मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना; गरजू रुग्णांसाठी जीवनदायिनी
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना; गरजू रुग्णांसाठी जीवनदायिनी
महाराष्ट्रातील नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी राज्य सरकारने सुरू केलेला हा एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी. या उपक्रमाचा उद्देश आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांना महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत पुरवणे हा आहे. या उपक्रमाद्वारे गरजू व आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या समाजघटकांना गंभीर आजारांवरील उपचार करून घेण्यासाठी या उपक्रमातून निधी दिला जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी हा उपक्रम २०१५ पासून सुरू झाला आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रात मुख्यमंत्री सहाय्यता निधी या नावाने ट्रस्ट कार्यरत होता. तो अजूनही सुरू असून त्या ट्रस्ट अंतर्गत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे कामकाज चालत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी ट्रस्टची स्थापना १९६७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली झाली होती. तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाची स्थापना २०१५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झाली होती.
२
मार्च १९६७
मुख्यमंत्री सहाय्यता निधी ट्रस्टची स्थापना
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियमांतर्गत १९६७ मध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी, मुंबई, असा ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे. या ट्रस्टमार्फत नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारच्या कारणांनी पीडित असलेल्या व्यक्तींना उपचारासाठी अर्थसहाय्य पुरवले जाते.तसेच महागड्या आजारांवरील शस्त्रक्रियांकरीता सरकारच्या या अधिकृत ट्रस्टद्वारे मदत केली जाते. या ट्रस्टच्या स्थापनेचा आणि त्याचा उद्देश स्पष्ट करणारा शासन निर्णय २ मार्च १९६७ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. या ट्रस्टचे कामकाज पाहण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली दहा जणांची समिती स्थापन करण्यात आली होती.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचे फोटो आणि व्हिडिओ -
२
मार्च १९६७
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेची सोशल मीडियामधील चर्चा -
२
मार्च १९६७
Facebook
माहिती अस्तित्वात नाही
Twitter
माहिती अस्तित्वात नाही
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचे GR आणि इतर लिंक्स -
२
मार्च १९६७
GR
cm-medical-relief-fund-2-march-1967.pdf
×
Useful Links
माहिती अस्तित्वात नाही
१५
नोव्हेंबर २००१
मुख्यमंत्री सहाय्यता निधी ट्रस्टची ध्येय आणि उद्दिष्ट्ये प्रसिद्ध
मुख्यमंत्री सहाय्यता निधी ट्रस्टच्या व्यवस्थापन समितीचे नियम, ध्येय आणि उद्दिष्ट्ये निश्चित करण्यात आली. १५ नोव्हेंबर २००१ च्या शासन निर्णयाद्वारे सदर ट्रस्टची ८ ध्येय आणि उद्दिष्ट्ये प्रसिद्ध करण्यात आली. त्यात खालील गोष्टींचा समावेश होता.
राज्यातील तथा देशातील नैसर्गिक आपत्तीतील आपदग्रस्तांना निकषांच्या अधीन राहून आर्थिक व इतर स्वरूपात मदत करणे. यामध्ये आपत्तीदरम्यान जी सरकारी मदत दिली जाते. त्या व्यतिरिक्त ही मदत आहे.
जातीत दंगलीत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना, तसेच जखमी व्यक्तींना आणि मालमत्तेचे नुकसान झालेल्या व्यक्तींना निकषांच्या अधीन राहून आर्थिक व इतर स्वरूपातील मदत करणे.
नक्षलवाद्यांच्या हल्लात हत्या झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना व वारशांना, जखमी झालेल्या व्यक्तींना निकषांच्या अधीन राहून आर्थिक व इतर स्वरूपातील मदत करणे.
हृदयविकास, किडनी, मूत्रपिंडरोपण, मेंदू व कर्करोग आदी गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना शस्त्रक्रिया व उपचाराकरीता अर्थसहाय्य करणे.
अपघातात मृत झालेल्या व्यक्तींच्या वारशांना व जखमी व्यक्तींना निकषांच्या अधीन राहून आर्थिक मदत करणे. यामध्ये मोटार, रेल्वे, विमान आणि बोट अपघात वगळण्यात आले आहेत.
अपंग व्यक्तींसाठी काम करणाऱ्या संस्थांना वेगवेगळ्या पातळीवर मदत करणे.
शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संमेलने, परिषदा, चर्चासत्रे यांच्या आयोजनाकरीता देणगी स्वरूपात मदत करणे.
शैक्षणिक व वैद्यकीय संस्थांच्या इमारतीच्या बांधकामासाठी आर्थिक मदत करणे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचे फोटो आणि व्हिडिओ -
१५
नोव्हेंबर २००१
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेची सोशल मीडियामधील चर्चा -
१५
नोव्हेंबर २००१
Facebook
माहिती अस्तित्वात नाही
Twitter
माहिती अस्तित्वात नाही
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचे GR आणि इतर लिंक्स -
१५
नोव्हेंबर २००१
GR
cm-medical-relief-fund-19-january-2001.pdf
×
Useful Links
माहिती अस्तित्वात नाही
१३
ऑगस्ट २०१५
देवेंद्र फडणवीस यांच्याद्वारे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची स्थापना
मुख्यमंत्री सहाय्यता निधी मार्फत विविध प्रकारच्या दुर्धर आजारांवरील उपचारांकरीता रुग्णांना आर्थिक मदत पुरवली जाते. यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात आर्थिक मदत मिळवण्यासाठी असंख्य अर्ज येतात. अशा रुग्णांच्या अर्जाची योग्य वेळेत पडताळणी व तपासणी करून त्यांना लगेच मदत उपलब्ध करून देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यालयात ऑगस्ट २०१५ मध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष स्थापन केला. तसेच या कक्षाच्या अंतर्गत एका कार्यकारिणी समितीची स्थापन देखील करण्यात आली. या समितीत सरकारच्या महत्त्वाच्या रुग्णालयाचे अधिक्षक, प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय सहाय्यता कक्ष समन्वयक आणि आरोग्य सल्लागार यांचा समावेश करण्यात आला.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचे फोटो आणि व्हिडिओ -
१३
ऑगस्ट २०१५
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेची सोशल मीडियामधील चर्चा -
१३
ऑगस्ट २०१५
Facebook
माहिती अस्तित्वात नाही
Twitter
माहिती अस्तित्वात नाही
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचे GR आणि इतर लिंक्स -
१३
ऑगस्ट २०१५
मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत करण्यात आलेली वैद्यकीय मदत
कालावधी – १ जानेवारी २०१५ ते ३१ मार्च २०१६
या कालावधीत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे वैद्यकीय अर्थसहाय्यासाठी ७ हजार ९३ अर्ज आले होते. त्यातील ४ हजार ८६७ रुग्णांना मदत करण्यात आली. या रुग्णांना ३४ कोटी ८२ लाख ८ हजार ६७९ रुपयांची मदत करण्यात आली.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचे फोटो आणि व्हिडिओ -
१
एप्रिल २०१६
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेची सोशल मीडियामधील चर्चा -
१
एप्रिल २०१६
Facebook
माहिती अस्तित्वात नाही
Twitter
माहिती अस्तित्वात नाही
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचे GR आणि इतर लिंक्स -
१
एप्रिल २०१६
GR
माहिती अस्तित्वात नाही
Useful Links
माहिती अस्तित्वात नाही
१
एप्रिल २०१७
मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत करण्यात आलेली वैद्यकीय मदत
कालावधी – १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७
या कालावधीत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडे वैद्यकीय अर्थसहाय्यासाठी १७ हजार १५० अर्ज आले होते. त्यातील १३ हजार १४६ रुग्णांना मदत करण्यात आली. या रुग्णांना १४५ कोटी ७६ लाख १५ हजार ५०१ रुपयांची मदत करण्यात आली.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचे फोटो आणि व्हिडिओ -
१
एप्रिल २०१७
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेची सोशल मीडियामधील चर्चा -
१
एप्रिल २०१७
Facebook
माहिती अस्तित्वात नाही
Twitter
माहिती अस्तित्वात नाही
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचे GR आणि इतर लिंक्स -
१
एप्रिल २०१७
GR
माहिती अस्तित्वात नाही
Useful Links
माहिती अस्तित्वात नाही
१७
एप्रिल २०१७
मुख्यमंत्री सहाय्यता निधी ट्रस्टच्या उद्दिष्टांमध्ये सुधारणा
मुख्यमंत्री सहाय्यता निधी ट्रस्टच्या व्यवस्थापन समितीने ८ प्रकारची ध्येय आणि उद्दिष्ट्ये १५ नोव्हेंबर २००१ च्या शासन निर्णयाद्वारे निश्चित केली होती. त्यात देवेंद्र फडणवीस सरकारने २०१७ मध्ये ९ आणि १० या दोन नवीन उद्दिष्टांचा समावेश केला.
दुष्काळ तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना मदत करताना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सुधारणा, विकास कामे, प्रतिबंधात्मक योजना यासाठी कंपनी अधिनियम २०१३ अन्वये स्थापित झालेल्या ना नफा तत्वावरील कंपन्यांना आर्थिक मदत करणे.
यापूर्वी स्थापित झालेल्या कोणत्याही सीएसआरची (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबिलिटी) उद्दिष्ट्ये पूर्ण करणाऱ्या संस्थेला किंवा कंपनीला आर्थिक मदत करणे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचे फोटो आणि व्हिडिओ -
१७
एप्रिल २०१७
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेची सोशल मीडियामधील चर्चा -
१७
एप्रिल २०१७
Facebook
माहिती अस्तित्वात नाही
Twitter
माहिती अस्तित्वात नाही
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचे GR आणि इतर लिंक्स -
१७
एप्रिल २०१७
GR
cm-medical-relief-fund-gr-17-april-2017.pdf
×
Useful Links
माहिती अस्तित्वात नाही
६
जुलै २०१७
ट्रस्टच्या उद्दिष्टांमध्ये शेती कर्जाशी संबंधित उद्दिष्टाचा समावेश
मुख्यमंत्री सहाय्यता निधी ट्रस्टच्या व्यवस्थापन समितीने ८ प्रकारची ध्येय आणि उद्दिष्ट्ये १५ नोव्हेंबर २००१ च्या शासन निर्णयाद्वारे निश्चित केली होती. त्यात देवेंद्र फडणवीस सरकारने एप्रिल २०१७ मध्ये ९ आणि १० या दोन नवीन उद्दिष्टांचा समावेश केल्यानंतर जुलै २०१७ मध्ये शेती कर्जाशी संबंधित आणखी एका नवीन उद्दिष्टाचा समावेश केला.
११. राज्यातील शेतकरी आणि त्यांचे कुटुंबिय यांनी शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या सरकारी योजनेला आर्थिक मदत करणे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचे फोटो आणि व्हिडिओ -
६
जुलै २०१७
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेची सोशल मीडियामधील चर्चा -
६
जुलै २०१७
Facebook
माहिती अस्तित्वात नाही
Twitter
माहिती अस्तित्वात नाही
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचे GR आणि इतर लिंक्स -
६
जुलै २०१७
GR
cm-medical-relief-fund-gr-06-july-2017.pdf
×
Useful Links
माहिती अस्तित्वात नाही
१
एप्रिल २०१८
मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत करण्यात आलेली वैद्यकीय मदत
कालावधी – १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८
या कालावधीत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे वैद्यकीय अर्थसहाय्यासाठी २७ हजार १८५ अर्ज आले होते. त्यातील १६ हजार ९१३ रुग्णांना मदत करण्यात आली. या रुग्णांना १५९ कोटी ५४ लाख ३८ हजार ७०० रुपयांची मदत करण्यात आली.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचे फोटो आणि व्हिडिओ -
१
एप्रिल २०१८
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचे GR आणि इतर लिंक्स -
१
एप्रिल २०१८
GR
माहिती अस्तित्वात नाही
Useful Links
माहिती अस्तित्वात नाही
१
एप्रिल २०१९
मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत करण्यात आलेली वैद्यकीय मदत
कालावधी – १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९
या कालावधीत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे वैद्यकीय अर्थसहाय्यासाठी ३४ हजार २६१ अर्ज आले होते. त्यातील १८ हजार ८३६ रुग्णांना मदत करण्यात आली. या रुग्णांना १८८ कोटी ७१ लाख ९९ हजार २०६ रुपयांची मदत करण्यात आली.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचे फोटो आणि व्हिडिओ -
१
एप्रिल २०१९
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेची सोशल मीडियामधील चर्चा -
१
एप्रिल २०१९
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचे GR आणि इतर लिंक्स -
१
एप्रिल २०१९
GR
माहिती अस्तित्वात नाही
Useful Links
माहिती अस्तित्वात नाही
२२
जुलै २०१९
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अनोखी मदत!
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे औरंगाबादमधील वेदांत भागवत पवार (रा. कनकोरी, ता. गंगापूर) या कॅन्सरग्रस्त बालकाला जीवनदान मिळाले होते. मोलमजुरी करणाऱ्या वेदांतचे आई-वडिल आणि त्याची आत्या यांनी अत्यंत कृतज्ञभावनेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १०१ रुपयांची मदत पाठविली होती. ही मदत नेमकी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसादिवशी म्हणजे २२ जुलै २०१९ रोजी आली होती.
वेदांतची आत्या श्रीमती रेणुका सुनील गोंधळी यांनी वेदांतच्या उपचारासाठी मुख्यमंत्र्यांना मदतीसाठी मॅसेज केला होता. त्या मॅसेजची दखल घेत देवेंद्रजींनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षातून वेदांतच्या उपचारासाठी १ लाख ९० हजार रुपयांची मदत केली होती.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचे फोटो आणि व्हिडिओ -
२२
जुलै २०१९
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेची सोशल मीडियामधील चर्चा -
२२
जुलै २०१९
Facebook
माहिती अस्तित्वात नाही
Twitter
माहिती अस्तित्वात नाही
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचे GR आणि इतर लिंक्स -
२२
जुलै २०१९
GR
माहिती अस्तित्वात नाही
Useful Links
माहिती अस्तित्वात नाही
१
एप्रिल २०२०
मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत करण्यात आलेली वैद्यकीय मदत
कालावधी – १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२०
या कालावधीत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे वैद्यकीय अर्थसहाय्यासाठी २२ हजार ९३ अर्ज आले होते. त्यातील ८ हजार ८१० रुग्णांना मदत करण्यात आली. या रुग्णांना ६९ कोटी ४९ लाख ८८ हजार ७१५ रुपयांची मदत करण्यात आली.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचे फोटो आणि व्हिडिओ -
१
एप्रिल २०२०
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेची सोशल मीडियामधील चर्चा -
१
एप्रिल २०२०
Facebook
माहिती अस्तित्वात नाही
Twitter
शीतलला श्रवणाची समस्या होती. 6 लाख रूपये शस्त्रक्रियेला लागणार होते. 2016 मध्ये मुख्यमंत्री सहायता निधीतून 2 लाख आणि पंतप्रधान निधीतून 3 लाख रूपयांची मदत देण्यात आली. मुंबईच्या नायर रूग्णालयात शस्त्रक्रिया झाली आणि त्यातून ती पूर्णपणे बरी झाली. माझ्या या बहिणीला खूप खूप शुभेच्छा! pic.twitter.com/FuFa8YNPOh
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचे GR आणि इतर लिंक्स -
१
एप्रिल २०२०
GR
माहिती अस्तित्वात नाही
Useful Links
माहिती अस्तित्वात नाही
१
एप्रिल २०२३
मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत करण्यात आलेली वैद्यकीय मदत
कालावधी – १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३
या कालावधीत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे वैद्यकीय अर्थसहाय्यासाठी १४ हजार ५६६ अर्ज आले होते. त्यातील ७ हजार ४१९ रुग्णांना मदत करण्यात आली. या रुग्णांना ५७ कोटी ४४ हजार ७०० रुपयांची मदत करण्यात आली.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचे फोटो आणि व्हिडिओ -
१
एप्रिल २०२३
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेची सोशल मीडियामधील चर्चा -
१
एप्रिल २०२३
Facebook
माहिती अस्तित्वात नाही
Twitter
माहिती अस्तित्वात नाही
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचे GR आणि इतर लिंक्स -
१
एप्रिल २०२३
GR
माहिती अस्तित्वात नाही
Useful Links
माहिती अस्तित्वात नाही
१
एप्रिल २०२४
मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत करण्यात आलेली वैद्यकीय मदत
कालावधी – १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे वैद्यकीय अर्थसहाय्यासाठी वर नमूद केलेल्या कालावधीत ३२ हजार २९९ अर्ज आले होते. त्यातील १८ हजार ८५९ रुग्णांना मदत करण्यात आली. या रुग्णांना १५९ कोटी ६६ लाख ८२ हजार ५०० रुपयांची मदत करण्यात आली.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचे फोटो आणि व्हिडिओ -
१
एप्रिल २०२४
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेची सोशल मीडियामधील चर्चा -
१
एप्रिल २०२४
Facebook
माहिती अस्तित्वात नाही
Twitter
माहिती अस्तित्वात नाही
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचे GR आणि इतर लिंक्स -
१
एप्रिल २०२४
GR
माहिती अस्तित्वात नाही
Useful Links
माहिती अस्तित्वात नाही
१६
मार्च २०२४
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कोविडसाठी अर्थसहाय्य
मुख्यमंत्री सहाय्यता निधी ट्रस्टच्या व्यवस्थापन समितीने ८ प्रकारची ध्येय आणि उद्दिष्ट्ये १५ नोव्हेंबर २००१ च्या शासन निर्णयाद्वारे निश्चित केली होती. त्यात देवेंद्र फडणवीस सरकारने एप्रिल २०१७ मध्ये ९ आणि १० या तर जुलै २०१७ मध्ये शेती कर्जाशी संबंधित आणखी एका नवीन उद्दिष्टाचा समावेश केला. त्यानंतर मार्च २०२४ मध्ये महायुती सरकारने कोव्हिडशी संबंधित आणखी एका उद्दिष्टाचा समावेश केला.
सद्यस्थितीत कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी भविष्यात कोविड किंवा कोविड सदृश्य अन्य संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव उद्भवल्यास तो रोखणे तसेच त्यावरील उपचारांसाठी अद्ययावत आरोग्यविषयक पायाभूत सुविधांनी महाराष्ट्र राज्य सुसज्ज असणे आवश्यक आहे. याकरीता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिने पायाभूत सोयीसुविधांचे बळकटीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून (कोविड-१९) अर्थसहाय्य देणे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचे फोटो आणि व्हिडिओ -
१६
मार्च २०२४
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेची सोशल मीडियामधील चर्चा -
१६
मार्च २०२४
Facebook
माहिती अस्तित्वात नाही
Twitter
माहिती अस्तित्वात नाही
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचे GR आणि इतर लिंक्स -
१६
मार्च २०२४
GR
cm-medical-relief-fund-gr-16-march-2024.pdf
×
Useful Links
माहिती अस्तित्वात नाही
६
डिसेंबर २०२४
मुख्यमंत्रीपदाचा पहिला निर्णय: माणुसकीचा हात पुढे करीत तातडीची आर्थिक मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या कार्यशैलीतून संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला आहे. पुण्यातील चंद्रकांत कुऱ्हाडे यांना बोन मॅरो प्रत्यारोपणासाठी तातडीने आर्थिक मदतीची गरज होती. तेव्हा कुऱ्हाडे यांच्या कुटुंबियांनी ही निकड लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीची विनंती केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचे फोटो आणि व्हिडिओ -
६
डिसेंबर २०२४
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेची सोशल मीडियामधील चर्चा -
६
डिसेंबर २०२४
Facebook
माहिती अस्तित्वात नाही
Twitter
पुणे येथील चंद्रकांत कुऱ्हाडे यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी आर्थिक मदतीची तातडीची गरज होती. त्यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मदतीची विनंती केली होती. काल मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारताच, त्यांनी तत्काळ दखल घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ₹5… https://t.co/ChfsJEzK80pic.twitter.com/OcJpAptglT
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचे GR आणि इतर लिंक्स -
६
डिसेंबर २०२४
GR
माहिती अस्तित्वात नाही
Useful Links
माहिती अस्तित्वात नाही
२२
जानेवारी २०२५
आता प्रत्येक जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या कक्षाच्या माध्यमातून गंभीर आजारांवरील उपचारांसाठी गरजू नागरिकांना अत्यावश्यक आर्थिक मदत मिळणार आहे. यामुळे गरजू रुग्णांना जिल्हा पातळीवरच सहकार्य उपलब्ध होणार आहे. संबंधितांना त्यांच्या अर्जाच्या पाठपुराव्यासाठी मंत्रालयात येण्याची गरज भासणार नाही. नागरिकांना आपल्या जिल्ह्यातून व गावातून सेवा मिळावी यासाठी याची अर्ज प्रक्रिया पूर्णतः पेपरलेस करण्याचा निर्णयदेखील सरकारने घेतला गेला आहे. यासाठी जिल्हा पातळीवर स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली विकसित केली जाणार आहे. या निर्णयामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या वेळेत आणि आर्थिक खर्चात बचत होणार आहे.
आजारांचे पुनर्विलोकन आणि उपचारांच्या रकमेची नव्याने निश्चिती करण्यासाठी समितीची स्थापना
मुख्यमंत्री कार्यालयांतर्गत सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा मार्फत दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाकरीता रुग्णांना आर्थिक मदत केली जाते. सध्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत २० आजारांवर आर्थिक मदत केली जाते. या आजारांव्यतिरिक्त इतरही अनेक गंभीर आजार आहेत. ज्यामुळे अनेक रुग्णांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. अशा रुग्णांना उपचारा अभावी जीव गमवावा लागू नये. यासाठी आजारांचे पुनर्विलोकन करून त्यात नवीन आजारांचा समावेश करण्यासाठी समितीची स्थापना करण्याचा देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला. त्यानुसार राज्य सरकारने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक यांच्या अध्यक्षतेखाली २० जणांची समिती स्थापन केली. ही समिती सध्या सुरू असलेल्या २० आजारांपैकी इतर सरकारी योजनेत समाविष्ट असलेल्या आजारांचे पुनर्विलोकन करून नवीन आजारांचा यात समावेश करण्याची शिफारस करू शकतात. तसेच ही समिती मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरीता रुग्णालय संलग्नीकरणासाठी रुग्णालयाच्या तपासणीचे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना केंद्र-राज्य सरकारच्या वैद्यकीय उपचाराबाबत असलेल्या इतर योजनांच्या धर्तीवर निकष ठरविण्याबाबत शिफारस करू शकणार आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचे फोटो आणि व्हिडिओ -
२२
जानेवारी २०२५
Photo Gallery
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेची सोशल मीडियामधील चर्चा -
२२
जानेवारी २०२५
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी (Mukhyamantri Vaidyakiya Sahayata Nidhi) हा उपक्रम गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी एक महत्वपूर्ण आधार आहे. गंभीर आजारांवर उपचारासाठी होणाऱ्या प्रचंड खर्चामुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडतात. अशा कुटुंबावरील आर्थिक ताण कमी करण्याच्या हेतुने या कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना अत्यावश्यक वैद्यकीय उपचार पुरवले जातात. ज्यामुळे त्यांच्या जीवनात नवीन आशा निर्माण होते. हा उपक्रम समाजातील दुर्बल घटकांसाठी आरोग्यसेवेच्या समानतेचे एक प्रतीक आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचा विस्तार करून त्याला एक वेगळा आयाम दिला. जेणेकरून भविष्यात जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ घेता येईल.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेशी संबंधित लेख