गुंतवणूक गाथा

विकासाचा नवा अध्याय: दावोस फोरममधून महाराष्ट्रात विक्रमी गुंतवणूक

दिवस पहिला (२१ जानेवारी २०२५)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून महाराष्ट्रात विक्रमी गुंतवणूक होईल, असा विश्वास तिथे जाण्यापूर्वी व्यक्त केला होता. त्यानुसार दावोस येथील फोरममधून पहिल्याच दिवशी (दि. २१ जानेवारी) महाराष्ट्रात ६ लाख २५ हजार ४५७ कोटी रुपयांचे ३१ गुंतवणूक करार झाले आहेत. आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात एकाच दिवशी इतक्या मोठ्या गुंतवणुकीचे करार झाले नव्हते. हा सुद्धा एक विक्रमच आहे. या पहिल्याच दिवशीच्या गुंतवणुकीतून साधारण ९५ हजारांची रोजगार निर्मिती होणार आहे. पहिल्या दिवशी झालेल्या गुंतवणुकीत जेएसडब्ल्यू कंपनीबरोबर झालेला करार खूप महत्त्वाचा ठरणार आहे. हा करार साधारण ३ लाख कोटी रुपयांचा आहे. यातून स्टील, नवीकरणीय ऊर्जा, ईव्ही, सोलर एनर्जी, सिमेंट आणि पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्प असणार आहेत. स्टीलचा प्रोजेक्ट हा गडचिरोलीमध्ये होणार आहे; त्याचा या जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासात मोठा वाटा असणार आहे. 

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1881820989954400327

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चार दिवसांच्या दावोस दौऱ्यावर आहेत. हा दौर महाराष्ट्राच्यादृष्टिने खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. दावोसमध्ये जगभरातील विविध सेक्टरमधील कंपन्या बिझनेस करण्यासाठी येतात. त्यांना आपल्या राज्यात सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात सर्व राज्यांची, देशांची स्पर्धा सुरू असते. या स्पर्धेत देवेंद्रजींनी पहिल्याच दिवशी महाराष्ट्र हे उद्योगधंद्यासाठी आणि गुंतवणूकदारांसाठी योग्य राज्य असल्याचे पटवून दिले. त्यामुळे या एका दिवसात ६ लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार (Davos Investment in Maharashtra) झाले. महाराष्ट्र हा पूर्वीपासून कणखर आणि अग्रेसर होता, आहे आणि भविष्यात देखील राहील. यावर देवेंद्रजींचा पूर्ण विश्वास आहे आणि ते याच दृष्टिने नेहमी प्रयत्नशील असतात. 

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1881706547409293431

कल्याणी ग्रुपबरोबर महाराष्ट्र सरकारने संरक्षण, स्टील, ईव्ही या सेक्टरमध्ये ५,२०० कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले. या करारातून ४ हजार रोजगारांची निर्मिती होणार आहे. रिलायन्स ग्रुपनेही संरक्षण सेक्टरमध्ये १६,५०० कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले आहेत. हा प्रकल्प रत्नागिरीमध्ये प्रस्तावित असून यातून २,४५० जणांना रोजगार मिळणार आहे. याचप्रमाणे बालासोर अलॉय लिमिटेड, विराज प्रोफाईल्स प्रायव्हेट लिमिटेड, एबी इनबेव, वारी एनर्जी, टेम्बो, एलमॉन्ट, ब्लॅकस्टोन अ‍ॅण्ड पंचशील रियालिटी, अवनी पॉवर बॅटरिज, जेन्सॉल, बिसलरी इंटरनॅशनल, एच2इ पॉवर, झेडआर2, ब्ल्यू एनर्जी मोटर्स, इस्सार, बुक माय शो, वेल्स्पून, टाटा ग्रुप, सिएट, रुरल एनहॅन्सर्स, पॉवरइन ऊर्जा, ओपन ओरिजिन इंडिया इंक, युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड, इरुलर्निंग सोल्युशन्स, ओलेक्ट्रा ईव्ही या कंपन्यांबरोबर करार झाले. हे करार ग्रीन हायड्रोजन, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, लॉजिस्टिक, ग्रीन एनर्जी, एज्युकेशन, एंटरटेनमेन्ट आदी सेक्टरमधील आहेत.  

दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दिवस पहिला (२१ जानेवारी २०२५)

करार १ 

महाराष्ट्र सरकार आणि कल्याणी ग्रुप 

एकूण गुंतवणूक – ₹५२५० कोटी

रोजगार – ४०००

सेक्टर – संरक्षण, स्टील आणि ईव्ही

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1881649838921810308

करार २

महाराष्ट्र सरकार आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड 

एकूण गुंतवणूक – ₹१६,५०० कोटी

रोजगार – २४५०

सेक्टर – संरक्षण

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1881658846630088967

करार ३

महाराष्ट्र सरकार आणि बालासोर अलॉय लिमिटेड

एकूण गुंतवणूक – ₹१७,००० कोटी

रोजगार – ३२००

सेक्टर – स्टील आणि मेटल

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1881663672226906387

करार ४

महाराष्ट्र सरकार आणि विराज प्रोफाईल्स प्रायव्हेट लिमिटेड

एकूण गुंतवणूक – ₹१२,००० कोटी

रोजगार – ३५००

सेक्टर – स्टील आणि मेटल

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1881682620502966347

करार ५

महाराष्ट्र सरकार आणि एबी इनबेव

एकूण गुंतवणूक – ₹७५० कोटी

रोजगार – अद्याप स्पष्ट नाही

सेक्टर – एफ अ‍ॅण्ड बी

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1881697450156773828

करार ६

महाराष्ट्र सरकार आणि जेएसडब्ल्यू ग्रुप

एकूण गुंतवणूक – ₹३,००,००० कोटी

रोजगार – १०,०००

सेक्टर – स्टील, नवीकरणीय ऊर्जा, इन्फ्रास्ट्रक्चर आणि सिमेंट, लिथिअम-लोन-बॅटरीज्, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1881699241409814610

करार ७

महाराष्ट्र सरकार आणि वारी एनर्जी

एकूण गुंतवणूक – ₹३०,००० कोटी

रोजगार – ७,५००

सेक्टर – ग्रीन एनर्जी, सोलर कॉम्पोनन्टस्

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1881699793761882381

करार ८

महाराष्ट्र सरकार आणि टेम्बो

एकूण गुंतवणूक – ₹१,००० कोटी

रोजगार – ३००

सेक्टर – संरक्षण

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1881701083644649674

करार ९

महाराष्ट्र सरकार आणि ईआय मॉन्ट

एकूण गुंतवणूक – ₹२,००० कोटी

रोजगार – ५०००

सेक्टर – इन्फ्रास्ट्रक्चर

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1881711646730805491

करार १०

महाराष्ट्र सरकार (सिडको) आणि ब्लॅकस्टोन-पंचशील रिअल्टी

एकूण गुंतवणूक – ₹२५,००० कोटी

रोजगार – ५००

सेक्टर – डेटा सेंटर

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1881715241131942054

करार ११

महाराष्ट्र सरकार आणि ब्लॅकस्टोन-पंचशील रिअल्टी

एकूण गुंतवणूक – ₹२५,००० कोटी

रोजगार – १,०००

सेक्टर – आयटी अ‍ॅण्ड आयटीस्

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1881729110277509421

करार १२

महाराष्ट्र सरकार आणि व्हीआयटी सेमीकॉन्स

एकूण गुंतवणूक – ₹२४,४३७ कोटी

रोजगार – ३३,६००

सेक्टर – इलेक्ट्रॉनिक्स

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1881762456110051428

करार १३

महाराष्ट्र सरकार आणि गेनसोल

एकूण गुंतवणूक – ₹४,००० कोटी

रोजगार – ५००

सेक्टर – इलेक्ट्रॉनिक्स

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1881764835261911427

करार १४

महाराष्ट्र सरकार आणि अन्वी पॉवर बॅटरीज

एकूण गुंतवणूक – ₹१०,५२१ कोटी

रोजगार – ५,०००

सेक्टर – इलेक्ट्रॉनिक्स

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1881774224890823107

करार १५

महाराष्ट्र सरकार आणि बिस्लेरी इंटरनॅशनल

एकूण गुंतवणूक – ₹२५० कोटी

रोजगार – ६००

सेक्टर – एफ अ‍ॅण्ड बी

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1881774931597537361

करार १६

महाराष्ट्र सरकार आणि एच2इ पॉवर

एकूण गुंतवणूक – ₹१०,७५० कोटी

रोजगार – १,८५०

सेक्टर – ग्रीन एनर्जी

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1881775784148582436

करार १७

महाराष्ट्र सरकार आणि झेडआर2 ग्रुप

एकूण गुंतवणूक – ₹१७,५०० कोटी

रोजगार – २३,०००

सेक्टर – ग्रीन हायड्रोजन अ‍ॅण्ड केमिकल्स

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1881776958960451941

करार १८

महाराष्ट्र सरकार आणि ब्ल्यू एनर्जी मोटर्स

एकूण गुंतवणूक – ₹३,५०० कोटी

रोजगार – ४,०००

सेक्टर – ऑटोमोटीव्ह अ‍ॅण्ड ईव्ही

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1881778281508479105

करार १९

महाराष्ट्र सरकार आणि इस्सार + ब्ल्यू एनर्जी (जॉईंट व्हेन्चर)

एकूण गुंतवणूक – ₹८,००० कोटी

रोजगार – २,०००

सेक्टर – ग्रीन एनर्जी

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1881779937788743995

करार २०

महाराष्ट्र सरकार (सिडको) आणि बुक माय शो

एकूण गुंतवणूक – ₹१,७०० कोटी

रोजगार – ५००

सेक्टर – आऊटडोअर एंटरटेंनमेन्ट अरेना

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1881782610558599252

करार २१

महाराष्ट्र सरकार (सिडको) आणि वेलस्पून वर्ल्ड

एकूण गुंतवणूक – ₹८,५०० कोटी

रोजगार – १७,३००

सेक्टर – लॉजिस्टिक

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1881783822662197346

करार २२

महाराष्ट्र सरकार आणि टाटा ग्रुप

एकूण गुंतवणूक – ₹३०,००० कोटी

रोजगार – आकडा उपलब्ध नाही

सेक्टर – विविध सेक्टरमध्ये

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1881797565035012357

करार २३

महाराष्ट्र सरकार आणि सिएट

एकूण गुंतवणूक – ₹५०० कोटी

रोजगार – ५००

सेक्टर – ऑटोमोटीव्ह आणि ईव्ही

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1881798876337971274

करार २४

महाराष्ट्र सरकार आणि रुरल एनहॅन्सर्स

एकूण गुंतवणूक – ₹१०,००० कोटी

रोजगार – उपलब्ध नाही

सेक्टर – विविध सेक्टरमध्ये

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1881800175301317019

करार २५

महाराष्ट्र सरकार आणि पॉवरइन ऊर्जा

एकूण गुंतवणूक – ₹१५,२९९ कोटी

रोजगार – ४,०००

सेक्टर – ग्रीन एनर्जी

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1881800690013782349

करार २६

महाराष्ट्र सरकार आणि ओपन ओरिजिन इंडिया इंक

एकूण गुंतवणूक – ₹१५,००० कोटी

रोजगार – १,०००

सेक्टर – ग्रीन एनर्जी

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1881801397878063201

करार २७

महाराष्ट्र सरकार आणि युनायटेड फोस्फोरस लिमिटेड

एकूण गुंतवणूक – ₹६,५०० कोटी

रोजगार – १,३००

सेक्टर – ग्रीन एनर्जी

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1881803818956181604

करार २८

महाराष्ट्र सरकार आणि इरुलर्निंग सोल्युशन्स

एकूण गुंतवणूक – ₹२०,००० कोटी

रोजगार – २०,०००

सेक्टर – एज्युकेशन

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1881804664905318580

करार २९

महाराष्ट्र सरकार आणि ओलेक्ट्रा ईव्ही

एकूण गुंतवणूक – ₹३,००० कोटी

रोजगार – १,०००

सेक्टर – ऑटोमोटीव्ह अ‍ॅण्ड ईव्ही

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1881807074419786093

करार ३०

महाराष्ट्र सरकार आणि फ्युएल
एकूण गुंतवणूक – माहिती उपलब्ध नाही
रोजगार – माहिती उपलब्ध नाही.
सेक्टर – स्किल एज्युकेशन


दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दिवस दुसरा (२२ जानेवारी २०२५)

दावोस फोरममध्ये महाराष्ट्राचा दबदबा: १५ लाख रोजगारांसह १५.७० लाख कोटींचे करार

मुख्यमंत्री दावोस दौरा दरम्यान दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पहिल्या दिवसाच्या विक्रमानंतर दुसऱ्या दिवशीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात एकूण २२ सामंजस्य करार झाले. यातून साधारण ९ लाख ४४ हजार ५४३ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार झाले. त्यामुळे या दोन दिवसांत महाराष्ट्र सरकारने एकूण ५४ करार केले असून त्यातून विक्रमी अशी १५ लाख ७० हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक करार (Davos Investment in Maharashtra) झाले आहेत. यातून जवळपास १५ लाखांहून अधिक रोजगारांची निर्मिती होणार आहे. ही राज्यातील आतापर्यंतची सर्वाधिक गुंतवणूक आहे. दुसऱ्या दिवशीच्या (दि.२२ जानेवारी) विविध गुंतवणूक करारात रिलायन्स ग्रुपसोबत झालेला ३ लाख ५ हजार कोटी रुपयांचा करार महत्त्वाचा ठरला आहे. या एका करारातून ३ लाख रोजगारांची निर्मिती होण्याचा अंदाज वर्तवविला जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस येथे आयोजित केलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातून महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक होणार असल्याचे सुतोवाच त्यांनी दौऱ्याला जाण्यापूर्वी दिले होते. त्यानुसार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पहिल्या दिवशी (दि.२१ जानेवारी) एकूण ३१ गुंतवणूक करार झाले. या सामंजस्य करारातून साधारण ६ लाख २५ हजार ४५७ कोटी रुपयांची गुंतवणूक अपक्षित आहे. म्हणजे महाराष्ट्र सरकारने तसे सामंजस्य करार केले आहेत. यामध्ये सोलर एनर्जी, सिमेंट, ईव्ही, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, शिक्षण, आयटी, स्टील, रिनीएबल एनर्जी, डिफेन्स या सेक्टरचा समावेश आहे. मंगळवारी (दि. २१ जानेवारी) करण्यात आलेल्या करारात जेएसडब्ल्यू ग्रुपबरोबर करण्यात आलेला करार खूपच महत्त्वाचा ठरला. या करारातून साधारण ३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्राच्या विविध भागात अपेक्षित आहे.

दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेमधून (World Economic Forum, Davos) महाराष्ट्रात होणारे गुंतवणूक करार हे नवभारताच्या निर्मितीत योगदान देणारे आहेत. रिलायन्स ग्रुपबरोबर करण्यात आलेल्या करारानुसार येणाऱ्या काळात पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, इंडस्ट्रीअल डेव्हलपमेंट, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन आणि रिअल इस्टेट या क्षेत्रांना चालना मिळणार आहे. तसेच यातून लाखो नोकऱ्या निर्माण होणार आहेत. रिलायन्सबरोबरच दुसऱ्या दिवशी झालेल्या मोठ्या गुंतवणुकीत अ‍ॅमेझॉनचाही समावेश आहे. अ‍ॅमेझॉन कंपनीबरोबर करण्यात आलेला करार हा ७१ हजार ७९५ कोटी रुपयांचा आहे. या कंपनीकडून एमएमआर सेक्टरमध्ये डेटा सेंटर्सच्या माध्यमातून गुंतवणूक केली जाणार आहे. या गुंतवणुकीतून राज्यात ८३ हजार १०० इतक्या मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टोनी ब्लेअर यांच्याशी चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्याशी भेट झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी ऊर्जा आणि सार्वजनिक वाहतूक या विषयावर सविस्तर चर्चा केली. यावेळी टोनी ब्लेअर यांनी लवकरच भारत दौऱ्यावर येणार असल्याचा मनोदय व्यक्त केला. त्याचबरोबर ह्युंडई मोटर्सचे कार्यकारी उपाध्यक्ष बम किम, डीपी वर्ल्डचे अध्यक्ष सुलतान अहमद बिन  सुलाएम, कंपनीचे भारतातील सीईओ रिझवान सोमर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील इंडस्ट्रीअल पार्क, लॉजिस्टिक सेक्टरमधील सहकार्याबाबत चर्चा केली.

करार ३२

महाराष्ट्र सरकार आणि रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड

एकूण गुंतवणूक – ३,०५,००० कोटी

रोजगार – ३,००,०००

सेक्टर – पेट्रोकिमिकल्स, पॉलिस्टर, नवीकरणीय ऊर्जा, बायो एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, इंडस्ट्री डेव्हलपमेंट, रिटेलिंग, डेटा सेंटर, टेलिकम्युनिकेशन आणि रिअल इस्टेट.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1882049170787409941

करार ३३

महाराष्ट्र सरकार आणि वर्धन लिथियम

एकूण गुंतवणूक – ४२,५३५ कोटी

रोजगार – ५,०००

सेक्टर – इलेक्ट्रॉनिक्स

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1882089196162277854

करार ३४

महाराष्ट्र सरकार आणि ग्रेटा एनर्जी

एकूण गुंतवणूक – १०,३१९ कोटी

रोजगार – ७,०००

सेक्टर – स्टील आणि मेटल

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1882094696585105457

करार ३५

महाराष्ट्र सरकार आणि ब्लॅकस्टोन

एकूण गुंतवणूक – ४३,००० कोटी

रोजगार – माहिती उपलब्ध नाही

सेक्टर – इन्फ्रास्ट्रक्चर

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1882096873487716654

करार ३६

महाराष्ट्र सरकार आणि इंदोरमा

एकूण गुंतवणूक – ३१,२०० कोटी

रोजगार – ४,०००

सेक्टर – टेक्स्टाईल

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1882097846679433382

करार ३७

महाराष्ट्र सरकार आणि एल अ‍ॅण्ड टी डिफेन्स

एकूण गुंतवणूक – १०,००० कोटी

रोजगार – २,५००

सेक्टर – डिफेन्स

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1882099075853774905

करार ३८

महाराष्ट्र सरकार आणि रेनिसन्स सोलर अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक मटेरिअल्स

एकूण गुंतवणूक – ५,००० कोटी

रोजगार – १,३००

सेक्टर – ग्रीन एनर्जी

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1882125448878157997

करार ३९

महाराष्ट्र सरकार आणि सिलॉन बेव्हरेजस्

एकूण गुंतवणूक – १,०३९ कोटी

रोजगार – ४५०

सेक्टर – एफ अ‍ॅण्ड बी

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1882125467416965224

करार ४०

महाराष्ट्र सरकार आणि टॉरल इंडिया

एकूण गुंतवणूक – ५०० कोटी

रोजगार – १,२००

सेक्टर – स्टील अ‍ॅण्ड मेटल्स

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1882125483535728962

करार ४१

महाराष्ट्र सरकार आणि निलसेन मिडिया इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

एकूण गुंतवणूक – ४५० कोटी

रोजगार – १,१००

सेक्टर – आयटी अ‍ॅण्ड आयटीस्

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1882126421889630285

करार ४२

महाराष्ट्र सरकार आणि एमएसएन होल्डिंग्स

एकूण गुंतवणूक – १४,६५२ कोटी

रोजगार – ८,७६०

सेक्टर – सोलर

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1882128996626014349

करार ४३

महाराष्ट्र सरकार आणि हायझेरो इंक

एकूण गुंतवणूक – १६,००० कोटी

रोजगार – १०,०००

सेक्टर – ग्रीन एनर्जी

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1882130115074900001

करार ४४

महाराष्ट्र सरकार आणि पीआरवायएम सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड

एकूण गुंतवणूक – ३०० कोटी

रोजगार – ३००

सेक्टर – ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1882139858132689176

करार ४५

महाराष्ट्र सरकार आणि हिरानंदानी ग्रुप

एकूण गुंतवणूक – ५१,६०० कोटी

रोजगार – निश्चित माहिती उपलब्ध नाही

सेक्टर – इन्फ्रास्ट्रक्चर

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1882141309177360605

करार ४६

महाराष्ट्र सरकार आणि सोटेफिन भारत प्रायव्हेट लिमिटेड

एकूण गुंतवणूक – ८,६४१ कोटी

रोजगार – निश्चित माहिती उपलब्ध नाही

सेक्टर – इन्फ्रास्ट्रक्चर

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1882143130629337164

करार ४७

महाराष्ट्र सरकार आणि एव्हरस्टोन

एकूण गुंतवणूक – ८,६०० कोटी

रोजगार – निश्चित माहिती उपलब्ध नाही

सेक्टर – इन्फ्रास्ट्रक्चर

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1882156833550541168

करार ४८

महाराष्ट्र सरकार आणि इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह सोलर डिफेन्स

एकूण गुंतवणूक – १२,७८० कोटी

रोजगार – २३२५

सेक्टर – एरोस्पेस अ‍ॅण्ड डिफेन्स

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1882157806813577592

करार ४९

महाराष्ट्र सरकार आणि अ‍ॅमेझॉन (एडब्ल्यूएस)

एकूण गुंतवणूक – ७१,७९५ कोटी

रोजगार – ८३,१००

सेक्टर – डेटा सेंटर

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1882164543494959267

करार ५०

महाराष्ट्र सरकार आणि गुरूकूल

एकूण गुंतवणूक – ५०० कोटी

रोजगार – माहिती उपलब्ध नाही

सेक्टर – सायबर सिक्युरिटी

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1882165295353340275

करार ५१

महाराष्ट्र सरकार आणि टेमासेक कॅपिटल

एकूण गुंतवणूक – ४३,००० कोटी

रोजगार – माहिती उपलब्ध नाही

सेक्टर – इन्फ्रास्ट्रक्चर

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1882166074688541006

करार ५२

महाराष्ट्र सरकार आणि सुमितोमो रिअलिटी

एकूण गुंतवणूक – ४३,००० कोटी

रोजगार – माहिती उपलब्ध नाही

सेक्टर – इन्फ्रास्ट्रक्चर

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1882344381543600340

करार ५३

महाराष्ट्र सरकार आणि के रहेजा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड

एकूण गुंतवणूक – ४३,००० कोटी

रोजगार – माहिती उपलब्ध नाही

सेक्टर – इन्फ्रास्ट्रक्चर

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1882172756865036443

करार ५४

महाराष्ट्र सरकार आणि ब्रुकफिल्ड

एकूण गुंतवणूक – १,०३,२०० कोटी

रोजगार – माहिती उपलब्ध नाही

सेक्टर – इन्फ्रास्ट्रक्चर

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1882362293020958981

दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दिवस तिसरा (२३ जानेवारी २०२५)

करार ५५

महाराष्ट्र सरकार आणि फ्लुइड कंट्रोल

एकूण गुंतवणूक – ४२५ कोटी

रोजगार – १००

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1882413473176617069

करार ५६

महाराष्ट्र सरकार आणि अॅकोलेड इलेक्ट्रॉनिक्स

एकूण गुंतवणूक – १७० कोटी

रोजगार – १५००

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1882414117530787913

करार ५७

महाराष्ट्र सरकार आणि स्कायरूट

एकूण गुंतवणूक – ५०० कोटी

रोजगार – ८००

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1882414664203862468

करार ५८

महाराष्ट्र सरकार आणि रिग्रीन

एकूण गुंतवणूक – १५०४ कोटी

रोजगार – ८००

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1882415464938357087

करार ५९

महाराष्ट्र सरकार आणि रॉनी स्क्रूवाला

एकूण गुंतवणूक – १०० कोटी

रोजगार – माहिती उपलब्ध नाही

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1882421962968068552

करार ६०

महाराष्ट्र सरकार (एमएमआरडीए) आणि एमटीसी ग्रुप

एकूण गुंतवणूक – १००० कोटी

रोजगार – १०००

सेक्टर – इन्फ्रास्ट्रक्चर

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1882422470084526511

दावोसमध्ये महाराष्ट्र आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच बोलबाला! 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतातील ६ राज्यांचे प्रमुख दावोसमध्ये गुंतवणुकीसाठी आले होते. यामध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक अशी १५ लाख ७० हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. या ४ दिवसांच्या परिषदेत एकूण ६१ प्रकारचे करार झाले. त्यातील ५४ करार हे गुंतवणुकीचे आणि ७ करार हे स्ट्रॅटिजिक कॅटेगरीतले होते. स्ट्रॅटेजिक करारांमधून काही कंपन्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी नॉलेज, गाईड या भूमिकेतून मदत करणार आहे. यातून कोणत्याही प्रकारची थेट गुंतवणूक होणार नाही. तर जे ५४ करार झाले आहेत. त्यातील साधारण ९८ टक्के गुंतवणूक एफडीआय कम्पोनन्टमधून झालेली आहे. या अशा प्रकारच्या गुंतवणुकीमुळे राज्याची आणि एकूणच देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा बदल होण्यास मदत होत आहे. २०२२ मध्ये राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मागीलवर्षी दावोसमध्ये केलेल्या करारातले बरेचसे करार हे मार्गी लावले गेले आहेत.

दावोसमध्ये झालेल्या १५ लाख ७० हजार कोटींच्या ऐतिहासिक करारातून महाराष्ट्रात एकूण १५ लाख ९५ हजार म्हणजे एकूण १६ लाखाची रोजगारनिर्मिती होणार आहे. हे गुंतवणूक करार वेगवेगळ्या सेक्टरमध्ये झालेले आहेत. यामध्ये स्टील, आयटी, ग्रीन एनर्जी, इन्फ्रास्ट्रक्चर आदी सेक्टरमध्ये गुंतवणूक झालेली आहे. वेगवेगळ्या सेक्टरबरोबरच ही गुंतवणूक राज्याच्या वेगवेगळ्या भागात झालेली आहे. यामध्ये एमएमआरडीए क्षेत्रामध्ये ६ ते ७ लाख कोटी, विदर्भामध्ये ५ लाख कोटी, नॉर्थ महाराष्ट्र, नाशिकमध्ये ३० ते ३५ हजार कोटी, त्याचबरोबर मराठवाडा विभागामध्ये २५ ते ३० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. या ऐतिहासिक करारांमुळे दावोसमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचाचा बोलबाला असल्याचे दिसून आले. महाराष्ट्रात होणाऱ्या गुंतवणुकीबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक पातळीवरील विविध प्रकारच्या चर्चेत सहभागी होऊन तिथे महाराष्ट्र आणि देशाचे प्रतिनिधित्व केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *