17 Katkari Families : देवेंद्र फडणवीस यांनी सावकरांच्या जाचातून सोडविलेली जमिनीची मालकी आज 17 कातकरी कुटुंबांना परत मिळाली

जगतगुरु तुकोबारायांच्या अभंगातील या ओवी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तंतोतंत लागू होतात. कारण आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करणे, विस्थापित मराठा समाजाला आरक्षण देणे, गरीब मराठा विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना सुरु करणे, धनगर बांधवांना आदिवासींना लागू असलेले लाभ देणे, असे अनेक निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घेतले. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर रामोशी, वडार, लिंगायत, गुरव, बंजारा समाजासाठी स्वतंत्र महामंडळ तयार करणे असे अनेक निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घेतले. यातले अनेक समाज असे आहेत ज्यांची महाराष्ट्रात राजकीय उपयुक्तता किंवा अगदीच रोखठोक सांगायचे म्हणजे वोट बँक अगदीच नगण्य आहे. असे असूनही समाजातील वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महामंडळे निर्माण करणे यातून देवेंद्र फडणवीसांचे दीनबंधूत्व ठळकपणे दिसून येते.

जे का रंजले गांजले।
त्यासी म्हणे जो आपुले।।
तो ची साधु ओळखावा।
देव तेथेची जाणावा।।

Lands received by Katkari families
Lands received by Katkari families

नुकतेच देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत दुर्लक्षित व विस्थापित असलेल्या कातकरी समाज बांधवांना मंत्रालयात आमंत्रित करून त्यांना जमीन पट्ट्यांचे वाटप केले. रायगड जिल्ह्यातील या १७ कुटुंबांच्या जमिनी सावकारांनी केवळ २०० रुपयात किंवा आठवड्यातून एकदा चिकन देऊन गिळल्या होत्या. परंतु देवेंद्र फडणवीस सत्तेत परतताच आज कातकरी बांधवांना त्यांच्या हक्काच्या जमिनी परत मिळाल्या. ही महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे.

कारण कातकरी समाज अत्यंत दैन्यावस्थेत जगतो आहे. त्याच्या दारिद्रयामुळे त्याचे अनेकदा शोषण केले जाते आणि न्याय मागण्यासाठी त्याच्यापुढे कुठलाच पर्याय नसतो. कातकरी समाजाचे हेच दुःख जाणत गेल्याच अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना देवेंद्र फडणवीस तब्बल २० मिनिटे या कातकरी समाजाबद्दल अतिशय तळमळीने बोलल्याचे महाराष्ट्राने पाहिले. मोलमजुरीवर गुजराण करत सतत भटकंतीवर असलेल्या या समाजाला सरकारच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देवेंद्रजींनी अनेक निर्णय जाहीर केले. ज्यामध्ये कातकरी बांधवांची मजुरी कुणी बुडविली आणि त्याने पोलिसात तक्रार केली तर पोलिसांनी तत्काळ संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. जो तपास अधिकारी कारवाई करण्यात दिरंगाई करेल, त्याचे थेट निलंबन करण्याचेही आदेश देवेंद्रजींनी सभागृहातच दिले. याशिवाय कातकरी समाजातील मुलांना शिक्षण आणि पोषक आहार मिळावा याबद्दलचे निर्णय देवेंद्रजींनी सभागृहात जाहीर केले. राजकीय पतपेटीच्या अंकगणितात कुठेच न बसणाऱ्या एखाद्या दुर्लक्षित समाजाचेही हित जपणारे, त्यांना सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून देणारे देवेंद्र फडणवीस आपल्या संवेदनशील कर्तुत्वामुळेच इतरांपेक्षा वेगळे ठरतात.

Lands received by Katkari families
Lands received by Katkari families

देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळापासून ते आजपर्यंतची कारकीर्द पाहिली तर, त्यांनी अशा अशा समाजासाठी निर्णय घेतले ज्यांच्याकडे आजवरचे कुठलेही सरकार लक्ष देऊ शकली नाही. ही तळमळ फक्त सामाजिक बांधीलकी, सेवाभाव आणि उत्तम संस्कारातून येऊ शकते. देवेंद्र फडणवीस अशा संस्कारात घडले जिथे पंडित दीनदयाळ उपाध्याय सारख्या महान नेत्यांनी अंत्योदयाचा विचार मांडला. त्यामुळे जोवर समाजातील अंतिम व्यक्ती मुख्य प्रवाहात येत नाही तोवर आपण विकसित झालो असे म्हणता येणार नाही, हाच विचार देवेंद्र फडणवीसांनी आपल्या राजकीय आयुष्यात पाळला. अगदी दुर्गम गडचिरोली, गोंदिया सारख्या नक्षलग्रस्त भागाचे उदाहरण घेतले, तर वर्षानुवर्षे हा भाग नक्षलवाद, कुपोषण आणि कुशासन यासाठीच कुख्यात होता. परंतु देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी सी-६० विशेष पोलीस तुकडीला बळ देत जंगलातील नक्षलवाद संपवला आणि नक्षलांच्या शहरी मास्टरमाईंडना तुरुंगात पाठविले. आज उपमुख्यमंत्री पदावर काम करत असताना देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा गडचिरोली जिल्यातील संवेदनशील गावांमध्ये मुक्कामी दौरे करत गावकरी आदिवासी आणि शासन यांच्यात संवादाचा पूल बांधला. सुरजागड सारख्या भागात पोलाद निर्मिती क्षेत्रात मोठी गुंतवणूक आणली. रस्ते, मूलभूत सुविधांचा विकास केला. त्यामुळेच आज गडचिरोली जिल्हा स्टील हब म्हणून उदयाला येतो आहे.

Lands received by Katkari families
Lands received by Katkari families

प्रश्न हा पडतो की, देवेंद्र फडणवीसांचे भाजपमधील स्थान पक्के आहे, केंद्रातील नेतृत्वाचा त्यांना भक्कम आशीर्वाद आहे, त्यांचा स्वतःचा मतदारसंघ शहरी आहे. शिवाय ते जे काही करतात त्यातून त्यांना राजकीय लाभ किती मिळेल, हे देखील नीट सांगता येत नाही. असे असूनही देवेंद्रजी कायम राज्यातील उपेक्षित, दिन, दलित, वंचित आणि शोषितांसाठी संपूर्ण राजकीय शक्ती पणाला लावून काम करतात, असे का? आजच्या स्वार्थ केंद्रित राजकारणात हे अव्यवहार्य नाही का?

निश्चित असेलही! पण आपण जीवनात काही कामे अशी करतो जी आपल्याला पदसिद्ध कर्तव्यातून मिळते, काही नफा-तोटा पाहून केली जातात. परंतु काही कामे अशी असतात जी मानव म्हणून जन्माला आल्यावर मानवधर्माचे कर्तव्य म्हणून स्वयंस्फूर्तीने नफ्या-तोट्याचा विचार न करता केली जातात, जिचे पुण्यसंचय पारलौकिक जीवनात उपयोगाला येते. देवेंद्र फडणवीस आता आपल्या सार्वजनिक आयुष्याच्या त्या टप्प्यावर येऊन पोचले आहेत जिथे सत्ता, पद, राजकीय आव्हाने, निंदा-नालस्ती या बाबी गौण ठरतात आणि मनुष्य वैराग्यपूर्ण भावनेने समाजासाठी जगतो, कर्मयोगी बनतो. काही वर्षांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हाच मार्ग निवडला होता आणि आज त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत देवेंद्र फडणवीस पुढे जाताना दिसताहेत. अर्थात या गोष्टी विकाऊ माध्यमे आणि स्वार्थी राजकारण्यांच्या ध्यानी पडत नाही आणि अशी माणसे पुढे कर्मयोग्यांच्या कर्तृत्वापुढे निष्प्रभ ठरतात.

ऑल द बेस्ट देवेंद्रजी…बढे चलो!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *