Solapur Kamgar Vasahat : देशाचे लाडके पंतप्रधान पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून ते दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी सोलापूरातील रे नगर येथे निर्माण झालेल्या देशातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाचे लोकार्पण करणार आहे. तब्बल ३५० एकरात पसरलेल्या प्रकल्पात ३०,००० कामगारांना स्वतःचे घर मिळणार असून त्यापैकी पहिल्या १५,००० घरांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण करण्यासाठी मोदीजी सोलापुरात येत आहे. एकूण 834 इमारती, प्रत्येक इमारतीत 36 फ्लॅट्स, 60 मेगावॅट क्षमतेचा, विज निर्मिती प्रकल्प, २९ एमएलडी क्षमतेच्या 7 मोठ्या पाणी टाक्यांमधून 24 तास पाणी पुरवठा, मलशुद्धीकरण केंद्र, स्वतंत्र घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा, विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदतर्फे शाळा, अंगणवाडी सोय, खेळण्यासाठी क्रीडा मैदान, आरोग्यासाठी हॉस्पिटल, लोकांच्या रोजगाराची व्यवस्था अशा अनेक सोई पुरवण्यात येणार आहे.
कामगारांच्या घरांसाठी कामगार नेते व जिल्ह्यातील सन्मानीय व्यक्तिमत्व नरसैया आडाम मास्तर हे गेल्या १३-१४ वर्षांपासून पाठपुरावा करत होते. त्यासाठी त्यांनी शरद पवार व तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे अनेकदा मागणी केली. परंतु आघाडी सरकारने त्यांना झुलवत ठेवले. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री बनले आणि त्यांनी तात्काळ ही देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत निर्माण करण्याला होकार दिला. ६ ऑक्टोबर २०१८ रोजी देवेंद्रजींनी बँकेची अट शिथील करत प्रकल्पाला १२० कोटी दिले. परंतु ३०,००० घरांची निर्मिती एकट्या राज्य सरकारच्या आवाक्याच्या बाहेर होते. त्यामुळे देवेंद्रजींनी सदर प्रकल्पाला केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून मदत मिळावी यासाठी नरेंद्र मोदीजींकडे मागणी केली. गोर-गरिब आणि कष्टकर्यांप्रती सदैव संवेदनशील असलेल्या मोदीजींनी तात्काळ देवेंद्रजींची मागणी पूर्ण केली व ९ जून २०१९ रोजी मोदीजींच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले.
पुढे राज्यात सत्तांतर होऊन उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात वसुली आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि ठाकरे सरकारने हा प्रकल्प थंडबस्त्यात टाकला. कामगार नेते नरसैया आडाम मास्तरांनी त्यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरेंसारख्या प्रमुख नेत्यांच्या घरांचे उंबरठे झिजवले, परंतु मविआने आडम मास्तरांना वारंवार अपमानित करत परत पाठविले याची खंत खुद्द त्यांनीच एका जाहीर कार्यक्रमात व्यक्त केली. एवढंच नव्हे एखाद्या कम्युनिस्ट नेत्याकडून भाजपचे कौतुक ऐकणे दुरापास्तच आहे. परंतु आडाम मास्तरांनी जाहीर सभेत हा प्रकल्प फक्त देवेंद्र फडणवीसांमुळे शक्य झाला, असे जाहीर सभेत ठासून सांगितले. दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील १५,००० घरांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण होते आहे. त्यामुळे नरेंद्र-देवेंद्र जोडी हाती घेतलेला प्रकल्प पूर्णत्वास नेते हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं.
देवेंद्र फडणवीस नावाच्या तरुण तडफदार नेत्याच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रत्येक आघाडीवर पहिला राहतो. जेव्हा जेव्हा देवेंद्रजी सत्तेत असतात तेव्हा तेव्हा महाराष्ट्र गुंतवणुकीत नंबर-१ वर राहतो. याशिवाय देवेंद्र फडणवीसांच्याच नेतृत्वात समृद्धी महामार्ग हा देशातील पहिला ग्रीनफिल्ड महामार्ग, ‘अटल सेतू’ हा देशातील सर्वात लांब सागरी सेतू, मुंबई कोस्टल रोड हा देशातील सर्वात पहिला किनारी महामार्ग, असे अनेक इंफ्रास्ट्रक्चर क्षेत्रातले विक्रम साकार होताना दिसत आहेत. सोलापुरातील गृहनिर्माण प्रकल्प सुद्धा देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत आहे. त्यामुळे देवेंद्रजींच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड जमा झाला आहे.
कुठलाही प्रकल्प भव्यदिव्य करायचा, तो भविष्याचा वेध घेऊन डिझाईन करायचा आणि जलदगतीने पूर्णत्वास न्यायचा हे देवेंद्रजींच्या विकासनीतीचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे अन्य नेत्यांच्या तुलनेत कमी काळासाठी सत्ता हाती मिळाली असूनही देवेंद्रजींनी जे अफाट कर्तृत्व सिद्ध केले, ते पाहता महाराष्ट्रातील सर्वच बलाढ्य नेत्यांचे कर्तृत्व देवेंद्रजींच्या कर्तृत्वापुढे खुजे दिसते. कदाचित हेच कारण असावे ज्यामुळे देवेंद्रजी सत्तेत राहू नये यासाठी त्यांचे विरोधक कुठल्याही थराला जाऊन हातमिळवण्या आणि तडजोडी करायचा खटाटोप करत असतात!