निष्ठावान कार्यकर्ता: देवेंद्र फडणवीसांची प्रेरणादायी वाटचाल | Devendra Fadnavis Honest Party Leader

देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे एक निष्ठावान (Devendra Fadnavis Honest Party Leader) आणि दूरदृष्टी असलेले नेते आहेत. त्यांची कारकीर्द महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत कमी कालावधीत प्रभावी ठरली आहे. १९९९ मध्ये त्यांनी सर्वप्रथम विधिमंडळात प्रवेश केला. त्यानंतर ते सलग ५ टर्म म्हणजे २०२४ पर्यंत जवळपास २५ वर्षे विधीमंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. २०१४ मध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. या कालावधीत त्यांनी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवून राज्याचा विकास साधला. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांच्याच नेतृत्त्वाखाली विधानसभा निवडणूक लढवली गेली. मात्र काही राजकीय उलथापालथीनंतर त्यांना मुख्यमंत्रीपद सोडून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले. यावेळीही त्यांनी आपली निष्ठा आणि कार्यक्षमता कायम ठेवली. भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेचा अवलंब करून त्यांनी महाराष्ट्रातील नागरिकांच्या हितासाठी कार्य सुरू ठेवले. त्यांचा हा राजकीय प्रवास आणि कार्यप्रणाली निष्ठावान, कष्टाळू आणि प्रामाणिकपणाची प्रेरणा देणारी आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी नागपूर येथे झाला. त्यांच्या कुटुंबाचा समाजकारण आणि राजकारणाशी जवळचा संबंध होता. त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनता पार्टीचे कार्यकर्ते होते. नागपूर महापालिकेत ते उपमहापौर देखील होते.  त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्या घरात भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेचे बाळकडू त्यांना मिळत गेले. परिणामी त्यांना सामाजिक कार्याची आणि नेतृत्वाची ओढ लागली. विद्यार्थीदशेत त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. याच काळात त्यांनी आपले नेतृत्व कौशल्य आणि समाजकार्याच्या कामाला गती दिली. त्यांच्या या बेधडक नेतृत्वगुणांमुळे ते लवकरच भारतीय जनता पक्षाचे सदस्य बनले. त्यानंतर नागपूर महानगरपालिकेत सदस्य आणि त्यानंतर मग महापौर अशी पदे विराजमान करत नागपूरच्या राजकारणात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.

Devendra Fadnavis Honest Party Leader

Devendra Fadnavis Honest Party Leader

राजकीय कारकीर्द आणि मुख्यमंत्रीपद

भारतीय जनता पक्षाचा प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ता म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाकडून जी जबाबदारी दिली गेली, ती स्वीकारून त्यावर प्रामाणिकपणे काम केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सुरू केलेल्या प्रवासात त्यांनी राजकीय कारकीर्दीची सुरुवात १९९२ मध्ये नागपूर महानगरपालिकेच्या नगरसेवकपदापासून केली. त्यानंतर अवघ्या ५ वर्षांनी वयाच्या २७ व्या वर्षी नागपूरचे महापौर पद भूषवले. त्यानंतर १९९९ मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे, सभागृहातील चर्चामुळे ते नागपूरचे लोकप्रिय आमदार बनले. २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाने शिवसेनेसोबत युती करून महाराष्ट्राची सत्ता मिळवली. या सत्तेच्या प्रमुखपदी म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस विराजमान झाले.  

देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदापर्यंतची कारकीर्द पाहण्यासाठी सुखद वाटत असली तरी, इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी वैयक्तिकरीत्या खूप मेहनत घेतली. पक्षाने जी जबाददारी दिली, तो पक्षादेश मानून प्रमाणिकपूणे पूर्ण केली. पक्षाने १९८९ मध्ये त्यांच्यावर भारतीय जनता युवा मोर्चाचा वॉर्ड अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली होती. त्यानंतर त्यांनी नागपूर पश्चिम मतदारसंघाचा पदाधिकारी म्हणून १९९० मध्ये काम केले. या कालावधीत त्यांनी रामजन्मभूमी कार्यक्रमांतर्गत विविध प्रकारचे कार्यक्रम केले. त्यानंतर पक्षाने १९९२ मध्ये त्यांच्यावर नागपूर भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. ही जबाबदारी देखील त्यांनी उत्तमरीत्या पार पाडली. त्यामुळे १९९४ मध्ये त्यांना भारतीय जनता युवा मोर्चाचे राज्याचे उपाध्यक्षपद दिले गेले. या पदावर समाधानकारक काम केल्यानंतर पक्षाने त्यांना २००१ मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. २०१० मध्ये भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये त्यांना भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष करण्यात आले. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांची रणनिती बऱ्यापैकी यशस्वी झाली आणि राज्यात  भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचे सरकार आले. मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी विविध सामाजिक आणि विकासाच्या योजनांची अंमलबजावणी केली. ज्यामध्ये जलयुक्त शिवार, समृद्धी महामार्ग, आणि मराठा आरक्षण या प्रमुख उपक्रमांचा समावेश होता. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ हा महाराष्ट्राच्या विकासाची नवी दिशा देणारा ठरला.

उपमुख्यमंत्रीपदाचा स्वीकार, राजकीय परिपक्वतेचे दर्शन

एक प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ता म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील विविध पदांबरोबरच राज्याच्या सत्ताकेंद्राचे प्रमुख पद देखील स्वीकारले. पण त्याच पक्षाने सांगितल्यावर फडणवीस यांनी पक्षादेश शीर्षस्थानी मानून, आपल्याचे पक्षाचे सर्वाधिक आमदार असूनही २०२२ मध्ये उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. २०१९ च्या निवडणुकांनंतर शिवसेनेने काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी करून सरकार स्थापन केले. पण २०२२ मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल झाला. शिवसेनेतील नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करून वेगळा गट स्थापन केला. यामुळे उद्धव ठाकरे सरकार कोसळले. त्यावेळी पक्षश्रेष्ठींनी एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद देऊन देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणे हे एक उल्लेखनीय बाब होती. कारण राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या व्यक्तीने आपल्या पक्षाच्या आमदारांची संख्या अधिक असूनही दुसऱ्या क्रमांकाचे पद स्वीकारणे हे अनेकांसाठी आश्चर्याचे होते. पण फडणवीस यांनी या कृतीतून आपल्या राजकीय परिपक्वतेचे दर्शन घडवले. त्याचबरोबर त्यांनी पक्षनिष्ठा, संघटनात्मक गरजा आणि महाराष्ट्रातील विकासासाठी आपल्या जबाबदाऱ्या महत्त्वाच्या मानल्या.

पक्षनिष्ठ आणि निष्ठावान कार्यकर्ता (Honest Party Leader)

देवेंद्र फडणवीस हे नेहमीच पक्षनिष्ठ राहिले आहेत. भाजपाचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर पक्षाच्या विविध पदांवर काम करताना नेहमीच पक्षाच्या ध्येयधोरणांना प्राधान्य दिले. उपमुख्यमंत्रीपदाची चर्चा झाली, तेव्हा ही त्यांनी पक्षाच्या हिताला प्राधान्य दिले आणि मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी कोणताही दबाव आणला नाही. फडणवीसांनी वेळोवेळी पक्षाविषयी भूमिका मांडताना स्पष्ट केले आहे की, त्यांचा पक्षाच्या निर्णयावर पूर्ण विश्वास आहे. पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयाला पाठिंबा देणार. याबाबतीत त्यांनी नेहमीच संघटनेच्या विचारांशी बांधील राहून पक्षाच्या शिस्तबद्ध धोरणांचे पालन केले. दरम्यानच्या काळात विरोधी पक्षाने फडणवीसांच्या या निर्णयावर बरीच टीका केली. पण फडणवीस यांनी दाखवून दिले की, सत्तेत फक्त पद महत्त्वाचे नाही. राज्याचा विकास आणि जनतेची सेवा हेच काम असेल तर ते कोणत्याही पदावरून प्रामाणिकपणे करता येते. त्यांच्या निर्णयाला न्याय देईल असेच काम फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून केले. मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक महत्त्वाचे प्रकल्प सुरू केले होते. यात समृद्धी महामार्ग, जलयुक्त शिवार योजना, राज्यातील डिजिटल धोरणे आणि शहरी विकासाला दिशा देणारे प्रकल्प होते. या प्रकल्पांना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून गती देत ते मार्गी लावले आणि राज्याच्या विकासात भर घातली.

देवेंद्र फडणवीस यांनी २०२२ मध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणे ही त्यांची राजकीय परिपक्वता आणि पक्षावरील निष्ठा होती. मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या एका मोठ्या नेत्याने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणे हा फक्त एक राजकीय निर्णय नव्हता. तर जनतेच्या सेवेत निरंतर कार्यरत राहण्याचे ध्येय होते. त्यांच्या या निष्ठेमुळेच देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान बनले आहेत.  त्यांची कार्यप्रणाली आणि समाजसेवेसाठी असलेली कटिबद्धता ही भावी पिढीसाठी आदर्श आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *