काठमांडूत अडकले मराठी पर्यटक आणि धावून आले देवेंद्र बनून संकटमोचक!

“आमची सुटका केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद देवेंद्रजी” ही भावना आहे पनवेल तालुक्यातील कामोठे गावातील ५८ भाविकांची!

झाले असे की, पनवेल तालुक्यातील कामोठे गावातील ३५ महिला व २३ पुरुषांचा एक गट धार्मिक पर्यटनासाठी नेपाळला गेला होता. त्यासाठी त्यांनी राधाकृष्ण ट्रॅव्हल्स कंपनीला जाण्यापूर्वीच पैसेही दिले होते. मात्र लुंबीनी, पोखरा, जनकपुरी, मनोकामना या ठिकाणी दर्शन घेऊन काठमांडूला आल्यावर त्यांना राधाकृष्ण ट्रॅव्हल्सच्या एका बसमध्ये अचानक कोंबण्यात आले. ट्रॅव्हल्स कंपनीने बस मालकाला पैसे दिले नसल्याचे सांगत बसचा मालक अंकित जैस्वाल याने पर्यटकांकडे ६ लाख रुपये भरण्याची मागणी केली. पैसे न भरल्यास कोणालाही सोडणार नाही, अशी धमकीही त्याने दिली. त्यामुळे पर्यटक पूर्णपणे अडकले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पर्यटकांनी महाराष्ट्रातील विविध नेत्यांना संपर्क साधण्याचे प्रयत्न केले. परंतु एकाही नेत्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही.

Marathi Tourist and Devendra Fadnavis
Marathi Tourist and Devendra Fadnavis

अखेर कुठूनतरी पर्यटकांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संपर्क क्रमांक मिळाला आणि त्यांनी आपली आपबिती एसएमएसच्या माध्यमातून देवेंद्रजींना पाठवली. देवेंद्रजींनी मात्र एका साध्या एसएमएसची लगेच दखल घेतली आणि लगेचच त्यांचे खासगी सचिव दिलीप राजूरकर आणि दिल्लीतील स्वीय सहायक मनोज मुंडे यांनी या भाविकांशी संपर्क साधला. देवेंद्रजींच्या टीमने मूळचे नेपाळचे असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे माजी स्वीय सहायक संदीप राणा यांना कळविले. राणा यांनी स्वत: या भाविकांची भेट घेतली व सर्व भाविकांची व्यवस्था करून विशेष बसने त्यांना गोरखपूरला पोहोचविले. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधला होता. त्यामुळे भाविक गोरखपूरला पोहोचल्यावर तेथील जिल्हाधिकारी स्वत: भेटीला आले. त्यांनी दोन दिवस भाविकांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली. त्यांना मुंबईपर्यंत कसे न्यायचे प्रश्न होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून गोरखपूरपासून मुंबईपर्यंत विशेष बोगी जोडण्याची विनंती केली. रेल्वेने त्याप्रमाणे भाविकांसाठी गोरखपूरहून मुंबईपर्यंत रेल्वेची एक बोगी आरक्षित करून दिली.

दोन दिवसांच्या प्रवासानंतर सर्व जण सुखरुपपणे मुंबईला पोहोचले. दोन दिवसांपूर्वी पैश्यांसाठी नेपाळमध्ये ओलीस बनलेले हे मराठी पर्यटक देवेंद्रजींमुळे झालेली सुटका झाल्याने आणि व्हीआयपी वागणुक मिळाल्यामुळे प्रचंड भारावून गेले. देवेंद्रजी आमच्यासाठी अक्षरशः देवदूतच बनून धावून आले, अशी भावना आपल्या घरी सुखरूप पोचलेल्या भाविकांनी व्यक्त केली.

संकटात अडकलेल्या सामान्यांना एक फोन, एक एसएमएस किंवा एका पत्रावर देवेंद्रजींनी तत्काळ मदत करण्याची अनेक उदाहरणे महाराष्ट्राने पाहिली आहेत. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी फक्त एका एसएमएस नंतर अनेकांना तत्काळ वैद्यकीय मदत मिळवून दिली. एकवेळ व्हीआयपींना देवेंद्रजींना भेटता येणार नाही, परंतु जनसामान्यांना मदत करण्यासाठी देवेंद्रजी आणि त्यांची टीम २४ तास कार्यरत असते. कोरोना काळातही देवेंद्रजींच्या टीमने हजारो रुग्णांना बेड्स, ऑक्सिजन आणि रेमेडीसीव्हीर इंजेक्शनसाठी मदत केली. मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी जनसामान्यांसाठी ‘मुख्यमंत्री सहायता कक्ष ‘ सुरु केला आणि तब्बल ५५,००० गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार मिळाले.

Marathi Tourist and Devendra Fadnavis
Marathi Tourist and Devendra Fadnavis

महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असताना आणि मविआ सरकार घरात लपून बसले असताना देवेंद्रजी एकमेव नेते होते, जे प्रत्यक्ष मैदानात उतरले आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आरोग्य व्यवस्था जागरूक करत नागरिकांचा धीर वाढवला. कोकणात आलेल्या महापुरात देवेंद्रजी स्वतः २ दिवस तळ ठोकत पीडितांच्या निवारा व भोजनाची व्यवस्था करत होते.

नैसर्गिक आपत्ती असो, आरक्षणाचे प्रश्न असोत, जातीय-धार्मिक तणाव असो, महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा संकट येते, मराठी माणूस जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात संकटात सापडतो, देवेंद्रजी संकटमोचक बनून धावून येतात, हे महाराष्ट्र गेल्या ९ वर्षांपासून बघतो आहे. त्यामुळे कामोठे गावातील पर्यटकांप्रमाणेच महाराष्ट्रातील सामान्य माणसाच्या मनात देवेंद्रजींबद्दल “तुम रक्षक काहु को डरना” ही भावना आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *