३० जून २०२२ रोजी महाभ्रष्ट तिघाडीचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करत देवेंद्र पुन्हा सत्तेत आले, ते राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून. २०१४-२०१९ या काळात मुख्यमंत्री पद भूषविणारे देवेंद्र फडणवीस, २०१९-२०२२ या काळात ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढत विरोधी पक्षनेते पदाची कारकीर्द गाजविणारे देवेंद्र फडणवीस आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एक कॉमन फॅक्टर आहे तो म्हणजे राज्याची ‘कायदा आणि सुव्यवस्था’ हा विषय देवेंद्रजींसाठी कायम टॉप प्रायोरिटीवर असतो. मग मुख्यमंत्री म्हणून पोलीस खात्यात त्यांनी केलेले रिफॉर्म्स असो, विरोधी पक्षनेते असताना पोलीस खात्यातील गैरप्रकारांवर त्यांची असलेली करडी नजर असो किंवा वर्तमान सरकारमध्ये गृह खाते सांभाळत असताना पोलीस खात्याला स्मार्ट, एफिशिएंट आणि हायटेक करण्यासाठी त्यांनी सुरु केलेले प्रयत्न असो, गुंतवणूकदारांसाठी कायम पहिली पसंती असलेल्या महाराष्ट्रात कायम कायद्याचे राज्य राहावे, जनसामान्यांना कायम पोलिसांचा आधार राहावा आणि गुन्हेगारांवर वचक रहावी यासाठी देवेंद्र फडणवीस कायम प्रयत्नशील असतात.
२०१४-२०१९ काळात देवेंद्रजींनी संपूर्ण मुंबईत सीसीटीव्ही कॅमेर्यांचे जाळे विणले, ज्याचे परिणामस्वरूप मुंबई दहशतवाद मुक्त बनली आणि गुन्हेगारीला आळा बसला. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात देवेंद्रजींनी राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व भोवतालचा परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आणण्याची घोषणा केली. त्यामुळे अलीकडच्या काळात शैक्षणिक परिसरांमध्ये घडणाऱ्या अनुचित घटना व अमली पदार्थ्यांची विक्री याला मोठ्या प्रमाणात आळा बसेल.
राज्यात तब्बल १८,००० पदांसाठी पोलीस भरती जोरात सुरु असतानाच देवेंद्रजींनी राज्यभरात अनेक नव्या पोलीस स्थानकांना मंजुरी दिली. ज्यामध्ये मुंबई ८, पुणे ग्रामीणसाठी ५ नव्या पोलीस स्थानकांचा समावेश आहे. लोकसंखेची गरज समजून घेऊन मिरा-भाईंदर आणि वसई-विरार स्वतंत्र पोलिस आयुक्तालय निर्माण केले. ठाणे ग्रामीण आणि पालघर पोलिस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्राचे विभाजन केले. नवीन पोलिस आयुक्तालयासाठी ४ हजार ७०८ पदभारती करण्याचा निर्णय घेतला. इतकेच नव्हे तर छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक गड-किल्ल्यावरही नव्या पोलीस स्थानकांना मंजुरी देण्यात आली आहे, ज्यामुळे गड-किल्ल्यांवर घडणारे अनुचित प्रकार व अतिक्रमणांना आळा बसणार आहे. पदभरतीच्या माध्यमातून पोलीस खात्यामध्ये नवीन रक्ताला वाव देत, नवी पोलीस स्थानके निर्माण करून राज्यातील जनतेला भयमुक्त वातावरण देण्यासाठी देवेंद्र सातत्याने प्रयत्न करत आहेत.
आघाडी सरकारच्या काळात अहोरात्र डोळ्यात तेल घालून महाराष्ट्राची सुरक्षा करणाऱ्या पोलीस बांधवांची तुटपुंज्या वेतनाअभावी आर्थिक परिस्थिती किती बिकट बनली होती हे अवघ्या महाराष्ट्राने पाहीले होते. पोलीस वसाहतींबद्दल तर बोलायलाच नको, नरकही बरा वाटावा अशा परिस्थितीत पोलिसांचा परिवार राहात होता. अशा अवस्थेत कर्तव्य निभावताना पोलिसांवर प्रचंड तणाव असायचा आणि त्यांचे मानसिक खच्चीकरणही व्हायचे. परंतु देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनल्यावर त्यांनी पोलीस बांधवांसाठी Police DG loan scheme सुरु केली, ज्या घरासाठी पोलिसांनी डिपार्टमेंटमधूनच २० लाख रुपयांपर्यंतचे सुलभ कर्ज मिळायला सुरुवात झाली. पुढे मविआ सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी ही योजना बंद केली. परंतु देवेंद्र फडणवीसांनी आता ही योजना पुहा नव्याने सुरु केली. इतकेच नव्हे तर फडणवीसांनी राज्यभरातील पोलीस वसाहतींना सुद्धा गती देण्याचे निर्देश दिले. BDD चाळ पुनर्वसन प्रकल्पात पोलिसांना अवघ्या १५ लक्ष रुपयात घरे देण्याचा निर्णय सुद्धा देवेंद्रजींनी नुकताच घेतला आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पोलीस केवळ बलाढ्यच नव्हे तर हायटेकही बनते आहे. आतंकवादी व नक्षली कारवायांवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र सायबर इंटेल युनिटची स्थापना केली जाणार आहे. हे युनिट सर्वप्रकारच्या गुन्ह्यांसाठी त्वरित प्रतिसाद देण्याचे काम करणार आहे. याशिवाय CCTN म्हणजेच क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्कही निर्माण केले जात आहे ज्या माध्यमातून राज्यातील गुन्हेगारीला मोठा आळा बसणार आहे. आता महाराष्ट्र पोलिसांच्या सोशल मीडिया माध्यमांचा वापर करून फेसबुक, व्हाट्सअप ट्विटरवरूनही तक्रार देणे शक्य होणार आहे.
महाराष्ट्र पोलीस सुपर स्मार्ट बनणार आहे ते AIMBS तंत्रप्रणालीमुळे. ही प्रणाली राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे. AIMBS म्हणजेच ऑटोमेटेड मल्टीमोडाल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीममुळे फिंगर प्रिंट स्कॅनिंग एक मोठा अविष्कार घडविणार असून बोटांच्या ठश्यांवरून गुन्हेगाराची ओळख करण्याची कारवाई अत्यंत जलद आणि अचूक होणार आहे.
एकीकडे मेगापदभरती, दुसरीकडे पोलिसांचे मनोबल व कौटुंबिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी विविध योजना आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रे व तंत्रज्ञानाचा वापर करून देवेंद्रजींनी पोलीस खात्याचा कायापालट करण्याचा दृढ संकल्पच केला आहे. देवेंद्रजींनी पोलीस खात्यात सुरु केलेल्या रिफॉर्म्सची परिणीती एका वाक्यात सांगायची झाल्यास ती अशीच सांगावी लागेल…
“देवेंद्रच्या राज्यात कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल!”