गाथा महाराष्ट्राच्या प्रगतीची, कणखर नेतृत्वाची!
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नेतृत्व आणि धोरणात्मक निर्णय क्षमतांच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन करणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ या कालावधीत मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या विकासात मोलाची भर घातली आहे. जलयुक्त शिवार योजनेपासून, समृद्धी महामार्ग, मुंबई मेट्रो, अटल सेतू, कोस्टल रोड यासारख्या प्रकल्पांना मूर्त स्वरूप दिले. त्यानंतर जुलै २०२२ मध्ये पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून मागील अडीच वर्षापासून महाराष्ट्राच्या थांबलेल्या विकासाला गती देण्याचे काम केले. महाराष्ट्राच्या या प्रगतीला, गतीला योग्य दिशा मिळाल्याने जनतेने पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या हाती दिले. त्यांनी देखील जनतेचा हा कौल प्रमाण मानून शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण आदी क्षेत्रात बदल घडवून आणण्यास सुरूवात केली. त्यांच्या दूरदृष्टीतून निर्माण झालेले कार्य अभ्यासक, पत्रकार, कार्यकर्ते यांच्यासाठी एक मोठे योगदान आहे. ते योगदान आम्ही ‘गाथा’ स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. वारकरी संप्रदायातील ‘तुकाराम महाराजांच्या गाथा’ प्रसिद्ध आहेत. या गाथांमध्ये रोजच्या जीवनात येणाऱ्या विविध अडचणींवरील मार्गदर्शन आणि भाष्य आहे. अगदी त्याचप्रमाणे ‘देवगाथा’च्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय प्रवासातून केलेली महाराष्ट्राची समाजसेवा, एक सच्चा महाराष्ट्र सेवक म्हणून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी घेतलेले निर्णय, त्यासाठी केलेले प्रयत्न, ऐतिहासिक प्रकल्पांची निर्मिती, राज्याच्या प्रगतीची आणि भविष्यातील गतीची गाथा ‘देवगाथा’ या वेबसाईटच्या माध्यमातून मांडत आहोत. देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय कसब, राज्याच्या हितासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न आणि राबवलेल्या विकासाच्या संकल्पनांमुळे महाराष्ट्रातील नागरिकांचे जीवनमान कसे बदलले, याचा आढावा यातून घेण्यात आला आहे.
‘देवगाथा’चे मुख्य ध्येय महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या योगदानाची माहिती महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील लोकांसमोर सादर करणे, हे आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रासाठी केलेली कामे, राबवलेल्या योजना आणि धोरणांची माहिती उपलब्ध करून राज्याच्या प्रगतीचा आलेख या वेबसाईटच्या माध्यमातून मांडणे, हे मुख्य ध्येय आहे. महाराष्ट्राच्या विकास प्रक्रियेत देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या योगदानाची माहिती एकत्रित करून ती अभ्यासक, पत्रकार, कार्यकर्ते यांच्यापर्यंत पोहोचवणे. वेगवेगळ्या सेक्टरमध्ये राबवलेल्या धोरणांचे व योजनेचे परिणाम लोकांपर्यंत पोहोचवणे. महाराष्ट्रातील तरुणाईसाठी नेतृत्व व विकासाची दिशा दाखवणारा एक मार्गदर्शक मंच तयार करणे. महाराष्ट्राच्या राजकारणातील अमृतकण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विधिमंडळातील रौप्य महोत्सवी (सिल्वर जुबली) कारकीर्दीतील कार्य लोकांसमोर ठेवणे. तसेच ‘देवगाथा’च्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्राच्या प्रगतीतील योगदान लोकांपर्यंत पोहोचवणे आणि पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरावे, हा मुख्य हेतू आहे.