राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २० ऑगस्ट पासून ५ दिवसीय जपान दौऱ्यावर जात आहेत. महाराष्ट्राच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण या दौऱ्यात महाराष्ट्र व जपान सरकारमध्ये अनेक महत्वपूर्ण करार होणार असून देवेंद्रजी जपानहून महाराष्ट्रासाठी काय आणतात याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे.
दुसरी महत्वाची बाब म्हणजे, जपान सरकारने देवेंद्रजींना ‘गेस्ट ऑफ स्टेट’ म्हणजेच विशेष शासकीय अतिथीचा सन्मान दिला आहे. खरं म्हणजे हा सन्मान फक्त एखाद्या देशाचे पंतप्रधान अथवा परराष्ट्र मंत्र्यांनाच दिला जातो. परंतु २०१३ मध्ये देशाचे वर्तमान पंतप्रधान व गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे अपवाद ठरले होते. एका राज्याचे मुख्यमंत्री असूनही जपानने मोदीजींना हा सन्मान दिला होता. त्यानंतर २०१५ मध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनाही स्टेट गेस्ट म्हणून गौरविण्यात आले होते. त्यामुळे महाराष्ट्राला जपानकडून हा सन्मान दोनदा मिळतो आहे, ही बाब प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद आहे.
२०१५ मध्ये जेव्हा देवेंद्रजी जपानला गेले होते तेव्हा त्यांनी तेथील कोयासन विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. एवढेच नव्हे तर जपानमधील ओसाका विद्यापीठाने देवेंद्रजींना मानद डॉक्टरेट पदवीही दिली होती. त्यामुळे यंदाच्या दौऱ्यात जपान देवेंद्रजींचे कसे स्वागत करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
जपान आणि देवेंद्रजी यांचे विशेष नाते आहे. देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या चाणाक्ष परराष्ट्र नितीमुळे २०१४ नंतर देशात परकीय गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात येऊ लागले. २०१४-२०१९ या काळात देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत सातत्याने पहिल्या क्रमांकावर होता. याच काळात महाराष्ट्रात मेट्रो, बुलेट ट्रेन, शिवडी-नाव्हाशेवा ट्रान्स हार्बर लिंक सारख्या हायटेक इंफ्रास्ट्रक्चर प्रकल्पांना सुरुवात झाली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी तर जपानने महाराष्ट्र सरकारला अवघ्या ०.१% व्याज दरात तब्बल 88,000 कोटी रुपये दिले. देवेंद्रजी मुख्यमंत्री असल्याने प्रकल्पांसाठी आवश्यक असणाऱ्या मंजुऱ्या, भूसंपादनातील विषय देवेंद्रजींनी अत्यंत वेगाने आणि पारदर्शीपणे सोडविले आणि तेव्हापासूनच जपानच्या मनात देवेंद्रजींबद्दल एक मैत्रीपूर्ण विश्वास निर्माण झाला. जायका सारख्या कंपनीने एजन्सीने मेट्रो प्रकल्पात १५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. परंतु २०१९ मध्ये जनादेशाची हत्या करून वसुली सरकार सत्तेत आले आणि राजकीय असूयेने पछाडलेल्या उद्धव ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी प्रकल्पांना स्थगिती देण्याचा सपाटाच लावला. त्यामुळे बुलेट ट्रेनसाठी आवश्यक असलेले भूसंपादन थांबले, ट्रान्सहार्बर लिंक रोडचे काम थंडावले आणि मेट्रो प्रकल्पाची किंमत तब्बल १०,००० कोटींनी वाढली. परंतु या हि काळात आपल्याला आठवत असेल तर जपानी राजदूत आणि जायकाचे अधिकारी देवेंद्रजी विरोधी पक्षनेते असूनही त्यांच्या भेटीला येत असत. पुढे ३० जून २०२२ रोजी देवेंद्रजी उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा सत्तेत आले आणि त्यांनी ठाकरे सरकारने अडवून ठेवलेल्या विकास कामांना गती दिली. त्याचीच परिणीती म्हणून समृद्धी महामार्ग, मेट्रो-७ आणि मेट्रो-२ (अ), पुणे मेट्रो हे प्रकल्प पूर्ण होऊन पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते त्यांचं लोकार्पण झालं. ट्रान्सहार्बर लिंकही डिसेंबर अखेरपर्यंत खुला होईल. बुलेट ट्रेनचेही अवघ्या ११ महिन्यात ९९% भूसंपादन पूर्ण झाले असून २८ पैकी २३ कंत्राटी कामांचे करारही पूर्ण झालेले आहेत.
देवेंद्रजी आणि जपान यांच्यात आणखीही एक समान धागा आहे, तो म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर!
१९९९ मध्ये नागपूरमधील कामठी येथे भव्य ‘ड्रॅगन पॅलेस टेम्पलचे’ निर्माण झाले. या मंदिराच्या निर्माणासाठी जपानच्या ओगावा सोसायटी या धर्मादाय ट्रस्टने मोठ्या प्रमाणात निधी दिला. परंतु तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने १५ वर्षात आसपासच्या परिसराचा मात्र विकासच केला नाही. परंतु देवेंद्रजी मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या विकासासाठी तब्बल ७५ कोटींचा निधी दिला. एवढेच नव्हे तर नागपूर-कामठी रस्त्याचे चौपदरीकरण व काँक्रिटीकरणही केले. त्यामुळे जगभरातून बौद्ध बांधव या मंदिराला भेट देण्यासाठी येतात.
त्यामुळे देवेंद्रजी आणि जपान यांच्यातील मैत्री केवळ राजकीयच नव्हे तर धार्मिक व अध्यात्मिक नात्याचीही झालर आहे. कारण जपानी लोक फार चोखंदळ असतात. ते चटकन कुणावर विश्वास ठेवत नाही. परंतु गेल्या ८ वर्षांपासून देवेंद्रजींनी आपल्या पारदर्शी कारभारातून जपानी माणसाच्या मनात एक विश्वास निर्माण केला आहे. देवेंद्रजींच्या २०१५ च्या दौऱ्याप्रमाणे यावेळीही महाराष्ट्र आणि जपानमध्ये पायाभूत सुविधा, आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक अशा अनेक क्षेत्रातील प्रकल्पांसाठी करार होणार आहे. महाराष्ट्रात सुरु असलेल्या इंफ्रा-प्रकल्पांनासुद्धा बूस्टर डोज मिळणार आहे. म्हणूनच देवेंद्रजी जपानमधून महाराष्ट्रासाठी काय काय आणतात, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागलेले आहे!