 

मुख्यमंत्री संवाद सेतू

पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवकांशी संपर्क

ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर पाण्याची टाकी बांधून देणार

नांदेड हिंगोली जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद 

मुखेड, देगलूर उमरी, सेनगाव, कळमनुरी गावातील सरपंचांशी संवाद

उस्मानाबाद, बीड आणि परभणीतील दुष्काळग्रस्त गावातील सरपंच, ग्रामसेवकांशी संवाद

अहमदनगर, सोलापूर आणि नाशिकमधील दुष्काळग्रस्त गावांतील सरपंचांशी संवाद

टँकर मंजुरीचे अधिकार स्थानिक पातळीवर तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांना

टंचाईसंदर्भातील प्रस्तावावर विनाविलंब निर्णय घेण्याचे आदेश

चंद्रपूर, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील लोकांशी संवाद 

अंजनगाव सुर्जी, मोर्शी, अचलपूर, वरूड, चिखलदरातील सरपंचांशी संवाद

जलयुक्त शिवारच्या कामांची, सिंचन विहिरींची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *