Jica Investment in India : जपानी जायका आणि जादूगार देवेंद्र!

ध्येयवेडी माणसे नेहमीच एकमेकांकडे आकृष्ट होतात. तसेच काहीसे झाले जपानी गुंतवणूकदार आणि महाराष्ट्राचे तरुण तडफदार नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात. जपान हा मेहनती, वक्तशीर, राष्ट्रभक्त आणि लढाऊ बाण्याच्या माणसांचा देश. १९४५ साली दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने केलेल्या अणुहल्ल्यामुळे जपान पूर्णपणे बेचिराख झाले. तरीही लढाऊ जपानने आपल्या अफलातून तंत्रज्ञानाच्या मदतीने पुन्हा एकदा जगात आपले प्रभुत्व प्रस्थापित केले. २०११ सालच्या प्रलयंकारी सुनामीनंतरही जपान पुन्हा उठून उभा राहिला. असा हा प्रचंड मेहनती आणि महत्वाकांक्षी देश आपली पै अन पै अगदी मोजून मापून गुंतवतो. असे असताना सुद्धा जपानने २०१४ नंतर महाराष्ट्रात १ लाख २२ हजार कोटीहून अधिकची गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात केली, याचे एकमेव कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस!

Devendra Fadnavis Japan Tour
Devendra Fadnavis Japan Tour

खरंतर भारत आणि जपानचे फार प्राचीन आणि सांस्कृतिक नाते. जपान जर उगवत्या सूर्याचा देश आहे तर भारत हजारो वर्षांपासून उगवत्या सूर्याला अर्घ देणारा सूर्यपूजकांचा देश आहे. जपानमध्ये प्रचलित झालेला बौद्ध धर्माचा जन्मही भारतातच झाला. त्यामुळे अजिंठा-वेरूळ सारख्या भारतातील अनेक पवित्र स्थळांबद्दल जपानला प्रचंड आस्था आहे. भारत मातेचे थोर सुपुत्र नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जेव्हा ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा उभारला, तेव्हा जपानेच त्यांना ‘आझाद हिंद सेनेची’ स्थापना करण्यासाठी सहकार्य केले. त्यामुळे भारत आणि जपानचे केवळ व्यापारीच नव्हे तर सांस्कृतिक व सामरिक संबंध सुद्धा दृढ आहे.

Devendra Fadnavis Japan Tour

२०१४ साली देशात आणि महाराष्ट्रात सत्तांतर झाले, मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले आणि देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्र-जपान या मैत्रीच्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली. याच अध्यायातील दोन प्रमुख पात्र म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि जपान इंटरनॅशनल कार्पोरेशन एजन्सी अर्थात जायका (JICA). २०१४ साली महाराष्ट्राच्या सत्तेची सूत्रे हाती घेताच देवेंद्रजींनी महाराष्ट्रात जगभरातून गुंतवणूक खेचून आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. केंद्रात मोदीजींचे सरकार असल्याने त्यांना केंद्राकडून भक्कम पाठबळही मिळाले. त्याच जोरावर देवेंद्रजींनी ३ महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले, ते म्हणजे बुलेट ट्रेन, मेट्रो आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंक रोड. तीनही प्रकल्प जवळपास अश्यक्यप्राय वाटत होते. ६० दशकांहून अधिक काळ सत्तेत राहूनही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने या प्रकल्पांना हात घालण्याची हिंमत केली नाही. परंतु तरुण तडफदार देवेंद्रजींनी हे आव्हान स्वीकारले आणि तीनही प्रकल्पांसाठी लागणारे फंडिंग आणि तंत्रज्ञान यासाठी जगभरात आपल्या उच्यतम तंत्रज्ञानाने ख्यातनाम असलेल्या जपानची निवड केली आणि इथून देवेंद्रजी आणि जयकाचे मैत्रीचे नाते बहरत गेले.

Devendra Fadnavis Japan Tour

२०१५ पासून मुंबईतील महत्वकांक्षी प्रकल्प तडीस नेण्यासाठी देवेंद्रजींनी सतत जायका अधिकाऱ्यांशी संवाद सुरु ठेवला. जपानी जायका आणि महाराष्ट्र सरकारच्या MMRDA च्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील इन्फ्रास्ट्रक्चरचा कायापालट व्हायला सुरुवात झाली. १७ मार्च २०१७ रोजी जायका आणि MMRDA मध्ये करार होऊन जायकाने सरकारला गुंतवणुकीचा ७३१० कोटींचा पहिला हफ्ता दिला आणि एकाच मुंबईत एकाच वेळी बुलेट ट्रेन, मेट्रो-३ व MTHL प्रकल्पांना सुरुवात झाली. मेट्रो प्रकल्पासाठी जायकाने महाराष्ट्रात आजवर तब्बल १५,००० कोटींची गुंतवणूक केली. २०१५ साली देवेंद्रजींनी जपानचा दौरा करून महाराष्ट्रातील MTHL व मेट्रो-३ प्रकल्पांसाठी गुंतवणूक आणली होती. जपानमधील ओसाका विद्यापीठाने देवेंद्रजींना ‘डॉक्टरेट’ ही मानद पदवीही दिली होती. नागपूर शहरानजीक कामठी येथे १९९५ साली जपानच्या मदतीने भव्य ड्रॅगन पॅलेस टेम्पलनिर्माण झाले होते. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी परिसराचा विकास करण्याकरिता ७५ कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्यामुळे जपान आणि देवेंद्रजींची मैत्री फार जुनी आणि घट्ट आहे. २०१९ मध्ये जेव्हा महाराष्ट्रात वसुली सरकार सत्तेत आणि आले आणि देवेंद्रजी विरोधी पक्षनेते बनले, तेव्हाही जायकाचे अधिकारी मुख्यमंत्र्यांऐवजी देवेंद्रजींच्या भेटीला येत असत.

Devendra Fadnavis Japan Tour

२०१९-२०२२ या ठाकरे सरकारच्या कार्यकाळात मेट्रो, बुलेट ट्रेन, MTHL या सर्वच प्रकल्पांची गती मंदावली. परंतु देवेंद्रजींनी सत्तेत परतताच सर्व कामांना गती दिली. MTHL तर या वर्षा अखेरीस वाहतुकीस खुला होणार आहे. बुलेट ट्रेन मार्गासाठी ९९% भूसंपादन पूर्ण झाले आहे. त्यामुळे जपानने महाराष्ट्रावर दाखवलेल्या विश्वासाला वसुली सरकारच्या काळात प्रकल्पांना मिळालेल्या स्थगित्यांमुळे तडा जाऊ नये म्हणून देवेंद्रजींनी नुकताच ५ दिवसांचा दौरा करत जपानी गुंतवणूकदारांच्या मनातील सर्व शंकांचे समाधान केले. या दौऱ्यात सुद्धा देवेंद्रजींनी इंफ्रास्ट्रक्चर क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकी आणली. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पानंतर जायका आता वर्सोवा-विरार सी लिंक या ४४ किमी अंतराच्या जगातील दुसऱ्या सर्वाधिक लांबीच्या सागरी सेतूच्या निर्माणकार्यात गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पामुळे संपूर्ण पश्चिम उपनगरीय मुंबई सुपरफास्ट कनेक्टीव्हीटीने जोडली जाणार आहे. याच सोबत मेट्रो-११ प्रकल्पाबद्दल सुद्धा जपानने अनुकूलता दाखवली आहे. त्याच सोबत नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन-२ चा आराखडा सुद्धा तयार झाला असून आवश्यक मंजुऱ्यांसाठी केंद्राकडे गेला आहे. जपानने पावसाचे पाणी रस्त्यांवर तुंबू न देता ते भूगर्भात साठविण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. तेच तंत्रज्ञान मुंबईत वापरून मुंबईची तुंबई होण्यापासून मुंबईकरांची कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी देवेंद्रजींनी MFMP अर्थात मुंबई पूर निवारण प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा जायकाला राजी केले आहे. त्यामुळे जायकाच्या मदतीने देवेंद्रजी सामान्य मुंबईकरांचे आयुष्य अधिक सुखकर बनविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. याशिवाय मित्सुबिशी, निपॉन सारख्या अन्य कंपन्याही महाराष्ट्रात पर्यावरण पूरक इंधन निर्मिती व माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणार आहेत. त्यामुळे येत्या ४-५ वर्षात देवेंद्रजींच्या नेतृत्वात आणि जपानच्या सहकार्याने एक फ्युचर रेडी नवा महाराष्ट्र जगाला बघायला मिळेल!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *