काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला बाहुबली हा चित्रपट आठवतो का? त्यात जसे महिष्मती साम्राज्यातील जनता आपल्या उज्वल भविष्यासाठी अमरेंद्र बाहुबलीच्या प्रतीक्षेत असते, तसेच विदर्भातील जनता आपल्या उज्वल भविष्यासाठी अशाच एका बाहुबलीच्या प्रतीक्षेत होती.
मिहान (MIHAN) मल्टी-मोडलं इंटरनॅशनल कार्गो हब अँड एयरपोर्ट नागपूर. अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाले तर मिहान हे विमान निर्मिती, नागरी उड्डाण, हवाई मालवाहतूक यावर आधारित उद्योग, तसेच आयटी व अन्य सेवा क्षेत्रावर आधारित उद्योगांचे हब आहे. 2002 मध्ये तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने नागपुरात मिहान येणार, विदर्भाचे भाग्य उजळणार, विदर्भातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार, अशा घोषणांनी पार राळ उडवून दिली. त्याकाळात मिहान संदर्भात शाळा, महाविद्यालयांमध्ये मिहानवर सेमिनार्स सुद्धा होऊ लागले. रियल इस्टेट क्षेत्राने उसळी मारली, मिहान परिसरात प्लॉट उपलब्दीची, मिहानमध्ये गुंतवणूक करण्याची प्रॉपर्टी दलालांनी अक्षरशः गावोगावी जाऊन मार्केटिंग केले. सहारा, सत्यम सारख्या कंपन्यांनी बुटीबोरी परिसरात मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्या. 2002 ते 2014 या काळात महाराष्ट्रात 4 मुख्यमंत्री होऊन गेले, प्रत्येक निवडणुकीत ‘नागपुरात मिहान आणू’ ही घोषणा झाली. मात्र मिहान काही आले नाही.
गुंतवणूकदारांचे पैसे अडकून पडले, जनता निराश झाली. शेवटी सगळ्यांनी मिहानची आशा सोडूनच दिली.
मग एंट्री झाली ती देवेंद्र फडणवीसांची. देवेंद्रजींनी 2014 मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि मिहान प्रकल्पासाठी आवश्यक हालचाली सुरु केल्या. कसलाही गाजावाजा न करता देवेंद्रजींनी अवघ्या 4 वर्षात मिहानसाठी आवश्यक असलेले सर्व इन्फ्रास्ट्रक्चर नागपुरात उभे केले.
ते म्हणतात ना “जो बरसते हैं, वो कभी गरजते नहीं।” त्याप्रमाणेच देवेंद्र फडणवीसांनी ना निवडणुकांमध्ये आश्वासन दिले, ना दलालांना मार्केटिंग साठी सोडले मात्र मिहान उभे केले. आज मिहानमध्ये विविध कंपन्यांनी आपले उद्योग उभे केले
अनेक आयटी कंपन्याही मिहानमध्ये आपली कार्यालये थाटत आहेत.
याच मिहान अंतर्गत देवेंद्रजींनी काही दिवसांपूर्वीच इंडमेर एव्हिएशन या खाजगी विमान व हेलिकॉप्टर सेवा कंपनीचे उदघाटन केले. इन्फोसिस या नामांकित आयटी कंपनीचा शुभारंभही देवेंद्रजींच्याच हस्ते काही दिवसांपूर्वी झाला.
ज्या मिहानबद्दल विदर्भातील जनतेने सर्व आशा सोडल्या होत्या, तोच मिहान आज विदर्भातील तरुणांच्या रोजगाराचे प्रमुख केंद्र बनतो आहे. हे शक्य झाले फक्त विदर्भाचा सुपुत्र देवेंद्रजींच्या प्रबळ राजकीय इच्छाशक्तीमुळे.
पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची हुजरेगिरी करून पदरी मंत्रीपदे, शिक्षणसंस्था पाडून घ्यायच्या, एवढाच उद्योग आजवर विदर्भातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला परंतु देवेंद्रजींच्या दबंग नेतृत्वामुळे आज विकासगंगा मुंबई-पुणे-नाशिक पुरती मर्यादित न राहता, मराठवाडा, विदर्भ अशी सर्वत्र दुथडी भरून वाहते आहे
महाराष्ट्रातील जाणिवपूर्वक मागास ठेवल्या गेलेल्या प्रदेशातील जनता ज्या बाहुबलीच्या प्रतीक्षेत होती तो बाहुबली देवेंद्र फडणवीसांच्या रूपाने त्यांना मिळाला आणि आज त्यांचा वर्तमान आणि भविष्य दोन्ही उज्वल होत आहे.