देवेंद्र फडणवीस: पक्षशिस्त, त्याग आणि निष्ठेचा परिचय; राजकारणातील अद्भूत व्यक्तिमत्त्व!

भारतीय राजकारणात नेतृत्वगुण, पक्षनिष्ठा आणि त्यागाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे स्थान अतिशय लक्षणीय ठरले आहे. २०१४ ते २०१९ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची कामगिरी राज्याच्या प्रगतीसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरली. या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्राची एक वेगळी ओळख निर्माण केली. पायाभूत सोयीसुविधांपासून शेती, सिंचन, टेक्नॉलॉजी ते परकीय गुंतवणुकीत पहिला क्रमांक पटकावला. तरीही त्यांना २०२२ मध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले. त्यांनी ते पक्षशिस्त आणि निष्ठेला धरून स्वीकारले. त्यांच्या या निर्णयामुळे एक वेगळाच आदर्श निर्माण केला गेला. या निर्णयातून त्यांनी पक्षहिताला प्राधान्य देत, आपल्या व्यक्तिगत आकांक्षांवर विजय मिळवत, पक्षशिस्तीचे एक उत्तम उदाहरण कार्यकर्त्यांसमोर ठेवले.

आताही २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने १३२ जागा जिंकून अद्भूत असे यश मिळवले आहे. भारतीय राजकारणाचा पोत आणि जिंकलेले आकडे पाहता, कोणीही डोळे बंद करून सांगू शकेल की, मुख्यमंत्री पदाचा मान हा देवेंद्र फडणवीस यांचाच आहे. ही फक्त कार्यकर्ते किंवा पक्षातील नेत्यांची भावना नाही. तर सर्वसामान्य नागरिकांचीही हीच भावना आहे. ज्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील विकास उघड्या डोळ्यांनी पाहिला आहे. त्यांच्या मनातील मुख्यमंत्री हे देवेंद्रजीच आहे. त्याची पूर्तता आता सर्वांच्या साक्षीने पुन्हा एकदा होणार आहे. पण बऱ्याचवेळा लोकांना फक्त देवेंद्रजींचे यश दिसते. हे शिखर गाठण्यासाठी त्यांनी केलेला त्याग, पक्षाने घालून दिलेली शिस्त आणि राजकीय क्षेत्रात राहूनही आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेल अशी निष्ठा कधीही ढळू दिली नाही. देवेंद्रजींसाठी राजकारण हे फक्त सत्ता मिळवण्याचे केंद्र नाही. त्यांच्यासाठी हे एक असे क्षेत्र आहे; ज्यामध्ये समाज आणि अर्थकारणात बदल घडवून आणण्याची ताकद आहे आणि ते या बदलासाठी झटत आहेत, राजकारण करत आहेत.

मागील दहा वर्षांतील राजकीय घडामोडींकडे पाहिले तर लक्षात येईल की, देवेंद्रजींनी राजकारणाची दिशाच बदलून टाकली आहे. या दिशेला महाराष्ट्राच्या प्रगतीचा उद्देश जोडून त्यामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी ते अहोरात्र काम करत आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे १०५ आमदार निवडून आले. त्यावेळी भाजपा हा सर्वाधिक आमदार निवडून आणणारा पक्ष ठरला होता आणि त्याचे नेतृत्व अर्थातच देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. पण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वकांक्षेपोटी भाजपाशी काडीमोड घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सोबत घरोबा केला. त्यावेळी देवेंद्रजींनी सर्वाधिक आमदार असलेला पक्ष असूनही राज्याचे विरोधी पक्ष नेते पद स्वीकारले. जवळपास अडीच वर्षे त्यांनी या पदावरून सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडले. त्यानंतर पुन्हा एकदा राज्यात सत्तांतर झाले आणि देवेंद्रजींना सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाचे नेते असूनही क्रमांक दोनचे उपमुख्यमंत्री पद (Deputy Chief Minister of Maharashtra) स्वीकारावे लागले. देवेंद्रजींनी ते पदही स्वीकारले. इथे देवेंद्रजींची पक्षावरील निष्ठा आणि शिस्त दिसून येते.

कार्यकर्त्यांच्या मनातला नेता…

२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हा नारा जोरदार घुमला होता. त्याचा पक्षाला फायदा होत भारतीय जनता पक्षाचे १२२ आमदार निवडून आले. देवेंद्रजी राज्याचे दुसरे तरुण मुख्यमंत्री ठरले. तसेच मुख्यमंत्री पदाची ५ वर्षे पूर्ण करणारे ही ते दुसरे मुख्यमंत्री ठरले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याचा बहुमान वाढवला. पायाभूत सोयीसुविधा, सिंचन, मेट्रो, शेती, परकीय गुंतवणूक अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी झटून काम केले आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ठरले. असे असतानाही २०१९ च्या निवडणुकानंतर त्यांना मुख्यमंत्री पद मिळू शकले नाही. पक्षाने दिलेला आदेश शिरसावंद्य मानून २०१९ मध्ये विरोधी पक्ष नेते आणि २०२२ मध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. हे पद स्वीकारताना त्यांनी जराही आपली वैयक्तिक ईर्षा किंवा महत्त्वाकांक्षा आड येऊ दिली नाही. एका सच्चा कार्यकर्त्याला पक्षाचा आदेश हेच सर्व काही असते. हे मानून त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारून पक्षशिस्त, त्याग आणि निष्ठा या गुणांचे फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर भारतीय राजकारणासाठी एक अनुकरणीय उदाहरण घालून दिले. 

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेत मिळालेला विजय
क्र.वर्षेलढलेल्या जागाविजयी जागापक्षाला मिळालेली मते
२०१४२६०१२२१,४७,०९,२७६
२०१९१६४१०५१,४१,९९,३७५
२०२४१४९१३२१,५७,०९,०७९

भारतीय राजकारणात असे निर्णय दुर्मीळ मानले जातात. कारण मुख्यमंत्रीपद सांभाळलेल्या नेत्याने पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री होणे अनेकांच्या दृष्टिकोनातून आव्हानात्मक ठरते. पण ज्याला पदापेक्षा त्या क्षेत्रामध्ये आणि त्यामुळे घडून येणाऱ्या बदलामध्ये अधिक रस आहे. त्यांच्यासाठी पद हे फक्त नाममात्र राहते. तर देवेंद्रजींच्या बाबतीत असेच घडले. २०२२ पासून जरी ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते; तरी त्यांनी आपल्या कामामध्ये कधीच खंड पडू दिला नाही. जे पद मिळाले आहे. त्याला न्याय देत त्यांनी महाराष्ट्र सेवक म्हणून राज्याची सेवा करण्यात कुठेही मागे राहिले नाही. त्यांची ही निष्ठा आणि पक्षशिस्त प्रत्येक कार्यकर्त्यांने अंगी बाळगावी, अशीच आहे. मग तो कार्यकर्ता कोणात्याही पक्षाचा असो. पण कार्यकर्ता मात्र तो देवेंद्रजीं सारखाच असावा, हे मात्र नक्की! 

उपमुख्यमंत्री पदावरील प्रभावी कार्यकाळ

देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री पद (Deputy Chief Minister of Maharashtra) स्वीकारत गृह, वित्त, ऊर्जा आणि जलसंपदा अशी महत्त्वाची खाती देखील सांभाळली. अर्थमंत्री असताना त्यांनी अमृतकाळातील पहिला आणि त्यांच्याही जीवनातील पहिला अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये मांडला. पंचामृत ध्येयावर आधारित मांडलेल्या या अर्थसंकल्पातून त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, १ रुपयांत पीक विमा, लेक लाडकी योजना, महिलांना एसटीत सरसकट ५० टक्के सूट अशा कितीतरी महत्त्वाच्या नाविन्यपूर्ण योजना आणल्या. त्यानंतर ऊर्जा आणि जलसंपदा विभागाच्या माध्यमातूनही त्यांनी लोकांना फायद्याच्या ठरणाऱ्या योजना आणल्या. महाविकास आघाडी सरकारने स्थगित केलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू केली. त्याला जोडून मागेल त्याला शेततळे राबवली. त्यानंतर माण भागातील दुष्काळ नाहिसा करण्यासाठी राबवलेली जिहे-कठापूर योजना मार्गी लावली. निळवंडे धरण, मराठवाडा वॉटरग्रीड या सर्व लोकांच्या जिव्हाळ्याच्या योजना मार्गी लावल्या. यासाठी देवेंद्रजींनी कधीही पदाचा विचार केला नाही. त्याला लोकांसाठी काम करायचे आहे; तो कोणत्याही पदावरून ते करू शकतो. याचे मोठे उदाहरण देवेंद्रजींनी घालून दिले आहे. मुंबईतील कोस्टल रोड, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग या इन्फ्रास्ट्रक्चरच्या निर्मितीमधून राज्याच्या आर्थिक गतीलाही देवेंद्रजींनी चांगलाच वेग दिला आहे.

देवेंद्रजींनी हा विकास घडवून आणण्यासाठी कधीही पदाचा अडसर आला नाही. इथे एक गोष्ट वारंवार नमूद करावीशी वाटते. ती म्हणजे देवेंद्रजी हे नेहमी राजकारणाकडे समाजात बदल घडवून आणणारी व्यवस्था म्हणून पाहतात. त्यांचे हे अशाप्रकारचे राजकारण नक्कीच येणाऱ्या पिढीसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी अनुकरणीय आहे. त्यांनी केलेली कामगिरी ही संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे, अनुभवली आहे. राजकारण, त्यातील नैतिकता, पक्षशिस्त आणि निष्ठा या गुणांनी त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर आपला एक वेगळाच ठसा उमटवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *