AI for Maharashtra : महाराष्ट्र शासन आणि गुगल यांच्यात ऐतिहसिक सामंजस्य करार!

AI for Maharashtra in Marathi : आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत भाग्याचा आणि दिशादर्शक आहे. आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुगल कंपनीसोबत AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित अत्यंत महत्वपूर्ण सामंजस्य करार केला. या करारामुळे जागतिक स्तरावर महाराष्ट्राचे महत्त्व फार वाढणार असून देशासाठीही महाराष्ट्र सीएम फेलोशिप आणि जलयुक्त शिवार अभियानाप्रमाणेच पथदर्शकाची भूमिका बजावणार आहे. अर्थात हे तीनही उपक्रम देवेंद्र फडणवीसांच्या कल्पक नेतृत्वातूनच जन्माला आलेले आहेत, हे वेगळं सांगायला नको.

गुगल आपल्या नवनव्या तंत्रज्ञानाने मानवी जीवन कसे सोपे बनवते आहे, हे आपल्या साऱ्यांना ठाऊकच आहे. कारण आज जगातील सर्वच स्मार्टफोन युझर्स गुगलवर फार मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. अलीकडच्या काळात गुगलने AI आणि थ्रीडी मॅपिंग सारखे तंत्रज्ञान वापरून सर्व प्रकारचा डेटा अगदी रियल टाईममध्ये उपलब्ध करण्याचा चमत्कार घडविला. इंटरनेटचे हेच सामर्थ्य हेरून केंद्रात मोदींनी आणि महाराष्ट्रात फडणवीसांनी गेल्या 9 वर्षांत मोठ्या प्रमाणात डिजिटायझेशन करून राज्यकारभारात पारदर्शिता आणि सुलभता आणली आहे. त्याचमुळे आज लाभार्थ्यांना DBT प्रणालीच्या माध्यमातून विविध योजनांचे पैसे थेट बँक खात्यांमध्ये मिळत आहेत. आज डिजिटल पेमेंटमध्ये भारत अव्वल असून भाजीवाल्या पासून ते भिकाऱ्यापर्यंत सर्वांकडे क्यूआर कोड उपलब्ध आहे आणि हा एक चमत्कारच आहे!

Maharashtra signs MoU with Google for harnessing Artificial Intelligence
Maharashtra signs MoU with Google for harnessing Artificial Intelligence

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना ‘आपले सरकार’ पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण मंत्रालय डिजिटल बनविले. सायबर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज पोलीस स्टेशन निर्माण करणारे सुद्धा देवेंद्र फडणवीसच आहे. फडणवीस तरुण आहेत आणि स्वतः टेकसॅव्ही आहेत. त्यामुळे परंपरागत पद्धतीने सुस्त गतीने राज्यकारभार करण्याची परंपरा त्यांनी मोडीत काढत नवनव्या तंत्रज्ञानाच्या वापरातून गव्हर्नन्स गतिमान केले. ज्यावेळी AI म्हणजे आर्टफिशियल इंटेलिजन्सबद्दल केवळ प्रगत देशांमधील हायटेक कम्युनिटीमध्ये बोलले जायचे त्यावेळी पुढे चौथ्या औद्योगिक क्रांतीत AI चे महत्व अनन्यसाधारण असेल, हे देवेंद्र फडणवीसांनी २०१७ मध्येच हेरले आणि २०१८ मध्ये NextAI या बहुराष्ट्रीय कंपनीसोबत करार करत AI वर आधारीत ५० स्टार्ट अप्स महाराष्ट्रात उभे करण्याचे काम सुरु केले. त्याचवेळी मुंबई विद्यापीठाच्या मदतीने फडवीसांनी देशातील पहिले AI इन्स्टिट्युटही मुंबईत निर्माण केली. यासोबतच पुणे जिल्ह्यात AI व ड्रोन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अचूक हवामान, पिकांचे जिओ मॅपिंग तसेच रासायनिक फवारणीचे पायलट प्रोजेक्टसही फडणवीसांनी राबविले.

आपल्या सेकंड इनिंगमध्ये देवेंद्र फडणवीस जनतेला अधिक वेगवान आणि आक्रमकपणे महाराष्ट्राला पुढे नेताना दिसताहेत. ज्यामुळे सत्तेत परतल्यानंतर अवघ्या वर्षभरात देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला पुन्हा गुंतवणुकीत नंबर बनविले. समृद्धी, अटल सेतू, कोस्टल रोडसारखे हायटेक इन्फ्रा प्रोजेक्ट्स युद्धपातळीवर पूर्ण केले आणि त्यातही ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी AI आधारित मॉनिटरिंग सिस्टीमचा वापर केला. आज गुगलसोबत झालेल्या करारानंतर गुगलने विकसित केलेल्या AI टूल्सच्या माध्यमातून कृषी, आरोग्य, उद्योजकता, कौशल्य विकास अशा अनेक क्षेत्रात सरकारकडून अनेक अविश्वसनीय चमत्कार येत्या काळात बघायला मिळतील.

AI for Maharashtra in Marathi
Maharashtra signs MoU with Google for harnessing Artificial Intelligence

कृषी क्षेत्रात गुगल टूल्सच्या मदतीने सरकारला आणि शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचे, पिकांचे अचूक मॅपिंग, हवामानाचे अचूक अंदाज, मनुष्यविरहित शेतकी कामे, पिकांवर येणाऱ्या संभाव्य रोगांचे निदान अशा अनेक कामांमध्ये मदत होणार असून ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. याशिवाय अतिवृष्टी किंवा कोरड्या दुष्काळाच्या अनुमानातही अचूकता आणणे यामुळे शक्य होणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी काय पेरलं आहे, काय पेरायला हवं याचाही अचूक डेटा सरकार आणि शेतकरी दोघानांही मिळणार आहे, जेणेकरून नैसर्गिक संकटामुळे दरवर्षी शेतीचे होणार नुकसान शेतकऱ्यांना कमी करता येईल आणि सरकारचेही अनुदानावर खर्च होणारे पैसे वाचतील.

आरोग्य क्षेत्रात AI आधारित उपकरणांचा वापर करून विविध चाचण्यांची अचूकता वाढविण्यास मदत होणार आहे. विविध रोगांचे अचूक निदान यामुळे शक्य होणार आहे. मानवी चुका किंवा निष्काळजीपणामुळे रुग्णांच्या होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही कमी करणे शक्य होणार आहे. उद्योजकता आणि कौशल्य विकासामध्ये AI ची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. गुगलच्या विविध टूल्सच्या माध्यमातून उद्यमशील तरुणांनी कुठला व्यवसाय करावा, कसा करावा, त्याचा विस्तार कसा करावा, इथपासून ते बिझनेस स्ट्रॅटिजी बनविण्यापर्यंत अतिशय अचूक व्यवस्थापन करण्यास सरकार मदत करणार आहे. त्यासाठी गुगल एड्युकेटर्सना विशेष प्रशिक्षण देणार आहे.

याशिवाय ५००+ अनुभवी आयटी तज्ञ युवकांना स्किल डेव्हलपमेंटचे रियल टाईममध्ये प्रशिक्षण देणार आहे व त्यांच्या शंकांचे समाधान करणार आहेत. त्यामुळे आज देशाचे स्टार्ट अप कॅपिटल बनलेले महाराष्ट्र भविष्यात जगाचे स्टार्ट अप कॅपिटल बनल्यास नवल वाटू नये. AI मुळे रोजगार जाणार अशी भीती तरुणांमध्ये राजकीय मंडळींकडून जाणीवपूर्वक पसरवली जाते. परंतु ते सत्य नसून AI मुळे रोजगाराचे स्वरूप बदलणार असून जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्याला AI स्किल्स स्वतःमध्ये डेव्हलप कराव्या लागतील आणि देवेंद्र फडणवीसांनी नेमक्या त्याच दिशेने पाऊल उचलले आहे.

याशिवाय AI च्या माध्यमातून गुन्हेगारांचा आणि सायबर गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांना फार मोठी मदत होणार आहे. त्यासाठी देवेंद्रजींनी अगोदरच नागपूर येथे स्वतंत्र केंद्राची उभारणी सुरु केली आहे.

संपूर्ण जग बदलते आहे, आपण तंत्रज्ञानाच्या वेगळ्या युगात प्रवेश करत आहोत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे तंत्रज्ञानाचा विकास थांबविणे आपल्या हातात नाही, त्यामुळे नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर आपण लोकहितासाठी कसा करू शकू यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे आज प्रत्येक भारतीय डिजिटल पेमेंट करतो आहे, त्याचप्रमाणे भविष्यात AI च्या माध्यमातून सामान्य माणूस अनेक क्षेत्रांमध्ये आपला वेळ, पैसे आणि श्रम वाचवून आपले जीवन सुखकर करू शकेल, आपले उत्पन्न वाढवू शकेल, याकडेच देवेंद्र फडणवीसांचे लक्ष आहे. यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपल्या ‘व्हिजन-२०३५’ वर काम सुरु केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *