‘देवाभाऊंचा ध्यास, दक्षिण-पश्चिम नागपूरचा विकास’, ही देवेंद्र फडणवीस यांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांची ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नागपूर दक्षिण-पश्चिम भागाचा फक्त भौतिक नाही, तर सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्तरावर विकास झाला आहे. नागपूरचा आधुनिक शहर म्हणून विकास करताना त्यांनी त्याची सुरूवात आपल्या मतदारसंघापासून केली. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प राबवले. ज्यामुळे नागपूरचा दक्षिण-पश्चिम हा मतदार आज एक प्रगतीशील, सुरक्षित आणि विकासाचा परिसर बनला आहे. यासाठी देवेंद्रजींनी कोट्यवधींचा निधी इथे आणला आहे. नुकतेच त्यांनी ५४१ कोटींची ५३ विकासकामांचे भूमिपूजन केले.
नागपूर शहराची ओळख फक्त विदर्भातील प्रमुख शहर किंवा राज्याची उपराजधानी इतकेच नाही. तर नागपूर हे एक प्रगतीशील, समृद्ध आणि अत्याधुनिक शहर म्हणून निर्माण करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. मार्च २०२४ मध्ये नागपूरच्या दक्षिण-पश्चिम भागात देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल ५४१ कोटींच्या ५३ विविध विकास कामांचे भूमिपूजन केले. यामध्ये व्यावसायिक आणि रहिवाशी संकुल, सारथी संस्थेच्या मुख्यालयाचे बांधकाम तसेच जवळपास ३०० कोटी रुपये खर्चून ३३ रस्त्यांचे काम सुरू केले. या रस्त्यांमुळे शहरांतील अंतर्गत वाहतूक व्यवस्था अजून मजूबत होणार आहे. या विकासकामांमधून नागपूरकरांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी देवेंद्रजींकडून प्रयत्न केले जात आहेत. शहरातील व्यावसायिक आणि रहिवाशी संकुलाच्या प्रकल्पातील ऑरेंज सिटी स्ट्रीट हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लक्षवेधी ठरत आहे. या प्रकल्पांतर्गत ९ व्यावसायिक संकुले, १४८ निवासी गाळे, १० पेंट हाऊस आणि पार्किंग सुविधेच्या माध्यमातून नागपूरकरांना निवास आणि व्यावसायाच्या उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
नागपूर विकास योजना – Nagpur Development Schemes
नागपूरमध्ये सारथी मुख्यालय
मतदारसंघ आणि शहरातील विविध जाती-धर्माच्या लोकांचा विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने मराठा आणि कुणबी समाजासाठी काम करणाऱ्या सारथी संस्थेच्या मुख्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले. या संस्थेच्या माध्यमातून मराठा व कुणबी समाजासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आर्थिक साधने उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात अहिल्याबाई होळकर सभागृह, आयुष्यमान आरोग्य मंदिर, जलकुंभ, ग्रंथालय आदी महत्त्वाच्या प्रकल्पांचे काम देखील सुरू झाले आहे. यासाठी एकूण ३१७ कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.
नागपूरच्या भविष्यासाठी नवीन संधी निर्माण करण्यावर भर!
दक्षिण-पश्चिम नागपूर बरोबरच पश्चिम नागपूर मतदारसंघातही ५२ कोटींची आणि दक्षिण नागपुरात १८ कोटींच्या विकासकामांना सुरुवात करण्यात आली आहे. तर नागपूरच्या उर्वरित भागात १५२ कोटी रुपये खर्च करून विविध विकास प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. ही सर्व विकासकामे नागपूरच्या भविष्यासाठी नव्या संधी निर्माण करणारी आहेत. नागपूर शहरातील वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार होणारा शहराचा विस्तार लक्षात घेता नागपूर शहर नियोजन आणि विकासासाठी १५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर नागपूरची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपारंपरिक आणि हरित ऊर्जा स्रोतांवर चालणारी बनवण्यासाठी भरीव प्रयत्न सुरू आहेत. नागपूर हे भारतातील पहिले अपारंपरिक ऊर्जा स्रोतांवर चालणाऱ्या बस असलेले शहर बनावे, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सोबतीने संकल्प सोडला आहे.
आयआयटीएमएस प्रकल्पामुळे ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये नवी क्रांती
नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळित करण्यासाठी तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी इंटिलिजेंट इंटीग्रेटेड ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयआयटीएमएस) राबवली जाणार आहे. या तंत्रज्ञानांतर्गत शहरातील सर्व १६४ स्वयंचलित वाहतूक नियंत्रकाचे नुतनीकरण करून त्यांना मुख्य सर्व्हरशी जोडून वाहतूक नियंत्रण प्रणालीमध्ये महत्त्वाचे बदल केले जाणार आहेत. या बदलांमुळे वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांच काटेकोरपणे पालन होऊन वाहतूक व्यवस्था सुरळित होण्यासाठी मदत होणार आहे. या प्रणालीसाठी १९७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
नाग नदीचे संवर्धन तर पोहरा नदी प्रदूषणमुक्त होणार!
दक्षिण सिवरेज झोनमधून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे पोहरा नदी प्रदूषित झाली आहे. हे प्रदूषण कायमचे बंद करण्यासाठी तसेच पोहरा नदीचे नैसर्गिक जलस्त्रोत अधिक बळकट करण्यासाठी अमृत २.० योजने अंतर्गत सरकारच्यावतीने ९५७ कोटी रुपयांचा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प राबवविला जाणार आहे. या प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सिवरेज लाईनचा प्रश्नदेखील पूर्णपणे सुटला जाईल. पोहरा नदीप्रमाणेच नाग नदीच्या संवर्धनासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या संवर्धन प्रकल्पासाठी जायकाची मदत घेतली जाणार असून त्यासाठी २४०० कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. नाग नदीच्या पुनरुज्जीवनासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी तर शुद्धीकरणासाठी २२४ कोटी रुपयांचा निधी वापरला जाणार आहे.
महिलांसाठी ‘हॅलो यशस्विनी’ हेल्पलाईन
नागपुरातील महिलांना उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि कायदेविषयक बाबींचे मार्गदर्शन मिळावे यासाठी हॅलो यशस्विनी हेल्पलाईन सुरू करण्यात आली. या हेल्पलाईनच्या माध्यमातून महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन मिळणार आहे. यासाठी महिलांनी ९५४५७५९९६६ या क्रमांकावर सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत संपर्क साधावा.
नागपूरच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शहराचा विविध बाजुंनी विकास घडवून आणण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी केली आहे. नागपूरकरांसाठी आरोग्य, शिक्षण, व्यापार, आणि सांस्कृतिक जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी हे सर्व प्रकल्प भविष्यातील नागपूरचे रूप बदलण्यास सक्षम ठरणार आहेत. त्याचबरोबर शहरातील रस्ते, वाणिज्यिक आणि निवासी संकुले, अत्याधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या प्रकल्पांमुळे नागपूर शहराचा बोलबाला फक्त विदर्भातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात होणार आहे. ग्रीन एनर्जी, मूलभूत पायाभूत सुविधा आणि एकात्मिक समाज उभारण्याच्या दिशेने सुरू झालेला हा विकास नागपूरमधील जनतेच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणारा ठरेल. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण-पश्चिम नागपूरसह संपूर्ण नागपूर शहर प्रगतीच्या एका उंचीवर जात आहे.